वृद्धाश्रमाबद्दल माहिती

विमल's picture
विमल in काथ्याकूट
4 Aug 2017 - 7:28 pm
गाभा: 

नमस्कार!
विषय थोडा गंभीर आहे. माझ्या ओळखीत एक वृद्ध आणि विधवा बाई आहेत. अगदी तरूणपणातच वैधव्य आल्यानंतर अत्यंत गरिबीत कष्ट करून बाईंनी मुलांना सांभाळलं, मोठं केलं. परंतु आता त्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना मुलं-सुना नीट सांभाळत नाहीत. घरातली नक्की कारणं मला माहिती नाहित पण बाईंशी अनेक दिवस कोणी एक शब्दही बोलत नाही हे मात्र खात्रीने माहिती आहे. औषधीसुद्धा आणून दिली जात नाहीत. बाई आर्थिक दृष्ट्या परावलंबी नाहीत, पुरेसं पेन्शन आहे.

बाईंची या वयात अशी स्थिती माझ्याने बघवत नाही पण त्यांना माझ्या घरी आणणंही शक्य नाही. म्हणून त्यांच्याकरता वृद्धाश्रम शोधत आहे आणि त्याकरता आपला सल्ला हवाय. अपेक्षा खालीलप्रमाणे:

- वृद्धाश्रम शक्यतो पुण्यात किंवा पुण्याजवळ हवे.
- तेथील स्वच्छता आणि सोयी टापटिप हवे. त्याकरता मासीक/वार्षीक दर असल्यास हरकत नाही.
- वातावरण मनमोकळे हवे जेणेकरून वृद्धांना आपल्या तिथे असण्याची जास्त बोचणी न वाटता त्यांचं मन रमेल.
- बाईंना एकदा हृदयरोगाचा झटका येवून गेला आहे. त्यानुशंगाने काळजी घेणारे ठिकाण हवे.

अशा वृद्धाश्रमांबद्दल माहिती असल्यास कृपया त्यांचे नाव, पत्ता आणि शक्य असल्यास फोन नंबर येथे कळवावे.

आपल्या सल्ल्याकरता आभारी आहे.

प्रतिक्रिया

रेवती's picture

4 Aug 2017 - 8:17 pm | रेवती

पुण्याजवळ खराडी गावात अण्णासाहेब बेहेरे वृद्धाश्रम आहे. सर्व सोयिंनी युक्त आहे व वृद्धश्रमाच्या बाहेरच बस स्टॉप असल्याने बसेस मिळतात.

रेवती's picture

4 Aug 2017 - 8:19 pm | रेवती

Survey no. 15/2. A/1 Chandannagar,
Kharadi, Pune 411014, Maharashtra, India.
Telephone: +91 20 27012464

विमल's picture

5 Aug 2017 - 12:39 am | विमल

धन्यवाद रेवतीताई!

जर कोणीच विचारत नाही तर पुणे काय अन पॅरिस काय सर्व सारखेच हो.
टिटवाळा स्टेशनजवळचे खडवली स्टेशन आहे तिथे ८० वृद्धांची सोय होते. दर गुरुवारी आजारींना बसने घाटकोपरच्या राजावाडी हॅास्पिटलात उपचार करून नेऊन आणतात. आश्रमाजवळच नदी, स्वामिमठ आहे. रम्य ठिकाण.

विमल's picture

5 Aug 2017 - 12:40 am | विमल

धन्यवाद कंजूसकाका!

भ ट क्या खे ड वा ला's picture

6 Aug 2017 - 12:02 pm | भ ट क्या खे ड वा ला
विमल's picture

6 Aug 2017 - 2:50 pm | विमल

धन्यवाद!

समाधान राऊत's picture

6 Aug 2017 - 8:40 pm | समाधान राऊत

मी तर म्हणेन पुण्याच्या आसपासच का ?? माहिती आहेत तेवढ्याची यादी उपलबध करावी .बहुदा गरज पडेल या काळात कुणालाही......

कंजूस's picture

7 Aug 2017 - 10:57 am | कंजूस

>>माहिती आहेत तेवढ्याची यादी उपलबध करावी >>

मिळते .
वरच्या खडवलीच्या आश्रमात चौकशीसाठी गेलो होतो ( थोड्या वर्षांपुर्वींची गोष्ट आहे ) तेव्हा तिथल्या संचालकाने सांगितलं - आमच्याकडे आता जागा नाही परंतू हे घ्या म्हणून कपाटातून फाइली काढून समोर ठेवल्या. त्यात सर्व आश्रमांचे पत्ते,फोन नं,महिना खर्च दिलेले होते!!
इतकं समाजकार्य चालतं.

पैसा's picture

7 Aug 2017 - 11:00 am | पैसा

तुमचा हेतू स्तुत्य आहे, पण वृद्धाश्रमात सोय करण्यासाठी त्या बाई किंवा त्यांचे घरचे यांची तयारी आहे का? इथे पत्ते जमा होत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे, की कोणाला गरज पडल्यास सांगता येतील. पण त्या बाईंची स्वतःची तयारी आहे का हे आधी विचारात घ्यावे लागेल.

विमल's picture

7 Aug 2017 - 1:19 pm | विमल

पैसाताई, माफी काय मागायची त्यात? तुमचा मुद्दा रास्त आहे. बाई एकदा बोलता-बोलता म्हणाल्या होत्या की त्यांना वेगळी खोली घेऊन रहावसं वाटतं पण या वयात, तेही आजारपणं असतांना ते झेपणार नाही म्हणून सहन करते.

त्यावरून मी अंदाज केला की बाईंना त्यांची सोय होईल अश्या ठिकाणी वेगळं रहायला आवडेल. त्यांच्या मनात (कदाचित टॅबूमुळे) वृद्धाश्रमाचा विचार आलाच नसावा. त्यामुळे त्यांची मर्जी जाणण्याआधी माहिती हाताशी असणं मला गरजेचं वाटलं. उगाच त्यांना वृद्धाश्रमाचा पर्याय सांगून आशा दाखवावी आणि नंतर त्या दिशेने काहीच मदत करता आली नसती तर त्यांच्या आशा पल्लवित होवून पुन्हा करपण्याची भीती होती. बाई ओळखीतल्या असल्याने आणि विषय नाजूक असल्याने सगळीकडे उघडपणे चौकशीही करता येणार नाहीये.

माझा विचार असा आहे की २-३ वृद्धाश्रमात चौकशी करून जिथे जागा असेल तिथल्या माहिती सकट बाईंना हा पर्याय सांगावा. त्यांची वृद्धाश्रमात जाण्याची ईच्छा ठाम असल्यास घरच्यांशी त्या स्वतः बोलतील किंवा मी सामोपचाराने बोलेनच.

मी आशा करते की माहिती मागताना मिपाकरांची काही दिशाभूल झाली नसावी. मला माहितीये की मी लष्कराच्या भाकर्‍या भाजतेय पण फक्त बघून गप्प बसायला मन मानत नाही.

पैसा's picture

7 Aug 2017 - 4:26 pm | पैसा

सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद! तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे, पण आपल्याकडे वृद्धाश्रम ही संकल्पना नीटशी रुजली नाही. लोक सहसा तयार होत नाहीत. मुले वगैरे असली तर दोघांनाही ते मान्य होत नाही. माझ्या जवळच्या ओळखीत एका काकूंना झेपत नाही तरी काकांच्या हट्टासाठी मुलांपासून हे काकाकाकू वेगळे राहात आहेत. त्यांची मुले आपल्याजवळ राहा असे सांगत असतानाही. हे एक टोक तर अजून एक घराचे लोक डिमेनशिया झालेल्या आजींसाठी नर्स सुद्धा ठेवायला तयार नाहीत ते इमोशनल कारणांनी की पेड नर्स नीट देखभाल करणार नाहीत. अर्थात सगळा कामाचा भार सुनांनी उचलावा ही अपेक्षा दोन्ही मुलांची. असे बरेच नमुने असतात पण वृद्धाश्रमाचा कोणी विचार करू धजत नाहीत त्याचे कारण लोक काय म्हणतील हा विचार केला जातो, मग त्यामुळे कितीही जणांना त्रास का होईना.

विमल's picture

8 Aug 2017 - 3:43 pm | विमल

मल व्यक्तिशः वृद्धाश्रम ही संकल्पना अजिबात वाईट वाटत नाही, किंबहुना उत्तमच वाटते. वृद्धाश्रमाला असलेला सामाजिक कलंक दूर झाला तर उलट जास्त संख्येने आणि संरचित सोयी असलेले वृद्धाश्रम बनतील आणि त्यात अनेक जेष्ठ नागरिकांना आरामात आयुष्य व्यतित करता येईल.

उगाच वयाला झेपत नसूनही एकटे राहणे किंवा तरूण पिढीला वाटणारा नकोसेपणा सहन करणे यापेक्षा समवयस्क लोकांत राहून आला दिवस आनंदात घालवणे कधीही चांगले, हे माझे मत!

अगदी सहमत आहे. मी वय झाल्यावर वृद्धश्रमात रहायला जाणार हे अगदी विशीत असतानाच ठरवले आहे व मत बदलावेसे वाटले नाही. माझ्या आजेसासूबाई (सासर्‍यांच्या काकू) नव्व्दीत आहेत. वृद्धाश्रमात राहतात व समाधानी आहे. उलट आम्ही सारखं भेटायला गेलेलं त्यांना आवडत नाही. थोडीफार आजारपणे आली तरी तेथील स्टाफकडून काळजी घेतली जाते. घरचेच सारखे फोन करतात की येऊ का न्यायला पण या जात नाहीत. त्यांची कारणे स्पष्ट आहेत. आपला संसार करून व मुलांचे धावपळीचे संसार पाहून कंटाळा आलाय. आजेसासरे व त्यांचा एक मुलगा यांच्या जाण्याने आजेसासूबाईंना सन्यस्त जीवन जगावेसे वाटते व ते रुटीन इतरांसाठी अडचणीचे ठरू शकते.

आई वडील म्हातारपणी सांभाळणे हे कर्तव्यच आहे नाहीतर कशाला हवीत मुल.
पण ही गोष्ट पण खरी आहे आईवडील सांभाळ ने नाही पण property var हक्क सांगायला हे नालायक हजार आसतात . कायद्यांनी च आशा नालायक मुलांचे अधिकार पुर्णत नाकारले पाहिजेत .म्हणजे aikdya करोडपती chya मुलाला 50000 हजारा पासून प्रॉपर्टी जमा करावी लागेल .

कंजूस's picture

7 Aug 2017 - 12:14 pm | कंजूस

हे आहेच.

शेखर's picture

7 Aug 2017 - 5:02 pm | शेखर

निवारा, पुणे हा एक चांगला पर्याय आहे.

अधिक माहिति साठी http://www.niwaraoldagehome.org/ भेट द्या.

विमल's picture

8 Aug 2017 - 3:36 pm | विमल

धन्यवाद शेखर!

समीर वैद्य's picture

8 Aug 2017 - 11:19 pm | समीर वैद्य

1/16, Vitthal Rd, Hingne Budrukh, Karve Nagar, Pune, Maharashtra 411052
020 2541 2375

समीर वैद्य's picture

8 Aug 2017 - 11:20 pm | समीर वैद्य

सिंहगड रोड कडून राजाराम पुलाकडे वळल्यावर लगेच समोर आहे.

विमल's picture

10 Aug 2017 - 3:54 pm | विमल

धन्यवाद समीर!

१)"आपल्याकडे वृद्धाश्रम ही संकल्पना नीटशी रुजली नाही. "
२)"वय झाल्यावर वृद्धश्रमात रहायला जाणार "
-
इतकं सोप्प नाही.
शेवटी वृद्धाश्रम चालवणे हासुद्धा धंधा झालेला आहे. त्यांचेही बरेच प्रश्न आहेत. आर्थिक संकटे येतात. ९५-९८% आश्रम सुदृढ उठबस करणाय्रांनाच ठेवायला तयार असतात. फार आजारी झाल्यावर नातेवाइकांना घेऊन जायला सांगतात. आपसापात भांडतात म्हातारे

रेवती's picture

9 Aug 2017 - 9:52 pm | रेवती

कंकाका,
आपापसात तर आपणही इथे भांडतो (म्हणजे काहीतरी वाद घालतो). जिथे कुटुंब असतं तिथे हे सगळं मर्यादेत चालत असतं. आपल्या लिमिटेशन्स ओळ्खून राहिल्यास प्रश्न कमी होतील. सगळे कधीच सुटणार नसतात. जसे, दिवसभर घरातली, बाहेरची, हापिसातली कामे केल्यावरही किती गोष्टी करायच्या उरलेल्या असतात म्हणून आपण जेवण झोप सोडून देतो का? रोजचे मूडस, दुखणं खुपणं कोणालाही चुकलेलं नाही. त्यांचा बाऊ करणं वयाबरोबर कमी होत जायला हवं. आपल्या समाजात नवरे लोक्स घर चालवण्यात फारसा हातभार लावत नाहीत तर बायका बाहेरची कामे करण्यास कचरतात (आताच्या पिढीत तसे नसावे). म्हातारपणी बायको पुढे निघून गेली तर नवरे लोकांना घरात जाऊ दे, वृद्धाश्रमातही मनास काही येत नाही. मग वैताग येतो.

वृद्धाश्रम हा धंदा असेल तर असू दे! जोवर सगळे वेळच्यावेळी होतेय तोवर ज्यांना पैसे मिळवायचेत ते लोक पडद्यामागून मिळवून घेणारचेत. माझ्या आजेसाबांना विचारले की "प्रत्येक खोलीत दोनजण रहात असताना तुमच्या खोलीत तुम्ही एकट्याच कश्या?" त्यावर त्यांनी सांगितले की पतीच्या व मुलाच्या जाण्याने त्यांचा स्वभाव चिडचिडा झालाय. दुसर्‍या माणसाने कितीही बरी वागणुक दिली तरी त्यांना ते पटत नाही. मग त्याचा आपल्याला व आपला त्या माणसाला त्रास होणार. त्यापेक्षा त्या जागेचे संपूर्ण भाडे भरून राहतात. आपल्या स्वभावातील बदलता व न बदलता येणारे काय आहे हे आपल्याशी पक्के केल्यास अडचणी कमी येतील. ज्या मनुष्याला सगळ्या खोलीचे भाडे देणे परवडत नसेल त्याने आपली आर्थिक मर्यादा समजून अ‍ॅडजस्ट करावे. आता मी जर म्हातारपणी वृद्धाश्रमात जाण्याचे ठरवलेय तर काय काय सवयी असल्या पाहिजेत किंवा असायला नकोत याचा विचार काहीसा करून ठेवलाय पण वाढत्या वयाबरोबर तो आणखी वेगळा असणार आहे याची कल्पना आहे.

आजेसाबांना त्यांनी मनाची तयारी कशी केली हेही विचारले तर त्या म्हणाल्या की त्यांचे पती हयात असताना दोघेही हा विचार करायचे व वेगवेगळ्या आश्रमात जाऊन यायचे. बरीच वर्षे त्यांनी आपल्या व मुलांच्या मनाची तयारी केली. सर्व जवळच्या नातेवाईक मंडळींमध्ये स्पष्तीकरण दिले म्हणजे इतरांनी आपल्या मुलांवर बेजबाबदारपणाचा शिक्का मारायला नको. नंतर माझे आजेसाबू आश्रमात जाण्याआधीच गेले पण यांनी निर्णय बदलला नाही. वयाच्या नव्वदित त्या जरा वाकल्या आहेत पण आपला व्यायाम, आहाराच्या चांगल्या सवयी अजिबात सोडल्या नाहीयेत. तब्येत त्यामुळे बरीच चांगली आहे. यशिवाय एक गोष्ट आवडली ती अशी की, त्या आम्हाला सगळा आश्रम आपणाहोऊन दाखवला. इथे जेवणाची व्यवस्था, इथे गच्ची, तिकडे लायब्ररी, टीव्ही रूम वगैरे. सगळे पर्फेक्ट नव्हते तर त्यांनी आम्हाला दाखवताना गच्चीवरून सुर्यास्त चांगला दिसतो (मला मध्ये मध्ये येणार्‍या केबल्स दिसत होत्या), मागील बाजूने नदी वाहते ते वळण चांगले आहे (मला ती गटारगंगा दिसत होती), वाचायला कितीतरी अध्यात्मिक पुस्तके आहेत वगैरे (मला तेथील पडद्यांचा रंग अतिषय उदास वाटला). शेवटी तुम्हाला काय पहायचे आहे? काकूआज्जींनी मला त्यांच्याकडील सेलफोन दाखवला. तो काही फार फॅन्सी नव्हता. "अगं हा शोध लागेल असं मला कधी वाटलंही नव्हतं पण माझ्या हयातीत हे यंत्र वापरायला मिळालं ही गंमत आहे की नाही?"

या काकूआज्जी व माझ्या सासूबाईंची मोठी बहिण, मावशी या दोघीही वयाने जास्त असूनही टापटिपिनं, नेटकेपणानं राहताना पाहणे आशादायक आहे. या पिढीनं अगदी काटकसरीनं संसार केलेत, जोडीदार पुढे निघून गेल्यावर आणि मोठाली आजारपणे पार पाडल्यावरही सकारात्मक दृष्टी सोडली नाही. हे किती चांगलं आहे.

प्रतिसाद आवडला व पटला ही.

विशुमित's picture

9 Aug 2017 - 11:31 pm | विशुमित

रेवाक्का ...

का कोणास ठाऊक तुमचा हा प्रतिसाद वाचत असताना जीवनाबद्दल एक अनामिक भीती वाटली..

छान लिहलंय ..!!

मृत्युन्जय's picture

2 Jan 2019 - 11:03 pm | मृत्युन्जय

खरंय. आपल्यासारख्या माणसाला आयुष्याची अखेर सोसावेल काय आणि निभावुन नेता येइल काय ही शंका मनाला चाटुन गेली. शिवाय म्हातारपणातल्या तडजोडी, मानापमान नाही सोसवणार मला. आयुष्याची अखेर मध्यातच झालेली बरी.

अभिजीत अवलिया's picture

10 Aug 2017 - 9:52 am | अभिजीत अवलिया

उत्तम प्रतिसाद. त्यामुळेच कोणताही संयमाची परीक्षा बघणारा आजार न होता हसतखेळत मृत्यू यावा अशी मनातून खूप इच्छा आहे.

स्मिता.'s picture

10 Aug 2017 - 3:50 pm | स्मिता.

माझंही असंच मत आहे. उतारवयात आपल्या क्षमता बघून योग्य तो व्यावहारीक निर्णय घेणे कधीही योग्य. तसंच वृद्धाश्रम धंदा झाला तर उत्तमच आहे. एकूण सगळ्यात गोष्टीत व्यावसायीकता येईल.

मात्र एक मुद्दा विचार करण्यासारखा वाटतो तो असा की जर बहुतेक वृद्धाश्रम हात-पाय चालत असणार्‍याच वृद्धांना ठेवत असतील आणि वृद्धांनी बिछाना पकडला की त्यांना परत न्यायला सांगत असतील तर ते अवघड आहे.
आता मूळ चर्चेतल्या बाईंचंच उदाहरण घेतलं तर त्या बाईंना आताच कोणी विचारत नाही. वर त्या मुलांना सांगून वृद्धाश्रमात गेल्या आणि काही महिन्यांनी त्यांनी बिछाना पकडल्यावर वृद्धाश्रमाने परत जायला सांगितले तर कुठे जातील त्या? जरी मुलांनी नेलं तरी घरातली मानसीक अवस्था आतापेक्षाही वाईट होईल.
एकदा प्रवेश घेतला की मृत्यू येत नाही तोपर्यंत सगळ्या प्रकारच्या सोयी/सेवा पुरवणारे वृद्धाश्रम नाहीत का?

अत्रे's picture

10 Aug 2017 - 6:54 am | अत्रे

वृद्धाश्रम / आडमुठ्या वयस्कर लोकांचे जीवन या विषयावर इंग्रजीत एक फार सुंदर पुस्तक/ ग्राफिक नॉवेल आहे. लेखिकेने स्वत:च्या अनुभवातून हे पुस्तक लिहिले आहे.

Can't we talk about something more pleasant?
ss

https://www.theguardian.com/books/2016/nov/23/cant-we-talk-about-somethi...

चौथा कोनाडा's picture

2 Jan 2019 - 10:45 pm | चौथा कोनाडा

पुस्तकाची सुन्दर ओळख करून दिलेली आहे.

धन्यवाद, अत्रे !

रेवती, प्रतिसाद पटला तरी तो वळत नाही सर्वांचा हे आम्ही जवळच्या तीनचार नातेवाइक,ओळखीचे यांचे अनुभव,एकासाठी वृद्धाश्रम शोधताना सहासात संचालकांची मते ऐकून वेगळी बाजू लक्षात आली.

विमल's picture

10 Aug 2017 - 4:01 pm | विमल

वृद्धाश्रमांची माहिती देणार्‍या तसेच त्याबाबतीत आपले विचार व्यक्त करणार्‍या सर्व सदस्यांचे मनापासून आभार! माहिती सोबत तुमची मतं लिहिल्याने माझ्याही विचारांना चालना मिळाली. कंजूसकाकांच्या प्रतिसादावरून वाटतंय की वृद्धाश्रमात जाणं आणि कायम तिथे राहणं हे वाटतं तेवढं सोपं नाहीये.

कदाचित जे आता वयस्कर किंवा वृद्ध आहेत त्यांच्या पिढीला वृद्धाश्रम म्हणजे आयुष्याचं अपयश अशी भावना असावी. ती काही त्यांची चूक नाही, समाजाचेच ते संस्कार! परंतु तरूण पिढी मात्र काळाबरोबर वृद्धाश्रमात राहण्याकरता स्वतःची मानसीक तयारी करत असावी असं वाटतं. अर्थात तरूण वयातले विचार उतारवयातही तसेच राहतील याची काही शाश्वती नाही.

वृध्द लोकांचं संगोपन करणे आणि त्यांची काळजी घेणे हे
नवीन पिढीला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे .
त्या साठी ऐक नवीन कल्पना सुचवावे आस वाटत.
आपल्या देशात बेकारी खूप आहे त्यामुळे ह्या कामाला मनुष्यबळ उपलब्ध आहे .पहिल्या प्रथम वारसा हक्क म्हणजे वंश परंपरेने property var मिळणाऱ्या कायद्यात अमुलाग्र बदल केला पाहिजे.
मुलांचं शिक्षण पूर्ण झाले की आईवडिलांच्या कोणत्याच संपत्तीवर मुलांचं बिलकुल अधिकार राहणार नाही .तरुण मुलांनी जे बेकारी नी pareshan आहेत मग ते कोंत देशातील असतील त्यांनी वृध्द व्यकी चा मरेपर्यंत सांभाळ केला तर पूर्ण मालमत्ता त्या व्यक्तीच्या नावावर होईल मग ती property हजारो करोड रुपयाची आसली तर .

तुम्ही नक्की काय 'नवीन' कल्पना सुचवत आहात कळले नाही.मला जेवढे माहित आहे त्यानुसार

१. स्वार्जित प्रॉपर्टी असेल तर मृत्युपत्र करून ती कोणाच्याही नावावर करता येते. बायको, मुलगा, मुलगी इ कोणीही त्यात हक्क म्हणून वाटा मागू शकत नाही.

२. वडिलोपार्जित जमीन असेल तर मात्र त्यात साऱ्या कुटुंबाचा हक्काने वाटा असतो. त्यातून कोणाला बेदखल करता येत नाही.

स्वार्जित प्रॉपर्टी म्हणजे व्यक्तीने स्वकमाईतून घेतलेली जमीन, घर इ.

वडिलोपार्जित म्हणजे मागच्या ३ (कि ४?) पिढ्या ie जवळपास १०० वर्ष, कोणत्याही वाटण्या न होता, एकत्र कुटुंबात पासऑन होत आलेली जमीन, घर, व्यवसाय, दागिने, आर्ट इ

सुबोध खरे's picture

3 Jan 2019 - 9:45 am | सुबोध खरे

.तरुण मुलांनी जे बेकारी नी pareshan आहेत मग ते कोंत देशातील असतील त्यांनी वृध्द व्यकी चा मरेपर्यंत सांभाळ केला तर पूर्ण मालमत्ता त्या व्यक्तीच्या नावावर होईल
@Rajesh188
एक तर आपले कायद्याचे ज्ञान अपुरे आहे आणि त्यातून हा भोळा स्वप्नवाद आहे.
जर बापाचे कर्ज मुलाला फेडायला लागते तर बापाची मालमत्ता मुलाला जाईल हा नैसर्गिक न्याय आहे.
बेकार तरुणांनी पैसे घेऊन(पगारावर) वृद्ध व्यक्तींचा सांभाळ करावा. पण असे काम कुणालाही करायला नको आहे. (अशी माणसे मिळत नाहीत हि वस्तुस्थिती)

आणि हे बेकार तरुण केवळ संपत्तीच्या लोभाने वरवर काळजी घेत आहेत असे दाखवतील.मुळात मुले काळजी घेत नाहीत हे ठरवायचे कुणी आणि कसे. बर हे बेकार तरुण खरंच काळजी घेतात याची शहानिशा कुणी करायची?सरकारने? म्हणजे साटेलोटे करून वृद्ध माणसांची संपत्ती हडप करायचा तो राजमार्गच होईल.
मग रोगापेक्षा उपाय भयंकर असेच होईल.

केवळ आजकालचे तरुण आईबापांची काळजी घेत नाहीत हे म्हणणे अत्यंत एकांगी आहे.
अनाथालयातीळ मुलांची वाढणारी संख्या काय दर्शवते? हि मुले पालन पोषण करायला असमर्थ असणाऱ्या किंवा नालायक आईबापांनी जन्माला घातली आहेत. याचा अर्थ केवळ असंख्य मुलंच नालायक आहेत असे नव्हे तर असंख्य आईबापही नालायक आहेत.

राहिला प्रश्न मालमत्तेचा. स्वकष्टार्जित किंवा वडिलोपार्जीत मालमत्तेबद्दल कायदा करणारे सरकार कोण? मालमत्ता करणे हा एक अत्यंत नैसर्गिक आणि मूलभूत हक्क आहे आणि लोकशाहीत असा कायदा न्यायाच्या नैसर्गिक तत्वाच्या विरुद्ध आहे. तेंव्हा हा कायदा होणे नाही.

कोकणतल्या गावांत ही प्रथा आहे. जो नातेवाइक संभाळेल त्यास मिळते जमिन.

ह्या आजींचे पुढे काय झाले?

विमल's picture

4 Jan 2019 - 5:07 am | विमल

यशोधराताई, तुमचा काळजीयुक्त प्रश्न पाहून बरं वाटलं. तुमच्यासारख्याच बर्याच मिपाकरांना हा प्रश्न पडला असावा.

तर झालं असं की आजीबाईंना वृद्धाश्रमाचा पर्याय सुचवण्याआधी त्यासाठीची प्राथमिक माहिती येथून जमा करून मी आजीबाईंना सुचवले. पण त्यांना ते काही फारसे पटले नाही आणि त्यांनी नकार दिला.

आजही त्या काही महिने एका मुलाकडे तर काही महिने दुसर्याकडे अश्या दुर्लक्षित आयुष्य ढकलत आहेत. वृद्धाश्रमाचा पर्याय असूनही जर त्यांना असेच अपमानास्पद जगणे श्रेयस्कर वाटत असले तर मी तरी काय करणार? तो त्यांच्या घरातला कौटुंबिक प्रश्न असल्याने माझ्या प्रयत्नांना मर्यादा आहेत.

तरी वर प्रतिसाद देणार्या सर्वांचे खूप आभार! कोणालातरी या धाग्यातल्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल.