टीव्ही सुचवा

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in काथ्याकूट
26 Feb 2018 - 6:12 pm
गाभा: 

३२" (याहून मोठा नक्कीच नको , एकवेळ छोटा चालेल) , Full HD / HD ready चालेल [तसही HD channels चा खर्च सध्याही करत नाही, भविष्यातही करण्याची इच्छा नाही]. किमान दोन HDMI port असावे , सुस्पष्ट आवाज , AV Out ची सोय , USB (जास्तीत जास्त formats/codecs support करावेत) , Wifi/LAN ने इंटरेनेटला जोडून YoTube बघता येत असेल तर उत्तम, दीर्घकाळ चांगला चालणारा, खराब झाला तर सर्विस चांगली असावी. सगळ्या जोडण्या बाजूने असल्यास बरे होईल (भिंतीकडून असतील तर त्यात काढ-घाल करणे फार कठीण होते)
बजेट :शक्यतो वीस हजाराच्या आत कारण टीव्ही बघण्याची फार आवड आणि सवड दोन्ही नाही. status symbol वगैरे म्हणून तर उगाच महागडा टीवी अजिबात नकोय.
VU /Samsung या ब्रँड्सचा विचार करतो आहे. शक्यतो दुकानात जावून घेण्याचा विचार आहे. VU क्रोमा , विजय सेल्स अशा ठिकाणि मिळतो का ?
मिपाकरांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

26 Feb 2018 - 9:01 pm | कंजूस

1 ) refresh rate 120 पेक्षा जास्ती असावा.
2) hd ready = 1200x720
फुल hd = 1900x1200
sd service वरही इंग्रजी पिच्चर दाखवतात ते फुल एचडीवर सुरेख दिसतात.
३) भितीकडे पोर्ट असली तरी इक्सटेंशन कॅार्ड ठेवावीच. वायर बदलणे सोपे जाते, युएसबी पुढेच लावता येते.
४) दुकानात केबलचे कनेक्शन लावून दाखवा सांगा. ते रेकोर्डेड प्ले करतात ते स्पष्टच असतात.
५) टिव्ही बंद करून त्याच्या स्क्रिनवर दिसणारे ट्युबलाइटचे/खिडक्यांचे रिफ्लेक्शन पाहा. वाकडेपणा दिसता कामा नये. सरळ रेषा सरळच दिसल्या पाहिजेत.
६) बातम्या लावून खाली एक ओळ सरकत असते त्यातल्या अक्षरांचा आकार कडेला मोठा व मध्यभागी लहान असं होतं का पाहा.
७)२२" साठी सहा फुट, ३२" साठी आठ फुटांपेक्षा दुरून पाहावे लागते.
८) स्क्रीनमधूनचे त्रासदायक इमिशन कमी असणे हे दुकानात कळणार नाही, त्यासाठी नावाजलेले ब्रँडच घेणे सोनी,फिलिप्स वगैरे.
९) AV out बहुतेक नसते. याबद्दल नक्की माहित नाही.
१०) या टिव्हिंत एलसीडीना रिपेअर वॅल्यू थोडी तरी असते इतर टाइपना कमीच. रिसेल व्हॅल्यू नगण्य.

तुषार काळभोर's picture

27 Feb 2018 - 7:39 am | तुषार काळभोर

एकदम उत्तम आणि व्यावहारिक प्रतिसाद.

स्क्रीनमधूनचे त्रासदायक इमिशन कमी असणे हे दुकानात कळणार नाही,
आताचे टीव्ही एल सी डी किंवा एल इ डी असल्याने पूर्वीच्या सी आर टी सारखे अगदी कमी शक्तीचे क्ष किरण प्रसारण होत नाही सबब हा मुद्दा गैर लागू आहे.
आजच्या काळात फुल एच डी १९२० X १०८० घेणे हे आवश्यक आहे. येत्या एक दोन वर्षात बहुसंख्य चॅनेल एच डी होतील. आजच माझ्या कडे महिना ३०० रुपये अतिरिक्त देऊन ५५ चॅनेल एच डी मध्ये दिसतात. त्यामुळे साध्या (SD) चॅनेल वर कार्यक्रम पाहावेसे वाटत नाहीत.
आजचे टीव्ही एल सी डी किंवा एल इ डी असल्यामुळे पूर्वीची अंतरे हि गैरलागू झाली आहेत त्यामुळे खालील दुवा वाचून घ्या.
most people sit about 9 feet (108 inches) from their TV, so THX recommends a screen size of around 90 inches diagonal for that distance.
https://www.cnet.com/how-to/how-big-a-tv-should-i-buy/
सोनी या कंपनीने टीव्ही तयार करणे बंद केले आहे. त्यामुळे या कंपनीचे टीव्ही घेऊ नका असाच सल्ला मी देईन. शिवाय ते टीव्ही फुकटचे महाग आहेत.
वाल्याकडे महाग ती गोष्ट चांगली हि पण एक हुच्चभरू लोकांची मनोवृत्ती आहे. उदा. अँपल आयफोन.
माझ्या घरात फिलिप्स चा ४२ इंचाचा FULL HD दिवाणखान्यात आणि ५५ इंचाचा VU फुल्ल HD टीव्ही बेडरूम मध्ये गेल्या २ वर्षांपासून आहेत. ५५ इंचाच्या टीव्ही वर ८ फुटांवर सिनेमा किंवा क्रिकेटची मॅच जितके चांगले दिसतात तितके लहान टीव्ही वर दिसत नाहीत. प्रत्यक्ष अनुभवासाठी माझ्या घरी येऊन पाहू शकता (मुलुंड पूर्व).
एक कळकळीचा सल्ला-- टीव्ही विकत घेताना नको तिथे काटकसर करू नका. कार घेताना लोक लाख भर रुपये जास्त टाकायला सहज तयार होतात. सरासरी ४० किमी दिवसात चालवली जाणारी कार म्हणजेच एक तास कार मध्ये जात असेल तर तितका वेळ घरातली एक तरी व्यक्ती टीव्ही नक्की पहाते. मग यासाठी २० हजार रुपयाची काटकसर करून काय फायदा? ४० हजार रुपयात तुम्हाला चांगल्या कंपनीचा ५५ इंचाचा फुल एच डी टीव्ही नक्की मिळेल.
पहा विचार करून.

मराठी कथालेखक's picture

27 Feb 2018 - 10:43 am | मराठी कथालेखक

सल्ल्याबद्दल आभारी, पण माफ करा मी आपल्याशी सहमत नाही.
full HD साठी ३०० रुपये महिना जास्त वाटतात. माझ्या घरी इतका जास्त टीव्ही पाहिला जात नाही.
SD चॅनेल तर बहूधा ७२० pixel पण telecast करत नाहीत, तर HD ready चे resolution 1,366 x 768 इतके असते. त्यामुळे मला HD ready चालेल.
माझ्याकडे सध्या ३२" full hd lcd आहे (त्याला काही समस्या उद्भवल्याने बदलायचा आहे). पण चॅनेल्सचे resolution कमी असेल तर बघायला काही मजा येत नाही. आम्ही टीव्ही ९-१० फुटांवरुन बघतो त्यामुळे यापेक्षा जास्त मोठा टिव्ही नक्कीच नकोय ..क्रिकेट वा इतर कोणताही खेळ घरात कुणीच बघत नाही. मराठी वा हिंदी मालिका बघितल्या जातात ...खरं तर अनेकदा फक्त ऐकल्या जातात (सोबत नाष्टा/जेवण, पेपर वाचन, इतर काम ई चालू असतेच). तांत्रिक करामती असलेले इंग्लिश चित्रपटही बघत नाही. हिंदी वा मराठी चित्रपटच बघतो.

एकूणातच टीव्ही बघून फार काही मनोरंजन होत नाही , कधी कधी तर वेळ असला तरी बघायला चांगलं काहीच सापडत नाही. क्वचित कधी २४ सारखी मालिका वा एखादा खास चित्रपटच काय तो स्क्रीनच्या या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत अगदी मन लावून बघितला जातो.

इंटरनेटवरुन नेहमीच चांगल्या resolution चे चित्रपट मिळतात असे नाही. काही वेळा डाउनलोड केलेल्या चित्रपटाचा (पेन ड्राईववरुन बघताना) आवाज टीव्ही वर नीटसा ऐकू येत नाही किंवा तो चित्रपटच टीव्हीवर चालत नाही. अशा वेळी डेस्कटॉपवर तो पाहतो (आणि त्यावर आवाजाची काहीच समस्या येत नाही, अगदी मोठा आवाज मिळतो..असो)

कार आणि टीव्हीची तुलना होवू शकत नाही. कारमध्ये मी अख्खे शरीर (माझे आणि इतरांचेही) घेवून जातो. त्यामुळे कार आरामदायी , सुरक्षित , चालवण्यास सोपी असणे खूप गरजेचे आहे. टीव्ही मी बाहेरुन बघतो. डोळ्यांना त्रास होणार नाही असे चित्र आणि कानांनी नीट ऐकू येईल, त्रास होणार नाही असा आवाज असणेच काय ते गरजेचे आहे. (अधिक चांगल्या साउंड साठी कधी सिनेमा बघताना म्युजिक सिस्टीमला जोडू शकतो)

बाकी सोनीबद्दल सहमत. माझाही सोनी घेण्याचा विचार फारसा नाही, माझा कल सध्यातरी samsung आणि VU कडे आहे.
Micromax कुणी वापरत आहे का ?

नन्दादीप's picture

6 Mar 2018 - 5:39 pm | नन्दादीप

मी गेली ४ वर्ष Micromax चा ४०' चा फुल HD वाला टीव्ही वापरत आहे. विनासायास, बिनबोभाट, सुरळीत चालू आहे सगळ. बहुतेक आत Inbuilt Stabilizer पण असावा. कारण मागे एकदा व्होल्टेज मुळे पन्खा जळला पण टीव्ही आपोआप बन्द झाला. नन्तर वोल्टेज सुरळीत झाल्यावर आपोआप सुरु झाला. ( कस्टमर केयर मधून एन्जिनेर येणार होता पण त्या आधीच सगळ ओक्के झाल.) अर्थात त्यानन्तर Stabilizer खरेदी झालीच.
आणि घेणार असाल तर आधी Online किंमत चेक करा. जमिन अस्मानाचा फरक असतो. तसही जर काही झालेच तरी दुकानदार देखील सर्व्हीस सेण्टर ची वाट दाखवतात.

मराठी कथालेखक's picture

6 Mar 2018 - 7:28 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद.

Micromax चा आवाज कसा आहे ?

HD चॅनल बघत नसाल तरी सुद्धा Tv फुल्ल HD घ्यावा कारण नेटफ्लिक्स, क्रोमकास्ट, ऍमेझॉन फायर इत्यादी भारतांत लोकप्रिय होत आहेत आणि त्यावर फार चांगला HD experience मिळेल. अर्थांत तुम्ही हे सर्व भविष्यांत घेणार नसाल तर गरज नाही.

स्वधर्म's picture

7 Mar 2018 - 6:01 pm | स्वधर्म

>> सोनी या कंपनीने टीव्ही तयार करणे बंद केले आहे. त्यामुळे या कंपनीचे टीव्ही घेऊ नका असाच सल्ला मी देईन.

तुंम्ही ज्या फिलीप्स कंपनीचा टीव्ही वापरता, ती कंपनी तरी स्वत:च्या प्लॅंटमध्ये टीव्ही बनवते का? पुण्यातला त्यांचा प्लॅंट केंव्हाच उत्पादनासठी बंद केला गेला अाहे. या सगळ्या पूर्वीच्या नावाजलेल्या कंपन्या अाता फक्त ब्रॅंड्स उरल्या अाहेत. ते लोक मार्केटींग अाणि संशोधन (R&D) करतात. पण ब्रॅंड जपणे अावश्यक असल्याने, दर्जाची काळजी घेऊन बनवून अापल्या ब्रॅंडखाली विकतात. अगदी अॅपलसुध्दा त्यांची उत्पादने मलेशिया वगैरे देशातून तयार करून घेते. त्यामुळे तुमचा सल्ला तितका योग्य वाटत नाही.

सुबोध खरे's picture

7 Mar 2018 - 6:27 pm | सुबोध खरे

सोनी या कंपनीने टीव्ही तयार करणे बंद केले आहे. त्यामुळे या कंपनीचे टीव्ही घेऊ नका असाच सल्ला मी देईन. शिवाय ते टीव्ही फुकटचे महाग आहेत.
आपण म्हणताय ते बरोबर आहे.
मी फिलिप्स टी व्ही घेतला तो २०१२ मध्ये त्यानंतर त्यांनी आपले उत्पादन फ्युनाई या जपानी कंपनीला विकले आहे. हीच स्थिती सोनीची (२०१४) आहे. पण या दोन्ही कंपन्यानि टीव्ही चे उत्पादन बंद केलेच आहे आणि केवळ त्यांच्या नावाने दुसरेच लोक विकत आहेत तर "फुकटचे सोनी या नावासाठी पैसे जास्त का द्या" या कारणासाठीच तो घेऊ नका असे सांगितले.
याच कारणासाठी मी सोनी फिलिप्स सोडून मी व्ही यु या कंपनीचा ५५ इंचाचा टीव्ही २ वर्षांपूर्वी घेतला.

मराठी कथालेखक's picture

7 Mar 2018 - 6:42 pm | मराठी कथालेखक

एकूणात VU बद्दल सकारात्मक मत दिसते आहे..
मी पण एकदा VU शोरुमला भेट देईन..

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Feb 2018 - 8:41 am | अमरेंद्र बाहुबली

Sony Bravia klv 32w512d.
अतिशय उत्तम. 1 वर्षांपासून वापरतोय. मोबाईल वायफाय द्वारा कनेक्ट करता येतो. जबरजस्ट clearity.

shashu's picture

27 Feb 2018 - 10:22 am | shashu

LG चे सुद्द्धा चांगले TV असतात असा अनुभव आहे. गेली ४ वर्षे वापरात आहे. १ रु चा सुद्धा खर्च नाही. या अनुभवावरूनच गावी सुद्धा १.५ वर्ष्यापुर्वी LG चाच TV घेतला. अगदी उत्तम.

mi चा एक नवीन tv online उपलब्ध आहे. याबद्दल कोणाचा काही अनुभव किंवा मत असल्यास मांडावे.

चौथा कोनाडा's picture

27 Feb 2018 - 1:18 pm | चौथा कोनाडा

आम्ही सॅमसंग, सोनी व एलजी शॉर्टलिस्ट केले होते.
शेवटी एलजी घ्यायचे नक्की केले.
पण साउंड क्वालिटीची पुन्हा एकदा तुलना केली असता एलजी पेक्षा सोनी ब्राव्हिया उजवा आढळला.
मग सोनी ब्राव्हियाच घेतला. झकास आहे. एन्जॉय करतोय.

मराठी कथालेखक's picture

27 Feb 2018 - 1:30 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद shashu आणि चौथा कोनाडा

टवाळ कार्टा's picture

28 Feb 2018 - 3:03 am | टवाळ कार्टा

जमल्यास व्हीडीओकॉन बघा, एक्सटेंडेड warranty मिळते 5 वर्षांसाठी

मराठी कथालेखक's picture

28 Feb 2018 - 12:39 pm | मराठी कथालेखक

तेवढं सोडूनच बघतोय :)
कारण सध्याचा व्हीडीओकॉनच आहे. साधारण पाच वर्षानंतर खराब झालाय.

आदिजोशी's picture

28 Feb 2018 - 1:35 pm | आदिजोशी

मी मागच्या ७ वर्षांपासून सॅमसंगचा ३२" full hd स्मार्ट टिव्ही वापरतोय. अप्रतीम आहे. एकदाही कसलाही प्रॉब्लेम आलेला नाही. तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या सुविधा त्यात मिळतील.

माझ्या सारखे अनुभव अनेकांनी अनेक ब्रँड्सच्या बाबतीत घेतले असतील. एखाद्याला जो ब्रँड उत्तम वाटत असेल, त्या ब्रँडचा दुसर्‍याला वाईट अनुभव असेल. त्यामुळे तुम्ही स्वतःच काय ते ठरवा.

मराठी कथालेखक's picture

28 Feb 2018 - 4:00 pm | मराठी कथालेखक

सॅमसंगबद्दल माझे मत चांगले आहेच. तुम्ही घेतला तेव्हा किती किंमत होती ?
जोडण्या पाठीमगून आहेत की बाजूने ?

सोनी चे टीव्ही महाग आहेत म्हणून इतर कंपन्यांचा विचार करत होतो, पण दुकानात सर्व कंपन्यांचे टीव्ही आजू बाजूला ठेवलेले असल्यामुळे पिक्चर क्वलिटी ची तुलना करणे सोपे झाले आणि थोडा महाग पडला तरी सोनीच घ्यायचं ठरवलं. हल्ली सर्व मोबाईल फोन व संगणक, भ्र. संगणक यांना इंटरनेट जोडलेले असतेच, टीव्ही ला नसले तरी फारसे काही अडत नाही असे माझे मत आहे. त्यामुळे सोनीचा (इंटरनेट / वायफाय नसलेला) फुल एचडी घेतला. मस्त चालतोय.

कपिलमुनी's picture

5 Mar 2018 - 4:29 pm | कपिलमुनी

xiaomi tv येइ पर्यन्त वाट बघा , चांगले ऑप्शन मिळतील

सतिश गावडे's picture

6 Mar 2018 - 11:31 pm | सतिश गावडे

VU क्रोमा , विजय सेल्स अशा ठिकाणि मिळतो का ?

पुण्यात क्याम्पमध्ये अरोरा टॉवर्स आणि फिनिक्स मार्केटसिटीमध्ये VU चे शोरूम आहेत. मी फ्लिपकार्टवरुन हा टीव्ही घेण्याआधी फिनिक्स मार्केटसिटीला जाऊन प्रत्यक्ष पाहून आलो होतो.

जेव्हा माझा टीव्ही घ्यायचा विचार चालू होता तेव्हा दोन सहकाऱ्यानी हा टीव्ही सुचवला. कधीही न ऐकलेल्या ब्रॅण्डचा टीव्ही घेण्याबद्दल मी साशंक होतो. मात्र शोरूमला जाऊन प्रत्यक्ष क्वालिटी पाहील्यावर घेतलाच.

स्वस्त आणि मस्त. काही दिवसांपूर्वी (वारंटी पिरियडमध्ये) टीव्ही मधला रिमोट सेन्सर काम करेनासा झाला. इनवोईस कॉपीची ईमेल सर्व्हिस सेंटरला प्रॉब्लेम डिटेल्स देऊन फॉरवर्ड केली. दुसऱ्या दिवशी त्यांचा माणूस येऊन डायग्नोसिस करुन गेला. चौथ्या दिवशी तोच माणूस घरी येऊन तो बाद झालेला भाग बदलून गेला. सतरा फॉलोअप कॉल करुन सात पिढयांचा उद्धार करूनही दाद न देणाऱ्या सर्व्हिस सेंटर्सचा दांडगा अनुभव असल्याने हा अनुभव सुखद धक्का होता. :)

मराठी कथालेखक's picture

7 Mar 2018 - 1:21 pm | मराठी कथालेखक

थोडी अधिक माहिती देवू शकाल काय ?
हा टीव्ही कधी घेतलात ? मॉडेल कोणते ? टीव्हीचा आवाज कसा वाटतो ?
प्लिपकार्ट आणि शोरुमच्या किंमतीत बराच फरक होता का ?

सतिश गावडे's picture

7 Mar 2018 - 10:30 pm | सतिश गावडे

>> थोडी अधिक माहिती देवू शकाल काय ?
हो

>> हा टीव्ही कधी घेतलात ? मॉडेल कोणते ? टीव्हीचा आवाज कसा वाटतो ?
प्लिपकार्ट आणि शोरुमच्या किंमतीत बराच फरक होता का ?

31 जुलैला घेतला. आवाज आणि चित्र मला समाधानकारक वाटतात. ऑनलाईन शोरूमपेक्षा स्वस्त होता. नेमका फरक आठवत नाही. मला 29 हजाराला पडला होता. आता किंमत कमी झाली आहे.

Vu

हा स्मार्ट टीव्ही आहे विथ युट्युब आणि नेटफलिक्स डायरेक्त एक्सेस बटन ऑन रिमोट. अँड्रॉईडप्रमाणे एप स्टोअर असून एप, गेम्स डाउनलोड करता येतात.

नॉन स्मार्ट टीव्हीची किंमत या तुलनेत बरीच कमी आहे. पण बजेट थोडे वाढवता येत असेल आणि घरी ब्रॉडब्रॅण्डचा अनलिमिटेड प्लान असेल तर स्मार्ट टिव्हीच घ्या असे मी सुचवेन. पुन्हा टीव्हीचे चॅनल पाहायची ईच्छा होणार नाही. :)

क्लासिक कॉर्ड कटर !

मराठी कथालेखक's picture

8 Mar 2018 - 11:33 am | मराठी कथालेखक

विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद..
हो घरी ब्रॉडबँड आहे.. युट्युबवर गाणि बघायला / ऐकायला आवडतं त्यामुळे टिव्हीवर युट्युब सहजपणे बघायला मिळणार असेल तर निश्चितच बजेट वाढवता येईल.
लवकरच शोरुमला भेट देतो आणि ठरवतो.

टीव्ही बघण्याची फार आवड आणि सवड दोन्ही नाही.

मग धागा काढला कशाला????

या धाग्यावर तरीही मन लावून प्रतिसाद देणार्‍या सर्वांना कोपरापासून हात जोडून नमस्कार!!!

:D

सतिश गावडे's picture

7 Mar 2018 - 2:02 pm | सतिश गावडे

या धाग्यावर प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हालाही कोपरापासून हात जोडून नमस्कार!!!

व्यक्तिशः मी ही त्यांच्यासारखाच आहे, टीव्ही बघण्याची फार आवड आणि सवड दोन्ही नसलेला. मात्र कधी वेळ मिळाला आणि टीव्ही पाहायची इच्छा झालीच तर फार महाग नसलेला टीव्ही घरी असावा हे त्यांचे म्हणणे आहे.

तुम्ही उत्साहात लोकांना नमस्कार केला. :)

पटलं नाही.... एकदा का फरक पडत नै म्हणलं की मग चिकित्सा कसली अन् कशाला?

मराठी कथालेखक's picture

7 Mar 2018 - 3:53 pm | मराठी कथालेखक

व्यक्तिशः मी ही त्यांच्यासारखाच आहे, टीव्ही बघण्याची फार आवड आणि सवड दोन्ही नसलेला. मात्र कधी वेळ मिळाला आणि टीव्ही पाहायची इच्छा झालीच तर फार महाग नसलेला टीव्ही घरी असावा हे त्यांचे म्हणणे आहे.

अचूक ताडलंत...

मराठी कथालेखक's picture

7 Mar 2018 - 3:51 pm | मराठी कथालेखक

टीव्ही बघण्याची फार आवड आणि सवड दोन्ही नाही.

असो :)

अभिदेश's picture

7 Mar 2018 - 5:02 pm | अभिदेश

प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही असाच लोकांचा सल्ला घेता का ? एवढ्या खाजगी मामल्यात असे सल्ले मागणाऱ्या माणसांच्या निर्णय क्षमतेवर खरंच प्रश्नचिन्ह आहे. तुमचं लग्न झालंय का ? असल्यास जोडीदार स्वतः निवडलात की सगळ्यांना विचारून ? लग्न झालं नसल्यास असाच धागा काढणार का ?

मराठी कथालेखक's picture

7 Mar 2018 - 5:34 pm | मराठी कथालेखक

ऐकावे जनाचे करावे मनाचे हे माझे सूत्र आहे.
असो ... तुम्ही नका उगाच ताण घेवू...
बाकी टीव्ही ही खूप खाजगी बाब आहे हे समजून मनोरंजन झाले. धन्यवाद

अभिदेश's picture

8 Mar 2018 - 9:26 am | अभिदेश

बाब नाही ?? तुमचा टीव्ही हा तुम्ही तुमच्या साठी घेत आहात , सार्वजनिक वापरासाठी नाही.

सतिश गावडे's picture

8 Mar 2018 - 9:29 am | सतिश गावडे

तुमच्या या हिशोबाने रिव्ह्यूची सुविधा देणारे अमेझॉन फ्लिपकार्ट हे एक मूर्ख तर त्यावर रिव्ह्यू देणारे दहा मूर्ख. :)

अभिदेश's picture

8 Mar 2018 - 9:53 am | अभिदेश

टीव्हीचे रिव्ह्यू मागितले नाहीत. लेखाचे नाव आहे टीव्ही सुचवा . वर लेखकाने म्हटलेच आहे की ते ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ह्या तत्वांचे आहेत, आता तुम्हीच ठरवा कोण मूर्ख आणि कोण दहा मूर्ख ते. :-)

सतिश गावडे's picture

8 Mar 2018 - 9:57 am | सतिश गावडे

आय माय स्वारी बरं का. तुमचं चालू द्या.

सगा, दासबोध वाचला नाहीस का?

बिटाकाका's picture

7 Mar 2018 - 9:29 pm | बिटाकाका

अत्यंत अकारण आणि हिणकस शेरा असं खेदाने नमूद करावं वाटतं! जगात "रिव्ह्यूज" नावाची काही गोष्ट असते याची कल्पना असेलच आपल्याला.

स्वधर्म's picture

7 Mar 2018 - 5:53 pm | स्वधर्म

वापरतोय. एचडी चॅनेल्स चांगली दिसतायत. खूष.

या धाग्यातील विचार घेऊन कथालेखकाने टिव्हि घेऊन झाला तरी हाच धागा वेळोवेळी नवीन प्रतिसाद देऊन टिव्ही कोणता घ्यावा यासाठी सर्वांनाच उपयुक्त राहील.

MI TV - किंमत,फिचर्स आणि इतर-
इथे :https://telecomtalk.info/xiaomi-mitv-32inch-43inch-launched/174414/

कंजूस's picture

8 Mar 2018 - 5:40 am | कंजूस

माझा अनुभव -

दीड वर्षांपुर्वी दोनचार दुकानांत टिव्ही पाहिले. छोट्या रुमसाठी छोटा फुल एचडी हवा होता. पण ३२"मध्येच ती मॅाडेल्स होती. एका दुकानात फिलिप्सचा २२" होता फुल एचडी. साडेबारा हजारचा पण १५ आगस्टचे एक हजार रु डिस्काउंट होते. मोबाइलातले फोटो विडिओ पाहणे हा एक महत्त्वाचा उपयोग होतो. मेमरी कार्ड रीडर वापरायचे.
युट्युबवरचे कोणतेही कंटेट विंडोज मोबाइलमध्ये डाउनलोड करता येत असल्याने तेही पाहता येतात. इपब/पिडिएफ चे .text रुपांतर केल्यास तेही पाहता/वाचता येते. सर्व काम होते. उचलून नेताही येतो पटकन.

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2018 - 4:22 pm | मराठी कथालेखक

https://www.croma.com/croma-led-hd-80cm-el7326-android-new/p/199070

हा घेतला... चित्र , आवाज सुस्पष्ट आहेत. Android TV आहे. WiFI जोडून YouTube बघता येते.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Feb 2019 - 4:28 pm | प्रकाश घाटपांडे

२०१९ मध्ये कुठला टीव्ही घेऊ
अंतर १६ फुट -३२ " कमी पडतो
अमेझोन फायर स्टिक आहे
बजेट ५० - 60ह

मराठी कथालेखक's picture

9 Feb 2019 - 5:12 pm | मराठी कथालेखक

५०-६० म्हणजे मोठं बजेट आहे.
ब्रँड म्हणून मला सॅमसंग नेहमीच उजवा वाटतो.
४० इंची बघा.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Feb 2019 - 12:39 pm | प्रकाश घाटपांडे

मला ५५" घ्यायचा आहे. किमान ५०" तरी घ्यावा म्हणतोय. माझ्याकडे अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक आहे तर मी स्मार्टा टीव्ही घ्यावा का? किमती व ब्रँड इतके विविध आहेत की गोंधळ होतो. त्यात नंतर तांत्रिक सेवा लागल्यास काय? दुरुस्ती वॉरंटी वगैरे. बजेट पेक्षा कमी लागल्यास उत्तम. आता एलजी ३२ एल्सीडी आहे. तशी काही अडचण नाहीये. काल विजय सेल्स मधे जाउन आलो तर म्हणाले ४९ इंच व जास्त असल्यास ४ के टेक्नॉलॉजीच येते. टीसीएल चे ५५ इंच ३८ हजारच्या आसपास आहे व तीन वर्षे वॉरंटी.

मराठी कथालेखक's picture

11 Feb 2019 - 2:21 pm | मराठी कथालेखक

Fire stick असेल तर टीव्ही स्मार्ट असण्याची गरज नसावी बहूधा पण मी खात्रीने सांगू शकणार नाही. तुम्ही आता Fire stick वापरत आहात काय ? असल्यास त्यात काय काय सुविधा आहेत ते सांगू शकता का ?
स्मार्ट दीव्ही बद्दल बोलायचे तर तो Android TV असतो (बहूतेक करुन- अजून काही वेगळे पर्याय उप्लब्ध असतील तर माहित नाही) त्यामुळे मोबाईल प्रमाणेच यावर विविध अ‍ॅप्स सहजपणे टाकता येतात. मला जाणवलेले स्मार्ट दीव्हीचे फायदे
१) YouTube, Amazon Prime ई सरळ बघता येतं
२) व्हिडिओ बघण्याकरिता VLC Player , MX player ई 1-2 विविध Player installl केल्यामुळे पेन ड्राईव्ह वरील व्हिडिओ कोणत्याही format मध्ये असेल तरी बघण्यात सहसा अडचण येत नाही (पुर्वी साध्या LCD TV स्मार्ट दीव्हीवर अनेकदा format साठी अडचण येत होती आणि काही सिनेमे बघता यायचे नाहीत कॉम्प्युटरवरच बघावे लागायचे)
मर्यादा
टिव्ही ची RAM , OS version , internal memory ई बघून घेणे गरजेचे आहे. माझ्या TV ची RAM - 1 GB, OS : Anrdoid 4.4 , internal memory - 4 GB आहे हे काही फार चांगले configuration नाही. OS version tar फारच जुनी आहे. सध्या तरी काही समस्या येत नाहीत पण भविष्यात येवू शकतात. तुम्ही महागडा Smart TV घेणार असाल तर त्याची Configuration चांगली आहे हे बघून घ्या म्हणजे अनेक वर्षे तो जुनाट वाटणार नाही.
बाकी ५५ इंच घेण्याचा विचार ठीक आहे पण इतक्या मोठ्या टिव्हीवर फक्त Full HD वा त्याहून अधिक resolution चे channels चांगले दिसतील. SD channels फारसे चांगले दिसणार नाहीत. तरी तुम्ही दुकानात टिव्ही बघत असताना सेल्समनला SD (HD नसलेले) चॅनेल चालवून दाखवायचा आग्रह धरा. वेगवेगळ्या कोनातून चित्र कसे दिसते ते पहा. तुम्ही जितक्या अंतरावरुन घरी बघणार साधारण तितक्या अंतरावून बघा.
बाकी चित्रासोबत सुस्पष्ट आवाजही महत्वाचा त्यामुळे आवाजही तपासून घ्या.TCL बद्दल मला माहित नाही. पण चित्र आणि आवाज आवडलं असेल तर घ्या बिनधास्त ३ वर्षांची वॉरंटी आहेच की..