च्या मायला बॅट घ्यायची होती हातात , अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं

Primary tabs

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
23 May 2018 - 1:32 pm

च्या मायला बॅट घ्यायची होती हातात

अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं

पण व्हायचं होतं येगळंच

तिच्यासंगे लगीन लागलं अन घडलं जे घडायचं होतं

एकदा का लग्न झाले नक्की

समजा झाली तुमची चक्की

दळत राहा जात्यावाणी

पळत राहा चोरावाणी

चंद्र सूर्य मग एक भासतील

तारका क्षणात लुप्त होतील

सारे ग्रह जणू उलटे फिरू फिरतील

उरलेसुरलेले केसही उडतील

जसं जसं कुटुंब वाढेल

तुमची "सावित्री "तुम्हास कुटून काढेल

थोरामोठ्यांचं बघता बघता

आयुष्य सार्थकी लागेल

माझे पण असेच काहीसे झाले

जास्त जाच नको म्हणून

गेलो पोपटवाल्या ज्योतिषाकडे

त्याने सांगितल्या प्रमाणे

वडाला उलट फेरे मारले

गणपतीला अबीराने काळे केले

मारुतीचं जोड्याने दर्शन घेतले

नको नको ते जालीम उपाय केले

तीच्या हे सर्व लक्षात येता

परिणाम मात्र गंभीर झाले

पाळंमुळं खणून काढली

ज्योतिषाम्होरं उभी ठाकली

ज्योतिषाचे ग्रह चांगलेच फिरले

त्याला त्याच्या पोपटासहित बदड बदड बदडले

कमी कि काय म्हणून

मला त्या वडाच्या झाडास उलटे टांगले

असा हा वटवट सावित्रीचा महिमा

आपुल्यासारख्या सत्यवानांची उडवितो दैना

म्हणून म्हणतो दादांनो, माझ्या भावी नवरोबानो

लग्न करण्याआधी, बघून निवडा आपली मैना

सिद्धेश्वर विलास पाटणकर

अविश्वसनीयखिलजी उवाचजिलबीमुक्त कवितारतीबाच्या कविताजीवनमानआईस्क्रीमओली चटणीखरवसमराठी पाककृती