सेल्फ पोर्ट्रेट (पेन्सिल)

शाली's picture
शाली in मिपा कलादालन
7 Jun 2018 - 12:46 pm

पहिल्यांदाच पेन्सिलने 'सेल्फ पोर्ट्रेट' करायचा प्रयत्न केलाय. कमीत कमी पेन्सिलचा वापर करायचा प्रयत्न केलाय. (पेपरचा जास्तीत जास्त पांढरा भाग वापरायचा प्रयत्न.) अर्थात हातात स्वतःचा फोटो होता संदर्भासाठी. फारसे साधले नाही चित्र पण तुम्हाला आवडावे. काय चुकलय ते सांगितले तर फार बरे होईल.

.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 Jun 2018 - 12:51 pm | प्रचेतस

भारी झालंय.

विशुमित's picture

7 Jun 2018 - 12:59 pm | विशुमित

खूप आवडले.

किसन शिंदे's picture

7 Jun 2018 - 1:49 pm | किसन शिंदे

भारीच जमलंय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2018 - 2:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्र सुंदर आहे. पोर्ट्रेट असल्याने व तुमचा चेहरा बहुतेक मिपाकरांनी पाहिलेला नसल्याने, संदर्भासाठी वापरलेला फोटो स्कॅन करून इथे टाकला असता तर (चित्रातले तुमचे कसब पाहता) तुमच्या कलेला अजून दाद मिळाली असती.

यशोधरा's picture

7 Jun 2018 - 2:53 pm | यशोधरा

मस्त जमलं आहे.

स्वधर्म's picture

7 Jun 2018 - 3:02 pm | स्वधर्म

अाता कमीत कमी रेघात करून बघा नि इथे डकवा.

कमीत कमी रेषांमध्ये स्केचींग करायचा प्रयत्न नक्कीच करेन.

कमीत कमी करायच्याऐवजी जास्तीत जास्त रेषांमध्ये केलय. पोस्ट केलय. आवडेल बहुतेक तुम्हाला.

मराठी कथालेखक's picture

7 Jun 2018 - 3:12 pm | मराठी कथालेखक

फार छान...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2018 - 3:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरिजनल फोटो एका बाजूला आणि चित्र एका बाजूला असतं तर कळलं असतं काय कमी आहे, सध्या ते चित्र म्हणून उत्तम वाटलं.

-दिलीप बिरुटे

शाली's picture

7 Jun 2018 - 4:14 pm | शाली

ते नंतर लक्षात आले.

पद्मावति's picture

7 Jun 2018 - 3:19 pm | पद्मावति

खुप मस्तं जमलंय.

शाली's picture

7 Jun 2018 - 4:17 pm | शाली

थँक्यू!

बबन ताम्बे's picture

7 Jun 2018 - 4:41 pm | बबन ताम्बे

मस्त !!

चांदणे संदीप's picture

8 Jun 2018 - 6:02 am | चांदणे संदीप

अहो सगळंच चुकलंय!!
असं म्हणेल त्याला माझ्या समोर आणा... ;)
मस्त झालंय पोट्रेट!

बाकी, ते चच्म्याला काचा नाहियेत एवढं बोलून मी खाली बसतो.

Sandy

परावर्तन परीप्रेषक काचा आहेत. anty reflexion glasses.

चामुंडराय's picture

8 Jun 2018 - 6:32 am | चामुंडराय

_/\_ भारीये

तुमच्या कडे लेखनकले प्रमाणे चित्रकला देखील आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व.
छान.

जेम्स वांड's picture

8 Jun 2018 - 8:00 am | जेम्स वांड

काय मज्जा भरलीये हो तुमच्यात! च्यायला लैच भारी राव!

चौथा कोनाडा's picture

8 Jun 2018 - 6:00 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त !

तुषार काळभोर's picture

8 Jun 2018 - 9:16 pm | तुषार काळभोर

सही एकदम आवडली आपल्याला.

खेडूत's picture

8 Jun 2018 - 9:59 pm | खेडूत

सुंदर!जमलंय.
मोडीतली स्वाक्षरीही आवडली!

शाली's picture

8 Jun 2018 - 10:11 pm | शाली

धन्यवाद!
मोडीतल्या सहीची दखल घेतलीत, बरे वाटले :)

चित्रगुप्त's picture

10 Jun 2018 - 8:11 am | चित्रगुप्त

हे छान आहे परंतु खरेखुरे सेल्फ पोर्ट्रेट करायचे तर ते फोटोवरून नव्हे, तर आरशात बघून केले पाहिजे. आता तसे करून बघा. कमित कमी रेषांच्या भानगडीत न पडता भरपूर पेन्सिल चालवा.... पांढर्‍या कागदाऐवजी ब्राऊन पेपर वा पेस्टल पेपर वर चारकोल पेन्सिल आणि पांढरी पेन्सिल वापरून करून बघा.
..

अहो हे तर भलतच आवघड दिसतय. तरीही तुम्ही म्हणालात तसा नक्की प्रयत्न करून पाहीन आता. धन्यवाद!

यशोधरा's picture

22 Jun 2018 - 10:11 pm | यशोधरा

वा!

चौकटराजा's picture

10 Jun 2018 - 8:57 am | चौकटराजा

बाकी चित्रगुप्त यांनी दिलेला पेन्सील वापराचा सल्ला अमोल आहे ! आपल्या फोटोवरून पहाता आपली ओळख पटतेय ! मस्त जम्या हय !

सुंदर ! सही सुद्धा लयं भारी हाय... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish Malhar

इरसाल's picture

11 Jun 2018 - 2:59 pm | इरसाल

ग णे शा !!!!!!!!!

सप्तरंगी's picture

14 Jun 2018 - 5:53 pm | सप्तरंगी

सुंदर काढलं आहे. दोन डोळ्यांमध्ये मला थोडा फरक वाटतो आहे पण प्रयत्न उत्तम आहे, तुम्ही वाटता आहात.

शाली's picture

15 Jun 2018 - 7:41 am | शाली

खुप धन्यवाद!
पहिलाच प्रयत्न आहे.

II श्रीमंत पेशवे II's picture

19 Jun 2018 - 2:50 pm | II श्रीमंत पेशवे II

खूप छान ......
शाळेनंतर पेन्सिल हातात न घेतलेले बापुडे आम्ही .......काय चुका काढणार .......

शाली's picture

19 Jun 2018 - 5:55 pm | शाली

धन्यवाद श्रीमंत!

सप्तरंगी's picture

22 Jun 2018 - 7:04 pm | सप्तरंगी

वाह पहिल्याच प्रयत्नात इतके सुंदर !