Skip to main content

जयपूर दिल्ली आग्रा ट्रिप - मदत माहिती हवी आहे

लेखक बारक्या_पहीलवान यांनी गुरुवार, 07/06/2018 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, जुलैच्या सुट्टीत जयपूर दिल्ली आग्रा फॅमिली ट्रिप चा प्लॅन आहे. रेल्वे ने दिल्ली ला जाणार. जाणार:- नाशिक-दिल्ली आग्रा जयपूर दिल्ली - नाशिक दिवस :- ४ ते ५ दिवस फॅमिली:- ६ मोठे पॅरेण्टसह, लहान ४

वाचने 5266
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

१)ताजमहाल शुक्रवार बंद असतो. २)दिल्लीला राहून आग्रा दर्शन परत, जयपूर दर्शन परत अशामध्ये दमायला होईल. ३)नाशिक - दिल्ली जाण्यासाठी एर्नाकुलम -निझामुद्दीन मंगला एक्सप्रेस पावसाळ्यात बेभरवशाची आहे. कोकणरेल्वेमार्गे येते।

रेल्वेने खूप वेळ प्रवासातच जातो आणि वरून थकवा येतो. त्यापेक्षा साधारण एक दीड महिना अगोदर विमानाचं बुकिंग केलं तर ते रेल्वेच्या AC क्लास एवढंच पडतं.

नाशिक ते राजा की मंडी (आग्रा ) - ताज महाल आग्रा ते जयपूर (इंटरसिटी एक्स्प्रेस) - जयपूर -दिल्ली ( डबल डेकर ) दिल्ली - मनमाड (कर्नाटक एक्सप्रेस)

जयपूर दीड दिवसात कव्हर होऊ शकते. ३ किल्ले नि हवा महल सिटी museum होऊ शकते. संध्याकाळी ५-६ च्या सुमारास शताब्दीने दिल्ली परत. उन्हाळयात दिल्ली नि जयपूर ट्रिप उन्हामुळे त्रासदायक होऊ शकते. आग्रा ताजमहाल उन्हात बघणे दिव्य आहे. दिल्ली - आग्रा एक्सप्रेस हाय वे चा अनुभव जरूर घ्या . मुंबई पुणे हाय वे पेक्षा मस्त सरळसोट रस्ता .

**जुलैच्या सुट्टीत जयपूर दिल्ली आग्रा फॅमिली ट्रिप चा प्लॅन आहे. रेल्वे ने ** प्रश्न असाच आहे म्हणून त्यातीलच पर्याय देत आहे. मथुरा ठीक पण वृंदावन गोकुळ केवळ धार्मिक भाविक ज्येष्ठांच्यासाठी आहे. खरं म्हणजे दिल्ली मुद्दाम हून जाऊ नयेच. पुढे शिमला/नैनिताल/कश्मिर/ऋषीकेश निमित्ताने दिल्लीचा स्टॉप येताजाता माथी पडणारच आहे तेव्हा पाहावे. नवीदिल्लीतील - पहाडगंज - गिजरे टुअरस यांचे पुण्यातही बुकिंग होते.

सिटी पॅलेस पाहू नका . आमेर किल्यावर हत्तीवरून कशाला जायचे ? पायी जाणे सोपेच आहे !