गाभा:
औरंगाबाद मध्ये वंध्यत्व/gyanac साठी चे चांगले डॉक्टर सुचवा
माझ्या मैत्रीणीला लग्नाला तीन वर्षे झालीयेत तरी त्यांना अजून
बाळाची चाहूल लागेना झालीय
तस प्रथम दर्शनी सर्व ठीक आहे
तरी दाखवलेले बरे
आपण कोणास चांगल्या डॉक्टर बद्दल माहिती असेल तर सांगा please
आणि हो औरंगाबाद परिसरातला हवा
तुमचे अनुभव शेअर करा
प्रतिक्रिया
26 Feb 2018 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Dr Manju Jillaहे औरंगाबादमधील प्रसिद्ध नाव आहे.
Jilla Hospital, Motiwala Nagar , Seven Hills, Aurangabad, MH 431005
Contact No: 0240- 2337245
आपण योग्य चौकशी करून, माहिती घेऊनच निर्णय घ्यावा. केवळ माहिती आहे म्हणून आणि एका प्राध्यापक मित्राच्या कुटुंबियांना चांगला अनुभव आहे म्हणून माहिती डकवतोय.
-दिलीप बिरुटे.
27 Feb 2018 - 12:07 pm | तनमयी
थांक्य यु सर
27 Feb 2018 - 12:07 pm | तनमयी
थांक्य यु सर
26 Feb 2018 - 6:34 pm | manguu@mail.com
सध्या तिथे conference सुरु आहे. याच विषयावर
27 Feb 2018 - 12:26 am | manguu@mail.com
डॉ. पंडित पळसकर
( माझी ओळख नाही .. मित्राना विचारून नाव मिळाले. )
http://endoworldhospital.com
27 Feb 2018 - 12:10 pm | तनमयी
बहुतेक इथेच जायचे घाटते आहे
पण गुगळे वर review तेवढे ठीक वाटत नाहीयेत
रेटिंग ठीक आहे
अशा उपचारासाठी पैसा बराच लागतो
27 Feb 2018 - 12:12 pm | तनमयी
हो का लिंक आहे का ?
किंवा वेनुय आहे?
27 Feb 2018 - 3:33 am | स्मिता.
ज्यांना तज्ञांची माहिती आहे ते देतीलच पण उपचार नीट माहिती गोळा करूनच घ्यायला सांगा.
माझ्या एका मैत्रिणीची वहिनी IVF उपचार घेत होती. कोणत्यातरी (मैत्रिणीच्या मते चुकीच्या) इंजेक्शनच्या रिअॅक्शनमुळे तिचा मृत्यू ओढवला असं माझ्या मैत्रिणीचं म्हणणं आहे. अर्थातच ही ऐकीव माहिती आहे, खरं-खोटं डॉक्टरला आणि देवालाच माहिती!
27 Feb 2018 - 12:17 pm | समीरसूर
अगदीच गरज असेल तर आयव्हीएफ करायला हरकत नाही पण आधी आययुआय ट्राय करायला सांगा. आयव्हीएफ १-२ करावेत. त्यापेक्षा जास्त करू नयेत. शरिराची वाट लावणारे उपचार म्हणजे आयव्हीएफ! एकवेळ अपत्य नाही झाले तर चालेल पण ८-१०-१२ आयव्हीएफ करणे अतिशय भयंकर आणि क्रूर आहे. मूल नसणे हा काही फार मोठा प्रॉब्लेम नाही; त्यासाठी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे, पैसा, आणि आरोग्य दवडणे योग्य नाही. त्यांना आणि तुम्हाला इच्छा असल्यास माझ्याशी संपर्क करू शकता. मी डॉक्टर नाही पण या सगळ्या मानसिक त्रासांमधून गेलेलो आहे आणियातलायाचा पूरेपूर अनुभव आहे.
शुभेच्छा!
1 Mar 2018 - 3:45 am | एमी
मूल नसणे हा काही फार मोठा प्रॉब्लेम नाही; त्यासाठी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे, पैसा, आणि आरोग्य दवडणे योग्य नाही. >> +१०००
28 Feb 2018 - 11:13 am | अनामिक
बऱ्याचवेळा मुल होत नाही म्हणजे वंध्यत्व स्त्री मधे आहे हे गृहित धरले जाते. कोणतेही उपचार घेण्याआधी मुळ प्रॉब्लेम समजून घ्या. नवरा आणि बायको दोघांच्याही निट तपासण्या आणि चाचण्या होणे आवश्यक आहे, नाहीतर प्रॉब्लेम पुरुषात असायचा आणि उपचार स्त्रीवर व्हायचे!
असो, जर् स्त्री किंवा पुरुषामधे काही त्रुटी असतील तर आधी त्या त्या त्रुटी विषयी सगळी माहिती गोळा करा. इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध असते. त्या माहितीच्या आधारे जो कोणी गायनॅक असेल त्याला सविस्तर प्रश्न विचारा. जर तुमच्या शंकांचे निरसन होत नसेल तर तो गायनॅक काही कामाचा नाही. फार नामांकित गायनॅक असेल तर त्यांच्याकडे सहसा पेशंटला द्यायला जास्तं वेळ नसतो. आणि तुम्हाला ह्या विषयातले जास्तं कळते की मला असे म्हणून आपलं तोंड गप्प केलं जातं. तरी जिथे सगळ्या शंकांचे निरसन होते तिथले उपचार घ्यायला हरकत नसावी. शेवटी आपण आप्ल्या शरिराशी खेळत असतो.
आयवीएफ ही शेवट्ची स्टेप असावी, त्याआधी दुसरे उपाय ट्राय करावे. घाई करु नये. लग्नाला ३ वर्षे म्हणजे जास्तं नाही झालेत.
1 Mar 2018 - 10:07 am | सुबोध खरे
त्यासाठी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे, पैसा, आणि आरोग्य दवडणे योग्य नाही.
हा अतिशय वैयक्तिक आणि खाजगी स्वरूपाचा प्रश्न आहे आणि ज्याला/ जिला अपत्यप्राप्तीची अपेक्षा किती तीव्र आहे हे दुसरा ठरवू शकत नाही त्यामुळे वरील सल्ला स्वतःच्या प्रवृत्ती / प्रकृती प्रमाणे घेणे.
आज आपले मूल नसले तरी चालेल वाटणाऱ्या जोडप्यानं काही वर्षांनी जेंव्हा करियर पैसे इ स्थिर स्थावर झाले तर फार प्रकर्षाने "मूल हवेच" असे जाणवू लागते तोवर उशीर झालेला असू शकतो
आपण मुंबईत आलात तर शंकानिरसन/सल्ला फुकट दिला जाईल. पण मी स्त्रीरोग तज्ञ नाही तर क्षकिरण विशेषज्ञ् आहे आणि वंध्यत्व या विषयात गेली काही वर्षे (२७) काम करीत आहे. गुगल किंवा व्हॉट्स ऍप विद्यापीठातील ज्ञानाचे सुद्धा शंका निरसन करण्यात येईल.
मिपाकरांसाठी काही पण.
औरंगाबाद मध्ये कोणते स्त्रीरोग तज्ञ चांगले आहेत हे मात्र मला माहित नाही.
क्षमस्व.
1 Mar 2018 - 2:47 pm | समीरसूर
मूल होणे हा आयुष्याचा एक भाग आहे. मी कित्येक जोडपी पाहिलेली आहेत ज्यांनी १२-१५ आयव्हीएफ करून ८-१० वर्षे या केवळ एका ध्यासापोटी दवडली आहेत. आणि आयव्हीएफमुळे अशा स्त्रियांच्या शरिराची प्रचंड वाताहत होते हे आमच्या घरचे उदाहरण आहे. सध्या तर "नि:संतान" अशी जाहिरात करून आयव्हीएफ करणार्या एका रुग्णालयाची मला प्रचंड चीड येत आहे. लोकांना भावनात्मक आवाहन करून लाखो रुपये आयव्हीएफसाठी खर्च करायला प्रवृत्त करणे हाच यांचा धंदा आहे. खरे म्हणजे आयव्हीएफ ही खूप त्रास देणारी उपचारपद्धती आहे आणि त्यावर डॉक्टर मंडळींनीच काहीतरी मर्यादा घालून द्यायला हवी. या बाबत डॉक्टर मंडळींनी मार्गदर्शक तत्वे घालून दिली पाहिजेत. एमसीआयने याबाबत कठोर नियमावली तयार केली पाहिजे असे माझे मत आहे. १-२ आयव्हीएफनंतर मूल होत नसल्यास पुन्हा आव्हीएफ करू नये असे माझे मत आहे. किंवा ३-४ वर्षंनतर पुन्हा एखादे आयव्हीएफ करावे आणि तरीही मूल होत नसेल तर हे वास्तव स्वीकारावे आणि आपले पुढचे आयुष्य आनंदाने व्यतीत करावे हाच त्यावरचा एकमेव चांगला उपाय आहे. आव्हीएफ हे आधुनिक विज्ञानाचे वरदान आहे खरे पण १-२ आयव्हीएफ नंतरही मूल होत नसेल तर तो मार्ग सोडायला हवा. स्वानुभवावरून सांगतो हे वास्तव पचवून चांगले आणि आनंदी आयुष्य जगणे खरंच शक्य आहे आणि तितकेसे ते अवघडही नाही. पण त्याच एका ध्यासापोटी अनेक वर्षे, ऊर्जा, लाखो रुपये दवडत राहणे यात काही राम नाही.
ता.क. - आम्हाला गेल्यावर्षी मार्चमध्ये देवाच्या कृपेने नैसर्गिकरीत्या मुलगा झाला. लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनंतर. त्याआधी चार वर्षे आम्ही आपल्याला मूल होणार नाही हे त्यावेळेपर्यंतचे वास्तव स्वीकरले होते आणि आम्ही त्या चार वर्षांत भरपूर धमाल केली. इतकी की जेव्हा अचानक आम्हाला कळले की बाळाची चाहूल लागलेली आहे त्यावेळेस आम्ही भांबावलो होतो आणि घाबरलो ही होतो. आता मात्र त्याच्यासोबत वेळ कसा जातो कळत नाही. आयुष्य सवयींवर चालते. एकदा एखाद्या गोष्टीची सवय झाली की मग काहीच प्रॉब्लेम येत नाही. बाकी समाज, नातेवाईक वगैरे सगळ्यांना सरळ सरळ इग्नोअर मारायचं. मी आम्ही काही खूप ग्रेट केलं किंवा आम्हाला किती अनुभव आहे या अविर्भावात हे सांगत नाहीये; परंतु एक अनुभव म्हणून सांगतो आहे. आणि आता आम्हाला बाळ आहे म्हणून मी हे सगळं म्हणतोय असंही नाही. हे मी २०१३ पासून या समस्येमुळे दु:खी, कष्टी असणार्या ओळखीच्यांना, मित्रांना वगैरे सांगतोय.
एखादी गोष्ट होतच नाहीये म्हटल्यावर त्यावर ती होत नाहीये म्हणून किती मनःस्ताप सहन करायचा हे आपणच ठरवायचं.
1 Mar 2018 - 4:26 pm | एस
प्रतिसाद आवडला.
1 Mar 2018 - 8:15 pm | सुबोध खरे
समीरसूर साहेब
आपण उपस्थित केलेले मुद्दे अतिशय योग्य आहेत.
आपण जर फॉलीक्युलर मॉनिटरिंग केले असेल तर आपल्याला माहीत असेल. मी पुण्यात रोज साधारण तीस रुग्णांचे फॉलीक्युलर मॉनिटरिंग सात वर्षे पर्यंत केले आहे (१९९१-१९९७). यानंतर गेले १ वर्षे मी कमी प्रमाणात तीच गोष्ट करत आलो आहे. यावरून मला एवढेच सांगायचे आहे कि मी साधारण एक ते दीड लाख रुग्ण गेल्या २७ वर्षात पाहिले आहेत. आय व्ही एफ ने गरोदर राहिलेली सर्वात वयस्कर स्त्री हि ५० वर्षाची मी स्वतः पाहिलेली आहे. यात शेखीं मिरवण्याचा भाग नसून माझ्या सारख्या अनेक डॉक्टरांनी किती अनुभव घेतलेला असतो हे नजरेस आणण्यासाठी आहे.
मूल नसणे याचा आपल्या समाजात स्त्रीला जितका मानसिक त्रास होतो तितका पुरुषांना होत नाही आणि पुरुष साधारणतः स्त्रियांइतके भावनिकहि नसतात. प्रत्येक सण समारंभ सार्वजनिक ठिकाणी स्त्रीला (इतर स्त्रियाच) इतक्या वेळेस "मुला"बद्दल विचारतात कि त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाणे नकोसे होते. बऱ्याच स्त्रिया या मुळे समाजात मिसळणे टाळू लागतात आणि त्यांची वृत्ती नैराश्यवादी होते.
चार पुरुष एकत्र आले तर मुले हा विषय त्यांच्या चर्चेत फार तर ५ % काळ व्यापतो. या उलट स्त्रियांच्या चर्चा ५० % पर्यंत काळ मूल याविषयाभोवती फिरत असतात. यामुळे स्त्रीला आपले मूल असणे हि एक अतिशय महत्वाची भावनिक गरज होऊन बसते.
मुळात स्त्रीची भावनिक ठेवण आणि आंतरिक उर्मी मातृत्वाबद्दल जास्त प्रखर असतेच. कारण मातृत्वात स्त्रीची भावनिक गुंतवणूक(emotional investment) कितीतरी जास्त असते. त्यातून समाजाची मूल नसलेल्या स्त्रीकडे समाजाची पाहण्याची दृष्टी हीच सदोष आहे. "वांझ" पासून नापीक किंवा बंजर यासारखी विशेषणे स्त्रिया आडून आडून वापरतात. कनिष्ठ वर्गात तर मूल होत नाही म्हणून बायकोला सोडून देणारे किंवा दुसरे लग्न करणारे भरपूर सापडतात. आंध्र प्रदेशात सवत येणारच असेल तर बाहेरची नको म्हणून धाकट्या बहिणीशी लग्न लावून देणाऱ्या बायका मी पाहिल्या आहेत.
यामुळे बऱ्याच स्त्रीया मूल होण्यासाठी कितीही पैसे किंवा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करण्यासाठी तयार होतात हि वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने वंध्यत्वावरील उपचार हे अतिशय महाग, वेळ खाणारे आणि मानसीकदृष्ट्या जोडप्याचा अंत पाहणारे आहेत हि वस्तुस्थिती आहे.
परंतु एखाद्या जोडप्याने मुल होण्यासाठी किती वेळ आणि पैसा खर्च करावा यासाठी सरकार किंवा भारतीय वैद्यक संस्था कोणतेही बंधन (कायदेशीर किंवा नैतिक) घालू शकत नाहीत.
मूल होण्यासाठी लोक अंगारे धुपारे पासून झाड मुल, काली विमुल,, बाबा महाराज पासून आयुर्मुल,,, होमिमुल,,,, आधुनिक विज्ञान पर्यंत सर्व उपाय करून पाहतात यात अतोनात पैसे वेळ जातो आणि मानसिक शक्तिपात होतो पण याला नक्की उपाय काय आणि कसा करणार.
जर आय आय टी मध्ये प्रवेश मिळण्यासाठी लोक आपल्या मुलाला ५ वी पासून घाण्याला जुंपतात आणि अक्षरशः लक्षावधी रुपये खर्च करतात तर मूल होण्यासाठी पैसे खर्च करणारच. त्याला तुम्ही आणि मी काय करू शकतो.
वंध्यत्वासाठी लागणारी इंजेक्शन मेनोट्रॉफीन हुमेगॉन इ. मधील (HUMAN MENOPAUSAL GONADOTROPHIN-- HMG) हे द्रव्य हि रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांच्या मूत्रापासून वेगळी काढून शुद्धीकरण करून निर्जंतुक करून बाजारात आणावी लागतात त्यामुळे त्याची किंमत जास्त असते.६००-८०० रुपये याला उपाय काय? अहो शेण ३०० रुपये किलो (१९९ रुपये किलो + १०० रुपये टपाल खर्च) ने उपलब्ध आहे https://www.amazon.in/Pure-Dung-powder-Organic-manure/dp/B071QZTJKR?tag=...
( आजच सकाळी माझ्या कडे सोनोग्राफी करून गेलेलय बाई आपल्या ४ वर्षाच्या मुलाच्या शाळे बद्दल बोलत होत्या. अपर के जी ची वर्षाची फी
ऐरोली च्या डी ए व्ही शाळेत ५०,००० आहे तर युरो स्कुल ची फी दीड लाख आहे. यात स्कुल बस ची फी अंतर्भूत नाही त्यासाठी १८००० रुपये वर्षाचे अतिरिक्त.
दर महा १५००० रुपये देऊन ४ वर्षाच्या मुलाला काय शिकवणार आणि ते मूल काय शिकणार?
साधारण १० टक्के जोडप्यात वंध्यत्व असते. आधुनिक उपचारांनी यातील ९० % स्त्रिया दोन वर्षात गरोदर राहू शकतात.
तात्पर्य -- आपला सल्ला मौलिक आहे यात शंकाच नाही पण कोणी किती पैसे खर्च करायचे आणि किती मानसीक आणि शारीरिक गुंतवणूक करायची हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
9 Mar 2018 - 5:03 pm | समीरसूर
डॉक्टरसाहेब, आपण सांगीतलेली ही वस्तुस्थिती आहे खरी पण यामध्ये आपल्या चालीरीती, समाज जास्त गुन्हेगार आहे. मला अशा स्त्रिया माहिती आहेत ज्यांना इच्छा नसतांना केवळ दबाव आहे म्हणून बाळांना जन्म द्यावे लागलेले आहेत. अशी कित्येक उदाहरणे आहेत. केवळ समाजाचा, घरच्यांचा दबाव आहे म्हणून तरी कुणी १०-१२ आयव्हीएफ सारखे अघोरी प्रकार करू नयेत एवढीच माफक अपेक्षा. हे आपलं आयुष्य आहे आणि ते आपण आपल्या पद्धतीने जगायला पाहिजे असं ठाम ठरवून उभं राहिलं की काही प्रॉब्लेम येत नाही. मला अशी बरीच जोडपी माहिती आहेत (४०-४५ पासून ८०-८५ पर्यंत वयाची) ज्यांना अपत्य नाही आणि त्यांनी अपत्याविना आयुष्य स्वीकारून आयुष्याचा आनंद उपभोगला आहे किंवा अजून उपभोगत आहेत. कुणाला क्रिकेटर व्ह्याचं असतं, कुणाला डॉक्टर, तर कुणाला गायक, तर कुणाला अभिनेता...अगदी कमी लोकांची अशी स्वप्ने पूर्ण होतात. नाही झाली तर काय करणार? रडत-कुढत बसण्यापेक्षा जे आहे ते स्वीकारून आनंदात जगणे हाच एक मार्ग असतो. मूल होत नसेल तर माफक उपचार करून आपले आयुष्य पुन्हा दुसर्या ध्येयांकडे वळवणे केव्हाही श्रेयस्कर! १२-१५-१८ वर्षे त्या एकाच गोष्टीमागे लागणे हे काही खरे नव्हे. नुकत्याच एका साठीतल्या जोडप्याने आपल्या मृत मुलाचे शुक्राणू वापरून एक अपत्य या जगात आणले. हा तंत्रज्ञानाचा चक्क दुरुपयोग आहे. तुषार कपूरने अशी आईविना वाढणारी मुले या जगात आणली. तंत्रज्ञाने काहीही शक्य आहे म्हणजे ते बरोबरच आहे असे असू नये असे वाटते. शेवटी प्रत्येक निर्णय हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे हे खरेच! असो.
1 Mar 2018 - 9:24 pm | तेजस आठवले
सर्वच प्रतिसाद विचार करायला लावणारे आहेत
1 Mar 2018 - 10:27 pm | चौथा कोनाडा
सुबोध खरे साहेब आणि समीरसुर यांचे प्रतिसाद आवडले, माहितीपुर्ण आहेत.
माझ्या नातेवाईक दाम्पत्य देखील यातून गेले. त्यातल्या पत्नी शरिरिक व मानसिक वाताहतीने त्रस्त झाल्या. आयव्हीएफ करण्यापुर्वी नशीबाने त्यांना अपत्यप्राप्ती झाली !
दुसर्या एका केस मध्ये दाम्पत्याला मूल होणार नाही हे स्पष्ट झाले. बिचारे कुढत कुढत दिवस काढत होते. आमच्या ऑफिस मधील नेहमी लोकांना वेगवेगळी मदत करणार्या एका सहकार्याला हे समजले. त्याने दत्तक प्रक्रियेची पुर्ण माहिती घेवुन, दाम्पत्याला मुल दत्तक घेण्यास प्रवृत्त केले. स्वतः पाठीशी ठाम पणे उभे राहून गरज असेल तेंव्हा यांच्याबरोबर जाऊन दत्तक घेण्यात पुर्ण मदत केली ! त्या दांपत्याला अपत्यसुख मिळवुन दिले. मदत करणारा तो सहकारी त्यांच्यासाठी परमेश्वर ठरला.
आता ती मुलगी अठरा वर्षांची झालीय. त्या कुटुंबातला आनंद, सुख पाहून, मदत करणार्या त्या सहकार्याला मी नेहमी मनोमन वंदन करत असतो.