बाबा-बुवा-माताजी यांचा सुळसुळाट

पुंबा's picture
पुंबा in काथ्याकूट
22 Dec 2017 - 6:44 pm
गाभा: 

हिंदू विचारपद्धतीत संत या शब्दाला मान आहे, संत ही उपाधी मिळण्यासाठी सज्जन, दुसर्‍याची दु:खे समजून घेणारा, जमेल तिथे करूणाभाव ठेऊन लोकांना योग्य मार्गावर आणणारा असा माणुस असे सर्वमान्य आहे. आधुनिक महाराष्ट्रात गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज हे दोन रचनात्मक काम उभारणारे, समाजाला योग्य मार्गावर आणणारे संत होऊन गेले. हल्ली मात्र स्वयंघोषीत संत, अध्यात्मिक तारणहार उदंड झालेले आहेत. गेल्या ५ वर्षातच किमान ३ बहुचर्चीत बाबे(आणि त्यांच्या अनुयायांच्या दृष्टीने संत) आपल्या काळ्या कामांमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडले. आसाराम, रामपाल आणि गुरमीत हे ते तिघे. तिघांचेही अनुयायी संख्येने प्रचंड म्हणावे इतके होते. सत्तेच्या दोन्ही टोकावरची हाय प्रोफाईल मंडळी यांच्या भक्तमंडळींत समाविष्ट होती. हजारो एकरच्या सरकारी जमिनी या तिघांनीही लाटल्या होत्या, अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे आरोप तिघांवरही झाले. यांच्या आश्रमात अनेक काळे धंदे चालत असल्याचे नंतर कळले. रामपालने आणि गुरमीतने तर सरकार अटक करू पाहते आहे हे पाहूने चक्क देशाविरूद्ध युद्ध पुकारले, त्यांच्या अनुयायांनी अनुक्रमे हरयाना आणि पंजाबमधील जनजीवन विस्कळीत केले. ही तीन उदाहरणे झाली, नित्यानंद, राधे मा असली प्रकरणेदेखिल मध्येच आली- गेली. रविशंकरच्या संस्थेने यमुनेच्या पात्राची वाट लावली त्यावरून देखिल न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. आज आणखी दिल्लीतील बाबाचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/saint-baba-sexual-exploitation...

हे वाचल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते इतके भयानक विकृत बाबी समोर येत आहेत. विशेषतः

In the last 20-22 years, numerous complainants have approached the Police, but to no avail. I was also threatened for raising my voice in the media, but I was not afraid,wanted to save innocent girls: Neighbour of Baba Virendra Dev Dikshit's Ashram in Delhi's Rohini

ही तर अत्यंत सिनिकल वाटण्याजोगी गोष्ट वाटली.

अत्रेंनी नारायण महाराजाचे भांडे फोडले होते तो किस्सा सर्वज्ञातच असेल. ५० - ६० वर्षे झाली तरी अश्या बुवाबाबांच्या चरणी जाणार्‍या भक्तमंडळीत घट झालेली नाही. उलट अधिकाधिक शिक्षीत, आर्थिकदृष्ट्या सुस्थीर असे लोक यांच्या पाशात अडकतात असे दिसते.(रामपालच्या केसमध्ये त्याच्या भक्तमंडळींत निवृत्त सैनिकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची संख्या अधिक होती). लहान - लहान मुले, मुली आश्रमात ठेवल्या जाकित, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात मात्र पालक त्याची वाच्यता करू शकत नाहीत(अनेकदा भितीमुळे). भक्तांना ठाम विश्वास असतो की आमचा बाबा महात्मा आहे तो कुठलेही वाईट काम करूच शकत नाही. अगदी जेन्युईनली त्यांची बाजू लावून धरत, सरकारचा आमच्या बाबावर, धर्मावर आघात करण्याचा कट आहे असा प्रोपगंडा चालू ठेवतात. ह्यांच्या कच्छपी लागलेली ही सारीच मंडळी भोळी- भाबडी आहेत किंवा वाईट हेतूने प्रेरीत आहेत असे नव्हे. सत्संगातून चांगले काही तरी मिळेल अश्या श्रद्धेने आलेले ते भाविक आहेत. त्यांच्या मध्ये देखिल विचारी लोक बाबांचे काळे कारनामे बाहेर आले की लोक त्याला सोडून देतात. एका मित्राचे वडिल आसारामभक्त होते, लैंगिक शोषण प्रकरण आल्यापासून त्यांनी त्या लोकांशी संबंध पूर्ण तोडून टाकला आहे. मात्र सर्वच लोक श्रद्धा आणि तथ्ये यांच्यातल्या विसंगतीमुळे(कॉग्निटिव्ह डिसोनन्स) मते बदलू शकतात असे नाही. काही लोक एवढे इनडॉक्ट्रिनेट झालेले असतात की ते कितीही पुरावे मिळाले, तथ्ये समोर आली तरी श्रद्धेतच रमतात. आजदेखिल फेबुवर वगैरे प्रचंड आसाराम भक्त हिरीरीने त्याचे समर्थन करताना आढळतात. रामपाल, गुरमीतसाठी देशाविरोधात गरळ ओकणारे बहाद्दर अश्या कारवाईप्रसंगी दिसले होते.

अश्या बाबा- बुवांचा प्रश्न कसा सोडवावा? लोकांची श्रद्धा अश्या लोकांवर बसते ते ठीक पण त्या श्रद्धेचा बाजार मांडुन, त्यांचा गैरफायदा घेणार्‍या या ईंडस्ट्रीचे नियमन कसे करायचे? कायदेबाह्य काम होत असले तरी पोलिस, इतर संस्था डोळेझाक करतात कारण मतांच्या लाचारीमुळे राजकारणी लोक त्यांच्यावर तसा दबाव आणतात. कित्येकदा जागेचे व्यवहार, मनी लाँडरींग आदी प्रकरणात असे धर्मदलाल लिप्त असतात, राजकारणी, बिल्डर आदींशी त्यांचे लागेबांधे असतात. आज घडीला हजारो स्वयंघोषीत बाबे- बुवा सुखनैव आपले धंदे चालवत आहेत. चंद्रास्वामी, भय्यु महाराज, नरेंद्र महाराज वगैरे थेट राज्यकर्त्यांचेच गुरू असल्यामुळे त्यांना किती गैरवाजवी फायदा मिळत असेल याचा विचारच न केलेला बरा. कर्नाटकात लिंगायत मठ, त्यांचे अधिपती, केरळात नारायण प्रतिपालक वाले, जैन गुरू आदींचा प्रभाव मोठा आहे. तमिळनाडूमधिल मोठ्या समारंभात भूत काढण्याची कामे करणार्‍या पास्टरचे विनोदी व्हिडिओ पाहिलेच असतील. ही तर थोडीशी उदाहरणे झाली. प्रत्यक्षात किती तरी हजारो लोक अश्या लोकांच्या मागे लागून आहेत. सर्वच बाबा- बुवा असे बेकायदेशीर कामे करणारेच असतील असे नाही. काही जेन्युईनली चांगले काम करतही असतील. तर कित्येक जण या पडद्यामागे देशविरोधी काम करत असतील. मात्र यांच्यावर कायदेशीर नियंत्रण राहिल याची व्यवस्था कशी करता येऊ शकते? येऊ शकते का? अंधश्रद्धाविरोधी कायद्याचा उपयोग अश्या बाबांच्या विरोधात करता येईल का? धार्मिक भावना दुखावल्या असा आरोप या बाबांवर कोणी कसा काय करत नाही? अश्या आश्रमांच्या आर्थिक संपत्तीवर ऑडिट करण्यासारख्या गोष्टी सरकार करू शकते का?

मी नास्तिक नाही. मला कूठल्याही सश्रद्धाविषयी व्यक्तिगत आकस नाही. श्रद्धा पूर्णपणे नष्ट करण्याजोगी गोष्ट मला वाटत नाही. अडचणीत सापडलेल्या माणसाला सत्संगातून उत्तरे मिळू शकतात, वामनराव पै, पांडूरंगशास्त्री आठवले अश्यांसारख्या लोकांमुळे अतिशय निराश, दुष्ट व्यक्तीसुद्धा अंतर्बाह्य बदलून गेल्याचे कित्येकांचे अनुभव आहेत. दुसर्‍या धाग्यात कुणीतरी म्हटल्याप्रमाणे असे धार्मिक गुरूंची प्रवचने सायकोथेरपी सारखी काम करतात असे मला देखिल वाटते. मला स्वत:ला ओशोच्या व्हिडियोमुळे एका महत्वाच्या प्रसंगी मार्गदर्शन झाले होते, पण तो जिवंत असता तरी त्याच्या भाषणाला पैसे देणे, त्याला भगवान संबोधणे असे प्रकार मी केले नसते, मात्र जे असे प्रकार करतात त्यांच्याबद्दल द्वेष न वाटता कुतुहल वाटते. अश्या गुरू़ंकडे जाण्यामागची सामान्य माणसाची प्रेरणा समजूण घेऊ शकतो मात्र पूर्ण श्रद्धा ठेवलेल्या भक्तांना त्यांच्या गुरूची डोळस चिकित्सा करता येईळ का असा प्रश्न मला पडतो. बाबा- बुवांचे भक्त होण्यामागचे लोकांचे व्यक्तिस्वातंत्र्य मान्य करूनदेखिल असे विचारावेसे वाटते की जर लोकांना असेच त्यांच्या नादी लागू दिले तर आज दिल्लीत घडले असे प्रकरणे घडतच राहतील, ते कसे थांबवायचे? सरकार, सिव्हिल सोसायटी, कायदा- सुव्यवस्था राबवणार्‍या संस्था- मिडिया या सार्‍यांचाच या मध्ये नक्की काय भुमिका असावी? राजकिय पक्षांनी अश्या कुठल्याच बाबा- बुवा- माताजी बरोबर संगनमत करून राहणार नाही अशी भुमिका घेण्यास त्यांना बाध्य करावे का? कसे?

प्रतिक्रिया

शब्दानुज's picture

22 Dec 2017 - 8:01 pm | शब्दानुज

ही तीन वाक्ये तीन मित्रांकडून खरोखर ऐकली आहेत

आसारामबापुंना अटक
- हिंदुंविषयी बोलणा-याला बरोबर आत टाकतात

झाकिर नाईकवर कारवाई
- मुस्लिमविरोधी वातावरण आहे सद्धा भारतात

जैनमुनी अटक
- जैन समजाला खुप दिवसापासुन टारगेट केले जात आहे.

एकही जण दुसरे उदाहरण समजून घ्यायला तयार नसतो.

पगला गजोधर's picture

23 Dec 2017 - 10:26 am | पगला गजोधर

4-"आले लगेच हे पुरोगामी आमच्या श्रद्धेवर हल्ला करायला, यांनी श्रद्धा निर्मूलन समितीच स्थापन केलीये, पुपुडाबु वै...."
5-"बाबा हिंदु होता म्हणूनच तुम्ही आले लगेच...जा जरा तिकडे
बंगालमधे बघा"
6-"सौदी कडून एव्हढा फायन्यांस होतो त्याबाबत मूग गिळून गप्प का, तिकडे नॉर्थइस्ट मधे मध्यप्रदेशमधे एव्हडी धर्मांतरे होतात, त्याबद्दल कधीच तुम्ही लेख लिहीत नाही"
7-"सियाचीनमधे आपले जवान खडा पहारा देत आहेत, आणि तुमचं हे काहीतरी भलतंच...."
8-"का का हे अत्याचार 2014 नंतर सुरू झालेत का ? त्याआधी तुम्ही शेपूट घालून बसला होता का ?"
9-"या सगळ्याला गांधी व नेहरूंच जबाबदार.... पटेल पंतप्रधान असते तर आज असं झालं नसतं"

अश्या प्रतिक्रिया येतात आणि सोशल मिडियामुळे वा एकूणच ध्रुविकरणामुळे फार तीव्रतेने येतात हे खरे आहे. पण, तरीदेखिल धार्मिक संस्था(शासकिय मान्यता असलेल्या अन नसलेल्या) कश्या चालतात, चालाव्यात, त्यांचे आणखी कडक नियमन करावे का अश्या प्रश्नांवर उहापोह व्हायला हवा असे वाटते.

होय. तथ्ये समजून घेऊन व्यक्त होणे नको वाटते लोकांना, त्यापेक्षा तात्काळ भावनिक होऊन प्रतिक्रिया देणे सोपे असते.
झाकिर नाईकविषयी वरील लेखात लिहायला हवे होते. त्याचे कार्यक्रम नीट पाहिले तर वरवर शांत आणि तर्कपूर्ण वाटणारा युक्तिवाद मांडत तो अतिशय कट्टर, हिंदू लोक व धर्माविषयी विषयी तेढ वाढवणारे र्हेटोरिक तो मांडत असे. भारतिय मुस्लिमांचे अरबीकरण व्हावे यासाठी त्याच्या संस्थेचे काम चालू होते. त्याच्या संस्थेवर बंदी आणणे योग्यच आहे. ईडी कडूनही आर्थिक गफल्यांबाबत तपास चालू आहे. अश्या धार्मिक उद्योगांमधले आर्थिक किंवा इतरही गैरप्रकार लवकर कळून येण्यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकते का यावर विचार करावा लागेल असे मला वाटते.

अमितदादा's picture

22 Dec 2017 - 9:02 pm | अमितदादा

लेखातील भावनांशी आणि मताशी पूर्ण सहमत आहे. ह्या अश्याच लोकामुळे धर्म बदनाम होतो, मलीन होतो. सुशिक्षित लोक सुधा अश्या लोकांच्या नादी का लागतात याचा मला उलगडा होत नाही, वारंवार अश्या गोष्टी उगड होवून हि अश्या गोष्टी थांबताना दिसत नाहीत हि सर्वात निराशजनक गोष्ट आहे. एका मित्राचा आणि नातेवायीकाचा याबाबतचा अनुभव मला माहित आहे.

पुंबा's picture

24 Dec 2017 - 7:37 pm | पुंबा

अमीतदादा, मला वाटते, विवेकवादी, वैज्ञानिक दृष्टीकोन एक मूल्य म्हणून रूजवणे आपल्याला अजून शक्य झालेले नाही. खरे तर धार्मिक संघटना या समाजनियमीत असायला हव्यात मात्र तसे होण्याआधी समाजात अश्या धार्मिक संस्था, गुरू, बाबा यांची सामाजिक कर्तव्ये काय असावीत, यांचे वर्तन कसे असावे, आर्थिक व्यवहार कसे असावेत याविषयी social legal agreement (service legal agreement च्या धर्तीवर) व्हायला हवे.
वैज्ञानिक शिक्षण घेऊनसुद्धा चिकित्सा न करताच लोक यांच्या आहारी जातात. येथे काही गैरप्रकार होत असतील का असे प्रश्न त्यांना पडत नाहीत. मला वाटते, अभिनिवेश टाळून विवेकवाद, ईहवाद रूजवला तर पुढच्या पिढीत तरी असे प्रकार कमी होऊ शकतील. अर्थात हे कसे करायचे हा पुन्हा चर्चेचा विषय.

गामा पैलवान's picture

23 Dec 2017 - 11:41 am | गामा पैलवान

पुंबा,

तुमची बाजू कळली. ती नीट मांडल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न रास्त आहेत :

मात्र यांच्यावर कायदेशीर नियंत्रण राहिल याची व्यवस्था कशी करता येऊ शकते? येऊ शकते का? अंधश्रद्धाविरोधी कायद्याचा उपयोग अश्या बाबांच्या विरोधात करता येईल का? धार्मिक भावना दुखावल्या असा आरोप या बाबांवर कोणी कसा काय करत नाही? अश्या आश्रमांच्या आर्थिक संपत्तीवर ऑडिट करण्यासारख्या गोष्टी सरकार करू शकते का?

एकेक बघतो.

१. कायदेशीर नियंत्रण : जो काही न्यास असेल तो कायदेशीर असतोच. मात्र बुवा किंवा बाबा या पदार्थाची कायदेशीर व्याख्या शक्य नाही.

२. अंधश्रद्धाविरोधी कायदा : मुळात अंधश्रद्धा म्हणजे काय हेच निश्चित नाही.

३. धार्मिक भावना दुखावणे : हे बाबा लोक वादग्रस्त विधानं करीत नाहीत. त्यामुळे धाभादु चा खटला दाखल करणं अशक्यं.

४. लेखापरीक्ष : न्यास व त्याची मालमत्ता कायदेशीर असतेच. त्यानुसार अधिकृत लेखापरीक्षण होत असतंच.

एकंदरीत प्रश्नांची उत्तरं शोधणं सोपं आहे. त्यामुळे चर्चा योग्य प्रश्न विचारण्यावर व्हावी.

आ.न.,
-गा.पै.

पुंबा's picture

24 Dec 2017 - 8:04 pm | पुंबा

गापै, चर्चेस तयारी दाखवल्याबद्दल धन्यवाद.
१. प्रत्येक न्यास कायदेशीररीत्या नोंदणीकृत असतोच असे नाही ना. शिवाय सरकारदरबारी त्या संस्थेचे धर्मादाय स्वरूपात वर्गीकरण असले तरी त्या संस्थेचे नियमन कितपत होत असते हे कळत नाही. मी या प्रश्नावर आरटीआय टाकायच्या विचारात आहे. बाकी, सर्वधर्मिय बाबा- बुवा- धर्मप्रचारक यांची सुची सरकारने तयार करायला हवी आहे. गॉडमॅन ही संकल्पनादेखिल व्याख्यीकृत करायला हवी.
२. होय. सध्याचा अंधश्रद्धाविषयक कायदा मुळात जादूटोणाविषयी अधिक आहे. गुरमीत प्रमाणे प्रकरणे हा कायदा हाताळू शकेल की नाही माहित नाही.
३. मला नाही वाटत निव्वळ हिंदू धर्माविरोधात बोलत नाहीत म्हणून धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत. कृती पहायला नको का? आम्ही धर्मपरायण, धार्मिक शिकवण देणारे लोक आहोत असे बिंबवून अनाचार करणारे, सामान्यांच्या धर्मविषयक भावनांना ठेच पोहोचवतातच की. आता, दिल्लीतील कालचे प्रकरण पहा, कृष्णाप्रमाणे सोळा हजार बायका असाव्यात अशी त्या बाबाची ईच्छा होती. त्याकरीता तो अल्पवयीन मुलींना आश्रमात डांबून ठेवत असे. निर्मलादेवी नावाची एक अशीच गॉडवुमन होती ती आपण शिव, विष्णू, लक्ष्मी अशा देवांचे अवतार आहोत असे सांगून सार्वजनिक समारंभात तसा वेष करून पुजा करून घेत असे. कोट्यावधी रूपये तिच्या चरणांवर दान केले जात. अशी हजारो प्रकरणे भारतात घडली आहेत, घडत आहेत अश्या गोष्टींमुळे धार्मिक भावना दुखावायला हव्यात की नकोत.
४. माहित नाही. https://www.google.co.in/amp/s/m.businesstoday.in/lite/story/gurmeet-sin...
इथे याबद्दल थोडे आढळले. आणखी वाचून सांगतो.

एकंदरीत प्रश्नांची उत्तरं शोधणं सोपं आहे. त्यामुळे चर्चा योग्य प्रश्न विचारण्यावर व्हावी.

होय. चर्चा थांबू मात्र नये. योग्य प्रश्न कोणते इथपासून सुरू होऊन उत्तरे शोधण्यापर्यंत जाणे आवश्यक. त्यासाठी सामाजिक मंथन चालू रहायला हवे.

बरेच काही आहे लिहिण्यासारखे, पण मोबाईल वरून लिहायचा कंटाळा आलाय, त्यामुळे पास..
फक्त या सगळ्या गोंधलावर कायद्याचे राज्य हा एकच उपाय आहे इतके नमूद करतो

पुंबा's picture

24 Dec 2017 - 8:07 pm | पुंबा

नक्की लिहा.
कायद्याचे राज्य हे उत्तर आहे हे खरे पण ते आणणार कोण? अश्या नियमनासाठी आवश्यक legal, administrative capability आणि ऑथोरिटी राज्य या संस्थेकडे आहे का? सिव्हिल सोसायटी अश्या नियमनात सहभाग घेऊन सरकारवरचा भार कमी करू शकते का? असे अनेक प्रश्न चर्चेत यायला हवेत.

पगला गजोधर's picture

25 Dec 2017 - 9:16 am | पगला गजोधर

सिव्हिल सोसायटी , (अंनिस) यांचे प्रयत्न चालू आहेत उदा कंजारभट समाजातील कौमार्य चाचणी...
जात पंचायतीच्या...वैयक्तिक जीवनातील पंचायती…...
पण कसाय न, ते धार्मिक भावना कसे दुखावतात...याबद्दलच इथल्या काही लोकांचा रस आहे, त्यामुळे ....जाऊ द्यात

या मानसिकतेचे मूळ इतिहासातही असावे असे वाटते.

आपण मुघल , इंग्रज अशांकडून लुटले गेलो आहोत ही एक फार खोल वेदना आहे. बाकी गौरवशाली इतिहासापेक्षा हा लुटला जाण्याचा इतिहास आपल्या मनात अधिक भरला गेला असावा.

दुसरी भारतीय मानसिकता म्हणजे व्यक्तिपुजा. माझ्यासाठी कोणतरी तलवार उचलेल तेव्हाच मी तलवार उचलणार आणि जो तलवार उचलेल तो माझा देव.
थोडक्यात काय की माझा उद्धार करण्यासाठी दुसरा कोणी तरी येणार आहे.

वर्तमानातील निगेटिव्ह विचारांचे साठे म्हणजे प्रसारमाध्यमे. कोणतेही चॅनेलवर चांगली बातमी असणे हे जवळपास अशक्यप्राय झाले आहे. घोटाळे , रेप लुट अशाच बातम्या आपल्यावर सारख्या मारल्या जातात

अशा भुतकाळ आणि वर्तमानच्या परिस्थितमुळे नैराश्य येऊ लागते. आणि बाबा हे तरणोपाय बनतात.

आता उपायाबद्दल म्हणाल तर जे कच्छपी लागले आहेत त्यांना ठेच लागल्याशिवाय परिस्थितीचे आकलन होणार नाही.

एक साधी गोष्ट जी आपण करु शकतो ती म्हणजे पुराणकथातील चमत्काराची जागा आता त्यामागील विचारांनी घ्यायला हवी. मूळात तुझ सगळ काही बर वाईट तुझ्याच हातात आहे हे गळी उतरवता आले पाहिजे.

एकमेकांनाचा आत्मविश्वास वाढवत नेणे ही गोष्ट आपल्याकडे कधीच होत नाही. स्वताःवरचा विश्वास वाढला की बाबांकडे जाण्याची गरज राहणार नाही.

आणि यानंतरही एक गट असा राहतो की ज्याला खरोखर अध्यात्मिक माहिती हवी असते किंवा त्याचे आकर्षण असते. सुधारित , सुसंगत , तार्किक धार्मिक माहिती सहज उपलब्ध होत नाही. त्या क्षेत्रातील जाणकारांनी हे करायला हवे. हिंदुधर्मातील ब-याच गोष्टींचे पुर्नरघटन व्हायला हवे.

ऐतिहासिक ,मानसिक , धार्मिक या तिन पातळ्यांवर काम करावे लागणार. (टाळ्या...)

आता हे कोण करणार असे अवघड प्रश्न विचारु नये.

शब्दानुज, शब्दाशब्दाशी सहमत.
उत्तम उहापोह केला आहे आपण या विषयाचा.

ऐतिहासिक ,मानसिक , धार्मिक या तिन पातळ्यांवर काम करावे लागणार. (टाळ्या...)

आता हे कोण करणार असे अवघड प्रश्न विचारु नये.

तेच ना. कोण करणार? समाज? सरकार? न्यायव्यवस्था? धर्म?

माहितगार's picture

24 Dec 2017 - 12:21 am | माहितगार

आर्थीक व्यवहारांचे जसे एक्स्टर्नल ऑडीट होते तसे एक्स्टर्नल सोशल ऑडीट आवश्यक करून , शैक्षणिक संस्थाचे रेटींग जसे होते तसे यां सर्वच धार्मिक आणि आश्रम संस्थांचे रेटींग केले जावयास हवे . स्त्री सुरक्षेसाठी कोड कंडक्ट अशा सोशल ऑडीट मधून तपासले जावयास हवेत. शिवाय स्मार्ट फोन अ‍ॅप मधून सोशल ऑडीट मध्येआश्रमाततील आजी माजी शिष्यांची मते गुप्त मतदानाने आजमावल्यास नियंत्रण अगदीच अशक्यही नसावे.

मागासाहेब, अगदी योग्य उपाय सुचवले आहेत. असे ऑडिट व्हायला हवे हे अगदीच खरे.

कोणते खटले भरणार? नक्की सांगा.
बुवाबाजी म्हणजे काय?

पुंबा's picture

24 Dec 2017 - 8:15 pm | पुंबा

https://www.quora.com/Laws-in-India-How-can-we-act-legally-against-fake-...

इथे या विषयावर थोडी माहिती मिळाली.

बुवाबाजी ही संकल्पना व्याख्यीकृत आहे की नाही माहीत नाही. नसेल तर व्हायला हवी. निदान सदर विषयाबद्दल चर्चा तरी सत्वर सुरू व्हायला पाहिजे.

तुडतुडी's picture

25 Dec 2017 - 4:06 pm | तुडतुडी

बुवा , माताजी अश्या लोकांची गरज का लागते समाजाला ? कारण ऐतखाऊ वृत्ती . मी भक्ती करणार नाही , मी नामस्मरण करणार नाही , मला तेवढा वेळ नाही . एखाद्या बुवा वॉर जबाबदारी सोपवायची , पैसे फेकायचे मग मी माझ्या संकटातून सुटेन हि वृत्ती . दुसरं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे स्वतः धर्माचा , अध्यात्माचा काही अभय्यासच करायचा नाही . ४कोणाच्यातरी प्रवचनाला जायचं , त्याने ४ संस्कृत मधील वाक्ये ऐकवली , ४ योगासने करून दाखवली , भारीपैकी प्रवचन दिलं कि हे चालले लगेच त्याच्या मागे . आपले धर्मग्रंथ काय सांगतात ? ज्ञानेश्वर महाराज , तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय ? आपल्याकडे इतके संत योगी होऊन गेले . त्यांनी काय शिकवण दिली आहे ? साधना कशी करावी ? गुरु कोणाला म्हणावे हे काहीही माहित नसते .

चौथा कोनाडा's picture

26 Dec 2017 - 3:25 pm | चौथा कोनाडा

कारण ऐतखाऊ वृत्ती . मी भक्ती करणार नाही , मी नामस्मरण करणार नाही ,
मला तेवढा वेळ नाही . एखाद्या बुवा वॉर जबाबदारी सोपवायची ,
पैसे फेकायचे मग मी माझ्या संकटातून सुटेन हि वृत्ती

असं नाही वाटतं. हे लोक बाबाबुवांच्या कार्यक्रमाला प्रचंड वेळ काढुन जातात, किंबहुना स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवून त्यांचे सत्संग, जयंत्या, सप्ताह वै. अटेंड करत असतात. त्यांनी सांगितलेली ठराविकच स्तोत्रं, अमुकच एक मंत्र, तमुकच आरत्या, ढमुकच घोषवाक्य/घोषणा, तमुक प्रकारच्याच पुजा नित्यनियमानं पार पाडत असतात.
स्वःतच घर नाही झाडणार, पण यांच्या मठात झाडणे काय बाकीच्या अनेक सेवा करणार ! एनरजॅटिक असतात हे लोक !

दुसरा मुद्दा मात्र अगदी पर्फेक्ट आहे.

पुंबा's picture

26 Dec 2017 - 4:26 pm | पुंबा

तुडतुडी, तुमच्या दोन्ही मुद्द्यांशी सहमत आहे. साधना ही अतिशय वैयक्तिक पातळीवर करण्याची गोष्ट आहे, नामस्मरण, ध्यान अशांसारखे तिचे मार्ग अनेक आहेत, आत्म्याचे आणि परमात्म्याचे अद्वैत व त्यामुळे बाह्य अवडंबराची गरज नसणे, किंबहुना कुठलेही कर्मकांड आत्म्याला परमात्म्यापासून अधिकच दूर नेतो असे अनेक आदर्शवादी तत्वे अध्यात्माचा अभ्यास करणार्‍या जाणकारांकडून कळली आहेत. माझ्या मते, बाबा- बुवा- सदगुरू अशांची गरज अत्यल्प असते साधनेत. प्रत्यक्षात मात्र जेवढे सार्वजनिक, व्यक्तिकेंद्रीत, कर्मकांडयुक्त स्वरूप देता येईल तेवढे आपल्या देशात(मुद्दामच धर्मात म्हणत नाही कारण या देशातले सगळेच प्रमुख धर्म अश्या भोंदू गुरूंच्या कह्यात जातात निरनिराळ्या प्रमाणात) दिले जाते.

तुडतुडी's picture

27 Dec 2017 - 3:24 pm | तुडतुडी

हम्म. बुवा बाबांची नसली तरी एका विशिष्ट पातळी नंतर सद्गुरूंची गरज असतेच असते . फक्त दिव्यत्वाचा साक्षात्कार करून देणारे सद्गुरू ओळखता आले पाहिजेत . मुळात सद्गुरू आपण शोधायचे नसतातच . त्या विशिष्ट पातळीला पोचल्यावर तेच तुमच्याकडे येतात .