ती सध्या काय करते
माहिती नाही
पण भेटते अधून मधून....
कधी शहारते चिंब पावसात
कधी वेढते रेशमी धुक्यात
कधी लुकलुकते चांदणरातीत
तर कधी भेटते मला....
मदहोश धुंद निशिगंधात...........
ती सध्या काय करते
माहिती नाही
पण भेटते अधून मधून....
कधी त्याच जुन्या वळणांवर
कधी तिच्या ओळखीच्या खुणांवर
कधी गुलाबी सांजवेळी
तर कधी भेटते मला....
दूर एकएकट्या क्षितिजावर ............
ती सध्या काय करते
माहिती नाही
पण भेटते अधून मधून....
कधी कुणाच्या चुकार बटांत
कधी कुणाच्या खोट्या रुसव्यात
कधी कुणाच्या गालावरल्या खळीत
तर कधी भेटते मला....
कुणाच्या खळाळत्या हसण्यात............
ती सध्या काय करते
माहिती नाही
पण भेटते अधून मधून
कधी जागते रात्री कवेत
कधी उरते साऱ्या हवेत
कधी अडते पापण्यांच्या किनारी
तर कधी भेटते माझी मला....
तिच्याच "अपुर्ण" कवितेत............
प्रतिक्रिया
26 Jan 2017 - 8:30 pm | शार्दुल_हातोळकर
कविता आवडली !
27 Jan 2017 - 9:52 am | Pradip kale
मस्त.
थोडावेळ तरी मला संदिप खरेंची कवीता वाचतोय असच वाटलं.
27 Jan 2017 - 9:52 am | Pradip kale
मस्त.
थोडावेळ तरी मला संदिप खरेंची कवीता वाचतोय असच वाटलं.
27 Jan 2017 - 4:14 pm | कवि मानव
मला हा एक अंतर खूप आवडला !!
कधी जागते रात्री कवेत
कधी उरते साऱ्या हवेत
कधी अडते पापण्यांच्या किनारी
तर कधी भेटते माझी मला....
तिच्याच "अपुर्ण" कवितेत............
28 Jan 2017 - 11:31 pm | ज्योति अळवणी
मस्त. खूप आवडली कविता
29 Jan 2017 - 5:48 pm | dhananjay.khadilkar
छान
29 Jan 2017 - 5:48 pm | dhananjay.khadilkar
छान
29 Jan 2017 - 6:12 pm | पैसा
कविता आवडली!
31 Jan 2017 - 4:49 am | रुपी
सुंदर कविता.. आवडली..
कधी कुणाच्या चुकार बटांत >> हे खूपच आवडलं!
3 Feb 2017 - 6:42 pm | एक एकटा एकटाच
सगळ्यांचे मनपुर्वक आभार!!!