भेट

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
31 Jan 2017 - 11:49 am

आज अशी ती भेटली
श्रावणी ओढ मुकी झाली

ममं ह्रदयी वैफल्य जळे
कुणा सौभाग्याची तू ना कळे

ती जुनी वाट पुन्हा थरथरे
पाहूनी दोन हळवे चेहरे

व्याकूळ दिस तसाच ढळतो
उदास रातीचा स्वर असाच सलतो

काळजाच्या शिवारात भिजते एक लहर
मुक्या पानांतूनी जागा ओला प्रहर

मंद हुंदक्यातूनी हाक आली
का अशी तू दूरस्थ गेली

जा सौख्याने आल्या पाऊली
युगायुगांची ही कथा अर्धीच राहीली.

करुणकविता