बाबा-बुवा-माताजी यांचा सुळसुळाट
हिंदू विचारपद्धतीत संत या शब्दाला मान आहे, संत ही उपाधी मिळण्यासाठी सज्जन, दुसर्याची दु:खे समजून घेणारा, जमेल तिथे करूणाभाव ठेऊन लोकांना योग्य मार्गावर आणणारा असा माणुस असे सर्वमान्य आहे. आधुनिक महाराष्ट्रात गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज हे दोन रचनात्मक काम उभारणारे, समाजाला योग्य मार्गावर आणणारे संत होऊन गेले. हल्ली मात्र स्वयंघोषीत संत, अध्यात्मिक तारणहार उदंड झालेले आहेत. गेल्या ५ वर्षातच किमान ३ बहुचर्चीत बाबे(आणि त्यांच्या अनुयायांच्या दृष्टीने संत) आपल्या काळ्या कामांमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडले. आसाराम, रामपाल आणि गुरमीत हे ते तिघे. तिघांचेही अनुयायी संख्येने प्रचंड म्हणावे इतके होते. सत्तेच्या दोन्ही टोकावरची हाय प्रोफाईल मंडळी यांच्या भक्तमंडळींत समाविष्ट होती. हजारो एकरच्या सरकारी जमिनी या तिघांनीही लाटल्या होत्या, अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे आरोप तिघांवरही झाले. यांच्या आश्रमात अनेक काळे धंदे चालत असल्याचे नंतर कळले. रामपालने आणि गुरमीतने तर सरकार अटक करू पाहते आहे हे पाहूने चक्क देशाविरूद्ध युद्ध पुकारले, त्यांच्या अनुयायांनी अनुक्रमे हरयाना आणि पंजाबमधील जनजीवन विस्कळीत केले. ही तीन उदाहरणे झाली, नित्यानंद, राधे मा असली प्रकरणेदेखिल मध्येच आली- गेली. रविशंकरच्या संस्थेने यमुनेच्या पात्राची वाट लावली त्यावरून देखिल न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. आज आणखी दिल्लीतील बाबाचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/saint-baba-sexual-exploitation-minor-girls-delhi-rohini-1604917/हे वाचल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते इतके भयानक विकृत बाबी समोर येत आहेत. विशेषतः
In the last 20-22 years, numerous complainants have approached the Police, but to no avail. I was also threatened for raising my voice in the media, but I was not afraid,wanted to save innocent girls: Neighbour of Baba Virendra Dev Dikshit's Ashram in Delhi's Rohiniही तर अत्यंत सिनिकल वाटण्याजोगी गोष्ट वाटली. अत्रेंनी नारायण महाराजाचे भांडे फोडले होते तो किस्सा सर्वज्ञातच असेल. ५० - ६० वर्षे झाली तरी अश्या बुवाबाबांच्या चरणी जाणार्या भक्तमंडळीत घट झालेली नाही. उलट अधिकाधिक शिक्षीत, आर्थिकदृष्ट्या सुस्थीर असे लोक यांच्या पाशात अडकतात असे दिसते.(रामपालच्या केसमध्ये त्याच्या भक्तमंडळींत निवृत्त सैनिकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची संख्या अधिक होती). लहान - लहान मुले, मुली आश्रमात ठेवल्या जाकित, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात मात्र पालक त्याची वाच्यता करू शकत नाहीत(अनेकदा भितीमुळे). भक्तांना ठाम विश्वास असतो की आमचा बाबा महात्मा आहे तो कुठलेही वाईट काम करूच शकत नाही. अगदी जेन्युईनली त्यांची बाजू लावून धरत, सरकारचा आमच्या बाबावर, धर्मावर आघात करण्याचा कट आहे असा प्रोपगंडा चालू ठेवतात. ह्यांच्या कच्छपी लागलेली ही सारीच मंडळी भोळी- भाबडी आहेत किंवा वाईट हेतूने प्रेरीत आहेत असे नव्हे. सत्संगातून चांगले काही तरी मिळेल अश्या श्रद्धेने आलेले ते भाविक आहेत. त्यांच्या मध्ये देखिल विचारी लोक बाबांचे काळे कारनामे बाहेर आले की लोक त्याला सोडून देतात. एका मित्राचे वडिल आसारामभक्त होते, लैंगिक शोषण प्रकरण आल्यापासून त्यांनी त्या लोकांशी संबंध पूर्ण तोडून टाकला आहे. मात्र सर्वच लोक श्रद्धा आणि तथ्ये यांच्यातल्या विसंगतीमुळे(कॉग्निटिव्ह डिसोनन्स) मते बदलू शकतात असे नाही. काही लोक एवढे इनडॉक्ट्रिनेट झालेले असतात की ते कितीही पुरावे मिळाले, तथ्ये समोर आली तरी श्रद्धेतच रमतात. आजदेखिल फेबुवर वगैरे प्रचंड आसाराम भक्त हिरीरीने त्याचे समर्थन करताना आढळतात. रामपाल, गुरमीतसाठी देशाविरोधात गरळ ओकणारे बहाद्दर अश्या कारवाईप्रसंगी दिसले होते. अश्या बाबा- बुवांचा प्रश्न कसा सोडवावा? लोकांची श्रद्धा अश्या लोकांवर बसते ते ठीक पण त्या श्रद्धेचा बाजार मांडुन, त्यांचा गैरफायदा घेणार्या या ईंडस्ट्रीचे नियमन कसे करायचे? कायदेबाह्य काम होत असले तरी पोलिस, इतर संस्था डोळेझाक करतात कारण मतांच्या लाचारीमुळे राजकारणी लोक त्यांच्यावर तसा दबाव आणतात. कित्येकदा जागेचे व्यवहार, मनी लाँडरींग आदी प्रकरणात असे धर्मदलाल लिप्त असतात, राजकारणी, बिल्डर आदींशी त्यांचे लागेबांधे असतात. आज घडीला हजारो स्वयंघोषीत बाबे- बुवा सुखनैव आपले धंदे चालवत आहेत. चंद्रास्वामी, भय्यु महाराज, नरेंद्र महाराज वगैरे थेट राज्यकर्त्यांचेच गुरू असल्यामुळे त्यांना किती गैरवाजवी फायदा मिळत असेल याचा विचारच न केलेला बरा. कर्नाटकात लिंगायत मठ, त्यांचे अधिपती, केरळात नारायण प्रतिपालक वाले, जैन गुरू आदींचा प्रभाव मोठा आहे. तमिळनाडूमधिल मोठ्या समारंभात भूत काढण्याची कामे करणार्या पास्टरचे विनोदी व्हिडिओ पाहिलेच असतील. ही तर थोडीशी उदाहरणे झाली. प्रत्यक्षात किती तरी हजारो लोक अश्या लोकांच्या मागे लागून आहेत. सर्वच बाबा- बुवा असे बेकायदेशीर कामे करणारेच असतील असे नाही. काही जेन्युईनली चांगले काम करतही असतील. तर कित्येक जण या पडद्यामागे देशविरोधी काम करत असतील. मात्र यांच्यावर कायदेशीर नियंत्रण राहिल याची व्यवस्था कशी करता येऊ शकते? येऊ शकते का? अंधश्रद्धाविरोधी कायद्याचा उपयोग अश्या बाबांच्या विरोधात करता येईल का? धार्मिक भावना दुखावल्या असा आरोप या बाबांवर कोणी कसा काय करत नाही? अश्या आश्रमांच्या आर्थिक संपत्तीवर ऑडिट करण्यासारख्या गोष्टी सरकार करू शकते का? मी नास्तिक नाही. मला कूठल्याही सश्रद्धाविषयी व्यक्तिगत आकस नाही. श्रद्धा पूर्णपणे नष्ट करण्याजोगी गोष्ट मला वाटत नाही. अडचणीत सापडलेल्या माणसाला सत्संगातून उत्तरे मिळू शकतात, वामनराव पै, पांडूरंगशास्त्री आठवले अश्यांसारख्या लोकांमुळे अतिशय निराश, दुष्ट व्यक्तीसुद्धा अंतर्बाह्य बदलून गेल्याचे कित्येकांचे अनुभव आहेत. दुसर्या धाग्यात कुणीतरी म्हटल्याप्रमाणे असे धार्मिक गुरूंची प्रवचने सायकोथेरपी सारखी काम करतात असे मला देखिल वाटते. मला स्वत:ला ओशोच्या व्हिडियोमुळे एका महत्वाच्या प्रसंगी मार्गदर्शन झाले होते, पण तो जिवंत असता तरी त्याच्या भाषणाला पैसे देणे, त्याला भगवान संबोधणे असे प्रकार मी केले नसते, मात्र जे असे प्रकार करतात त्यांच्याबद्दल द्वेष न वाटता कुतुहल वाटते. अश्या गुरू़ंकडे जाण्यामागची सामान्य माणसाची प्रेरणा समजूण घेऊ शकतो मात्र पूर्ण श्रद्धा ठेवलेल्या भक्तांना त्यांच्या गुरूची डोळस चिकित्सा करता येईळ का असा प्रश्न मला पडतो. बाबा- बुवांचे भक्त होण्यामागचे लोकांचे व्यक्तिस्वातंत्र्य मान्य करूनदेखिल असे विचारावेसे वाटते की जर लोकांना असेच त्यांच्या नादी लागू दिले तर आज दिल्लीत घडले असे प्रकरणे घडतच राहतील, ते कसे थांबवायचे? सरकार, सिव्हिल सोसायटी, कायदा- सुव्यवस्था राबवणार्या संस्था- मिडिया या सार्यांचाच या मध्ये नक्की काय भुमिका असावी? राजकिय पक्षांनी अश्या कुठल्याच बाबा- बुवा- माताजी बरोबर संगनमत करून राहणार नाही अशी भुमिका घेण्यास त्यांना बाध्य करावे का? कसे?
वर्गीकरण
याद्या
7471
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
4-"आले लगेच हे पुरोगामी
In reply to . by शब्दानुज
अश्या प्रतिक्रिया येतात आणि
In reply to 4-"आले लगेच हे पुरोगामी by पगला गजोधर
होय. तथ्ये समजून घेऊन व्यक्त
In reply to . by शब्दानुज
लेखातील भावनांशी आणि मताशी
अमीतदादा, मला वाटते,
In reply to लेखातील भावनांशी आणि मताशी by अमितदादा
प्रश्न व उत्तरं
गापै, चर्चेस तयारी
In reply to प्रश्न व उत्तरं by गामा पैलवान
बरेच काही आहे लिहिण्यासारखे,
नक्की लिहा.
In reply to बरेच काही आहे लिहिण्यासारखे, by आनन्दा
सिव्हिल सोसायटी , (अंनिस)
In reply to नक्की लिहा. by पुंबा
या मानसिकतेचे मूळ इतिहासातही
शब्दानुज, शब्दाशब्दाशी सहमत.
In reply to या मानसिकतेचे मूळ इतिहासातही by शब्दानुज
१
मागासाहेब, अगदी योग्य उपाय
In reply to १ by माहितगार
कोणते खटले भरणार? नक्की सांगा
https://www.quora.com/Laws-in
In reply to कोणते खटले भरणार? नक्की सांगा by कंजूस
बुवा , माताजी अश्या लोकांची
कारण ऐतखाऊ वृत्ती . मी भक्ती
In reply to बुवा , माताजी अश्या लोकांची by तुडतुडी
तुडतुडी, तुमच्या दोन्ही
In reply to बुवा , माताजी अश्या लोकांची by तुडतुडी
हम्म. बुवा बाबांची नसली तरी
In reply to तुडतुडी, तुमच्या दोन्ही by पुंबा