Skip to main content

बिघडलिये मान

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 16/10/2008 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
बिघडलिये मान तरुण मुलींसमोर लटलटते वाढलेल्या वयाला नाकाराते हिरवटपणाला कंपवात चांगली साथ देतो असाच एक त्रिवेणीचा प्रयत्न ! कसा वाटला... -- लिखाळ
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2397
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

बहुतेक spondilitis झाला असावा. पण प्रयत्न छान आहे. vrush

In reply to by बेसनलाडू

(लटलटती मान सावरत, कंपयुक्त आवाजात, पॉजेस घेत) डॉ.लागू - "कोण तो, बेला का?.....अरे चेष्टा करणं सोपं आहे रे..... जरा इथे रंगमंचावर येऊन चार वाक्य फेकून दाखवा म्हणावं! ...आता वय झालं म्हणून काय झालं...एकेकाळी नटसम्राट केलाय मी!" ;) चतुरंग

संगम छान आहे, चालू द्या.. :) आपला, (सध्या प्रचंड बिझी असलेला) तात्या.

ही त्रिवेणी आताच पाहिली. च्यामारी लिखाळ गुर्जीबी लईच म्हान निगालं ! ;-)

कालच वाचली होती त्रिवेणी पण वाचल्यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते सुचेना म्हणून टाळत होतो. लिखाळशेठ, मध्यंतरी तुमच्या 'भेसूर रात्र' ह्या भयकवितेत 'थरथरता मुक्तछंद' सादर केला होतात आता आपल्या काव्य प्रतिभेला असा 'लटलटणारा अंकुर' फुटलेला बघून अंमळ मौज वाटली! ;) चतुरंग

आमच्या तीनओळींना काव्यप्रतिभा वगैरे म्हणून आणि आमच्या लटलटत्या मानेला 'म्हान' वगैरे म्हणून आमची मान खरेच ताठ झाली आहे :) प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. --लिखाळ.