वैभव लक्ष्मी व्रत : ओरिजिनल वायरल ???

साहना's picture
साहना in काथ्याकूट
2 Jun 2018 - 4:10 am
गाभा: 

खूप खूप वर्षां पूर्वी मी लहान असताना वैभवलक्ष्मी[१] नावाचे व्रत अगदी पॉप्युलर झाले होते. आता ठिकसे आठवत नाही पण दर रविवारी कि शुक्रवारी पूजा करायची आणि ११ आठवड्यानंतर ११ महिलांना बोलावून प्रत्येकीला व्रताचे पुस्तक द्यायचे . मग त्या ११ जणींनी व्रत करायचे. काही परिचयातील महिलांनी किमान ३-४ वेळा हे व्रत केले होते.

इथे सिया चे चिप थ्रिल आठवल्या शिवाय राहत नाही .

Come on, come on, turn the radio on
It's Friday night and I won't be long
Gotta do my hair, I put my make up on
It's Friday night and I won't be long

अश्या प्रकारची व्रते जुन्या काली होती काय किंवा सध्या असे एखादे वायरल व्रत लोकप्रिय आहे का ?

टीप : आता स्त्रिया जास्त स्वतंत्र असल्याने परवानगी वगैरे न घेता मित्र मैत्रिणीना भेटू शकतात. पूर्वी तसे नसायचे त्यामुळे व्रताच्या निमित्ताने शुक्रवारी आपल्या मैत्रिणींना भेटायला जायची संधी म्हणून कदाचित त्यांनी ते व्रत लोकप्रिय केले असेल.

[१] http://web.bookstruck.in/book/show?id=1651

प्रतिक्रिया

माहितगार's picture

2 Jun 2018 - 7:26 am | माहितगार

तौलनिक आर्थिक स्थैर्य, आरोग्य क्षेत्रातील सुधारणा, शिक्षण , असुरक्षिततेच्या भावना कमी होणे,( अंध) श्रद्धांना ओहोटी मुळे 'नव्या पिढीत' ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज 'व्रत' प्रकारांना ओहोटी लागली असावी. महानगरीय मध्याम व उच्चमध्यमवर्गात हे प्रमाण बरेच कमी झाले असावे - पण मर्यादीत प्रमाणात शिल्लक असावे. कनिष्ठ मध्यमवर्ग आणि इतर शहर गावे यात अद्यापही प्रमाण असावे. नेमके किती आणि काय शिल्लक आहे याची इथे काही व्यक्तिगत अनुभवातून माहिती येईल त्या पलिकडे आंतरजालावरुन माहितीस मर्यादा येतात.

धार्मिक पुस्तके आणि तस्बिरीम्च्या विक्री होतात तिथे कोणती विक्रि अधिक होते याची माहिती मिळू शकते. मुद्रक प्रकाशकांच्या आणि वितरकांच्या रेकॉर्डवरुन एखादी पिएचडी करण्यास समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासकांना वाव असावा असे वाटते.

amazon पहिल्या शंभर बेस्ट सेलींग बुक्स यादी ऑवरली अपडेट करते त्यात मराठी कॅटेगरीत या क्षणी बालाजी तांब्यांचे आयुर्वेदीय गर्भ संस्कार टॉपवर दिसते आहे . त्या नंतर धार्मिक पुस्तकात भगवद गीता स्ट्रेट ४० व्या क्रमांकावर दिसते, मा एकदम ५४ व्या क्रमांकावर दत्त अनुभूती दिसते - ९५ व्या क्रमांकावर' कर्दळीवन एक अनुभूती'-९९ क्रमांकावर 'श्री दत्त परिक्रमा' दिसते ( गेल्या काही वर्षात अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या भक्तीचा प्रसार वाढत असावा कदाचित त्याचा परिणाम असेल का माहित नाही)

गूगल ट्रेंड मध्ये 'Vrata' शब्दावर काळजी पूर्वक शोध घेतल्यास महाराष्ट्रातील ट्रेंड्सची माहिती कमी मिळत असली तरी अखिल भारतीय तुलनेत माहिती मिळू शकते . Vrata हा शब्द ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीत अधिक स्पाईक दिसतात ऑक्टोबरातील स्पाईक सर्वाधिक आहे. आणि उत्तराखन्ड आणि हरियाणातील हिमाचल प्रदेश मधून शोध सर्वाधिक आहेत, उत्तराखंडाच्या तुलनेत महाराष्ट्रातील शोध केवळ ३१ टक्के आहेत. गूगल ट्रेंड वेबसर्च आणि युट्यूबसर्च दोन्ही देते आणि संतोषी माता व्रत हि सर्वाधीक शोधली जाणारी टर्म दिसते.

गूगल ट्रेंड संदर्भ

माहितगार's picture

2 Jun 2018 - 7:33 am | माहितगार

* गूगल ट्रेंडवर vrata शब्दावर शोध देताना खाली ड्रॉप्डाऊन मेन्युतून ईंडिया निवडावे लागते नाहीतर शोध चुकतोच

* आधी नुसता vrata शब्दावर शोध द्यावा , मग ड्रॉपडाऊन मेन्युतून वेब सर्च आणि युट्यूब सर्च मध्ये होणारा फरक पहावा

* मग नंतर इतर व्रतांच्या स्पेसिफीक सर्च टर्म जोडून बघता येऊ शकतील

* युट्यूबवर गेल्या वर्षभरात सर्वाधिक पाहिलेल्या मराठी युट्यूब चित्रफिती शोधून कोणत्या युट्यूबला किती हिट्स आहेत यावरुन काही ढोबळ अंदाजा येऊ शकेल ,

* अमेझॉन दुवा

एक मराठी सिनेमाही होता यावर. अलका कुबल.

साहना's picture

2 Jun 2018 - 11:52 pm | साहना

अलका कुबल एक मराठी MEME कशी नाही झाली ह्याच आश्चर्य वाटतं . मी गेम ऑफ थ्रोन्स पाहत होते आणि माझी एक आत्या म्हणाली हा जॉन स्नो एकदम अलका कुबल आहे .

दुर्गविहारी's picture

2 Jun 2018 - 6:17 pm | दुर्गविहारी

मला वाटले हेमंत लाटकर उर्फ हे.ला.काका परत आले कि काय? ;-)

कंजूस's picture

2 Jun 2018 - 8:41 pm | कंजूस

**'नव्या पिढीत' ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज 'व्रत' प्रकारांना ओहोटी लागली असावी. महानगरीय मध्याम व उच्चमध्यमवर्गात हे प्रमाण बरेच कमी झाले असावे -**

छ्याछ्या! वाढतंय!
फक्त अश्विनात नवरात्रात अनवाणी जायचे ते आता मार्गशीर्ष आणि चैत्रामध्ये सुरू झालं आहे.

माहितगार's picture

3 Jun 2018 - 1:49 pm | माहितगार

मागच्या शतका पर्यंत जनजिवनातील व्रतांची संख्या फार म्हणजे फार होती अहो. आताच्या एखाद दोन व्रतांनी भरुन येईल असे वाटत नाही असो.

श्वेता२४'s picture

3 Jun 2018 - 3:47 pm | श्वेता२४

बायका नवरात्री आणि संक्रांति व्रत आवर्जून आणि सामूहिक फतवा काढून करताना दिसतात म्हाणजे नवरात्र जवळ आले की कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे असे काहीबाही आणि संक्रांतीला हळदी कुंकवाचा सामूहिक वाण लुटायचा कार्यक्रम

माहितगार's picture

3 Jun 2018 - 4:51 pm | माहितगार

सहसा एखादी कामना आहे किंवा कामना पूर्ण झाली आहे , कामना ऐहिक (सांसारीक) अथवा पारलौकीकखी असू शकेल त्यासाठी स्वतःस लावून घेतलेला नेम अथवा धार्मिक अनुष्ठानकरिता नियमाने धार्मिक कृत्य, उपवास इत्यादी करण्याची क्रिया -काही वेळा परंपरेने आणि सामुदायिक रित्या पारपाडली जाते - म्हणजे व्रत असा माझा समज आहे चुभू देघे .

त्यामुळे सहसा कामनेचा अंतर्भाव असेल तर व्रत म्हणावे असे वाटते. त्यामुळे सक्रांतीचे परंपरागत रूप व्रताचे असले , आणि आताही सामुदायिक संक्रांत होत असली तरी घरातला पसारा आणि खर्च टाळून सामुदायिक रित्या करणे हे परंपरेचे स्वरुप अंशत बदलताना परंपरेस ओहोटी लागताम्ना मनाला येणारी टोचणी टाळण्य्चा प्रकार आहे .
यात तातकालीक सामुहीक आनंद मेळ्या पलिकडे सांसारीक अथवा पारलौकीक कामना शिल्लक असण्याची शक्यता कमी त्यामुळे आता सर्वांसाठी व्रत याच व्याख्येत बसण्याचे शक्यता कमी असावी .

हाच नियम नवरात्रीस विशीष्ट रंगाचे पोषाख परिधान करणे या मागे सांसारीक अथवा पारलौकीक कामना शिल्लक नसेल आणि नुसते उत्सवी आनंदासाठी केले जात असेल तर व्रताच्या स्ट्रीक्ट व्याख्येस पात्र होण्याची शक्यता कमी असावी.

गंमत म्हणून आहे ते ठिक पण फतवा नावाचा मूळ प्रकार म्हणजे काय -उत्साह घालवणे- आणि त्याचे शक्य परिणाम पहाता उपरोल्लेखीत उत्साही वर्तनास फतवा हा शब्द जरासा मिसफीट असावा असो.

श्वेता२४'s picture

3 Jun 2018 - 5:11 pm | श्वेता२४

कोणतेही व्रत हि अत्यन्त खाजगी गोष्ट आहे. मला या दोन्ही व्रताचा वाईट अनुभव आलाय माझ्या ऑफिसमध्ये नवरात्री आधी फळ्यावर 7 दिवसांचे रंग लिहून ठेवले होते माझे तेव्हा नुकतेच लग्न झाले होते मी एकही दिवस साडी नेसली नाही आणि ते रंग देखील पाळू शकले नाही तर रोज मला कुणी न कुणी यावरून टोके कि अगं तुझ लग्न झालंय ना? मग रंगाची साडी नेस(काय संबंध?- इति मी) एखादे व्रत मोठ्या प्रमाणात सामूहिकरित्या केले जात असले तरी यात जबरदस्ती नसावी असं मी मानते. आजही मी ते रंग प्रकरण पाळत नाही जे पाळतात त्यांच्याबद्दल आक्षेपही नाही.

माहितगार's picture

4 Jun 2018 - 7:58 am | माहितगार

नवरात्रीचे नऊरंग साडी हे आधूनिक वृत माध्यमांच्या टिआरपी वाढवण्याच्या शकलेतुन आले आहे असा एक मत प्रवाह आहे.

पण दुसर्‍या बाजूने नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे , आणि टिआरपीच्या निमीत्ताने का होईना सर्वसामान्य स्त्रीयांना वृत्तमाध्यमांचे व्यासपीठ मिळत असेल तर वावगे ह काही नसावे.

श्वेता२४'s picture

4 Jun 2018 - 9:59 am | श्वेता२४

नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसण्याबद्दल अजिबात आक्षेप नाही दुसरे लोक त्यात सामील होत नसतील तर त्यांना त्याबद्दल टोकण्याबद्दल आक्षेप आहे. बाकी नऊ दिवस लोकंचा ओसंडून वाहणारा उत्साह पाहायला मलाहि आवडते

माहितगार's picture

4 Jun 2018 - 10:04 am | माहितगार

सहमत आहे, कोणतेही आग्रह ऑब्सेसीव्ह आणि खासकरुन पझेसीव्हपणे केले जाणे बर्‍याचदा नकोसे होणारे असते.

नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या

हे रंग कशाच्या आधारावर ठरवतात? आणि कोण ठरवते?

श्वेता२४'s picture

5 Jun 2018 - 9:22 pm | श्वेता२४

हाच प्रश्न मी त्यांना विचारला कारण असं रंगाच्या साड्या नसणे हे प्रकरण मला नवीनच होतं तर असं उत्तर मिळालं कि म.टा. मध्ये रंग छापून येतात म्हणे. पण हे काही सगळीकडे एकसारखं नसतं .

साहना's picture

4 Jun 2018 - 1:06 pm | साहना

व्रत ह्या शब्दाचे मूळ "प्रतिज्ञा" सारखा आहे. इथे माणसाने काही त्याग करणे अभिप्रेत आहे . देखावा ह्या गोष्टीला इथे थारा नाही त्यामुळे हे रंगाच्या सड्या वगैरे फेड आहे व्रत नाही.

सुबोध खरे's picture

5 Jun 2018 - 6:46 pm | सुबोध खरे

@श्वेता

कुणी यावरून टोके कि अगं तुझ लग्न झालंय ना? मग रंगाची साडी नेस

साधं आहे लोकांना सांगायचं "अहो माझ्या कडे इतक्या साड्या नाहीत आणि दुसऱ्यांच्या साडया नेसलेल्या आमच्या "ह्यांना" आवडत नाहीत"

मी नाही का ११ वर्षे जुनी इंडिका वापरतो. लोकांनी विचारलं तर सांगतो कि बाबानी वायफळ खर्च करायला मनाई केली आहे.

हा का ना का

श्वेता२४'s picture

5 Jun 2018 - 9:56 pm | श्वेता२४

☺️

वैभवलक्ष्मी व्रत फलदायी ठरले - व्रताची पुस्तके छापणार्याला.

असे कुठेतरी वाचले होते .

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2018 - 11:06 am | टवाळ कार्टा

खरेच (डॉक्टर नव्हे) आहे ते =))

सुबोध खरे's picture

4 Jun 2018 - 11:17 am | सुबोध खरे

नवरात्रीत नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात हि अतिशय चांगली गोष्ट आहे. नाही तरी आमची बायको आजकाल साड्या फार कमी नसते. बाकी साडीत स्त्री जास्त चांगली दिसते त्यातून सालंकृत असेल तर सोन्याहून पिवळे हे माझे वैयक्तिक मत. मग नऊ दिवस नवरात्र म्हणून आणि दहाव्या दिवशी दसरा म्हणून रोज बायको नटून थटून येते. दहा दिवस तेवढेच दृष्टिसुख.

पद्मावति's picture

4 Jun 2018 - 1:55 pm | पद्मावति

मी गेम ऑफ थ्रोन्स पाहत होते आणि माझी एक आत्या म्हणाली हा जॉन स्नो एकदम अलका कुबल आहे .

=)) खरंय जॉन स्नो आणि दुसरा म्हणजे अँडी मरे.

आल्का कुब्बल किती निब्बर झाली पण तिचं तेच ते चालू आहे.बघ्वत नाही असे सिनेमे, मालिका.

पिवळा डांबिस's picture

5 Jun 2018 - 2:14 am | पिवळा डांबिस

पूर्वी आमच्या काळी ते एक संतोषी मातेचं व्रत होतं.....
शेजारपाजारच्या बायका ते करत असत. वैताग यायचा त्या बायकांचा!
नाही म्हणजे त्यांनी व्रत करण्याबद्दल आमची तक्रार नव्हती पण त्या व्रताचं उद्यापन हे लहान मुलांना प्रसाद देऊन केलं जायचं. आणि ते व्रत मोडलं जाऊ नये म्हणून त्या लहान निरागस (पक्षी: आम्ही) मुलांनी दिवसभर काहीही आंबट न खाण्याची शिक्षा असायची. बरं देवाचं कार्य असल्याने आई जबरदस्तीने पाठवायचीच.
एक-दोन वेळा सहन केलं. नंतर आईने मला अमकी-तमकीच्या व्रताला पाठवायची गोष्ट काढली रे काढ्ली की पटकन स्वयंपाकघरात जाऊन बरणीतल्या चिंचेचं बुटुक तोंडात टाकून मग आईला, 'काय म्हणालीस?' असं विचारत असे.
आईही मग हसून स्वतःच्या कपाळावर हात मारून, 'काही नाही, जा' असे म्हणत असे.... :)
पाळण्यातच पाय दाखवणारा,
पिवळा डांबिस