मंडळी, गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आले आहे कि मिपावर प्रतिभावान, कल्पक आणि सर्जनशील सभासदांची मांदियाळी आहे. मग मनात विचार आला कि या सर्वांच्या प्रतिभा, कल्पना आणि सर्जनशीलता एकत्र आणून काहीतरी अतिव सुंदर तयार करता येईल.
म्हणून हा धागा.
या धाग्यात आपण सगळे मिळून एक काल्पनिक कथा तयार करूयात. याची क्रिया आणि नियम खुप सोपे आहेत.
प्रक्रिया:
१. प्रत्येकाने एक (किंवा जास्तीत जास्त दोन) वाक्य प्रतिसाद म्हणून लिहायचे.
नियम:
१. नवीन वाक्य हे पूर्वीच्या कथेला/प्रतिसादांना, अनुसरूनच असावे.
२. प्रत्येक प्रतिसाद हा जास्तीत जास्त २० शब्दांचा असावा. (१ किंवा २ च वाक्ये असावीत)
३. एखाद्या सदस्याने प्रतिसाद दिल्यानंतर त्याच सदस्याने पुढचा प्रतिसाद देण्याआधी कमीत कमी ५ इतर प्रतिसादांची वाट पाहावी. (जेणे करून कथेच्या जडणघडणी मध्ये सर्वांचा सहभाग होईल व कथा कोणा एका व्यक्तीच्या मनाप्रमाणे नियंत्रित होणार नाही. )
४. प्रतिसाद हा फक्त आणि फक्त कथेला अनुसरूनच असावा. (प्रतिसादामध्ये वैक्तिक टिप्पणी, सल्ले इ. इ. असे काहीहि नसावे.)
५. प्रत्येक प्रतिसाद हा या चर्चेला प्रतिसाद म्हणूनच द्यावा, उप-प्रतिसाद (प्रतिसादास प्रतिसाद) नको. जेणेकरून कथा हि कालानुक्रमे पुढे पुढे सरकत जाईल.
मंडळी, आपण सर्व सुजाण आणि जाणकार सदस्य आहात. त्यामुळे हे नियम आपण स्वतःच पाळायचे आहेत. कोणीही नियमांची अंमलबजावणी तपासात बसणार नाही किंवा कोणी नियम मोडले म्हणून सल्ले, उपदेश देत बसणार नाही. अशा छोट्या-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत कथा पुढे पुढे नेत राहायची.
(काही सल्ले, उपदेश, प्रतिक्रया असतील तर कृपया ते या चर्चेच्या प्रतिसादामध्ये न टाकता मला वैयक्तिक संदेशाद्वारे पाठवा.)
चला तर मग साकारुयात कथा तुझी माझी.
प्रतिक्रिया
19 Dec 2017 - 3:46 am | गबाळ्या
ट्रिंग-ट्रिंग ... ट्रिंग-ट्रिंग ... ट्रिंग-ट्रिंग ... सलग पाचव्या दिवशीही, पहाटे बरोब्बर ५:३५ वाजता, मोजून ३ रिंग वाजून फोन पुन्हा झोपी गेला.
19 Dec 2017 - 8:42 am | चामुंडराय
पाचव्या दिवशीच्या रिंग नंतर आपले अवतार कार्य समाप्त झाले आहे याची फोनला जाणीव झाली. त्याच्या OS ने सगळा डेटा फॉरमॅट करायला सुरवात केली व शेवटचा मिशन अकंम्पलीश्ड असा कोडेड संदेश पाठवून तो मृत झाला.
19 Dec 2017 - 9:19 am | सतिश गावडे
भूमध्य समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका अज्ञात, निर्जन बेटावरील एकुलत्या एक पडक्या घरात एका विचित्र दिसणाऱ्या जुनाट वाटेल अशा यंत्राने पहाटे बरोब्बर ५:३५ वाजता, मोजून ३ वेळा बीप असा आवाज केला.
19 Dec 2017 - 9:20 am | नावातकायआहे
झोपेतुन दचकुन तो जागा झाला....आधि फोन चेक केला. चालु होता. "बाप रे काय हे भयनक स्वप्न."
19 Dec 2017 - 10:42 am | सिरुसेरि
टिव्हीवर कुठलीतरी क्रिकेट मॅच चालु होती . आक्रमकपणे खेळत असलेल्या फलंदाजाकडे निर्देश करत चाणाक्ष विकेटकीपर फिरकी गोलंदाजाला सुचना करत होता - "ये आडा मारेगा" .
19 Dec 2017 - 1:16 pm | अभ्या..
गल्लीत मस्त काळीभोर शववाहिका थांबलीय. तंबाखू मळणार्या ड्रायव्हरला एक चक्कर मागितली तर आईघाला म्हनाला "स्कोर काय झाला बे?"
19 Dec 2017 - 1:35 pm | गबाळ्या
सगळंच कसं आक्रीत आणि अतर्क्य वाटत होतं. डोकं जाड आणि बधिर झाल्यासारखं वाटत होतं. एवढ्यात दारावर थाप पडली.
19 Dec 2017 - 2:23 pm | अनन्त्_यात्री
झरझर डोळ्यासमोरून तरळत जात असताना काय टोटलच लागेना. मग होलोग्राम प्रोजेक्टरचं चॅनेल बदलायला रिमोट शोधायला लागलो तेव्हा आठवलं मगाशी गनीमीड वरून यान निघालं तेव्हा तिथेच विसरलोय.
19 Dec 2017 - 2:40 pm | ज्ञानोबाचे पैजार
त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. हे कोणला समजायच्या आत तो रिमोट हस्तगत करणे महत्वाचे होते. तो रिमोट जर चुकुनही दुसर्या कोणाच्या हातात पडला तर काय होईल या विचारानेच त्याला दरदरुन घाम फुटला. पण शक्य तेवढे शांत रहात त्याने वेगाने हलचाली करायला सुरुवात केली
19 Dec 2017 - 4:08 pm | नाखु
ताण हलका करावासा वाटला म्हणून (सवयीने) सिगारेट साठी खिशात हात घातला आणि हातात काय यावं, वाढदिवसाच्या सामानाची यादी.
"सालं नशीबच फुटके, सिगारेट शोधली तेंव्हा यादी सापडते,आणि काल यादी शोधली तेंव्हा फुटकळ, पावत्या अन् बिलं"
एकदा चेहर्यावर खसखसा रूमाल फिरवला तेंव्हा बरं वाटलं
19 Dec 2017 - 4:38 pm | पगला गजोधर
"टाईम झोन १९८० प्लॅनेट नाबु" पाशी काटा स्थिरावला, 'सिम्युलेशन समाप्त' अशी उद्घोषणा हेडफोनमधे झाली.
19 Dec 2017 - 4:49 pm | संजय पाटिल
हेडफोन काढून समोरच्या टेबलावर ठेवला. दोन्ही हात एकमेकात अडकऊन डोक्यावर ताणून एक लांबलचक आळस त्याने दिला.
19 Dec 2017 - 8:58 pm | पगला गजोधर
आळस देतांना चुकून उजवी बरगडी जर्रा जास्त ताण बसल्याने,
परत ठणाणू लागली, बुलेट शरीरातून आरपार गेलेली त्यामुळे जखम मोठी नव्हती, कालच्या नशेत भाजीपाव गुंडाळलेला पण आता चोळामोळा करून झालेला तेलकट बोळा, चेंडूसारखा त्यानं वॉटरटाईट पोर्टहोलच्या दिशेनं फेकला, काचेवर थडकून तो टॉरपिडो ट्यूबवर पडला...
19 Dec 2017 - 9:03 pm | मिसळपाव
पण त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थता १९८० आकडा वाचून आली होती. १९८० ....... काहीतरी गूढ, अनाकलनीय होतं या आकड्यात. जाउद्या. रात्री मेमरी रीसेट होईल तेव्हा काय ते समजेलच.
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
20 Dec 2017 - 8:58 am | गबाळ्या
हे सगळे संकेत कोणत्या तरी कोड्याचे तुकडे असावेत असे मनाला चाटून गेले. एकेका संकेताचा छडा लावून हे कोडे सोडवायचेच असे मनाशी ठरवले. पहिला संकेत -फोनच्या ३ रिंग. त्यांचे गूढ सोडवण्यासाठी शहरातील नामवंत सांकेतिक तज्ज्ञाकडे गेलो.
20 Dec 2017 - 8:58 am | गबाळ्या
हे सगळे संकेत कोणत्या तरी कोड्याचे तुकडे असावेत असे मनाला चाटून गेले. एकेका संकेताचा छडा लावून हे कोडे सोडवायचेच असे मनाशी ठरवले. पहिला संकेत -फोनच्या ३ रिंग. त्यांचे गूढ सोडवण्यासाठी शहरातील नामवंत सांकेतिक तज्ज्ञाकडे गेलो.
20 Dec 2017 - 9:55 am | पगला गजोधर
सांकेतिक तज्ज्ञाकडे गेलो म्हणजे, त्याच्याकडे मदतीसाठी वळलो, त्यासाठी त्याला माझ्या सबमरीनच्या कमांड सेंटरमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कॉल केला, नशिबाने सबमरीन आता हॉमुरझच्या खाडीतून परत न्हावशेवाच्या जवळ आली होती..
20 Dec 2017 - 11:30 am | ज्ञानोबाचे पैजार
कॉल संपता संपता छोटू माझ्यासाठी चहा घेउन आला. तो दरवाजा बाहेर उभा राहून चोरून आमचे बोलणे ऐकत असावा असा मला संशय आला, कारण चहा थंड झालेला होता. या आधिही मी त्याला दुसर्यांचे बोलणे चोरुन ऐकताना तीन चार वे़ळा पकडला होता. पण आमच्या कॅप्टनने त्याला पाठीशी घातल्या मुळे तो प्रत्येक वेळी वाचला होता.
20 Dec 2017 - 7:42 pm | पगला गजोधर
दरम्यान दिल्लीतील साऊथ ब्लॉकमधील एका केबिनमधे एक रिपोर्टवर नजर फेरली जात होती,
.
.
"अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या अण्वस्त्रवाहू पाणबुडीवरील नऊ नाविकांना भारतीय नौदलातून बडतर्फ करण्यात आले आहे. अमली पदार्थ चाचणीत दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. हे सर्व नाविक अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या आयएनएस आदिनाथवर सेवेत होते. या सर्वांनी कोकेन या अमली पदार्थाचे सेवन केल्याचे चाचणीतून निष्पन्न झाले आहे. अमली पदार्थ गैरवापराचा प्रकार कदापि सहन केला जाणार नसल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. आमची उच्च मानके जपण्यात अपयशी ठरलेल्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे नौदलाने म्हटले आहे. या पाणबुडीच्या कप्तानास काही दिवसांपूर्वीच सक्तीने सेवामुक्त करण्यात आले होते हे येथे उल्लेखनीय. "
21 Dec 2017 - 1:08 pm | अभ्या..
"लै थाटात सांगत होता ना खलाशी का असंना पण पाणबुडीवर हाय म्हणून,"
"जित्तं थोबाड बी दाखवाया आला न्हाई ते बरं झालं"
"असल्यांचं मरण असलंच असतंय, मी सांगत असतोच की."
"पण महिन्याच्या महिन्याला इतके पैसे घराकडं पाठवत होताच की"
22 Dec 2017 - 1:53 pm | आनन्दा
काही जमत नाहीये, वेगळा विचार केला पाहिजे...
असे म्हणून मयांकने त्याची वही बंद केली आणि सरळ उठून समुद्रावर निघून गेला.
लाटांवर लाटा बघत असताना त्याला काय वाटलं कोण जाणे, सरळ चालत जात जात त्या समुद्राशी तो कधी एकरूप झाला कळलंच नाही
22 Dec 2017 - 5:12 pm | चौथा कोनाडा
सागरांतून तो अचानक दुसर्या जगात आला .... समोर पाहतो तर ... हिरवेकंच कुळांगार... अन ती ! आपसुकच तो तिच्याकडे ओढलां गेला ....
कुळांगारातले कोंवळे पाणी तिच्या डोळ्यांत खेळत होते आणि ते जणू विस्मयकारक स्वप्नांतून चमकून उठल्यासारखे दिसत होते. जांभासारखे गाल, केवड्याच्या पानासारखी कपाळपट्टी, फुटलेल्या डाळिंबासारखी जिवणी, केळीसारख्या मांड्या, पिकल्या पपनसासारखी कान्ति, गाढावलेल्या सांवल्यांसारखा कचसंभार, शीळेसारखा गोड आवाज वैगरे लक्षणे पाहिल्यावर जणुं काय वनस्पतिसृष्टीचें चैतन्यच स्त्रीचा आकार घेऊन आलें आहे असें वाट्ले. त्यांत हिरव्या साडीचोळीनें तिचीं सुंदरांगे परिवेष्टित झाल्यामुळें ती त्या प्रगाराची देवताच वाटत होती.
23 Dec 2017 - 12:54 am | गबाळ्या
का बरें ? का बरें आपले मन हे असे भिरभिरतंय हे त्याला कळेना. मनापासून काहीतरी लिहायचंय, मन वेगवेगळ्या कल्पनांमधून सैरभर धावतंय. पण या साऱ्या कल्पना नुसत्याच रंजक आहेत त्यात आपला आत्मा नाही हे त्याला जाणवू लागले. आत्मा ? आपला आत्मा ? मग त्यासाठी ही कथा स्वतःचीच असायला हवी ना? क्षणार्धात त्याचे मन त्याच्या बालपणात गेले. ते आकाशाशी स्पर्धा करू पाहणारे ते उंचच्या उंच हिरवे डोंगर, त्यांच्यामधून खळखळणारी ती नदी, नदी किनारी बहरलेले भले थोरले वडाचे झाड, अनेकदा त्याच्यावर खेळलेला सुरपारंब्याचा खेळ, खरेतर ...
23 Dec 2017 - 10:12 am | पगला गजोधर
अचानक उजवा डोळा उघडला गेला, पिवळा झोत पडला डोळ्यावर, तो डोळा बंदही करवत नाहीये.... अचानक झाला बंद.....आता डावा उघडला. पुन्हा तोच झोत. ....कोण करतंय हे? कुठे आहे मी????? डावा डोळापण बंद झाला. कुणीतरी आहेत आजूबाजूला..... कुजबुजतायत काहीतरी. काय बोलतायत काही कळत नाहीये नीटसं. उभे आहेत आजूबाजूला माझ्या. माझ्याचकडे बघतायत का ? त्यांचे चेहरे नीटसे दिसत नाहीयेत. कोण आहेत ते? इथे कधी आलो मी? मला हलताही येत नाहीये. की बांधून ठेवलंय त्यांनी मला? नाही.. नक्कीच नाही.. आसपास आपले कोणीच नाही.. आपण एकटे पडलो आहोत. डोके गरगरत होते आणि त्यात तो पुन्हा हरवू लागला.. सत्य आणि असत्य, वास्तव आणि आभास, प्राप्य आणि दुष्प्राय, म्हटलं तर दोन टोकांचे दोन ध्रुव आणि म्हटलं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू, पाठीला पाठ लावून येणाऱ्या. त्यांच्यामधल्या सीमेवरच्या या धूसर शापित प्रदेशात त्याची चाललेली ही आत्ताची वणवण, तरीही त्याच्या हाती काहीच लागत नव्हतं अजुन...
27 Dec 2017 - 4:30 pm | तुडतुडी
भयकथा येत नाहीत का आता
28 Dec 2017 - 5:25 pm | सिरुसेरि
या सर्व घटनाक्रमांमागे डिटेक्टिव्ह रामराव यांचाच हात आहे हे आतापावेतो आमच्या चतुर , सुज्ञ वाचकांनी ओळखले असेलच . कुख्यात दरोडेखोर राका , फितुर स्पाय टायरग यांना डिटेक्टिव्ह रामराव यांनीच रंगेहाथ पकडले होते .
28 Dec 2017 - 6:41 pm | पगला गजोधर
" ए राम्या भाड्या जरा कनेक्सन देरे जरा ..."
एकजण आपल्या तोंडात पेटविण्यासाठी सिगारेट ठेवून राम्याला म्हणाला. राम्याने आपल्या तोंडातली पेटलेली सिगारेट त्याच्याजवळ दिली. त्याने ती पेटलेली सिगारेट आपल्या तोंडातल्या सिगारेटच्या टोकाला लावून दोनचार जोरात झुरके मारले आणि आपली सिगारेट पेटल्यावर त्याने राम्याला त्याची सिगारेट परत केली.
' कनेक्सन' समोरचा सगळा प्रकार डोळ्यात तेल घालून निरखणाऱ्या, राम्या उर्फ डिटेक्टिव्ह रामराव, आपल्या वेषांतरित पात्राच्या बेअरिंगमधून बाहेर न पडता ...
न्हावाशेवाच्या गोदीसमोरील बसथांब्यावर, वाट पाहत थांबलेल्या पाकिस्तान वकिलातीत काम करणारां डेस्क ऑफिसरजवळ जाऊन, कुजबुजला
"आस्मानमें कितने तारें है ?"