जयपूर दिल्ली आग्रा ट्रिप - मदत माहिती हवी आहे

Primary tabs

बारक्या_पहीलवान's picture
बारक्या_पहीलवान in भटकंती
7 Jun 2018 - 5:44 pm

नमस्कार मंडळी,
जुलैच्या सुट्टीत जयपूर दिल्ली आग्रा फॅमिली ट्रिप चा प्लॅन आहे. रेल्वे ने दिल्ली ला जाणार.
जाणार:- नाशिक-दिल्ली आग्रा जयपूर दिल्ली - नाशिक
दिवस :- ४ ते ५ दिवस
फॅमिली:- ६ मोठे पॅरेण्टसह, लहान ४

प्रतिक्रिया

१)ताजमहाल शुक्रवार बंद असतो.
२)दिल्लीला राहून आग्रा दर्शन परत, जयपूर दर्शन परत अशामध्ये दमायला होईल.
३)नाशिक - दिल्ली जाण्यासाठी एर्नाकुलम -निझामुद्दीन मंगला एक्सप्रेस पावसाळ्यात बेभरवशाची आहे. कोकणरेल्वेमार्गे येते।

शंकासुर's picture

8 Jun 2018 - 12:07 am | शंकासुर

रेल्वेने खूप वेळ प्रवासातच जातो आणि वरून थकवा येतो. त्यापेक्षा साधारण एक दीड महिना अगोदर विमानाचं बुकिंग केलं तर ते रेल्वेच्या AC क्लास एवढंच पडतं.

राघवेंद्र's picture

8 Jun 2018 - 1:24 am | राघवेंद्र

नाशिक ते राजा की मंडी (आग्रा ) - ताज महाल
आग्रा ते जयपूर (इंटरसिटी एक्स्प्रेस) -
जयपूर -दिल्ली ( डबल डेकर )
दिल्ली - मनमाड (कर्नाटक एक्सप्रेस)

आलमगिर's picture

8 Jun 2018 - 1:44 am | आलमगिर

मला फोन करा ९९८७८१०९५१
प्रणव जोशी माझा पर्यटनाचाच व्यवसाय आहे.

विअर्ड विक्स's picture

9 Jun 2018 - 12:23 am | विअर्ड विक्स

जयपूर दीड दिवसात कव्हर होऊ शकते. ३ किल्ले नि हवा महल सिटी museum होऊ शकते. संध्याकाळी ५-६ च्या सुमारास शताब्दीने दिल्ली परत. उन्हाळयात दिल्ली नि जयपूर ट्रिप उन्हामुळे त्रासदायक होऊ शकते.

आग्रा ताजमहाल उन्हात बघणे दिव्य आहे. दिल्ली - आग्रा एक्सप्रेस हाय वे चा अनुभव जरूर घ्या . मुंबई पुणे हाय वे पेक्षा मस्त सरळसोट रस्ता .

**जुलैच्या सुट्टीत जयपूर दिल्ली आग्रा फॅमिली ट्रिप चा प्लॅन आहे. रेल्वे ने **

प्रश्न असाच आहे म्हणून त्यातीलच पर्याय देत आहे.
मथुरा ठीक पण वृंदावन गोकुळ केवळ धार्मिक भाविक ज्येष्ठांच्यासाठी आहे.
खरं म्हणजे दिल्ली मुद्दाम हून जाऊ नयेच. पुढे शिमला/नैनिताल/कश्मिर/ऋषीकेश निमित्ताने दिल्लीचा स्टॉप येताजाता माथी पडणारच आहे तेव्हा पाहावे.
नवीदिल्लीतील - पहाडगंज - गिजरे टुअरस यांचे पुण्यातही बुकिंग होते.

चौकटराजा's picture

10 Jun 2018 - 8:52 am | चौकटराजा

सिटी पॅलेस पाहू नका . आमेर किल्यावर हत्तीवरून कशाला जायचे ? पायी जाणे सोपेच आहे !

विअर्ड विक्स's picture

10 Jun 2018 - 11:23 am | विअर्ड विक्स

आजकाल हत्ती नाही बॅटरी operated गाड्या आहेत . जल महल संध्याकाळीच बघा .