गच्ची वरुन...

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
14 Sep 2017 - 4:25 pm

Epppie.... चिनी गुलाबाचे सीड्स मागवली होती अम्माजानकडुन. पावली नुकतीच. आता ५० बीयापासुन किती रोपं बनताय बघुयात. लगे हातो नर्सरीत चक्कर टाकुन आलो. तर तिथंही त्यानं चिगुची रोप लावलीयेत नुकतीच. अचानक मागणी वाढली म्हणे.

आमच्या गच्चीवरील बाग प्रेमी मंडळाची देखिल तुफान चर्चा सत्र होतायेत. फुलांचे नवनवे रंग तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संवाद, संपर्क , समन्वय सुरु झालाय.

--चिनी गुलाबाचे कलम करून नवीन कलर बनवता येईल का ?

--भाबड्या अपेक्षा लागल्यात फुलांच्या रंगाच्या

--बरेचसे ड्युअल कलर बघितलेत मी नेट वर

--सगळ्याना द्यायला सोपे जाईल... सगळे कलर

--Hand pollinate document .
You can use 0 no painting brush for hand pollination . Keep a book record of when you mixed 2 different pollens . Keep new hybrid seeds separate from regulars .

--करता येऊ शकतात पण चिनी गुलाब टिश्युकल्चर मधून कलर तयार करतात

--You can also try cross polination of portulaca (white) with gokarna flower(blue). Seen the results on net. They are amazing.

--कलम करुन नाही होणार का?

--कलम ला काडी टणकपणा असावा लागतो.पण तरी ह्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ट्राय करून बघायला हरकत नाही जाॅईन्ड व्यवस्थित पॅक करून प्रयत्न करायला हवा होऊ शकते

--चिनी गुलाबाची फांदी चिटकवूका गोकरणाला ?

--परागकण

--आरे बापरे... कसे ते सांगा

--जर जमले तर डझनानी कलर बनवेंन मी

--Take a 0 number painting brush. First move the brush gently on the Gokarna flower's pollens and then immediately the same brush should be moved gently on Portulaca flower.

--होईल का... प्रयत्न करून बघतो

--नवीन येणाऱ्या फुलाचा रंग मिकक्स कसा होईल

--might not be successful in the first attempt.

- -मग त्यातल्या बिया गोळा करायच्या का ?

--brush must be very clean

अश्या संवादाच्या झडी झडताय. दोघा तिघांनी पुढाकार घेउन स गळ्या ग टासाठी चिगुची रोप तयार करायला घेतलीत . पहिल्या राउंड मध्ये सगळ्यांना दोन रोप मिळणार . मग त्यांनी पुन्हा सगळ्यां करीता रोप तयार कराय ची असं ठरलयं. गच्चीवरील बाग फुलविताना अश्या भन्नाट बाबी सुरु आहेत अ‍ामच्य‍ाकडे.... जाम हुरुप आलायं सगळ्या मंडळींना.

शेतीप्रकटनशुभेच्छाअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

आगाऊ कार्टा's picture

14 Sep 2017 - 6:23 pm | आगाऊ कार्टा

हे काय आहे ?

शीर्षक वाचून अंमळ गोंधळायला झालं! बादवे चिनी गुलाब म्हणजे ते जमिनीवर पांगणारे वेल का? इथे फोटो द्या बागेचे.

सिरुसेरि's picture

15 Sep 2017 - 1:33 pm | सिरुसेरि

"गच्चीसह झालीच पाहिजे" आठवले .