प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
http://www.misalpav.com/node/41232
लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या राहिलेल्या मुलाचे जॅकेट पहा, कसे वारा भरल्याने फुग्यासारखे टम्म् फुगले आहे ते !!! जम्माडी गंमत आपली.
Making of photo and status :
मी रोज लोकलट्रेनने प्रवास करतो. प्रवास करीत असताना मला आजूबाजूचे निरीक्षण करण्याची सवय (खोड??? हा! हा!! हा!!!) आहे. नकळत माझे अंतर्मन तेव्हा दिसणाऱ्या, घडणाऱ्या गोष्टी टिपत असते. त्यांचा मला लेखन करताना उपयोगही होत असतो.
असाच एकदा मी लोकलट्रेनने जात होतो. पावसाळी दिवस होते. दुपारची वेळ असल्याने डब्यात तुरळकच गर्दी होती. आपण डब्यात शिरतो त्या मोठ्या पॅसेजमध्ये दरवाजाच्या एका बाजूला रेलिंगला रेलून मी उभा होतो. समोरच्या दुसऱ्या दरवाजाच्या रेलिंगच्या इथे समोरासमोर दोन माणसं उभी होती. एक तरुण दरवाजात उभा होता. गाडी तुफान वेगात धावत असल्याने चाकांचा जोराचा खडखड आवाज येत होता. गाडी गदागदा हलत होती. दरवाजातून सोसाट्याचा वारा डब्यात शिरत होता.
दरवाजात बाहेर तोंड करून हवा खात जो तरुण उभा होता, त्याच्याकडे माझे सहजच लक्ष्य गेले आणि मी आश्चर्याने आणि गंमतीने त्याच्याकडे पहातच राहिलो. पावसाळी दिवस असल्याने त्या तरुणाने अंगात विंडचिटरचे जॅकेट आणि खाली रेनकोटची पॅन्ट घातली होती. आणि त्याच्या जॅकेटच्या कॉलर आणि बटनांमधून आत शिरणार्या सोसाट्याच्या वाऱ्याने त्याच्या जॅकेटला मोठ्या फुग्याचा आकार देऊ केला होता. जो फारच गमतीदार दिसत होता. मला तर असं वाटत होतं की एक सुई घ्यावी आणि तो फुगा फाट्कन फोडून टाकावा. तुम्ही फोटो पुन्हा पहा ना! बघा बरं काय गंमत दिसतेय ती! तरुण डब्याच्या दरवाजाला डोकं चिकटवून बाहेर बघत उभा आहे. त्याने एका हाताने वर दांडा पकडलाय. वाऱ्याने त्याचे जॅकेट फुग्यासारखे टम्म फुगवलेय, ज्यामुळे त्याच्या पाठीचा आकारच दिसेनासा झालाय. आणि त्याखाली त्याच्या ढगळ पँटीचा आकार विचित्र दिसतोय. आहे की नाही मजेदार दृश्य! दरवाजातून डब्यात शिरणारा सोसाट्याचा वारा त्या तरुणाबरोबर एक जम्माडी गंमत करत होता हे त्याच्या गावीही नव्हते. त्याचे मस्तपैकी बाहेर बघणे चालू होते.
हे दृश्य मला एवढे आवडले, की ते मला कोणालातरी दाखवावेसे वाटू लागले. पण तिथे माझे कोणीच ओळखीचे नव्हते. म्हणून मी हळूच माझा मोबाईल काढला आणि ते दृश्य कॅमेऱ्यात कैद केले.
आणि हो!! असला बालिशपणा करायला मला भयंकर आवडतो बरं का!! माझ्या बालिशपणाचे अजून किस्से पुन्हा कधीतरी. हा! हा!! हा!!!
--- सचिन काळे.
माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in
प्रतिक्रिया
29 Oct 2017 - 12:53 pm | Ranapratap
सचिन तुमची जावळ हा लेख वाचला, फोटो हि पाहिला, आताच केरळ मधील एलिफंट राईड करताना हत्तीच्या डोक्यावरील जावळ पाहिले, एक फोटो देखील घेतला.
29 Oct 2017 - 1:12 pm | सचिन काळे
@ Ranapratap, एलिफंट राईड करताना हत्तीच्या डोक्यावरील जावळ पाहिले, एक फोटो देखील घेतला. >>> वा:! मस्तं!! माझ्या लेखाशी आपण रिलेट झालात, हे वाचून मला फार समाधान वाटले. आपले मन कोणीतरी ओळखते, ही भावना किती सुखद असते याचा तुमच्या प्रतिसादाने मला अनुभव आला. इथे लिहिल्याबद्दल आपले विशेष आभार.
30 Oct 2017 - 10:55 am | सिरुसेरि
पुफोप्र
30 Oct 2017 - 2:45 pm | सचिन काळे
@ सिरुसेरि, पुफोप्र >>> म्हणजे काय समजले नाही हो!!!
30 Oct 2017 - 3:25 pm | संजय पाटिल
पुढिल फोटोची प्रतिक्षा...
30 Oct 2017 - 4:15 pm | सचिन काळे
@ संजय पाटिल, सिरुसेरि, अस्सं होय!!! धन्यवाद! धन्यवाद!! पण तुम्हाला माहीतच असेल. पु फो एव्हरी संडे टु संडे!! :स्मित:
30 Oct 2017 - 5:55 pm | सचिन काळे
अरे! गेले कुठे सगळे? वाचनसंख्येचा आकडा वाढतोय, पण प्रतिसाद येईना झालेत. मी साद घालू का सगळ्यांना, अगदी नावानिशी. मग बघा हं उचकी लागायची तुम्हाला. हा! हा!! हा!!
4 Nov 2017 - 12:56 pm | सचिन काळे
पुढील भाग उद्या रविवारी सकाळी ९ वाजता टाकतोय. आपणां सर्वांस आग्रहाचे निमंत्रण आहे. पाहण्या आणि वाचण्यासाठी नक्की या. आणि आपली प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका बरं का!!! :स्मित:
4 Nov 2017 - 1:22 pm | अभिजीत अवलिया
हो हो नक्कीच. 'मोसाद' इतकीच तुमच्या लेखमालेतील प्रत्येक भागाची मी वाट बघत असतो. येऊद्या पुढचे पुष्प. :)
4 Nov 2017 - 4:00 pm | सचिन काळे
धन्यवाद! :स्मित:
4 Nov 2017 - 4:01 pm | सचिन काळे
4 Nov 2017 - 6:23 pm | बाजीप्रभू
आता कधी एकदा रविवार येतोय आणि नऊ वाजताहेत असं झालंय...
4 Nov 2017 - 7:59 pm | अमरेंद्र बाहुबली
मलाही. कल क्या हो सकता है?, कोणी ओळखु शकेल का?
4 Nov 2017 - 9:01 pm | सचिन काळे
@ बाजीप्रभू, अमरेंद्र, दिल थामके के बैठीये। अब बस् कुछही घंटो का इंतजार बाकी है।
4 Nov 2017 - 9:56 pm | बाजीप्रभू
उशिरा उठायच्या दिवशी एखाद्याला काकड आरतीचा (९ वा.) चा टाईम देऊन उठायला लावल्यास गोहत्येचं पातक लागतं असं म्हणतात..
4 Nov 2017 - 10:07 pm | सचिन काळे
:स्मित:
5 Nov 2017 - 4:56 am | चामुंडराय
कल क्या हो किसको पता
अब्बी टम्म जॅकेटका ले लो मझ्झा
बाजीप्रभूंना अनुमोदन.
काळे सर, शनिवारी संध्याकाळीच फोस्टे टाकत चला, एकतर उत्सुकता शमल्यामुळे शनिवारी शांत झोप आणि रविवारी सकाळी भल्या पहाटे नऊ वाजता उठायचं टेन्शन नाही, असे दुहेरी फायदे.
5 Nov 2017 - 6:09 am | सचिन काळे
@ चामुंडराय, कल क्या हो किसको पता अब्बी टम्म जॅकेटका ले लो मझ्झा >>> वा:! मस्तं!! आवडलं.
शनिवारी संध्याकाळीच फोस्टे टाकत चला, >>> आपल्या सुचनेस अनुमोदन. प्रयत्न करून पहातो. तरी कार्यबहुल्यामुळे हे शक्य न झाल्यास माफ करावे.
5 Nov 2017 - 9:21 am | सतिश गावडे
रविवारचे सकाळचे सव्वा नऊ वाजून गेले आहेत. अजून तुमची अप्रतिम फोटो स्टेटस आले नाही.
आतुरतेने प्राण डोळ्यात आणून वाट पाहत आहे.
5 Nov 2017 - 10:33 am | सचिन काळे
@ सतिश गावडेजी, आपण माझ्या धाग्यावर आलात म्हणून मला कोण आनंद झालाय म्हणून सांगू!! गेले चार भाग मी आपली वाट पहात होतो. आपले फार फार आभार.
मी पाचवा भाग थोड्यावेळापूर्वी ०८.४५ वाजताच प्रसिद्ध केलाय. कृपया वाचनाचा आनंद घ्यावा. आणि हो! प्रतिसादही द्यावा, बरं का!!