हा क्षण

vishalingle25793's picture
vishalingle25793 in जनातलं, मनातलं
7 Mar 2018 - 9:58 pm

सकाळी ५:०० चा अलार्म आज सुद्धा न चुकता वाजला. .. आदित्य ला उठायचा कंटाळा आला होता, तरी ही तो उठला. .. ऑफिस मध्ये लेट पोहोचणे आदित्य ओफोर्ड करू शकत नव्हता. .. तशी नोकरी त्याला हवी तशीच आणि इन-फैक्ट हव्या त्या कंपनीतच मिळाली होती. .. पण २४ तासांपैकी १२ तास सतत नॉन-स्टॉप काम करणं यामुळे त्याला स्वतःसाठी जगायला पण वेळ मिळत नव्हता. .. तन्मयी सोबत प्रत्यक्ष भेटीला आज जवळजवळ महीना झाला असेल. .. दोन वर्षाआधी आदित्यने "रेफ्लेक्शन्स" सॉफ्टवेयर कंपनी जॉइन केली आणि तेव्हापासून हे असंच चालतंय. .. तसं मगच्याच आठवड्यात आदित्यने तन्मयी ला त्याच्या अपार्टमेंट मध्येच शिफ्ट होण्यासाठी म्हंटलं होतं. .. त्यामुळे त्यांना कमीत कमी संध्याकाळ तरी सोबत घलवायला मिळणार होती. .. तन्मयी ला शिफ्ट होण्यासाठी किमान एक आठवडा आणखी लागणार होता. .. कंपनी त्याला त्याची स्वप्ने पूर्ण होवू शकतील इतका पगार देत होती आणि केवळ या करिताच त्याने आतापर्यंत जॉब सोडला नसावा. .. पण ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे वेळ मात्र नव्हता. ..
आदित्य बेड वरुन उठला. .. पावले वाशरूम कडे चलायला लागली. .. वाशरूमच्या भिंतीवर च्या आरशात बघत आदित्यने ब्रश करायला सुरुवात केली. .. त्याला आज डोकं थोडं भारी वाटायला लागलं. .. काहीतरी चुकचुकल्या सारखं वाटत होतं पण काही कळेना. .. वर्क स्ट्रेस असेल म्हणून त्याने मनातून विचार काढून टाकला. .. अंघोळ वगैरे करुन आदित्य बाहेर आला. .. ५:४५, कॉफीची वेळ. .. आदित्यचा किचन मध्ये प्रवेश. .. आदित्यने रेडिओ ऑन केला. .. कॉफ़ी करताना, संध्याकाळी स्वयंपाक करताना, घराची आवाराआवर किंवा इतर कामे करताना किंवा मग पुस्तक वाचताना आदित्यला रेडिओ ऐकण्याची सवय. .. आदित्यकडे टीवी आहे पण त्याला टीवी बघणं आवडत नाही. .. दिवसभरातल्या सर्व बातम्या असो की मग जुनी गाणी तो रेडिओ वरच ऐकणार. .. फक्त ब्राज़ील वर्सेस स्पेन ची फूटबॉल किंवा इंडिया-पाकिस्तानची क्रिकेट मैच याला अपवाद. ..
रेडिओ वर कुण्यातरी मोठ्या लेखकांचा इंटरव्यू चालू होता. .. आपल्या आगामी पुस्तकबद्दल ते सांगत होते आणि आदित्यच्या कानावर ते शब्द आले,
"देव सगळ्यांना माफ करतो. .."
आदित्य शून्यात हरवला. ..

"देव सगळ्यांना माफ़ करतोच रे, पण इथेही तुम्हाला कुणीतरी माफ़ करायला हवं. ..", सिद्धार्थ, आदित्य आणि तन्मयी सिद्धार्थच्या घरी टेरिस वर बसलेले. .. सिद्धार्थचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं आणि म्हणून सिद्धार्थने त्यांना सेलेब्रेट करायला म्हणून बोलावून घेतलं होतं. .. आदित्य आणि तन्मयी व्यतिरिक्त त्याचं कुणाचसोबत पटलं नाही. .. पार्टी म्हणजे फक्त पिज़्ज़ा आणि वाईन. .. त्यांची पार्टी नेहमी अशीच व्हायची. .. हो, त्यानंतर जेवनाची व्यवस्था ही त्याने केली होती. ..
कुठल्यातरि विषयावर बोलता बोलता आदित्यच्या तोंडुन निघालं,
"देव सर्वाना माफ करतो. .."
"देव सर्वानाच माफ़ करतो रे, पण इथेही तुम्हाला कुणीतरी माफ़ करायला हवं. .. तुम्ही जेव्हा कुणाला तरी हर्ट करतो नं, तेव्हा त्यातून निर्माण होणारी दोषीपणाची भावना आयुष्य भर तुम्हाला टोचत राहते. .. जितकी हर्ट ती समोरची व्यक्ती असते नं त्यापेक्षा जास्त हर्ट तुम्ही स्वतःच होत असता. .. आणि ती व्यक्ती जर काही न बोलताच जर तुमच्या आयुष्यातून निघून. ..",सिद्धार्थ बोलता बोलता थांबला. .. डोळे पाणावलेले. ..
"तू बोलत का नाही तिच्यासोबत. ..? जर तुमच्या दोघांचीही लाइफ अफेक्ट होत असेल तर काय अर्थ आहे तुमच्या वेगळं होण्याला. ..? एकदा बोलून सॉर्ट ऑउट का करत नाहीस सगळं. ..?", तन्मयी. ..
"वेळ झालाय तन्मयी, खूप वेळ झालाय. ..", सिद्धार्थ. ..

गॅस वर ठेवलेल्या कॉफीच्या भांड्याला आदित्यचा हात लागला आणि चटक्याने आदित्य शून्यातून बाहेर आला. ..
आदित्यने कपाटातून मलम काढून हातावर लावला. .. आणि कॉफी-मग घेवून हॉल मध्ये सोफ्यावर येवून बसला. ..
इतक्यात डूअर बेल वाजली, आदित्यने दरवाजा उघडला. ..
कुणाचं तरी कूरियर आलं होतं. .. अदित्यने कूरियर घेतलं. .. कूरियर निनावी, पाठवणार्याचं नाव नाही. .. आदित्यने घड्याळाकडे बघितलं. .. वेळ ६:१२. .. आदित्यने कूरियर कपाटात ठेवलं आणि आणि ऑफिसची तयारी चालू केली. ..

वेळ ८:०५. .. ८:१२ च्या लोकलला वेळ होता. .. समोर एक मुलगी पुस्तक वाचत बसली होती. .. "ओन्ली लव ईज़ रियल", सिद्धार्थचं फेवरेट बुक. .. सिद्धार्थ नेहमी म्हणायचा,
"माणसाने या क्षणी जगलं पाहिजे, बघ चालता चालता मला आता कुण्यातरी फोर व्हीलर ने उडवलं तर काय? मला हा क्षण जगायचाय. .. आयुष्यात नवीन दिवस आहे की नाही कुणाला माहिती? अगदी पुढच्या क्षणाची ही शाश्वती नाही. .. मग फ्यूचर सेक्युर करण्याला काय अर्थ आहे. .. मी उद्याचा विचार नाही करत. .. मला आत्ता जगायचंय. .."

वेळ १०:४५. .. आदित्यला बॉस ने केबिन मध्ये बोलावून घेतलं. ..
"आदित्य, हे मिस्टर जॉन माइकल, हेड ऑफ 'इंटेलिजेंस प्राइवेट लिमिटेड'. .. आणि हे आमच्या कंपनीचे सी.इ.ओ. मिस्टर आदित्य विनायक. .."

निदान अर्धा तास त्याचं कशावर तरी बोलणं झालं. .. आदित्य त्याच्या केबिन मध्ये परतला आणि पुन्हा कुठल्यातरि विचारात हरवला. ..

"ये, लोकं स्वतःला इंट्रोड्यूस करताना मी अमुक अमुक, टमुक टमुक पोस्ट वर आहे असं इंट्रोडक्शन का देतात. ..?", सिद्धार्थ च्या डोक्यात कधी, कसं, कुठे, काय येईल आणि त्याला कधी काय प्रश्न पडेल हे सांगता येत नाही. .. कॉलेज मध्ये कुण्या एका मोठ्या वक्त्याचं गेस्ट लेक्चर अरेंज करण्यात आलं होतं, वक्त्याच्या तोंडून इंट्रोडक्शन निघालं नाही आणि सिद्धार्थ चा प्रश्न निर्माण झाला. ..
"तुला काय प्रोब्लेम आहे त्याच्याशी?",आदित्य. ..
"अरे, म्हणजे बघ नं. .. तसं ही पोस्ट वगैरे सांगण्याची गरज काय? विचार करा. .. म्हणजे बघ, आपण कुणाला आपली ओळख करून देतो तेव्हा आपल्याला त्याच्याशी नातं तयार करायचं असतं, त्या व्यक्तीला जाणून घ्यायचं असतं. .. त्यात पोस्ट, फॅमिली बैकग्राउंड, इकोनोमिकल स्टेटस सांगायची गरज काय. .. मी सिद्धार्थ राजपूत, मला लिहायला आवडतं. .. मी आदित्य, मला जग फिरायचंय, खुप खुप फिरायचंय. .. किंवा ही, मी तन्मयी, फोटोग्रॉफी हा माझा आवडीचा छंद. .. असं का इंट्रोड्यूस करत नाही. .. समोरच्या शिक्षकाला 'मी सिद्धार्थ, 63%. ..!' यावरुन विद्यार्थी कसा आहे, हे खरंच कळत असेल?",सिद्धार्थ. ..

अचानक फोन च्या रिंगने आदित्य पुन्हा भानावर आला. ..स्क्रीनवर तन्मयीचं नाव फ्लैश होत होतं. .. आदित्यने फोन उचलला. ..
"हं बोल?", आदित्य. ..
"अरे तुला बोलली होती न, मृणाल यू.एस. वरुन परत येणार होती पुढच्या आठवड्यात? तिचं तिकडलं काम लवकर संपलं आणि ती आजच परत आलीय तर उद्याच शिफ्ट होते तुझ्या अपार्टमेंट मध्ये. .. आणि राणी मावशीचा कॉल आला होता. .. तुला पार्सल पाठविलंय म्हणे कूरियर ने. .. तुझा कॉल लागत नव्हता म्हणून मला कॉल केला होता त्यांनी. .. पार्सल मिळालं का म्हणून. ..",तन्मयी. ..
"हे, एक मिनीट, सकाळी जे पार्सल आलं होतं ते राणी मावशी ने पाठविलं होतं? आज तारीख काय आहे. ..?"
"८ ऑगस्ट. .."
"तन्मयी, ८ ऑगस्ट. ..! तरी सकाळ पासून काहीतरी चुकचूकल्या सारखं वाटत होतं. .."
"अरे हो, मी पण कशी काय विसरली?"
"सोड, तू घरी ये. .. मी पन निघतो येथून. .. तिथून पार्सल घेवून निघू आपण. .. आपण जायलाच हवं. .. सिद्धार्थची शेवटची इच्छा होती. .. आपण जायलाच हवं. .. तिच्यापर्यंत पोहोचायलाच हवं ते पार्सल. .."

© विशाल इंगळे
-------------------------

कथालेख

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

8 Mar 2018 - 2:25 am | राघवेंद्र

मस्त सुरुवात !!

बाकीचे पण भाग वाचतो !!!