कुलदिपक भाग ४

विप्लव's picture
विप्लव in जनातलं, मनातलं
19 Jun 2018 - 12:49 am

मेघा आणि शर्मिष्ठाचा आतेभाऊ एकमेकांकडे टक लावून पहात असतात अगदि भान हरपून, इतकं की त्यांना भोवतालच्या जगाचा विसर पडतो.
"अरे काय पाहतोयस असा वेड्यासारखा?" शर्मिष्ठेच्या प्रश्नाने दोघेही भानावर आले.
" अग काही नाही . पण तू कितीवेळ करतीयेस? केव्हाचा थांबलोय मी? जायचयं ना आपल्याला आज पुण्याला? तुझं नटनं मुरडणं झालं असेल तर निघायच का ?" आपण पकडले गेलो म्हणून तो मनातून ओशाळला होता, पण त्याचा तसूभरही लवलेश चेहर्यावर जाणवू न देता उलट शर्मिष्ठेवर प्रश्नांची सरबत्ती चालू केली. ह्या सगळ्यात मेघावर चोरून कटाक्ष टाकायला मात्र विसरला नाही हं.
आणि मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. ' अरे कसली जबरदस्त संधी चालून आलीए मला शमूला गोड बोलून घोळात घ्यायलाच हवं त्याशिवाय या स्वप्न परीची माहिती मिळणार कशी?' याच आपल मनात संभाषण चालू असतं. शर्मिष्ठेच्या बडबडीकडे लक्ष न देता ह्याच आपल चालूच असत मेघाच्या सौंदर्याची नेत्र दिपाने पुजा करणं की एकदम शर्मिष्ठाच्या वाक्यानी तो भानावर येतो.
" अरे काय रे तुझी आल्या आल्या भूणभूण चालूए? अरे माझ्या मैत्रिणी बरोबर थोड बोलू तरी दे. चल ग मेघा आपण माझ्या रूममध्ये जाऊ. हा दादुल्याना फार दुष्ट आहे आपल्याला बोलू नाही देणार."
' अरे ही कुठ वरती कडमडायला निघालीए? नाही नाहि काहिही करून आज हिच्या मैत्रिणीची इतंभूत माहिती मिळवणारच. विक्या लेका हा चान्स सोडून नाही चालणार.'
आत्ता आलं ना लक्षात मंडळी 'हा' दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या कथेचा हिरो विकी आहे. तर--
" अग तस नाही शमूडी, अग वेळ होतोय ना आपल्याला म्हणून म्हणालो आणि हे काय आमचीही ओळख करून दे ना तुझ्या मैत्रिणी सोबत. अग मलाही एकट्याला बाहेर बसून खूप बोअर होतय. तेव्हढाच माझाही वेळ जाईल ना."
" अरे हो सॉरी दादा मी विसरलेच. ही मेघा माझी बालमैत्रिण. आम्ही दोघी एकाच शाळेत शिकलो. एकत्र खेळलो, वाढलो. ही मला माझ्या बहिणीसारखीच म्हण ना आणि मेघा हा आहे माझ्या लहान आत्याचा मुलगा ' विक्रांत ' पुण्याला असतो इंजिनियरींगला. आत्ता सुट्टीला आलेला गावी, परत निघालाय पुण्याला. मला सोबत म्हणून थांबलाय नाहीतर कालच जाणार होता. माझी मोठी आत्या आहे ना तिच्याकडे चाललीय ना मी." शर्मिष्ठाने दोघांची ओळख करुन दिली.
" बर पोरांनो तुम्ही आत जाऊन गप्पा मारत बसा तोवर मी तुमच्यासाठी काहितरी खायला करते." नलू काकूंनी आपला मोर्चा परत मुदपाकखान्याकडे वळवला.
" हो चालेल मामी, तसही दिड तास आहे अजून आम्हाला निघायला तोवर आम्ही बोलत बसतो. तू मस्त काहीतरी खायला कर पोटात कावळे ओरडत आहेत." विकी बोलतच असतो की शर्मिष्ठा त्याच्याकडे संशयाने पहात विचारते. " अरे व्वा मगाशी तर मला डाफरत होता वेळ होतोय म्हणून मग आत्ता कुठून आला रे वेळ?"
झाल तंतरली आपल्या हिरोची जाम. कसाबसा शब्दांची जुळवा जुळव करत तो म्हणतो " अगं तसं नाही, तुझी मैत्रिण भेटलीए ना तुला, अनं तुझ पुण्यात एडमिशन झाल की मग तुम्हाला भेटायला क्षशमिळेल न मिळेल म्हणून म्हणालो. नाहीतर उगाच मला 'दोस्ती का दुश्मन' ' विरहास कारणीभूत ' असली विशेषणं लावून तुम्ही दोघी मला व्हिलन ठरवून मोकळ्या व्हाल नं. मग मी बापडा काय करणार?" उगाच उसना निरागसपणा आणत विकीने दोन्ही गाल फुगवले.
'अय्या किती ती निरागसता! किती तो बालिशपणा! किती ते बोलके डोळे! नुसतं पाहतचं रहावसं वाटतय.' आपली मेघा तर वेगळ्याच दुनियेत गेली. तर इकढशडे शर्मिष्ठाच्या डोक्यात काय चालूए. ' काय ते ध्यान! असा का वेड्यासारखा वागतोय हा? जाऊ दे आपल्याला काय? आपण मस्त गप्पा हाणू.'
" हेलो मेघा, शमूने तर आपली ओळख करुन दिलीयं. मग फ्रेंडस् ?" अस म्हणत विकीने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. आता मात्र मेघा पुरती बावरली. एकदम अनपेक्षित होत तिच्यासाठी.
' काय करावं ? हात पुढं करावा की नको? आपला तर एकही मित्र नाही, आहेत त्या सगळ्या मैत्रिणीच. कधी कुठल्या मुलासोबत धड बोलले ही नाही. अनं ह्याला तर चक्क मी दम दिला होता. काय करु? शमूचा भाऊ आहे हा आणि तसा बोलण्यावरुन. पण शहरात राहणारा आहे हा अनं मी खेड्यातली. त्याला आवडेन का मी? छे काय हा वेडा विचार मनात डोकावला माझ्या. पण खरचं पाहताक्षणी मनात भरण्यासारख व्यक्तिमत्व आहे त्याच. मग चान्स घ्यायला काय हरकत आहे? मैत्रिच करत आहे, प्रेमात थोडीच पडतेय. '
ह्या विचारासरशीच मेघा लाजली. तिच्या गोबर्या गालावर गोड खळी उमटली. तिच्या गालावर लाजेची लालिमा पसरली आणि तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली.
झालं खेळ खल्लास, तिच्या या आरक्त मुखाकडे पाहताक्षणी विकी स्वप्नांच्या राज्यात हरवून गेला. तिच्या गोड खळीच्या डोहात मनसोक्त डुंबू लागला. आणि शमू मात्र दोघांकडे आळिपाळीने पहात बसली. तिला काय चाललयं तेच कळेना.
शर्मिष्ठेला या होऊ घातलेल्या नवरुजित प्रेमाची चाहुल लागणार का?.....

- क्रमशः
(विप्लव)

कथालेखविरंगुळा