बिघडलिये मान

लिखाळ's picture
लिखाळ in जे न देखे रवी...
16 Oct 2008 - 4:36 pm

बिघडलिये मान तरुण मुलींसमोर लटलटते
वाढलेल्या वयाला नाकाराते

हिरवटपणाला कंपवात चांगली साथ देतो

असाच एक त्रिवेणीचा प्रयत्न ! कसा वाटला...
-- लिखाळ

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

वृषाली's picture

16 Oct 2008 - 4:41 pm | वृषाली

बहुतेक spondilitis झाला असावा.
पण प्रयत्न छान आहे.

vrush

बेसनलाडू's picture

16 Oct 2008 - 5:17 pm | बेसनलाडू

श्रीराम लागूंची आठवण झाली ;)
(स्मरणशील)बेसनलाडू

प्राजु's picture

16 Oct 2008 - 7:49 pm | प्राजु

श्रीराम लागूंची आठवण झाली ....

=)) =)) =))

प्रयत्न मस्त आहे त्रिवेणीचा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

17 Oct 2008 - 2:43 am | चतुरंग

(लटलटती मान सावरत, कंपयुक्त आवाजात, पॉजेस घेत) डॉ.लागू -

"कोण तो, बेला का?.....अरे चेष्टा करणं सोपं आहे रे..... जरा इथे रंगमंचावर येऊन चार वाक्य फेकून दाखवा म्हणावं! ...आता वय झालं म्हणून काय झालं...एकेकाळी नटसम्राट केलाय मी!" ;)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

17 Oct 2008 - 12:31 am | विसोबा खेचर

संगम छान आहे, चालू द्या.. :)

आपला,
(सध्या प्रचंड बिझी असलेला) तात्या.

मुक्तसुनीत's picture

17 Oct 2008 - 12:32 am | मुक्तसुनीत

ही त्रिवेणी आताच पाहिली.
च्यामारी लिखाळ गुर्जीबी लईच म्हान निगालं ! ;-)

चतुरंग's picture

17 Oct 2008 - 2:38 am | चतुरंग

कालच वाचली होती त्रिवेणी पण वाचल्यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते सुचेना म्हणून टाळत होतो.
लिखाळशेठ, मध्यंतरी तुमच्या 'भेसूर रात्र' ह्या भयकवितेत 'थरथरता मुक्तछंद' सादर केला होतात आता आपल्या काव्य प्रतिभेला असा 'लटलटणारा अंकुर' फुटलेला बघून अंमळ मौज वाटली! ;)

चतुरंग

लिखाळ's picture

17 Oct 2008 - 4:36 pm | लिखाळ

आमच्या तीनओळींना काव्यप्रतिभा वगैरे म्हणून आणि आमच्या लटलटत्या मानेला 'म्हान' वगैरे म्हणून आमची मान खरेच ताठ झाली आहे :)
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
--लिखाळ.