या वेळी सोसायटीच्या बागेतला बहावा चांगलाच बहरला होता. दरवेळी दुरुन फोटो काढायचो. पण यावेळी जवळून फोटो काढले. नेमकी सकाळी प्रचंड वारे सुटले होते त्यामुळे फुले अस्ताव्यस्त वाटत होती.
पुण्यात कर्वेनगर मधे युनायटेड वेस्टन सभागृहाच्या जवळ एक बहाव्याचे झाड आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमधे भरघोस फुलांनी लगडलेले झाड बघायला फार बरे वाटते.
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
21 Jun 2018 - 4:54 pm | यशोधरा
हे काय, दोनच फोटो? बहाव्याचा बहर दाखवणारा एक पूर्ण फोटो तरी हवा होता की!
हे फोटोही सुरेख आहेत पण बहाव्याच्या सौंदर्याची पूर्ण कल्पना देत नाहीत.
21 Jun 2018 - 5:49 pm | चौथा कोनाडा
+१
बहाव्याचा बहर दाखवणारा एक पूर्ण फोटो तरी हवा !
21 Jun 2018 - 7:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे घ्या, एकावर एक फोटो फ्री... :)
22 Jun 2018 - 11:08 am | चौथा कोनाडा
वाह, क्या बात हैं ! वेगळ्या अॅन्गलने काढलेले फोटो !
मस्त, डॉ. साहेब !
22 Jun 2018 - 5:59 pm | यशोधरा
मस्त!!
21 Jun 2018 - 5:10 pm | ज्ञानोबाचे पैजार
पुण्यात कर्वेनगर मधे युनायटेड वेस्टन सभागृहाच्या जवळ एक बहाव्याचे झाड आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमधे भरघोस फुलांनी लगडलेले झाड बघायला फार बरे वाटते.
पैजारबुवा,
22 Jun 2018 - 8:34 am | चांदणे संदीप
बहाव्याची फुलं गुच्छातच चांगली दिसतात. जणू गळ्यातला पिवळाधमक सोन्याचा साज. आणि सोबत गुलमोहोराचे झाड असेल तर क्या कहने!
Sandy
22 Jun 2018 - 11:45 am | टर्मीनेटर
सुंदर. गेल्या आठवड्यात नर्सरीतून बहावाचे रोप आणून आमच्या फार्महाउस वर लावलंय. बघू आता किती महिने वा वर्षांनी फुले येतात ते.
23 Jun 2018 - 10:58 am | मदनबाण
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Boudi Sopner Sundori... ;)
23 Jun 2018 - 12:14 pm | नाखु
हे नाव कसं पडलं असावं एक उत्सुकता आहे.
बहावाची वाहवा याची देही याची डोळा पाहीलेला नाखु
23 Jun 2018 - 5:10 pm | शाली
वाहवा मस्तच. हेच नाव वापरणार ईथून पुढे. याला अमलतासही म्हणतात.