प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
http://www.misalpav.com/node/41232
लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या राहिलेल्या मुलाचे जॅकेट पहा, कसे वारा भरल्याने फुग्यासारखे टम्म् फुगले आहे ते !!! जम्माडी गंमत आपली.
Making of photo and status :
मी रोज लोकलट्रेनने प्रवास करतो. प्रवास करीत असताना मला आजूबाजूचे निरीक्षण करण्याची सवय (खोड??? हा! हा!! हा!!!) आहे. नकळत माझे अंतर्मन तेव्हा दिसणाऱ्या, घडणाऱ्या गोष्टी टिपत असते. त्यांचा मला लेखन करताना उपयोगही होत असतो.
असाच एकदा मी लोकलट्रेनने जात होतो. पावसाळी दिवस होते. दुपारची वेळ असल्याने डब्यात तुरळकच गर्दी होती. आपण डब्यात शिरतो त्या मोठ्या पॅसेजमध्ये दरवाजाच्या एका बाजूला रेलिंगला रेलून मी उभा होतो. समोरच्या दुसऱ्या दरवाजाच्या रेलिंगच्या इथे समोरासमोर दोन माणसं उभी होती. एक तरुण दरवाजात उभा होता. गाडी तुफान वेगात धावत असल्याने चाकांचा जोराचा खडखड आवाज येत होता. गाडी गदागदा हलत होती. दरवाजातून सोसाट्याचा वारा डब्यात शिरत होता.
दरवाजात बाहेर तोंड करून हवा खात जो तरुण उभा होता, त्याच्याकडे माझे सहजच लक्ष्य गेले आणि मी आश्चर्याने आणि गंमतीने त्याच्याकडे पहातच राहिलो. पावसाळी दिवस असल्याने त्या तरुणाने अंगात विंडचिटरचे जॅकेट आणि खाली रेनकोटची पॅन्ट घातली होती. आणि त्याच्या जॅकेटच्या कॉलर आणि बटनांमधून आत शिरणार्या सोसाट्याच्या वाऱ्याने त्याच्या जॅकेटला मोठ्या फुग्याचा आकार देऊ केला होता. जो फारच गमतीदार दिसत होता. मला तर असं वाटत होतं की एक सुई घ्यावी आणि तो फुगा फाट्कन फोडून टाकावा. तुम्ही फोटो पुन्हा पहा ना! बघा बरं काय गंमत दिसतेय ती! तरुण डब्याच्या दरवाजाला डोकं चिकटवून बाहेर बघत उभा आहे. त्याने एका हाताने वर दांडा पकडलाय. वाऱ्याने त्याचे जॅकेट फुग्यासारखे टम्म फुगवलेय, ज्यामुळे त्याच्या पाठीचा आकारच दिसेनासा झालाय. आणि त्याखाली त्याच्या ढगळ पँटीचा आकार विचित्र दिसतोय. आहे की नाही मजेदार दृश्य! दरवाजातून डब्यात शिरणारा सोसाट्याचा वारा त्या तरुणाबरोबर एक जम्माडी गंमत करत होता हे त्याच्या गावीही नव्हते. त्याचे मस्तपैकी बाहेर बघणे चालू होते.
हे दृश्य मला एवढे आवडले, की ते मला कोणालातरी दाखवावेसे वाटू लागले. पण तिथे माझे कोणीच ओळखीचे नव्हते. म्हणून मी हळूच माझा मोबाईल काढला आणि ते दृश्य कॅमेऱ्यात कैद केले.
आणि हो!! असला बालिशपणा करायला मला भयंकर आवडतो बरं का!! माझ्या बालिशपणाचे अजून किस्से पुन्हा कधीतरी. हा! हा!! हा!!!
--- सचिन काळे.
माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

वाचने
4317
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
जावळ
धन्यवाद!
In reply to जावळ by Ranapratap
पुफोप्र
@ सिरुसेरि, पुफोप्र >>>
In reply to पुफोप्र by सिरुसेरि
पुढिल फोटोची प्रतिक्षा...
In reply to @ सिरुसेरि, पुफोप्र >>> by सचिन काळे
धन्यवाद!
In reply to पुढिल फोटोची प्रतिक्षा... by संजय पाटिल
अरे! गेले कुठे सगळे?
पुढील भाग उद्या रविवारी सकाळी
हो हो नक्कीच. 'मोसाद' इतकीच
In reply to पुढील भाग उद्या रविवारी सकाळी by सचिन काळे
धन्यवाद!
In reply to हो हो नक्कीच. 'मोसाद' इतकीच by अभिजीत अवलिया

टम्म् फुगीर जॅकेट आवडलं..
मलाही. कल क्या हो सकता है?,
In reply to टम्म् फुगीर जॅकेट आवडलं.. by बाजीप्रभू
@ बाजीप्रभू, अमरेंद्र, दिल
काळे सर अहो करून टाका कि पोस्ट.. म्हणजे शांत झोप तरी लागेल.
:स्मित:
In reply to काळे सर अहो करून टाका कि पोस्ट.. म्हणजे शांत झोप तरी लागेल. by बाजीप्रभू
अब्बी टम्म जॅकेटका ले लो मझ्झा
धन्यवाद!
In reply to अब्बी टम्म जॅकेटका ले लो मझ्झा by चामुंडराय
रविवारचे सकाळचे सव्वा नऊ
@ सतिश गावडेजी, आपण माझ्या