मागील वेळी पूर्ण न लिहीता, ईस्नीपचा ऑडियो टाकला होता. त्यामुळे काहींची गैरसोय झाली होती. इथे पूर्ण कविता लिहीली आहे.
जेव्हा तिची नी त्याची ओळख देखील नव्हती
तिचे दर्शन, ह्रदयाचे ठोके चुकवायचे
तिचा सुगंध, भरून प्यावासा वाटायचा
तिचा आभास देखील, लक्ष लक्ष चांदण्या फुलवायचा.
जेव्हा तिची नी त्याची, पहिली भेट होते
तिच्या मोगरी स्पर्शाने, तो मोहरून जातो.
तिचा श्वास, ह्रदयात भरून घेतो.
तिचे सानीध्य, त्याच्या 'मी' मधे विरून जाते.
जेव्हा तिची नी त्याची, जीवाभावाची मैत्री होते,
तिचा स्पर्श, त्याला स्वतःचाच वाटतो.
तिचा सुगंध, त्याची ओळख बनतो.
तिचे सानीध्य, त्याच्या रोमारोमांत वसते.
जेव्हा तिची नी त्याची, ताटातूट होते
तिचा स्पर्श, तिचा सुगंध, फक्त आठवणीत उरतो.
पण तिने त्याच्या रोमरोमांत, लक्ष लक्ष चांदण्या फुलवून ठेवल्या असतात.
त्या चांदण्यांचे निखारे, हळुहळु त्याच्या अंतरंगात वाढत असतात.
तिच्या श्वासाचा भास,
त्याचा उरलेला श्वास जाळत, त्याच्या सोबतीला शेवटपर्यंत रहाणार असतो......
********************************************
प्रतिक्रिया
25 Oct 2008 - 7:48 am | अनिरुध्द
कविता दिसतच नाहीये. :O
25 Oct 2008 - 7:50 am | अनिरुध्द
ब-याच वेळाने कवीता उतरली (डाऊनलोड झाली) म्हणून वरील कमेंट लिहीली. बाकी कवीता एकदम आवडली. झकास.
25 Oct 2008 - 7:53 am | मीनल
अहो इतके दिवस मिपावर वाचता येत होत.
पर जमाना बदल गया है!
आता ऐकायलाही मिळत म्हटल.
बर आहे .ङोळ्यांना त्रास कमी.
मजा आली विषकन्या ऐकताना.
मीनल.