गाभा:
नमस्कार मंडळी,
गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवार १८ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी मिपावर ऑनलाईन असणारच आहे. जसेजसे कल आणि निकाल येतील तसेतसे ते इथे पोस्ट करणार आहे. त्यासाठी हा नवा धागा उघडत आहे. या धाग्यावर विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्याअनुषंगाने संबंधित विषयांवर चर्चा व्हावी ही अपेक्षा.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
18 Dec 2017 - 11:48 am | गॅरी ट्रुमन
काँग्रेसचे नेते शक्तीसिंग गोहिल यांचा मांडवी (कच्छ) मधून पराभव झाला आहे.
आता भाजप-- १०३ आणि काँग्रेस--७५.
18 Dec 2017 - 11:51 am | गॅरी ट्रुमन
सौराष्ट्रमधून भाजपने पिछाडी बरीच कमी केली आहे. सौराष्ट्र आणि कच्छमधील ५४ जागांपैकी २९ जागांवर काँग्रेस आणि २५ जागांवर भाजप पुढे आहे. या ५४ पैकी ४८ जागा सौराष्ट्रमध्ये आहेत आणि कच्छमध्ये ६ पैकी ३-३ जागांवर भाजप आणि काँग्रेस पुढे आहेत.
सकाळी काँग्रेस पुढे होती त्याचे कारण पक्षाने सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमध्ये आघाडी घेतली होती. आता सौराष्ट्रमध्ये काँग्रेसची आघाडी कमी झाली आहे आणि उत्तर गुजरातमध्ये भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे.
18 Dec 2017 - 11:58 am | SHASHANKPARAB
भाजपला या निवडणुकीत पाटिदार मतांचा निश्चित फटका बसलेला आहे, तेव्हढाच फायदा कॉंग्रेसचा झालेला दिसतो (दक्षिण व पश्चिम गुजरातमध्ये). परंतु इतर ठिकाणी भाजपने चांगली कामगिरी केलेली आहे. भाजपला गुजरातमधील इतर भागात पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळाल्यात. यामुळे हे म्हणता येईल की नोटबंदी हा विषय लोकांनी हिशेबात धरलाच नाही. जीएसटी देखील काही दिवसांनी स्थिर होईल. पण जातीयवाद आणि आरक्षण वाद फोफावतोय ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.
18 Dec 2017 - 12:01 pm | SHASHANKPARAB
भाजपला या निवडणुकीत पाटिदार मतांचा निश्चित फटका बसलेला आहे, तेव्हढाच फायदा कॉंग्रेसचा झालेला दिसतो (दक्षिण व पश्चिम गुजरातमध्ये). परंतु इतर ठिकाणी भाजपने चांगली कामगिरी केलेली आहे. भाजपला गुजरातमधील इतर भागात पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळाल्यात. यामुळे हे म्हणता येईल की नोटबंदी हा विषय लोकांनी हिशेबात धरलाच नाही. जीएसटी देखील काही दिवसांनी स्थिर होईल. पण जातीयवाद आणि आरक्षण वाद फोफावतोय ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.
18 Dec 2017 - 12:18 pm | पैसा
मतांचे जातीयवादी ध्रुवीकरण करूनही एकूण निकाल बदलता आले नाहीत हे चांगलेच झाले. कोणीच किंगमकेर नाही.
18 Dec 2017 - 11:58 am | गॅरी ट्रुमन
कॉग्रेसने गुजरातमध्ये चांगलीच कडवी लढत दिली. पण तरीही २०१९ मध्ये मोदींना मात देता येणे (निदान गुजरातमध्ये) तितके सोपे नाही. आताच रिपब्लिक चॅनेलवर यशवंत देशमुखांनी म्हटले की काँग्रेसच्या मतदारांपैकी १२% मतदारांनी आता लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपला (मुख्यतः मोदींना) मत देऊ असे म्हटले. आताच यशवंत देशमुखांनी जाहिर केले की यावरून भाजप गुजरातमधील २६ पैकी २६ लोकसभेच्या जागा जिंकू शकेल.
भाजपने यावेळी पटेल-पाटीदार मतदार गमावले पण ते मतदार परत भाजपकडे जाऊ शकतील. पण काँग्रेसने वनवासी मतदार गमावले ते काँग्रेसला परत मिळतील याची शक्यता फारच कमी असेही यशवंत देशमुख म्हणाले.
पटेल मतांमागे धावताना आपल्या हक्काच्या मतदारांकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले ते भलतेच महागात पडलेले दिसते.
18 Dec 2017 - 12:04 pm | चिनार
वनवासी मतदार म्हनजे कोण??
18 Dec 2017 - 12:08 pm | गॅरी ट्रुमन
वनवासी म्हणजे ट्रायबल्स. त्यांना आदिवासी मतदार असेही म्हणता येईल पण मला आदिवासी हा शब्द थोडा डिमिनिंग वाटतो. त्यामानाने वनवासी हा शब्द ठिक वाटतो.
18 Dec 2017 - 12:17 pm | अनुप ढेरे
संघ परिवार आदीवासी हा शब्द वापरत नाही. वनवासी हा शब्द वापरतो. एक गट आदीवासी असेल तर इतर आपोआप परकीय होतात म्हणून असेल कदाचित.
18 Dec 2017 - 12:12 pm | नाखु
नाहीस, असं हे म्हणत होते काल गुरुजी भाऊजी आलें होते चहापाणी करायला तेंव्हा.
पुन्हा एकदा मिसामा
18 Dec 2017 - 12:15 pm | गॅरी ट्रुमन
समजले नाही. मिसामा म्हणजे काय? गुरूजी भाऊजी म्हणजे श्रीगुरूजी का?
18 Dec 2017 - 12:54 pm | नाखु
मिपा सार्वकालीन माई
भाऊजी ं बाबतीत आपला अंदाज बरोबर ठरला आहे
आणि ते चिनार साठी होते, पण पोस्ट करेपर्यंत मध्ये २-३ गाड्या गेल्याही
निराकरण नाखु
18 Dec 2017 - 12:55 pm | नाखु
मिपा सार्वकालीन माई
भाऊजी ं बाबतीत आपला अंदाज बरोबर ठरला आहे
आणि ते चिनार साठी होते, पण पोस्ट करेपर्यंत मध्ये २-३ गाड्या गेल्याही
निराकरण नाखु
18 Dec 2017 - 12:11 pm | हतोळकरांचा प्रसाद
जातीय समीकरणांचे गणित घातले तर भाजपला रोखले जाऊ शकते हेच पुन्हा एकदा सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे, आधी बिहार आणि आता गुजरात! हे नक्कीच चांगले नाही.
सकाळी काँग्रेस पुढे दिसत असताना बंद पडलेला ईव्हीएमविरोधी सूर पुन्हा चालू होताना दिसतोय.
18 Dec 2017 - 12:50 pm | माहितगार
जातीय समीकरणांचे गणित ही या पेक्षा बरीच जुनी गोष्ट असावी नाहीका .अर्थात टाळीचा एक हात 'जातींभेदाचे अस्तीत्व' हे मुळ नाही का ? शंकराचार्य ते गुरु साधू संत समेलने गोष्टीं साठी एकत्र आणता येता जातितिभेद मूळापासून निर्मुलनाचा संदेश देण्यासाठी काही केले जाताना का दिसत नाही ?
18 Dec 2017 - 12:13 pm | गॅरी ट्रुमन
गुजरातः भाजप-११० , काँग्रेस-७०
हिमाचलः भाजप-४३, काँग्रेस-२१
18 Dec 2017 - 12:19 pm | डँबिस००७
<<<<+सकाळी काँग्रेस पुढे दिसत असताना बंद पडलेला ईव्हीएमविरोधी सूर पुन्हा चालू होताना दिसतोय +>>>>>>=
सहमत !!
18 Dec 2017 - 12:21 pm | डँबिस००७
प्रसाद,
सकाळी काँग्रेस पुढे दिसत असताना बंद पडलेला ई व्हीएम विरोधी सुर पुन्हा चालु झालेला दिसतोय !!
सहमत !!
18 Dec 2017 - 12:22 pm | सुबोध खरे
मिपा वरील पुरोगामी, बुद्धिवादी, उदारमतवादी इ इ लोकांची अनुपस्थिती जाणवत आहे.
18 Dec 2017 - 12:40 pm | प्रसाद_१९८२
मिपा वरील पुरोगामी, बुद्धिवादी, उदारमतवादी लोक
कॉंग्रेसच्या होणार्या संभाव्य पराभवाची कारणे शोधत असावेत बहुतेक. :))
18 Dec 2017 - 1:11 pm | सुबोध खरे
कारण शोधायची गरजच नाही.
मतदान यंत्रे घोटाळा हे सर्वसमावेशक आणि सर्वकारण शोधायची गरजच नाही.
मतदान यंत्रे घोटाळा हे सर्वसमावेशक आणि सर्व कालिक कारण उपलब्ध असतेच.
18 Dec 2017 - 12:23 pm | पैसा
मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर सगळे लक्ष केंद्रित होताना गुजरात मुख्यमंत्र्यांचे काम हा तिथल्या विधानसभा निवडणुकात महत्त्वाचा मुद्दा मतदारांसाठी असू शकतो याकडे दुर्लक्ष झाले. भाजपच्या मतांची टक्केवारी प्रत्यक्षात वाढली आहे याचा अर्थ रूपाणी यांनी न बोलता चांगले काम केले असणार असे वाटते.
18 Dec 2017 - 12:32 pm | हतोळकरांचा प्रसाद
मला हे फक्त दिल्लीतल्या वाचाळ माध्यमांनी तयार केलेले चित्र वाटते. त्यांना मोदी/राहुल काय म्हणाले - खरंतर ते काय म्हणाले यापेक्षासुद्धा त्यांचं एखाद दुसरं वाक्य - यातच रस असल्याने त्यांनी तसंच चित्र उभं केलं! वास्तविक मोदींनी काही गुजरातमधील सगळ्या मतदारसंघात सभा घेतल्या नाहीत. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी नक्कीच त्याच्या प्रचारात स्वतःच्या कामाचा प्रचार केला असणार.
18 Dec 2017 - 12:28 pm | गॅरी ट्रुमन
यावेळी भाजप आणी काँग्रेसच्या मतदानाच्या टक्केवारीत ५-६% फरक दिसत आहे. त्या आधारावर भाजप याक्षणी १०७ आणि काँग्रेस ७१ जागांवर पुढे आहे.
आतापर्यंतचे मतदानाचे गणित लक्षात घेता ५-६% मते जास्त घेऊन भाजपने ९५ ते १०० जागा जिंकल्या असत्या. त्यापेक्षा आणखी १० जागा जास्त जिंकलेल्या दिसत आहेत. एकूणच आतापर्यंतचे मतदानाचे गणित बदललेले दिसत आहे. रिपब्लिकवर दाखवलेल्या नकाशावरून दिसते की यापूर्वी गुजरातमध्ये उत्तर-दक्षिण अशी विभागणी असायची म्हणजे अहमदाबादच्या उत्तरेला काँग्रेस आणि दक्षिणेला भाजप विजयी होत असे. पण आता गुजरातमध्ये पूर्व-पश्चिम विभागणी दिसत आहे. पश्चिमेकडे असलेल्या सौराष्ट्रमध्ये काँग्रेस जिंकत आहे पण पूर्वेकडे भाजप.
18 Dec 2017 - 12:43 pm | गॅरी ट्रुमन
हिमाचल प्रदेशात भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल ३ हजार मतांनी पिछाडीवर आहेत असे रिपब्लिकवर जाहिर केले आहे. जर पक्ष जिंकला पण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हरला तर ती विचित्र परिस्थिती होईल. हिमाचलमध्ये मतदारसंघ लहान असतात त्यामुळे ३ हजार ही पिछाडी त्यामानाने मोठी आहे. ती इतक्या सहजपणे भरून काढता येईल का ही शंका वाटते.
18 Dec 2017 - 12:56 pm | मराठी कथालेखक
हिमाचलमध्ये विधानपरिषद आहे का ? असल्यास काही अडचण होणार नाही. विधानपरिषदेवर आणता येईलच.
18 Dec 2017 - 12:57 pm | गॅरी ट्रुमन
नाही हिमाचलमध्ये विधानपरिषद नाही.
18 Dec 2017 - 7:11 pm | रामदास२९
कदाचित जयराम ठाकूर किन्वा जगतप्रकाश नड्डा मुख्यमन्त्री होतील.. किन्वा नवीन फारसे चर्चेत नसलेले नाव पुढे येईल..
18 Dec 2017 - 8:01 pm | पगला गजोधर
नड्डा होतील..
ते संघाच्या शिफारशीत आहेत...
किंबहुना, संघाच्या माणसाच्या हातात चाव्या देता याव्या,
म्हणूनच धुमल व त्यांचा निकटवर्तीय व्यक्तीचा पराभव होऊ दिला गेला असावा.....फार मोठी चाणक्यनीतीची संभावना नाकारता येत नाही....क्विन्स गॅमंबिट .....
18 Dec 2017 - 12:44 pm | प्रसाद_१९८२
एनडी टिव्हीवर सध्या
ई.व्ही.एम. टेंप्मरिंग व ईलेक्शन कमिशन कसे भाजपा व इतर पक्षांत भेदभाव करतो हा मुद्दा चर्चीला जात आहे.
18 Dec 2017 - 12:50 pm | श्रीगुरुजी
हि.प्र. मधून प्रेमकुमार धूमल ३००० मतांनी मागे आहेत. सुरवातीला मोदींना धुमल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्यास उत्सुक नव्हते. त्यांना जे पी नड्डांचे नाव जाहीर करायचे होते. परंतु ठाकूर मतांच्या दबावामुळे त्यांना शेवटी धूमलांचेच नाव पुढे आणावे लागले. धूमल पडले तर नड्डा मुख्यमंत्री होतील.
18 Dec 2017 - 12:51 pm | गॅरी ट्रुमन
गुजरातः भाजप १०५, काँग्रेस ७४
हिमाचलः भाजप ४३, काँग्रेस २३
18 Dec 2017 - 12:51 pm | प्रसाद_१९८२
कॉंग्रेस प्रवक्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हिमाचल प्रदेश मध्ये कॉंग्रेस हरली ती anti incumbency मुळे.
मात्र गुजरात मध्ये कॉंग्रेस हरली ती ई.व्ही.एम. टेंप्मरींग मुळे.
18 Dec 2017 - 1:08 pm | गॅरी ट्रुमन
रिपब्लिक चॅनेलवर जाहिर केले आहे की आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजपला ५०.११% मते मिळाली आहेत. जागा दिसताना मागच्या वेळेपेक्षा कमी दिसत आहेत पण २०१२ मधील ४७.८५% वरून दोन-सव्वादोन टक्के मते भाजपला जास्त मिळत असतील तर तो भाजपचा जबरदस्त विजय म्हणायला हवा. लोकसभेत मोदींच्या नावावर आणखी ५% मते जरी मिळाली तर भाजप २०१४ प्रमाणेच क्लीन स्वीप करेल. सगळे आकडे आले की त्याचे विश्लेषण करायचेच आहे.
18 Dec 2017 - 1:13 pm | गॅरी ट्रुमन
गुजरातमध्ये काँग्रेसने सलग सातवी निवडणुक गमावलेली आहे तर भाजपने सलग सहावी निवडणुक जिंकली आहे.
अजूनही काही जागांवर चुरस चालू आहे आणि मतमोजणी जशी पुढे जात आहे त्याप्रमाणे त्या जागांवरील लीड बदलत आहेत.
आता भाजप १०१ आणि काँग्रेस ७६.
18 Dec 2017 - 1:13 pm | डँबिस००७
मिपा वरील तसेच मबो वरीलही फुरोगामी, बुद्धिवादी, उदारमतवादी लोकांची अनुपस्थिती नक्कीच खुपत आहे.
18 Dec 2017 - 1:30 pm | प्रसाद_१९८२
मायबोलीवर "राजकारण गुजरातचे" या धाग्यावर तर आता स्मशान शांतता पसरली आहे. गेले कित्येक दिवस भाजपाचा पराभव होईल या आशेवर असणारी भूते अचानक आज अंतर्धान पावली आहेत.
18 Dec 2017 - 1:20 pm | गॅरी ट्रुमन
मेहसाणामधून उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही विजय झाला आहे. आज बराच वेळ मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल दोघेही मागे होते. आता दोघांचाही विजय झाला आहे.
18 Dec 2017 - 1:33 pm | प्रसाद_१९८२
या दोन्ही राज्यांच्या निकालानी
मोदी सरकारच्या नोटाबंदी व जीएसटीच्या नावाने २४*७ बोंबलणार्या अनेकजणांच्या कानाखाली सणसणीत आवाज काढलाय.
18 Dec 2017 - 1:37 pm | गॅरी ट्रुमन
२०१९ मध्ये आता कोणत्या मुद्द्यावर मोदींना घेरावे हा प्रश्नच विरोधकांना पडेल.
18 Dec 2017 - 1:36 pm | गॅरी ट्रुमन
सध्याचे आकडे:
गुजरात- भाजपः १०४, काँग्रेसः ७४
हिमाचल- भाजप: ४२, काँग्रेसः २२
18 Dec 2017 - 1:43 pm | जेसीना
२०१९ मध्ये आता मोदींना जास्तच प्रभावीपणे उभे राहता येईल , जरी राज्यसभेत त्यांचा संख्याबळ वाढले नाही आणि विरोधकांनी त्यांची काही विधेयक राज्यसभेत अडवून ठेवली तर मग विरोधकांचा काही खरा नाही , मोदींना उगाचच आयते कोलीत मिळेल हातात
आणि जर विरोधकांनी ते मंजूर करण्यात हातभार लावला तरी मोदींचाच फायदा
ये तो ऐसा हुआ ना भाई "अब चिट भी मेरी और पट भी "
18 Dec 2017 - 1:43 pm | श्रीगुरुजी
गुजरातमध्ये राष्ट्रवादीने १ जागा जिंकली आहे़.
18 Dec 2017 - 1:44 pm | जेसीना
आणि आम आदमी पार्टी ने ?
उगाचच विचारावासा वाटलं :)
18 Dec 2017 - 1:49 pm | श्रीगुरुजी
शिवसेना व आआपने नैतिक विजय मिळविला.
19 Dec 2017 - 12:42 am | श्रिपाद पणशिकर
सडजि फार अपेक्षा ठेवुन होते.... तेच ईंटरनँशनल शीएम.
पण कपिल मिश्रा ने अशी पाचर मारलिय का सडजि अजुनहि त्या एरंडेला ची गुळणि धरून बसलेत. चिऊसेने च्या बाबतीत न बोललेलच बरय बाब्बो हे डायरेक माणसाच्या मेंदुतुन त्याचा कोथळा च काढतेत.
18 Dec 2017 - 1:49 pm | गॅरी ट्रुमन
त्यांच्या इंटर्नल सर्व्हेमध्ये ११० जागा येणार होत्या.
18 Dec 2017 - 1:50 pm | अनुप ढेरे
सर्व जागी डिपॉझिट जप्त
19 Dec 2017 - 12:59 am | विकास
ते लाभार्थी आहेत. ;)
18 Dec 2017 - 1:49 pm | प्रसाद_१९८२
किती उमेदवार जिंकले किंव्हा आघाडीवर आहेत?
18 Dec 2017 - 1:50 pm | श्रीगुरुजी
शून्य
18 Dec 2017 - 1:50 pm | गॅरी ट्रुमन
एकही नाही :)
18 Dec 2017 - 10:05 pm | विकास
गुजरातमध्ये राष्ट्रवादी पेक्षा None of the Above (NOTA) ला अधिक मते (vote share) मिळाली आहेत.
18 Dec 2017 - 1:49 pm | कंजूस
राहुलबाबाने अशोक चव्हाणांचे कौतुक न करता तिथल्या कॅान्ग्रेस कमिटीचे केले. आताही तसेच करणार आणि लेवल दाखवणार का?
18 Dec 2017 - 1:50 pm | अनुप ढेरे
जातीवादी पक्षाचा पराभव होणे ही आनंदाची गोष्ट आहे.
18 Dec 2017 - 1:54 pm | गॅरी ट्रुमन
विरमगाममधून भाजपच्या डॉ.तेजश्री पटेल यांनी काँग्रेसच्या लाखाभाई हरवड यांचा १५६५ मतांनी पराभव केला आहे. विरमगाममध्ये हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर या दोघांचेही घर आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपचा विजय व्हायलाच हवा होता. तो तसा झाला आहे याचे समाधान आहे.
18 Dec 2017 - 3:52 pm | गॅरी ट्रुमन
विरमगाममधून भाजपचा विजय झाला असे एन.डी.टी.व्ही च्या वेबसाईटवर काही वेळापूर्वी बघितले होते. पण आता तिथेच काँग्रेसच्या लाखाभाई हरवड यांचा विजय झाला आहे असे म्हटले जात आहे. नक्की काय चालू आहे हे समजत नाही.
18 Dec 2017 - 4:04 pm | सखारामगटणे
http://eciresults.nic.in/ConstituencywiseS0639.htm?ac=39
भाजपा हरले आहे तिथे
18 Dec 2017 - 1:54 pm | इरसाल
१. गुजराती लोकं मोदींनाच मत देणार,
२. मोदींनी जातीयवादी राजकारण केलं,
३. मोदींच्या मित्रांनी भरमसाठ पैसा ओतला निवडणुकीत,
४. गुजरात आणी हिमाचलच्या लोकांना अक्कल नाही,
५. मोदींनी द्वेषाचे आणी सीडी प्रकरणाचे घाणेरडे (??) राजकारण केले
.
.
.
.
.
.
.
.
(ईन्फिनीटी) ईव्हीएम हॅक
18 Dec 2017 - 1:55 pm | प्रसाद_१९८२
सुरत मधील सर्व १२ जागा भाजपा जिंकणार असे दिसते. नोटबंदी व जीएसटीचा फटका सर्वात जास्त सुरत मधील व्यापार्यांना बसला असे निवडणुक प्रचारात कॉंग्रेस सतत सांगत होती तो कॉंग्रेसचा चुनावी जुमला होता असेच आता म्हणावे लागेल.
18 Dec 2017 - 2:15 pm | श्रीगुरुजी
आताची स्थिती (एबीपी) -
गुजरात -
भाजप १००, काँग्रेस - ८०
हिमाचल -
भाजप ४१, काँग्रेस २३
18 Dec 2017 - 2:16 pm | श्रीगुरुजी
वडनगरमधून भाजपचा पराभव
18 Dec 2017 - 2:26 pm | गॅरी ट्रुमन
मोदींचे जन्मस्थान वडनगर (मेहसाणा जिल्हा) ही विधानसभा जागा नाही. तर विधानसभा जागा आहे वडगामची. ही जागा मेहसाणा जिल्ह्यात नाही तर बनासकांठा जिल्ह्यात आहे. तिथून जिग्नेश मेवाणी जिंकला आहे. मोदींचे जन्मस्थान असलेल्या वडनगर गावाचा कोणत्या विधानसभा मतदारसंघात समावेश होतो हे बघायला हवे.
18 Dec 2017 - 2:16 pm | गॅरी ट्रुमन
अजूनही सगळे निकाल हातात आलेले नाहीत. त्यामुळे आकडे वरखाली होत आहेत. याक्षणी भाजप १०० आणि काँग्रेस ७९ असे आकडे आहेत. काही वेळापूर्वी भाजप १०५ वर असताना मी काही आकडे गोळा केले. ते खालीलप्रमाणे:
विभागांमधील निकाल
मध्य गुजरात

सौराष्ट्र-कच्छ

उत्तर गुजरात

दक्षिण गुजरात

18 Dec 2017 - 2:23 pm | गॅरी ट्रुमन
या आकड्यांवरून समजून येईल की भाजपने आपले अहमदाबाद, सुरत आणि वडोदर्यामधील बालेकिल्ले राखले आहेत.
सौराष्ट्रमधून मोठ्या प्रमाणावर भाजपची पिछेहाट झाली आहे. पाटीदार समाजाची नाराजी त्याला नक्कीच जबाबदार होती असे म्हणायला हवे. सौराष्ट्रात अमरेली जिल्हा वगळता भाजप सगळीकडे शक्तीशाली होता. यावेळी अमरेली जिल्ह्यातून काँग्रेसने स्वीप केला आहे. पण जुनागढ, जामनगर, सुरेन्द्रनगर, भावनगर या एकेकाळच्या भाजपच्या बालेकिल्ल्यातही भाजपची पिछेहाट झाली आहे.
पण भाजपने सौराष्ट्रमधून झालेले नुकसान काही प्रमाणात मध्य गुजरात आणि दक्षिण गुजरातमध्ये भरून काढले आहे. तरीही सौराष्ट्रमध्ये झालेले नुकसान जास्त असल्यामुळे जागा मागच्यावेळे पेक्षा कमी आलेल्या दिसत आहेत.
18 Dec 2017 - 2:30 pm | गॅरी ट्रुमन
भाजपने सौराष्ट्रमध्ये झालेले नुकसान उत्तर गुजरातमध्ये काही प्रमाणात भरून काढले आहे. त्यात पंचमहाल जिल्ह्यातील आकडे महत्वाचे आहेत. या जिल्ह्यात ७ पैकी ५ जागा भाजप पुढे आहे तर काँग्रेसला एकही जागेवर पुढे नाही. महत्वाचे म्हणजे पंचमहाल जिल्ह्यात गोधरा येते. तसेच शेजारच्या दाहोद जिल्ह्यातही ६ पैकी ४ जागांवर भाजप पुढे दिसत आहे. या भागात शंकरसिंग वाघेलांचा काही प्रमाणावर जोर आहे. एकेकाळी वाघेला गोधरामधून लोकसभेवर निवडूनही गेले आहेत.
शंकरसिंग वाघेला निवडणुकांपूर्वी बाहेर पडल्याचा काँग्रेसला नेमका इथेच फटका बसलेला दिसतो.
18 Dec 2017 - 2:35 pm | मराठी कथालेखक
गुजरातमध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत. भाजपसाठी हा धोक्याचा इशारा आहे, भाजपने आता काही टोकाचे धार्मिक मुद्दे बाजूला ठेवत विकासावर लक्ष केंद्रित करावे ही अपेक्षा.
मी मोदीभक्त / मोदीविरोधक वगैरे नाही. जाती-धर्माचे राजकारण न करणारा , गुन्हेगारी व भ्रष्टाचाराला आळा घालणारा आणि विकासाची कास धरणारा कोणताही पक्ष सत्तेत यावा आणि देशाची भरभराट व्हावी, देशातील नागरिक सुरक्षित आयुष्य जगावेत हीच इच्छा
18 Dec 2017 - 2:55 pm | चौकटराजा
नागरिक म्हणून मी अनेक वर्षे भाजपाला केशरी कॉंग्रेस व कॉंग्रेस ला सफेद भाजपा मानत आलो आहे. केवळ मोदी( खोटारडे असले तरी ) यांच्या वैचारिक पध्हती मुळे मी आता तरी भाजपाचा समर्थक आहे. या पक्षाने नाईलाजाने का होईना आपले जनसंघ पण सोडून कॉंग्रेसला ला गुरू मानले आहे. काँग्रेस संस्कृतित रमलेला एक सध्या तुरूंगात आहे तर भाजपाचा एक माजी मुख्यमंत्री तुरुंगात जाणार आहे.
भाजपा ला शत्रू मानून एकत्र आलेली माणसे पहाता भाजपाच्या जागा कमी होणार हे स्पष्ट होते. पण कॉंग्रेस ने बोलून न दाखविलेला सत्तेचा त्यांचा अम्दाज चुकलाच. एक जागेने का होईना भाजपाला जीवदान मिळाले तरी भारतीय लोकशाहीत हा १०० टक्के विजयच मानावा लागेल. कारण आपल्या लोकशाहीत पराभूत म्हणजे कुचकामी असेच म्हटले जाते. अर्थात भाजपाला यातून काहीतरी शिकता ये ईल ते आसे की काँग्रेस मुक्त भारत या ऐवजी गव्हर्नन्स युक्त भारत ही नवी घोषणा मोदीनी निवडली पाहिजे.
18 Dec 2017 - 2:59 pm | अमितदादा
प्रथम भाजप चे गुजरात आणि हिमाचल प्रदेश मधील विजयाबद्दल अभिनंदन. गुजरात आणि हिमाचल प्रदेश मध्ये नक्कीच भाजप ला सरळ विजय मिळला आहे आणि काँग्रेस पराजित झाली आहे. परंतु भाजप ला गुजरात मध्ये मिळालेल्या जागा नक्कीच मोदी आणि शाह यांच्या अपेक्षेनुसार नाहीत. या निवडणुकीत भाजप कडे केंद्रातील सत्ता, अमर्याद रिसोर्सेस, संघ आणि भाजप च संघटना बळ, धार्मिक ध्रुवीकरण, मोदी शाह सारखे नेते असे अनेक प्लस पॉईंट होते, तर काँग्रेस कडे जातीय ध्रुवीकरण, तरुण नेते, सरकार विरोधाचा असंतोष हे प्लस पॉईंट होते.
यातून भाजप आणि काँग्रेस या दोघांना योग्य तो संदेश मतदारांनी दिला आहे यात काही शंका नाही. काँग्रेस च संख्याबळ वाढलं हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे याच कारण, लोकशाही मध्ये सत्ताधारी पक्षास तुल्यबळ विरोधी पक्ष हवा (equilibrium) नाहीतर मदमस्त हत्ती सारखी सरकार ची अवस्था होते. जे भाजप च झालं आहे , गर्विष्ठ मोदी आणि शाह, चुकीची आर्थिक धोरण, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष, निराशाजनक रोजगार निर्मिती, उजिवकडच्या धर्माध संघटनाची गोरक्षा आणि लव्ह जिहाद च्या नावाखाली चालेली हिंसा हि अनेक कारणे भाजप ला २०१४ साली भरभरून मतदान करणाऱ्या काही मतदारांना भाजप पासून दूर नेत आहे (माझ्या सारख्या). काँग्रेस अजून हि लोकांना पर्याय वाटत नाही परंतु भाजप ला धडा शिकवण्यासाठी काबूत ठेवण्यासाठी लोक काँग्रेस मजबूत करतायत. भाजप ने योग्य तो धडा घेऊन कोर्स करेक्शन करावे अन्यथा लोक काँग्रेस ला पर्याय म्हणून पाहतील. काँग्रेस मुक्त भारत हे मोदींच दु स्वप्न साकार न होण्यातच देशाचं भलं आहे, २०१९ साली मोदी पंतप्रधान आणि तुल्यबळ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस हे समीकरण नक्कीच हिताचं आहे.
मुळात भाजप चे समर्थक काँग्रेस वर जातीयवादाचा आरोप करतात जो योग्यच आहे, परंतु भाजप हा धर्मांध आणि काही प्रमाणात जातीयवादी पक्ष आहे. जातीयवाद आणि धार्मिकवाद दोन्ही देशाला धोकादायकच, धार्मिकवाद पेक्षा जातीयवाद अधिक धोकादायक म्हणून भाजप आणि त्यांच्या सहयोगी संघटनेच्या चुकीच्या धोरणांना डिरेक्टली /इंडिरेक्टली पाठिंबा देणे हा बुद्दिभेद आहे किंवा आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट हे लॉजिक आहे .
इथून पुढे भाजपाला issue बेस्ड विरोध (आणि समर्थन) हे नक्कीच राहील.
18 Dec 2017 - 3:36 pm | चिर्कुट
बराचसा सहमत आहे.
20 Dec 2017 - 5:52 am | चौकटराजा
लोकशाही ही अधिकात अधिक मते मिळविणार्या माणसाची हुकुमशाहीच असते. निवडणुकीत विजेत्यास किती जनाधार मिळाला ते कळते. पराभूतास ही जनाधार असतो याची दखल आपली काय जगातील कोणतीच लोकशाही घेत नाही. माझ्या तरी माहितीप्रमाणे"वेटेड राईट तू व्होट टू मेक अ लॉ " अशी व्यवस्था जगात कुठेही नाही. विरोधी पक्ष ही एक हिडीस कल्पना असून त्यामुळे राजकीय शत्रूत्वाची भावना निर्माण होते. सत्ताधारी व सत्ता नसलेले यात घातक फरक आपल्या लोकशाहीत आहे. लोकांच्या वास्तव जनाधाराचे प्रतिबिम्ब आपल्या लोकशाहीत होत नाही. सर्व खासदारांचे वेतन वाढवायचे असले तर मात्र १०० टक्के मतदान ठरावाच्या॑ बाजूने होते.
18 Dec 2017 - 3:19 pm | रंगीला रतन
हार्दीक पटेल आता ईव्हिएम वर मुक्ताफळं उधळत आहे.
18 Dec 2017 - 3:24 pm | गॅरी ट्रुमन
आता हार्दिक पटेलची पत्रकार परीषद चालू आहे. नेहमीप्रमाणे भाजपने ईव्हीएम मुळेच यश मिळवले आहे (जेवढे मिळवले आहे तेवढे) असे तो म्हणत आहे. तसेच सुरतमधील वारच्छा मतदारसंघात १ लाख १० हजार पाटीदार मतदार असताना तिथे भाजप जिंकूच कसा शकतो वगैरे मुक्ताफळे तो उधळत आहे. म्हणजे आपण पाटीदार- पटेल समाजाचे नेते म्हणून वावरलो तरी सगळ्यांना प्रभावित करू शकलो नाही हे काही मान्य करायला तो तयार नाही. तसेच गुजरातची जनता बर्यापैकी जागृत झाली आहे पण अजून अहमदाबाद-सुरतच्या लोकांना जागृत व्हायला हवे अशी नवी मुक्ताफळे तो उधळत आहे.
18 Dec 2017 - 3:34 pm | मराठी कथालेखक
हार्दिक पटेल आता इथेच संपेल.. यापुढे त्याला कुणी विचारणार नाही.. तो स्वतः निवडणूक लढला नाही ना ?
18 Dec 2017 - 4:09 pm | अनुप ढेरे
वयात बसत नाही बहुधा. २५ वय लागतं. हा २३ आहे.
18 Dec 2017 - 3:44 pm | गॅरी ट्रुमन
एकूणच काँग्रेसने हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या त्रिकूटाला बरोबर घेऊन घाणेरडे जातीचे राजकारण खेळले त्याला पूर्ण यश आले नाही हे समाधान आहे. राहुल गांधी म्हणत आहेत की काँग्रेस पक्ष देशाला २१ व्या शतकात तर मोदी मध्ययुगात घेऊन जात आहेत. पण स्वतः जातीपातीचे घाणेरडे राजकारण खेळून काँग्रेसच देशाला मध्ययुगात घेऊन जात आहे. या राजकारणाचा जितका मोठा पराभव व्हायला हवा होता तितका झालेला नाही पण तरीही त्या राजकारणाला पूर्ण यश आले नाही हे पण काही कमी नाही.
18 Dec 2017 - 3:50 pm | हतोळकरांचा प्रसाद
भाजप १०५ खाली राहिला तर भाजपसाठी हा अतिशय निराशाजनक निकाल असायला हवा. गुजरातमध्ये विरोधी पक्ष मोट बांधून भाजपला रोखू शकते तर देशभरात कुठेही ते केले जाऊ शकते. माझ्यादृष्टीने तरी हा भाजपसाठी धोक्याचा इशारा आहे. जीएसटी, नोटबंदी वगैरे विषयांना स्वतःच्या पद्धतीने मांडून, गैरसमज पसरवून विरोधी पक्ष भाजपला गुजरातमध्ये रोखू शकतोय हा त्यांच्यासाठी धक्काच मनाला गेला पाहिजे.
18 Dec 2017 - 8:36 pm | SHASHANKPARAB
Anti incumbency हा एक मोठा फॅक्टर धरला तर ही गणिते राष्ट्रीय स्तरावर चालणे मुश्किल आहे. देशात राजकारण फक्त धार्मिक गनिटांवरच चालेल. शिवाय धक्क्यातून शिकण्याची आणि तत्पर निर्णय घेण्याची मोदी शहा जोडगोळीची खासियत पहिली तर 2019 अजूनही मोदींच्याच खिशात आहे असं वाटत. आता सर्वात आधी भ्रष्टाचाराची प्रकरणे सरकार खऱ्या अर्थाने हाताळायला सुरुवात करेल असे वाटते. त्यात विरोधकांना गुंतवुन ठेवले तर जातीय समीकरणे दूरच, स्वतःचे धोतर कसे वाचवायचे या विवंचनेत ते पडतील. त्यात काँग्रेसला तथाकथित नवसंजीवनी ,( म्हणजे जातीय समिकरणांमुळे आलेली सूज) राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मिळाल्याने, कॉंग्रेसलाच तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वपदी बसवावे असा आवाज निघू लागेल, ज्याला ममता व बिजू जनता दल उघड विरोध तर आपले काकासाहेब पडद्याआडून कारस्थान करून विरोध करतील....
18 Dec 2017 - 4:14 pm | गॅरी ट्रुमन
काँग्रेसनी काही चुका केल्या त्या त्यांना महागात पडलेल्या दिसत आहे. भाजपचा थोडक्यात विजय झालेला दिसत आहे. काँग्रेसने या चुका केल्या नसत्या तर आज निकाल वेगळा लागला असता. माझ्या मते काँग्रेसने केलेल्या चुका पुढीलप्रमाणे:
१. जेव्हा राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी विरूध्द राहुल गांधी अशी लढत होते तेव्हा राहुल गांधी मोदींना पुरे पडू शकणार नाहीत हे परत एकदा सिध्द झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने निवडणुक स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करून लढवायला हवी होती. राहुल गांधींनी सुरवातीला 'गुजरातनू विकास गांडा छे' वगैरे स्थानिक मुद्दे आणून सुरवात चांगली केली होतीच. पण शेवटी मणीशंकर अय्यरनी मोदींना 'नीच' म्हणून फूलटॉस टाकला. त्यामुळे मोदींची प्रतिमा हा मुद्दा गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये नसतानाही तो मुद्दा आणला गेला. आणि ती संधी मोदी थोडीच सोडणार होते?
अजून मी सगळ्या आकड्यांचे विश्लेषण केलेले नाही पण सध्या वाटत आहे की भाजपने मागच्या वेळेपेक्षा जास्त मते मिळवली आहेत. पण काँग्रेसचीही मते वाढली आणि मतांचे डिस्ट्रीब्युशन अशा पध्दतीने झाले की त्यामुळे भाजपला १०० च्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत. गुजरात विधानसभा निवडणुका-२०१७ या लेखात म्हटले होते की भाजपला काठावरचे (म्हणजे ९५) बहुमत पाहिजे असेल तर काँग्रेसपेक्षा ४.५% मते जास्त हवीत. जर भाजप १०० च्या आसपास असेल तर भाजपने ५ ते ५.५% मते जास्त मिळवलेली दिसत आहेत. काँग्रेसने टाकलेल्या फूलटॉसमुळे नक्की किती मते फिरली हे सांगता येणार नाही पण समजा अगदी अर्धा टक्का मते जरी त्यामुळे फिरली असतील तरी दोन पक्षांमधला मतांचा फरक ४% ते ४.५% इतका असता. कदाचित त्या परिस्थितीत भाजपने काही जागा गमावल्याही असत्या आणि भाजप बहुमताच्या खाली (९१) गेला असता.
२. याच धाग्यात म्हटल्याप्रमाणे पाटीदार मतदारांना आकर्षित करायच्या गडबडीत काँग्रेसने आपल्या पारंपारिक मतदारांना दुरावले. ज्या मतदारांनी यापूर्वी कधीही भाजपला मत दिले नव्हते त्यांनीही यावेळी भाजपला मत दिले आहे. समजा काँग्रेसने आपली पारंपारीक मते कायम राखली असती आणि वर पाटीदार समाजातील मते आकर्षित केली असती तर मात्र भाजपचा मोठा पराभव करण्यात काँग्रेस यशस्वी होऊ शकला असता.
३. शंकरसिंग वाघेलांना जाऊ दिले ही पण काँग्रेसची मोठी चूक झालेली दिसत आहे. याच धाग्यात म्हटल्याप्रमाणे गोधरा आणि दाहोदमध्ये भाजपने सौराष्ट्रमध्ये झालेली पडझड काही प्रमाणात सावरली आहे. हा भाग गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला फार यश मिळालेले नव्हते. या दोन जिल्ह्यातून ५-६ जागा कमी झाल्या असत्या तरी भाजपला अगदीच थोडके बहुमत मिळाले असते.
अजून मुद्दे आठवले तर लिहितोच.
18 Dec 2017 - 4:29 pm | गॅरी ट्रुमन
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास काँग्रेस आघाडीवर होता. एक वेळ अशी आली होती की काँग्रेसने भाजपपेक्षा १२ जास्त मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती. त्यावेळी ई.व्ही.एम एकदम व्यवस्थित होती. पण नंतर काँग्रेस पिछाडीवर गेल्यानंतर मात्र ई.व्ही.एम वाईट झाली. श्री.रा.रा.संजय निरूपम यांनी ई.व्ही.एम ला दोष दिलाही आहे.
विशेष म्हणजे माजी मुख्य निवडणुक आयुक्त गोपालस्वामींबरोबरच नवीन चावलांनीही ई.व्ही.एम वर प्रश्नचिन्ह उभे करू नका असे म्हटले आहे. हे नवीन चावला काँग्रेस पक्षाच्या जवळचे आहेत, आणीबाणीदरम्यान ते बदनाम झाले होते आणि २००८ मध्ये त्यांची मुख्य निवडणुक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हा या कारणामुळे भाजपने त्यांच्या नियुक्तीविरूध्द आक्षेपही घेतले होते.
तरीही काँग्रेसवाले आणि हार्दिक पटेलसारखी फालतू मंडळी परत परत ई.व्ही.एम वर प्रश्नचिन्ह उभे करत आहेतच.
19 Dec 2017 - 1:46 pm | arunjoshi123
ही काँग्रेसी मंडळी इतकी नालायक आहेत कि पुढे त्यांना ५५% सीट मिळतिल तेव्हा देखिल आम्हाला ७५% मिळाल्या, ई व्ही एम ने घोटाला केला, असं म्हणतील.
18 Dec 2017 - 4:31 pm | गॅरी ट्रुमन
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पत्रकारांना सामोरे जायचे नाकारले आहे. याविषयी काँग्रेस समर्थकांचे काय म्हणणे आहे?
18 Dec 2017 - 4:34 pm | विशुमित
माझा भाजप १३० जागा जिंकेल याचा अंदाज गुजराती जनतेने साफ चुकवला आहे. याचा अर्थ मी तज्ज्ञ नाही असा होत नाही. असो ..
चला भाजपच्या सर्वोच नेत्यांचे गुजराती अस्मितेने नाक वाचवले.
चांगली, नियोजनबद्ध टक्कर देऊन मनोरंजन केल्याबद्दल भाजपचे हार्दिक आभार आणि अभिनंदन ...!!
EVM बाबत आणखी पारदर्शकता यावी याबद्दल मी अजूनही आग्रही आहे. भले काँग्रेस ने देखील मुसंडी मारली असली तरी ही.
...
काँग्रेसचे विशेष अभिनंदन काटे कि टक्कर दिलीत. पण खचू नका पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागा. कारण तुमच्या कडे वेळच वेळ आहे.
राहुल यांनी पार्टीमधून अमित शाह सारखे संघटनात्मक गुण असलेले लोक हेरून पुढची रणनीती राबवावी.
....
ट्रुमन जी चे सुद्धा खूप खूप आभार ज्यांनी क्षणो क्षणी अपडेट्स देऊन खुर्चीवर स्वतः खिळून बसून आम्हाला पण तसे करायला भाग पाडले. एक वेळ तर मिपा ने Drupal एर्रोर पण दाखवला होता, एवढे वाचक या धाग्यावर तुटून पडले होते.
...
गुजरात मध्ये भाजप का जिंकले आणि काँग्रेस का हरले याचे विश्लेषण करणारा कोणीतरी धागा काढलेच पण त्याला तेवढा रिस्पॉन्स मिळेल असे वाटत नाही. ज्याला असा धागा काढायचा आहे त्याने आपल्या जवाबदारीवर काढावा.
...
18 Dec 2017 - 4:51 pm | गॅरी ट्रुमन
अजून काही मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू आहे. गोधरामध्ये आता काँग्रेस १६७ मतांनी तर मोडासामध्ये काँग्रेस १४७ मतांनी पुढे आहे. हे दोन निकाल अजूनही बदलू शकतात. काँग्रेसने धांधुका ३५ मतांनी तर कपराडाची जागा १७० मतांनी जिंकली आहे.
18 Dec 2017 - 5:27 pm | गॅरी ट्रुमन
हिमाचलमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा सुजानपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. आता बहुदा केंद्रीय मंत्री जयप्रकाश नड्डा मुख्यमंत्री होतील.
पक्षाचा विजय होणे पण मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा पराभव होणे हा प्रकार निदान माझ्या आठवतीत तरी प्रथमच झाला आहे असे वाटते. १९९६ मध्ये केरळमध्ये कम्युनिस्टांचा विजय झाला पण ज्येष्ठ नेते अच्युतानंदन यांचा पराभव झाला होता. अच्युतानंदनना अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहिर केले गेले नव्हते आणि पक्ष जिंकल्यास ते मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती. तेव्हा ती परिस्थिती नक्कीच वेगळी होती.
18 Dec 2017 - 6:26 pm | श्रीगुरुजी
१९८९ मध्ये एनटीआर ३ पैकी १ किंवा २ मतदारसंघात हरले होते.
18 Dec 2017 - 8:08 pm | नितिन थत्ते
अहो तो पण मास्टर स्ट्रोक आहे म्हणे !!
18 Dec 2017 - 7:48 pm | चष्मेबद्दूर
प्रतिसाद पटला. सहमत आहे.
18 Dec 2017 - 9:02 pm | गामा पैलवान
अवांतर :
गॅरी ट्रुमन,
गुजरातचं पूर्वपश्चिम विभाजन पारंपरिक व नैसर्गिक आहे. मराठा कालखंडात गुजरात व माळवा असा महसुली प्रांत असे. त्याच्या पूर्वेस कच्छ व सौराष्ट्र हा महसुली प्रदेश असायचा. दक्षिणेस सुरत व डांग असा प्रदेश असे.
आजच्या नकाशावर बघायला गेलं तर उत्तर व मध्य गुजरात हा पूर्वकालीन गुजरात होता. नर्मदेच्या दक्षिणेस सुरत व डांग प्रदेश असे. क्वचित त्यासोबत वसई ते डहाणू हा लाटप्रदेश देखील सामील असे. पूर्वेकडे कच्छ काठियावाड एकत्र असून त्यासोबत सौराष्ट्र द्वीपकल्प महसुली गणनेत घेत.
मोदींना पूर्व व पश्चिम गुजरात सांधण्याचं काम करावं लागेलसं दिसतंय.
आ.न.,
-गा.पै.
19 Dec 2017 - 12:58 am | अर्धवटराव
आपलं काम चोख केलं साहेबांनी.
भाजपाने टेक्नीकली निवडणुक जींकली आहे. आणि विजय हा विजय असतो. मुख्य म्हणजे नाक कापायचं वाचलं. हार्दीक अभिनंदन.
२०१९ निवडणुकीत यु.पी.मधे काँग्रेस+सपा+बसपा, महाराष्ट्रात काँग्रेस+राष्ट्रवादी, बिहारमधे काँग्रेस+राजद, कर्नाटक, राजस्थान, पंजाब, दिल्ली, केरळ मधे काँग्रेस एकटी समर्थ आहे. बंगाल, तमिळनाडु युपीए चे समर्थक आहे. आणि गुजरातमधे तरुण तुर्कांचे राजकारण आता स्पीड पकडणार... राहुलबाबा, द बॉल इज इन युअर कोर्ट. तुम्ही फक्त चुका टाळा, मणिशंकर अय्यर सारख्या मंडळींना वेळीच कंट्रोल करा. सत्ता सोपान दृष्टीक्षेपात आलाय.
19 Dec 2017 - 7:32 am | एमी
ये जितना भी कोई जितना है **!!
शेवटची सुरवात वगैरे वगैरे...
19 Dec 2017 - 8:48 am | चामुंडराय
प्रश्न असा आहे........
की BJP ला 'हार्दिक' अभिनंदन असे म्हटलेले 'पटेल' का ??
19 Dec 2017 - 9:31 am | राघवेंद्र
19 Dec 2017 - 9:31 am | राघवेंद्र
19 Dec 2017 - 9:32 am | राघवेंद्र
19 Dec 2017 - 4:54 pm | राघवेंद्र
19 Dec 2017 - 6:54 pm | मार्मिक गोडसे
अडकलेला बोळा काढू का?
ह्याची 'शहा'निशा करावी लागेल.
19 Dec 2017 - 7:55 pm | डँबिस००७
श्री मणिशंकरजी अय्यरांचे हार्दीक अभिनंदन ?
का बाबा ??
20 Dec 2017 - 1:45 am | अर्धवटराव
राष्ट्रीय राजकारणावर खंग्री प्रभाव टाकु शकणारी घटना टाळण्यात अय्यर साहेबांनी मोलाची भुमीका निभावली. अभिनंदन नको करायला ???