चिकन अंगुरी
साहित्यः
१ कि.ग्रॅम चिकन, दही , हळ्द, लाल तिखट, गरम मसाला, तंदुरी मसाला(१टेबल स्पुन) , आलं-लसुण पेस्ट, लिंबू , मीठ, थोडा लाल कलर, बटर.
कृती:--
प्रथम चि़कनला मीठ व लिंबू लावून १५ मि. ठेवावे.
दही चांगले फेटुन घ्यावे.
चिकनमध्ये दही ,हळ्द, लाल तिखट, गरम मसाला, तंदुरी मसाला, आलं-लसुण पेस्ट,घालून चांगले २ तास मुरत ठेवावे .
नंतर पॅन मध्ये बटर टाकून हे मिश्रण चांगले परतवुन घ्यावे.
झाकण ठेवुन २० मि. शिजु द्यावे.
प्रतिक्रिया
16 Oct 2008 - 9:01 pm | दिप्ती
कांदा टोमॅटो शिवाय चिकनची रेसीपी छान आहे.
16 Oct 2008 - 9:05 pm | प्राजु
पण मग त्याला अंगूरी का नाव?? कारण अंगूरी म्हणजे छोटे गोळे असलेली रसमलाई इतकचं माहीती होतं. आणि या रेसिपी मध्ये अंगूर (द्राक्षे) ही नाहीयेत. मग चिकन अंगूरी का बरं असेल??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Oct 2008 - 7:01 pm | वृषाली
actually ह्या रेसिपी मध्ये अंगुर चा काही एक संबंध नाही आहे. असाच एखादा प्रयत्न करुन पहावा.म्हणुन हा प्रयास
पण नावात काय आहे.
vrush
16 Oct 2008 - 9:48 pm | टारझन
आम्हाला चिकनची कोणतीही अपरूपे मनापासून आवडतात , परंतु "चिकन अंगुरी" हे नाव भयंकर जबर्या कै च्या कै आवडलेलं आहे ... मिपावरच्या सर्व चिकन पाकृची एकदा घरी गेलो की प्रिंट आउट काढेल आणि आईला ६-८ महिन्यांचा तुंबलेला स्वयंपाक एकदाच करायला लावीन म्हणतो :)
अजुन येउंद्या चिकन पाकृ ..
(सर्वचिकनचापी) टार्जू
17 Oct 2008 - 12:49 pm | विसोबा खेचर
क्या केहेने..!
लाजवाब पाककृती...
तात्या.