Skip to main content

ती सध्या काय करते....

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 26/01/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
ती सध्या काय करते माहिती नाही पण भेटते अधून मधून.... कधी शहारते चिंब पावसात कधी वेढते रेशमी धुक्यात कधी लुकलुकते चांदणरातीत तर कधी भेटते मला.... मदहोश धुंद निशिगंधात........... ती सध्या काय करते माहिती नाही पण भेटते अधून मधून.... कधी त्याच जुन्या वळणांवर कधी तिच्या ओळखीच्या खुणांवर कधी गुलाबी सांजवेळी तर कधी भेटते मला.... दूर एकएकट्या क्षितिजावर ............ ती सध्या काय करते माहिती नाही पण भेटते अधून मधून.... कधी कुणाच्या चुकार बटांत कधी कुणाच्या खोट्या रुसव्यात कधी कुणाच्या गालावरल्या खळीत तर कधी भेटते मला.... कुणाच्या खळाळत्या हसण्यात............ ती सध्या काय करते माहिती नाही पण भेटते अधून मधून कधी जागते रात्री कवेत कधी उरते साऱ्या हवेत कधी अडते पापण्यांच्या किनारी तर कधी भेटते माझी मला.... तिच्याच "अपुर्ण" कवितेत............
लेखनविषय:

वाचने 1934
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कविता आवडली !

मस्त. थोडावेळ तरी मला संदिप खरेंची कवीता वाचतोय असच वाटलं.

मस्त. थोडावेळ तरी मला संदिप खरेंची कवीता वाचतोय असच वाटलं.

मला हा एक अंतर खूप आवडला !! कधी जागते रात्री कवेत कधी उरते साऱ्या हवेत कधी अडते पापण्यांच्या किनारी तर कधी भेटते माझी मला.... तिच्याच "अपुर्ण" कवितेत............

कविता आवडली!

सगळ्यांचे मनपुर्वक आभार!!!