Skip to main content

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक-२०१७ मतमोजणी

लेखक गॅरी ट्रुमन यांनी शनिवार, 16/12/2017 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवार १८ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी मिपावर ऑनलाईन असणारच आहे. जसेजसे कल आणि निकाल येतील तसेतसे ते इथे पोस्ट करणार आहे. त्यासाठी हा नवा धागा उघडत आहे. या धाग्यावर विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्याअनुषंगाने संबंधित विषयांवर चर्चा व्हावी ही अपेक्षा. धन्यवाद.

वाचने 44229
प्रतिक्रिया 249

प्रतिक्रिया

सर्वच एक्झिट पोल भाजप ला स्पष्ट बहुमत दाखवत आहेत. त्यामुळे नक्कीच भाजप ठसाठशत विजयी होण्याची शक्यता वाटते . यातून एकच गोष्ट अधोरेखित होतीये, देशात अजूनही, मोदी यांना भरपुर सपोर्ट आहे, शिवाय विरोधी पक्षाकडे मोदींना आव्हान देईल अशी शक्ती व कुवत नाहीये, विरोधी पक्षाने सखोल आत्मचिंतन व सातत्यपूर्ण प्रयत्न व मेहनत केलीच पाहिजे.

In reply to by पगला गजोधर

आपला संबीत पात्रा/मणी अय्यर तर होत नाहीये नं? अशी विचार करण्याची वेळ काही लोकांवर आहे. दु ४ वा bjp 98, cong 81 मी मागच्या वेळेस अंदाज दिलेली 95/85 http://www.misalpav.com/comment/974440#comment-974440 कदाचित मणीला पडमभूषण देतील यावेळी.... जर 98 म्हणजे विकासासाठी... तर 81 हे विकास पोकळ आहे हे दाखवतो. जर 98 जातीय राजकारणाविरुद्ध तर 81 हे धार्मिक विद्वेषा विरुद्ध का नाही समजायचे ? जर 49 टक्के मतदार देशप्रेमी तर 43% देशद्रोही नाही... 5 लाख मते नोटा ला ? जर सलग 22 वर्षे राज्य हातात ठेवणे आचिव्हमेंट तर, 55 वर्षे देश हातात ठेवणे आचिव्हमेंट कसे नाही ? जर 98 आमदार राज्यसभेच्या निवडणुकीत प्रभाव टाकणार तर 82 आमदार पण प्रभाव टाकणारच नं ?

In reply to by पगला गजोधर

150+ आमदार व काँग्रेस मुक्त भारत या केवळ वालग्ना करून ठेवल्या मतदारांनी !

In reply to by पगला गजोधर

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींवर जनतेने विश्वास टाकला, त्यावेळीसचा विरोधी पक्ष व आताचा विरोधी पक्ष यात गुणात्मक दृष्टया फरक जाणवतोय का ? होम पिच वरची ही मॅच Bjp जिकणार होतीच, परंतु किती फरकाने हाच मुद्दा होता. या होम पिचवर नाही म्हटलं तरी थोडासा bjp ला अडवांतेज होताच, त्यांची कार्यकर्ता फळी मजबूत होतीच, तरीही टफ फाईट झाली, तर विरोधी पक्ष आत्मनिरीक्षण करून स्वतः सुधारणा करू शकतात, फक्त अमित शाहच सुधारणा करत नाही.... आज सुधीर चौधरी चं (झी वाल्या)तोंड पाहण्यासारखं होतं...

In reply to by पगला गजोधर

गुजरातेत Bjp चा सीट ट्रेंड हा डाऊनट्रेंड कन्टीन्यू राहिलाय.... ट्रेंड रिवर्सल आजिबात पाहण्यात नाहीये.... उलट काँग्रेस चा पॅटर्न दोजी मॉर्निंग स्टार आहे का ?

मला वाटतं की टाइम्सने त्यांच्या साईटमार्फत केलेला देशव्यापी सर्व्हे बरच काही सांगून जातो...

मतमोजणी ८ वाजता सुरू होईल. सुरवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल. ती पूर्ण झाल्यानंतर ई.व्ही.एम उघडण्यात येतील. साधारण ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास पहिले कल हाती येतील. जसेजसे कल (आणि नंतर निकाल) हातात येतील तसेतसे मी ते इथे पोस्ट करणार आहेच.

भाजपा हरली तर कोणत्या मुद्याचा जनमतावर परिणाम झाला म्हणाल? १) नोटाबंदी २) जाएसटी ३) गोहत्या बंदी व त्यांचा अतिरेक ४) आरक्षण ५)इतर?

In reply to by कंजूस

भाजपचा पराभव झाल्यास अ‍ॅन्टी इन्कबन्सीला तोंड देण्यात आलेले अपयश, मोदींच्या नावावर लोक नेहमीच मते देतील हा आत्मविश्वास नडणे, काँग्रेसने हार्दिक पटेल प्रभृतींना पुढे आणून भाजपला चेकमेट केले आणि त्याला तोंड देण्यात भाजपला अपयश आले वगैरे मुद्दांचा समावेश असेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

GST मुळे व्यापारी वर्गाचा असंतोषही थोडाफार हातभार लावेल असे वाटते. कारण यामुळे cash flow वर नाही म्हणलं तरी परीणाम झाला आहेच.

In reply to by चाणक्य

जी.एस.टी चा सुरतमध्ये मोठा परिणाम होईल असे म्हटले जात होते. पण सुरत शहरातील सगळ्या जागा भाजपनेच जिंकल्या आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना भाजप जिंकल्यास मुख्यमंत्री होणार का हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी 'पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल' असे म्हटले. त्यामुळे पक्षाचा रूपाणी सोडून अन्य कोणाला मुख्यमंत्री करायचा बेत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना निवडणुक झाल्यानंतर मुख्यमंत्री केले जाणार का? ते मेहसाणामधून निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पटेल मतदार आहेत त्यामुळे त्यांची जागा धोक्यात आहे असे म्हटले जात आहे. मुळात विजय रूपाणी किंवा अन्य कोणा भाजप नेत्याला मुख्यमंत्री करायचा प्रश्न उभा राहणार की नाही हे समजेल अजून काही तासात. उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मतमोजणी पद्धत चुकीची आहे. गुप्त मतदान नसते. एकेका भागाला एकेक मतपेटी असते ती जोडली की त्यात्या भागातल्या लोकांनी कोणत्या पक्षाला मत दिले हे पक्षांना कळते. तसं करायला नको. फक्त त्या पेटीत किती मतं आहेत ते दिसले पाहिजे. प्रभागाच्या सर्व मतपेट्या जोडून झाल्यावरच पक्षांची मते दिसली पाहिजेत आणि विभागाचा निकाल.

गुजरातमधील पहिले कल हाती आले आहेत. पहिला कल भाजपच्या बाजूने गेला आहे. नक्की जागा कोणती हे अजून सांगितलेले नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

ही जागा कच्छ जिल्ह्यातील अंजार ही आहे. २०१२ मध्येही ही जागा भाजपने जिंकली होती.

गुजरातमधून आणखी काही कल आले आहेत. भाजप ४ जागांवर तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

आता गुजरातमध्ये भाजप १० जागांवर तर काँग्रेस २ जागांवर पुढे आहे. काँग्रेस गांधीनगर उत्तर आणि पाटणमधून तर भाजप अंजार, दहेगाम, दीसा या जागांवरून पुढे आहे.

हे आकडे पोस्टल मतांचे आहेत. त्यामुळे हे आकडे वेगवेगळ्या चॅनेलवर थोडे वेगळे आहेत. हे आकडे थोडेफार बदलू शकतात. नितीन पटेल मेहसाणामधून पुढे आहेत. घाटलोडिया या भाजपच्या बालेकिल्ल्यातून भाजप पुढे आहे.

मुख्यमंत्री विजय रूपाणी राजकोट पश्चिम मधून आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाणामधून पुढे आहेत.

एन.डी.टी.व्ही वर भाजप २० आणि काँग्रेस ४ वर पुढे असे दाखवत आहेत तर रिपब्लिकवर ९-९ असे आकडे दाखवत आहेत.

एन.डी.टी.व्ही वर दावा केला जात आहे की त्यांनी निवडणुक आयोगाने व्हेरीफाय केलेले आकडे दाखवत आहेत. एन.डी.टी.व्ही वर भाजप ४४ तर काँग्रेस ११ जागांवर पुढे दाखवत आहेत. तर इतर लोकल चॅनेल्सवर भाजप ५२ ठिकाणी आणि काँग्रेस ४१ ठिकाणी आघाडीवर आहे असे दाखवत आहेत.

आता एन.डी.टी.व्ही आणि इतरांमधला फरक थोडा कमी झाला आहे. एन.डी.टी.व्ही अर भाजप ५७ आणि काँग्रेस १९ जागांवर पुढे दाखवत आहेत तर लोकल चॅनेलवर भाजप ६३ आणि काँग्रेस ४१ जागांवर पुढे दाखवत आहेत. एन.डी.टी.व्ही वर हिमाचलमध्ये भाजप ३ आणि काँग्रेस १ जागेवर दाखवत आहेत तर इतर लोकल चॅनेलवर भाजप २७ आणि काँग्रेस ८ जागांवर पुढे दाखवत आहेत.

आताच एन.डी.टी.व्ही वर जाहिर केले की आतापर्यंत आकडे आले आहेत त्यापैकी ९०% मते पोस्टल मते आहेत. त्यामुळे हे आकडे बदलू शकतात. सध्याचे आकडे--- भाजप ६०, काँग्रेस २४ आणि इतर १ (गुजरातमध्ये) तर हिमाचलमध्ये भाजप ३ आणि काँग्रेस १.

काँग्रेसचे शक्तीसिंग गोहिल मांडवीमधून आघाडीवर आहेत, वडगाममधून जिग्नेश मेवानी आघाडीवर आहेत. राधनपूरमधून अल्पेश ठाकोर पिछाडीवर आहेत.

मेहसाणामधून काँग्रेस आघाडीवर दाखवत आहेत. याचा अर्थ उपमुख्यमंत्री नितीन पटेल पिछाडीवर गेलेले दिसत आहेत.

एन.डी.टी.व्ही वरील नकाशावरून काँग्रेसने सौराष्ट्रमध्ये बर्‍यापैकी आघाडी मिळवलेली दिसत आहे. आताचे आकडे गुजरातः भाजप: ६९ , काँग्रेसः ३४ हिमाचलः भाजपः ८, काँग्रेसः २

आता काँग्रेसने फरक बराच कमी केलेला दिसत आहे. आता भाजप ७२ तर कॉम्ग्रेस ४३ जागांवर पुढे आहे. भाजपने मागच्या वेळेपेक्षा ४ जागांवर मागे आहे तर काँग्रेसने ६ जास्त जागा मिळवताना दिसत आहे. हिमाचलमध्ये भाजप १२ तर काँग्रेस ४ जागांवर पुढे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अरे सगळे हिमाचलला विसरून गेले की काय ?! टाईम्स नाऊ : भाजप : १६ काँग्रेस : १० इतर : २

आतापर्यंतचे आकडे बघता गुजरातमध्ये भाजप जिंकेल पण २०१२ पेक्षा काहीशा कमी जागा घेऊन असे वाटते. हिमाचलमध्ये मात्र भाजपचा विजय होताना दिसत आहे. याक्षणी: गुजरातमध्ये भाजप-- ७९, काँग्रेस-- ५६ तर हिमाचलमध्ये भाजप--१६ आणि काँग्रेस-- १०

सौराष्ट्रमधून आणि उत्तर गुजरातमधून काँग्रेस पुढे आहे तर दक्षिण आणि मध्य गुजरातमधून भाजप. भाजप-- ८०, काँग्रेस-- ५७ हिमाचलमध्ये भाजप--१८ आणि काँग्रेस--१०

भाजप सुरतमधील सगळ्या जागांवर पुढे आहे. सुरतमध्ये पटेलांची संख्या लक्षणीय आहे.

ही निवडणुक रंगतदार होत आहे. आता गुजरातमध्ये आता भाजप-- ७७ आणि काँग्रेस--६३ जागांवर पुढे आहे. भाजप जिंकेल पण २०१२ पेक्षा कमी जागांवर असे दिसत आहे. आता नितीन पटेल पुढे गेले आहेत.

सौराष्ट्रमधील ४८ जागांपैकी काँग्रेस २८ जागांवर तर भाजप २० जागांवर आघाडीवर दिसत आहे. आता भाजप ७७ आणि काँग्रेस ६४ जागांवर पुढे आहे.

सध्या काँग्रेसने सौराष्ट्रमध्ये आघाडी घेतलेली दिसत आहे. भाजप मागच्या वेळेपेक्षा पिछाडीवर दिसत आहे त्याचे कारण सौराष्ट्र आहे. सौराष्ट्र-कच्छ मधून ५४ पैकी ४९ जागांचे कल आले आहेत. काँग्रेस २९ तर भाजप २० जागांवर पुढे आहे. आता भाजप ७९ आणि काँग्रेस ६५ जागांवर पुढे आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

काहि मिनिटांपुर्वी काँग्रेस पुढे होते. आता परत मागे पडलेले दिसतेय..

आता भाजप ७८ तर काँग्रेस ६६ जागांवर पुढे आहे. बर्‍याच महिन्यांनंतर अशी निवडणुकींमध्ये चुरस बघायला मिळत आहे. विजय रूपाणी राजकोट (पश्चिम) मधून पिछाडीवर आहे.

काँग्रेसने १९८५ मध्ये १४९ जागा जिंकल्या होत्या. त्याखालोखाल २०१२ मधील ६१ जागा ही काँग्रेसची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. या क्षणी १४८ जागांचे कल हाती आले आहेत. त्यापैकी काँग्रेस ६८ जागांवर आहे. म्हणजे ही काँग्रेसची ३२ वर्षातील सर्वोत्तम कामगिरी असे म्हणायला हरकत नसावी.

आता भाजप आणि काँग्रेस दोघेही ७६ जागांवर पुढे आहेत. हे लिहिता लिहिता काँग्रेस ८० जागांवर तर भाजप ७८ जागांवर पुढे आहे.

आता काँग्रेस ८६ आणि भाजप ७४ जागांवर पुढे आहे. भाजपचे माजी नेते यतीन ओझांनी काँग्रेस ९९ जागांवर पुढे आहे अशी बातमी दिली आहे. मोदी-शहांना हा मोठा धक्का असे म्हणायला हरकत नसावी

महाराष्ट्रात लवकरच इलेक्शन होणार ह्याची चाहूल दिसतेय .............. पण नक्कीच सुरेख निकाल , दिल गार्डन गार्डन होतेय ABP माझा भाजप ७७ काँग्रेस ८८ इतर 4

आता काँग्रेस-८६ आणि भाजप-- ७७ जागांवर पुढे आहे. सौराष्ट्रमधून काँग्रेस ३३ तर काँग्रेस १७ जागांवर पुढे आहे.

भाजपला आता थोडीफार आशा असेल तर ती मध्य गुजरातमधून. तिथे अजून १० जागांचे कल हाती यायचे आहेत. सौराष्ट्रामधून सगळ्या जागांचे कल आले आहेत. दक्षिण गुजरातमधून जवळपास सगळ्या जागांचे कल आले आहेत.

अजूनही भाजप जिंकेल असा वाटते ... पण टक्कर झालीये ह्याचे इतर राज्यात नक्कीच परिणाम दिसतील भाजप ८८ काँग्रेस ८२ इतर 2

लैच भारी निकाल वाटायलाय, स्वयंघोषित पंडितांची भाकिते चुकल्याचा आनंद आहे, काँग्रेस पुढे आल्याचा आनंद नाही पण भाजपाच्या माजूरडेपणाला चाप लागेल ह्याचा जास्त आनंद आहे. बहुधा मोदी शहा पेक्षा रुपाणीमुळे इलेक्शन फसली हा युक्तिवाद लौकर यावा ही अपेक्षा.

भाजप ८८ काँग्रेस ८२ इतर १ अवांतर : मला शेअर बाजार गडगडलाय त्याचा टेन्शन आलाय , उगाच नको तिथे गुंतवणूक करून ठेवलीये :(

काँग्रेस नेते शक्तीसिंग गोहिल मांडवीमधून मागे. तर भाजपचे जितू वाघानी भावनगरमधून मागे. गोधरामधून भाजप पुढे आता भाजप ८८ आणि काँग्रेस ८२

अजून ११ जागांवरील कल हाती यायचे आहेत. त्या सगळ्या जागा दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये आहेत. आता भाजप ८९ आणि काँग्रेस ८० जागांवर पुढे