उत्तरे

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जनातलं, मनातलं
14 Dec 2007 - 10:39 am

सर्किटकाकांना कबूल केल्याप्रमाणे माझ्यावरील आरोपांची स्वतंत्र उत्तरे या लेखाद्वारे देत आहे -
सर्वश्री गा. बापूसाहेब,
'विनोद' या लेखावरील प्रतिसादात विनाकारण आणि अनाकलनीयरित्या आमचा उल्लेख 'पुचाट'असा केल्यावर, शेपूट घातलीन म्हटल्यावर तुमचा उल्लेख आमच्याकडून होता कामा नये, अशी धमकी देण्याचा अधिकार तुम्हाला राहत नाही. सबब, अशी धमकी देण्याआधी आधी स्वतःचे कर्तृत्त्व कसे कुठे पाजळले आहेत, हे बघावे :) कसें?
सर्वश्री सर्किटकाका,
तात्यांनी तुमच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याचे खापर माझ्या प्रतिसादांवर फोडू नये. कारण माझे प्रतिसाद व्यक्तिगत पातळीवर नसून लोकशाही तत्त्वे आणि मिसळपावची धोरणे यांच्याशी सुसंगत आहेत, हे कृपया लक्षात घ्यावे. मात्र असे न करता कोत्या मनोवृत्तीचा वगैरे आरोप विनाकारण करणे, गप्प बस, तोंडावर/बोटांवर कन्ट्रोल ठेव वगैरे धमकीवजा सूचना करणे ('वार्न' करणे) यासारखा बालिशपणा तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी टाळला नाही, तर आम्हा लहानांनी कुणाकडून आदर्श घ्यायचे?
धन्यवाद.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

सर्किट's picture

14 Dec 2007 - 11:06 am | सर्किट (not verified)

योग्य वेळ येताच, तुम्हा लहान मुलांच्या भाबड्या बोलांना, आम्हा मोठ्यांकडून उत्तेजन मिळेलच.

तोवर मोठे बोलताहेत त्यात कृपया अडथळा आणू नये.

ज्या विषयावर चर्चा सुरू आहे, तो गंभीर विषय आहे.

लहान मुलांनी मध्ये मध्ये बोलल्यास, चर्चा करणार्‍यांतील एक बाजू त्याचा फायदा घेऊन विषयांतर करायला तयार असेल.

तेव्हा, माझा पुन्हा एकदा सल्ला (होय, आता लहानमुलांनाही सल्लाच द्यावा लागतो, धाकदपटशा देता येत नाही ;-)

गप्प !!!!

पंचायत समितीच्या आडून त्यांच्या नकळत कुणी त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले, हे कळल्याखेरीज मी गप्प बसणार नाही, तेव्हा, तू कृपया गप्प बसशील का ?

- सर्किट

बेसनलाडू's picture

14 Dec 2007 - 11:11 am | बेसनलाडू

पंचायत समितीच्या आडून त्यांच्या नकळत कुणी त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले, हे कळल्याखेरीज मी गप्प बसणार नाही,
--- तुमच्याकडून हे आश्वासन जाहीर मिळाल्याने आता निर्धास्त आहे.
(निर्धास्त)बेसनलाडू
तेव्हा, तू कृपया गप्प बसशील का ?
--- व्यक्तिगत स्तरावरील, अतार्किक तसेच विनाकारण आणि निंदनीय आरोप झाले नाहीत, तर नक्कीच. खात्री बाळगा. पण सार्वजनिक मुद्द्यांवर मते मांडणे, तत्त्वांमधला आणि धोरणांमधला विरोधाभास अधोरेखित करणे सुद्धा सोडायचे का? तिसरेच कोणीतरी विषयांतर करेल या भीतीने? अशा विषयांतराकडे यथायोग्य दुर्लक्ष करून मूळ मुद्दा लावून धरण्याचे कामही नाही करायचे का?
कृपया या प्रश्नावर मार्गदर्शन करावे.
(कन्फ्यूज्ड)बेसनलाडू

सर्किट's picture

14 Dec 2007 - 11:16 am | सर्किट (not verified)

अशा विषयांतराकडे यथायोग्य दुर्लक्ष करून मूळ मुद्दा लावून धरण्याचे कामही नाही करायचे का?

तुला उत्तर हवे आहे की नाही ?

मग स्वतः शांत राहणे आवश्यक. वाटल्यास मी केलाय तसा खरडवहीतून तात्याला उत्तराचा आग्रह कर. रात्रभर मिसळपाव रिलोड कर वाटल्यास ! पण तुझ्या लेखनाला नेहमी "पोष्ट्यागजानाचा पित्तु" असा उल्लेख करून घ्यायचा नसेल, आणि विषयांतर करवायचे नसेल, तर गप्प बसणे, हेच श्रेयस्कर !

विनाकारण आणि निंदनीय आरोपांचे उत्तर म्हणजे ते आरोप विनाकारण आणि निंदनीय आहेत, असे सिद्ध करणे.

हेच माझे मार्गदर्शन !

- सर्किट

बेसनलाडू's picture

14 Dec 2007 - 11:18 am | बेसनलाडू

काका,
अतिशय छान मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार येथील पुढचे लेखन करेन. धन्यवाद.
(आभारी)बेसनलाडू

गारंबीचा बापू's picture

14 Dec 2007 - 11:33 am | गारंबीचा बापू

बेसनलाडु पुचका निघाला
दम नाही
आहे तिथेच रहाणार
गां* मे नही गु और चले हग्गु

आता कोणाला द्यावा पाठींबा हे ठरवतोः)

नाना

हे ही तू वाचायला हवं होतंस आणि या लेखात याची लिंकही द्यायला हवी होतीस.

ज्या अविर्भावात तू हा विषय पुढे रेटत आहेस, त्यावरून तुझ्यात फार धमक आहे असा समज माझाच नव्हे तर इतरांचाही झाला.

नाना चेंगटाचा वरचा अभिप्राय हेच सांगतोय ना?

पण आयत्या वेळेस तू पळपुटेपणाचीपणाची भूमिका स्विकारलीस.

१. समिती लोकनियुक्त आहे. मतदानाचे नियम, स्वरूप स्पष्ट असून त्यांनुसार निवडून आलेली आहे. तुम्हांला माहीत नसल्यास सांगतो.
२. माझ्या नावाने आगे बढोच्या घोषणा देणे निरर्थक, खोडसाळ आणि तार्किकदृष्ट्या चुकीचे आहे, कारण माझा समितीवर अविश्वास आहे, असे मी कोठेही म्हटलेले नाही.
बाकी तुमचे मोर्चे वगैरे चालू द्यात.
धन्यवाद.
(खुलासेवार)बेसनलाडू

तुझे या संदर्भातील आजपर्यंतचे लेखन आणि तुझा वरील अभिप्राय यात किती तफावत आहे ते तूच ठरव.

"तुम्ही लढा.....मी कपडे सांभाळतो" या अवसानघातकीपणाला साध्या कोकणी मराठीत 'पुचाट' म्हणतात.

बापू.

बेसनलाडू's picture

14 Dec 2007 - 11:40 am | बेसनलाडू

मी स्वतःचेच म्हणणे कुठेही कॉन्ट्राडिक्ट केलेले नाही.
मी जो विषय रेटला तो माझ्या मुद्द्यावर, माझ्या मुद्द्यासाठी. कोणाच्या वतीने, कोणीतरी सांगितले म्हणून, कोणासाठी वगैरे नाही. पुढारीपणा, नेतेगिरी केलेली नाही. ती केलेली नाही, हेही स्पष्ट त्याच ठिकाणी सांगितले होतेच. तुमचा जो काय समजबिमज झाला, त्याची जबाबदारी माझी राहत नाही. मात्र या (गैर)समजाची कोणतीही शहानिशा न करता बेलगाम वैयक्तिक आरोप करण्याच्या नीचपणाची जबाबदरी तुमची. त्यामुळे त्याला अनुसरून दिलेल्या "माझ्या नावाचा उल्लेख होता कामा नये" वाली धमकी तुम्हालाही लागू होतेच आहे. तीच मीही दिली.
कृपया तफावतीचा तुमचा मुद्दा अधिक स्पष्ट करावा. कळलेला नाही. जितका कळलेला आहे, केवळ त्यावरूनच मला कोणत्याही निष्कर्षाप्रत जायचे नाही, म्हणून हा प्रतिसादप्रपंच.
(खुलासेवार)बेसनलाडू

मुक्तसुनीत's picture

14 Dec 2007 - 11:41 am | मुक्तसुनीत

माझ्या आवडत्या बनू पाहणार्‍या या संकेतस्थळावर आज इंटरेस्टिंग , चांगलं वाटण्याजोगं एक अक्षरही मिळालं नाही वाचायला आज. आता मालकानी यावे आणि जे काय झालं (किंवा नाही झालं) त्याची मनमोकळी उत्तरे द्यावी. आणि सर्वानी हा अत्यंत बोरिंग प्रकार मागे टाकून काहीतरी नवे (किंवा जुन्यापैकी काहीतरी छानसे पुन्हा नव्याने ) लिहीणे चालू करावे अशी माझी प्रार्थना राहील.

कुठल्याही जबाबदार सदस्यांच्या भावनाना कमी लेखायचा हेतू नाही. But I really wish we get to move on. Enough this @#@#@.

गारंबीचा बापू's picture

14 Dec 2007 - 11:57 am | गारंबीचा बापू

सुनीत,

मी तुमच्याशी सहमत आहे. पण अनेकदा विनंत्या झाल्या तरी हा नाठाळ बेसनलाडू गप्प बसत नाही.

काही कारण नसतांना वादाचे विषय निर्माण करून माझ्यासारख्यांना त्यात 'अवतीर्ण' करून घेतो आहे. नवीन नवीन पोस्ट निर्माण करून मूळ मुद्द्यांना फाटे फोडतो आहे.

मी देखिल तुमच्यासारखाच आनंद मिळवण्यासाठी इथे येतो पण उगाच कोणी धोतराला हात घातला तर वहाण हातात घ्यावी लागते. काय करणार?असो.

मी या विषयावर अधिक काही लिहिणार नाही. हा विषय माझ्यापुरता संपलेला आहे.

बापू

बेसनलाडू's picture

14 Dec 2007 - 12:49 pm | बेसनलाडू

मी देखिल तुमच्यासारखाच आनंद मिळवण्यासाठी इथे येतो पण उगाच कोणी धोतराला हात घातला तर वहाण हातात घ्यावी लागते.
--- मलाही!

काय करणार?असो.
मी या विषयावर अधिक काही लिहिणार नाही. हा विषय माझ्यापुरता संपलेला आहे.
--- अहो लिहायला काही उरलेच कुठे आहे तुमच्याकडे! तेव्हा संपवलेत हेच उत्तम! आम्हाला सर्किटकाकांनी मार्गदर्शन केले आहे आरोप खोडून काढण्याचे! त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार.

(समाधानी)बेसनलाडू

नाना फडणवीस's picture

14 Dec 2007 - 1:42 pm | नाना फडणवीस

या विषयावरील लेखन वाचल्यावर, बेसनलाडू करतांना पाक बिघडला असावा असे दिसते. पाक फार चिकट झाला.

नाना फडणवीस

क्रेमर's picture

23 Jul 2010 - 3:32 am | क्रेमर

जुन्या काळातील मोकळ्या जीवनशैलीविषयी काही निष्कर्ष या धाग्यावरून काढता येतात.

-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.