... एक क्षण भाळण्याचा. ( २)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
20 Dec 2017 - 10:59 am

मागील दुवा : http://www.misalpav.com/node/41673
हीच्या आत्तेभावाने, बेल वाजवली. आत कुठेतरी " मै जिंदगी का साथ निभाता चला गया " या गाण्या अगोदरची धून वाजली. आणि ती धून संपायच्या आत एक प्रसन्न चेहेर्याच्या गृहस्थानी दार उघडले. वय बहुतेक साठी पासष्ठ . अंगात टी शर्ट बर्मुडा .
" या " हासतमुखाने तोंडभरुन स्वागत केले.
( क्रमशः ).

... सुमीत .... फार दिवसानी येणं केलंत बगा हो. आमचं पुणं सुटल्यापासून तुम्ही अगदी दुर्मीळच झालाय की बघा." बोलण्यातला बेळगावी लहेजा लपत नव्हता.
आम्ही आत गेलो. घराची ड्रॉईंग रूम , खरोखर ती बैठकीची खोलीच म्हणावे लागेल. भारतीय बैठक , मस्त पर्शीयन कार्पेट त्यावर गादी तक्ये ,एक हार्मोनियम असा मस्त जामानिमा , एका कोपर्यात कपाटात रेकॉर्ड प्लेअर त्या वरच्या कप्प्यात अनेक रेकॉर्ड्स होत्या. अहो काय काय होतं त्यात म्हणून सांगु. कुंदन लाल सैगल, सुरैय्या , तलत महमूद , भिमसेन जोशी , बडे गुलाम अली खान
शेजारच्या टेबलावर शंकर पाटलांपासून ,द मा मिरासदार. जी ए , व पु, अरविंद गोखले , रॉबर्ट लुडलूम , डॅन ब्राउन , अर्नेस्ट हेमिंग्वे , शेक्सपीयर, सगळी मंडळी सुखाने विसावली होती. या माणसाची वाचनाची रेंज अफाट दिसत होती.
सुमीत ने ओळखीचे सोपस्कार पार पाडले. बसा हो. मस्त निवान्त बसा की. संकोच गिंकोच असलं करु नका. त्यानी आम्हाला हाताला धरुन बसवले.
नमस्कार मी नाथ श्रोत्री. आता मला तुम्ही श्रोत्री साहेब गीहेब वगैरे म्हणून नका. मला माहीत आहे की नुसते नाथ म्हणून बोलावणे अवघड आहे ते, स्वतःच्याच कोटीवर त्यानी एक झकास हास्य केले. अहो मला ऑफिसात कधीच कोणी नावाने बोलावले नाही. हा हा हा.
हो ते असायचेच. माझे अर्धे लक्ष्य कपाटातल्या रेकॉर्ड्स कडे आणि अर्धे टेबलवरच्या पुस्तकांकडे होते. मधुनच हार्मोनियम कडे जात होते.
ही ना ही स्केल चेंजर आहे. म्हणत नाथ साहेबानी हार्मोनियम पुढ्यात ओढली. थोडीशी बोटे फिरवत एक सुरावट वाजवली.
अरे हे तर " घर आये घीर आजा " गाणे
बरोबर लता मंगेशकर , आर डी बर्मनच पहीले गाणे छोटे नबाब चित्रपटातले. खरे तर मालगुंजी रागातली ही चीज ,लताबाईनी काय उत्कटतेने गायलीये. विरह,आणि त्याबद्दलची तक्रार केवळ स्वरांनी व्यक्त केली आहे.
लता मंगेशकरांचे हे गाणे म्हणजे गाण्याचा वस्तुपाठ ठरावा असेच आहे. पाऊस पडतोय म्हणून प्रियकराला घरी लवकर परत ये म्हणणारी विरहीणी तीची उदासी निव्वळ सुरावटीतुन दाखवली आहे . खरेच नवरत्नात शोभावे असेच हे गाणे आहे. गंमत बघा आपण एखादे गाणे नेहमी ऐकत असतो ते गाणे आपल्याला का आवडते हेच माहीत नसते. ती गंमत त्या गाण्याच्या मांडणीत असते. आता हेच बघा ना या गाण्यात " सुना सूना घर मोहे डसने को आये रे. खीडकी पे बैठे बैठे पडी रैन जाये रे." या ओळी नंतर येणारे " टप टीप सुनत मै तो भई रे बावरीया.." या ओळीत "टप टीप " या दोन शब्दात जो अर्ध्या क्षणाचा छोटासा पॉज आहे ना तो जीव घेणा आहे. अगदी पावसाचे थेंब पागोळ्यावरुन पडल्यासारखे वाटतात. हे आख्खे गाणे त्या एका पॉज साठी.
आपल्याला आवडलेल्या प्रत्येक गाण्यात असे काही वेगळे असतेच. ते शोधता आले पाहिजे. ज्या क्षणी ते सापडते त्या क्षणी देव गवसल्याचा आनंद होतो होतो
आता बघा हे गाणं असे करुन त्यानी " आणखी एका गाण्याची धून वाजवली. आणि त्या गाण्या बद्दल सांगायला लागले. गाण्यात सापडलेला तो क्षण सापडतानाचा तो परब्रम्ह भेटल्याच आनंद त्यांच्या चेहेर्यावरुन ओसंडून वहात होता. डोळे विस्फारत होते. दोन भुवयांच्या मधे किंचितशी घडी पडत होती. बोलताना नाथ साहेब मधूनच कधितरी डोळे मिचकावत होते. त्यांचा चेहेरा च बोलत होता. एखादे गीत अगदी प्रत्यक्ष अनुभवत असल्यासारखा हा माणुस त्या क्षणांशी समरस होत होता.
मला हेवा वाटला. इतके रंगुन जाता यायला हवे गाण्यात.
अरे भावसाहेब नुसते गाणीच काय सांगता माझ्या कडे कुमारांची निर्गुणी भजनांची रेकॉर्ड आहे. ती निर्गुणी भजने ज्या बुंदेली लोक गीतांवरुन आली त्या लोकगीतांची ही रेकॉर्ड आहे. एच एम व्ही ने काढली होती त्या नंतर पुन्हा नाही आली ती. पण आहे ती रेकॉर्ड माझ्या कडे. असे बोलून त्यानी रेकॉर्ड कडे मोहोरा वळवला अचानक ते थांबले. म्हणाले भावसाहेब तुमच्या वेळेची काय भानगड गीनगड नाय ना. मला काय मी रीटायर्ड माणूस.
नाही हो तसे काही नाही. पण मी एकदा तुमच्या कडे मुद्दाम वेळ काढून येणार पूर्ण दिवस भर.
खरंय हो. गाणं म्हंटलं ना की दिवस काय आख्खं आयुष्य लहान पडेल. थाम्बा हं जरा आलोच म्हणत उठले. चला तुमचं चहा पाण्याचं बघु या. आलेल्या पाहुण्याला नुसत्या गाण्यागीण्यावर पाठवलं तर त्या रागावतील. तुमच्या वहिनी हो. बसा हं आलोच मी . आम्ही कशाला कशाला म्हणायच्या आतच ते आलोच असे म्हणत आत गेले.
सुमीत माझ्या कडेच पहात होता. त्याला बहुतेक हे नवीनच होते.
( क्रमशः )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

20 Dec 2017 - 12:56 pm | राजाभाउ

मस्त !!! एकदम . पुभाप्र.

सिरुसेरि's picture

20 Dec 2017 - 1:00 pm | सिरुसेरि

छान . हा भाग थोड्या घाईने लिहिल्यासारखा वाटला .

संग्राम's picture

20 Dec 2017 - 3:26 pm | संग्राम

आवडलं

घर आजा घीर आये बदरां -- अस आहे ते....