लांब केस ठेवावेत कि सरळ टक्कल करुन टाकावे???

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
25 Jan 2017 - 8:42 pm
गाभा: 

टक्कल पडायला लागणे हे कोणत्याही पुरुषाला इन्फेरीओरीटी कॉम्प्लेक्स द्यायला पुरेसे असते.
थांबा ! थांबा ! मला टक्कल पडत नाहीए.सध्या मी सहा इंच लांब केस बाळगले आहेत,केस भरपुर आहेत ,पण प्रॉब्लेम असा आहे की केस खुप पातळ आहेत व लांब ठेवल्याने गळत आहेत.कंगव्यात,उशीवर,टॉवेलवर जिथेतिथे हे पातळ केस दिसू लागल्याने मी सध्या चिंताग्रस्त आहे.लांब केस बाळगणे मला अडचणीचे ठरु लागले आहेत.तसा मला लांब केसांचा लुक आवडतो,अगदी lion's mane टाईप.पण उपरोक्त कारणामुळे ते आता अडचणीचे ठरु लागलेत.मला मेडीयम लेंथ हेअरकट आवडत नाहीत,एकतर लांब ठेवायचे नाहीतर सरळ चकोटी.मला आता क्लीन शेवन हेड लुक हवाहवासा वाटू लागला आहे.मस्त तुळतुळीत डोके व त्यावर फ्रेंच कट दाढी ठेऊन जरा मॅच्युर व कॉन्फीडंट लुक ठेवायचा विचार करतोय.माझे काही प्रश्न.
१.तुमचे केस तुम्ही कीती लांब ठेवता?
२.लांब केस पातळ असतील तर गळतात,यावर तुम्ही काय उपाय करता?
३.तुळतुळीत टक्कल ठेवायचे असेल तर दर दोन दिवसांनी भादरत बसायला लागते,यावर खरचं काही इलाज आहे का ? इलेक्ट्रीक रेझर वगैरे?
४. बायकांना प्रश्न----- तुम्हाला तुळतुळीत टक्कल ठेवलेले पुरुष आवडतात का? की बिग नो असते त्यासाठी?

प्रतिक्रिया

दा विन्ची's picture

25 Jan 2017 - 9:59 pm | दा विन्ची

टफी, तुमचा सध्याचा एक फोटु लावा हित , मग त्यावर आम्ही वेगवेगळी कलाकुसर करून बघतो. मग ठरवू .

खेडूत's picture

25 Jan 2017 - 10:34 pm | खेडूत

साधारण असं बघा...
m

प्रतिमा जालावरून साभार.

टफी साहेब, तुम्ही तुमच्या खूप वयक्तीक गोष्टींवर धागे काढताहात. यासाठी सेलीब्रेटी असावे लागते. तुम्ही सेलीब्रेटी आहात असे तुम्हाला वाटत असेल तर.....
बाकी तुम्ही तुमच्या वयक्तीक आयुष्यात तुमच्या शरीराच्या कोणत्या अवयवाचे काय करावे, काय करु नये यासाठी मिपासारखा फोरम वापरु नये.

श्रीगुरुजी's picture

25 Jan 2017 - 10:50 pm | श्रीगुरुजी

सरळ मधोमध भांग पाडा. एका बाजूला लांबलचक केस वाढवा आणि दुसऱ्या अर्ध्या भागाचे टक्कल करा.

संजय क्षीरसागर's picture

26 Jan 2017 - 2:36 am | संजय क्षीरसागर

हेअर प्लांटेशन करुन घ्या. मस्त खर्च होईल.

केस टिकले तर तुम्हाला हवे तसे लाँग हेअर दिसतील नाही तर कॅरम बोर्ड होईल.

सो आयदर वे, प्रश्न सुटेल !

एकवेळ टक्कल परवडले पण केस वाढवू नका. आज मुलगी समजत होते तो पुरुष होता हे समजायला बराचवेळ गेला. बरं, केस वाढवले ते वाढवले, ते रंगवले. रंगवले तरी एकवेळ ठीक पण मुंडकं खाली घालून बसला होता. थोड्यावेळाने वर बघितले तेंव्हा त्याच्या मिश्या दिसल्या व ही आत्याबाई नसून काका असल्याचं समजलं.
बाकी, तुमच्या प्रश्नांना उत्तरे काय द्यायची ही नेहमीचा प्रश्न आहे. कोणी आहे का भेंड्या खेळायला...........सॉरी, चिरून द्यायला?

फेदरवेट साहेब's picture

26 Jan 2017 - 12:45 pm | फेदरवेट साहेब

एकदाची डोई बोडून मिपाच्या नावे अंघोळ करून टाकावी असा सल्ला द्यायचा मोह आवरतोय. कारण डोई बोडणे न बोडणे तुमचा वैयक्तिक निर्णय आहे अन तुमच्यासाठी मिसळपाव दिवंगत करणे संपादक मालकांच्या हाती आहे. आपला कश्यावरच जोर नाही, त्यामुळे मिपा मिपा रमवानू बिअर पिवानू मज्जानी लाईफ.

संपादक- (अंमळ ब्रिटिश भोचकपणा करून सांगतोय) असले धागे कायम ठेवल्यामुळे इथल्या संपादक मंडळाबद्दल 'आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय' असा समज सामान्य सभासदांचा झाला तर वाईट वाटून न घेणे.

ए फेदरबेड शायेब, तुज्या याक्षेन्ट शाला एकदम पुनेकर माफिक झ्याला!!

वाढतील तेवढे वाढवा आणि मग खोपा घाला. त्यावर अबोलीचा गजरा हवा असेल तर मी गुंफून देईन.

धर्मराजमुटके's picture

27 Jan 2017 - 6:17 pm | धर्मराजमुटके

तुमच्या प्रशांची उत्तरे :
१.तुमचे केस तुम्ही कीती लांब ठेवता? -
उत्तर : महिन्यातुन एकदा कापून घेतो तो रेफरन्स पाईंट पकडायचा का ? खरे म्हणजे केसांची लांबी मोजण्यासाठी इंजपट्टी आणि जाडी मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलीपर घ्यायचे आहे. स्वस्तात कोठे मिळेल ?

२.लांब केस पातळ असतील तर गळतात,यावर तुम्ही काय उपाय करता?
उत्तर : गळालेले केस अंगावरुन झटकून टाकतो.

३.तुळतुळीत टक्कल ठेवायचे असेल तर दर दोन दिवसांनी भादरत बसायला लागते,यावर खरचं काही इलाज आहे का ? इलेक्ट्रीक रेझर वगैरे?
उत्तर : वर्षा ६ महिन्यांतुन १-२ वेळा मुड लागला की किंवा केस रंगवायचा कंटाळा आला की टक्कल करतो. दर दोन दिवसांनी भादरत नाही. केसांना मुक्तपणे वाढण्यासाठी वाव देतो.

४. बायकांना प्रश्न----- तुम्हाला तुळतुळीत टक्कल ठेवलेले पुरुष आवडतात का? की बिग नो असते त्यासाठी?
उत्तर : बाई नसल्यामुळे उत्तर देणे अवघड आहे. पण एक पुरुष म्हणून विचार केला की मला टक्कल ठेवलेले / असलेले पुरुष आवडतात. ह्या साल्यांना केस विंचरायला नकोत, तेल लावायला नको, शांपु लावायला नको, कंडीशनर लावायला नको, केस सफेद झाले की पैसे आणि वेळ घालवून काळे करायला नको हे सगळे फायदे डोळ्यासमोर तरळून जातात आणि त्यांचा हेवा वाटतो. मी टक्कल केल्यावर माझ्या बायकोचा माझ्याबरोबरच्या वागण्यात फरक पडलेला जाणवत नाही. (कदाचित माझी निरिक्षण शक्ती कमजोर असु शकेल. इतर बायका तर असेही भाऊ/ काका /अंकल म्हणायला लागल्यामुळे केस असले काय नि नसले काय, काय फरक पडतो ?

असो. आत्ता तुम्हाला सल्ला :
सध्या लांबच आहेत तर लांबच ठेवा. नंतर आपोआप टक्कल पडेलच. जास्त पुरुषार्थ करण्यात अर्थ नाही. ठेवीले अनंते तैसेची राहावे.

माझ्या प्रतिसादाची लांबी तुमच्या केसांपेक्षा जास्त झाली असेल तर उदार मनाने क्षमा करा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Jan 2017 - 11:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खरे म्हणजे केसांची लांबी मोजण्यासाठी इंजपट्टी आणि जाडी मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलीपर घ्यायचे आहे. स्वस्तात कोठे मिळेल ?

व्हर्निअर पेक्षा मायक्रोमीटर घ्या. अजुन अचुक मोजमाप घेता येईल बघा.

वर्षा ६ महिन्यांतुन १-२ वेळा मुड लागला की किंवा केस रंगवायचा कंटाळा आला की टक्कल करतो. दर दोन दिवसांनी भादरत नाही. केसांना मुक्तपणे वाढण्यासाठी वाव देतो.

छ्या...फारचं पुरातन काळात जगता राव तुम्ही. कसं मस्तं डोक्यावर दोन चमचे पेट्रोल ओतुन काडी लावायची. किमान ४ महिने पहायची गरज नाही.

वॉव ! काय जबराट आयडीया दिलीत राव ! नेक्स्ट टाईम करुन बघतो. पण पेट्रोल ऐवजी डिझेल वापरले तर चालेल काय ? पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे आणि अ‍ॅव्हरेज पण जास्त मिळेल म्हणून विचारतो. की प्रदुषण वाढविण्याच्या आरोपाखाली मला दंड होईल ?

अनन्त अवधुत's picture

28 Jan 2017 - 2:18 pm | अनन्त अवधुत
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2017 - 10:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठल्या भागात राहाता भारताच्या त्यावर अवलंबुन आहे. दिल्ली वगैरे मधे राहात असाल तर सी.एन.जी. वापरा. बाकी डिझेल मधे कार्बन जास्ती, त्यामुळे अंमळ काळं व्हायची शक्यता जास्तं. =))!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2017 - 1:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

कसं मस्तं डोक्यावर दोन चमचे पेट्रोल ओतुन काडी लावायची. किमान ४ महिने पहायची गरज नाही.

बरोबर आहे. असं केलं की पुढचे चार महिने डोक्याचं जे काय करायचंय ते डॉक्टरलाच करावे लागेल ;) =)) =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2017 - 10:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

अद्द्या's picture

30 Jan 2017 - 12:40 pm | अद्द्या

मस्तं डोक्यावर दोन चमचे पेट्रोल ओतुन काडी लावायची. किमान ४ महिने पहायची गरज नाही

हि रेसिपी अंडं घालून करता येईल काय

चालतात असे धागे काढलेले ?
जाम भारी टाईमपास आहे!

आंतर्ज्वलन आवेशित विचारवंत, तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे सुयोग्य उत्तर मिळाले का? मिळाले असेल तर आता मिपाकरांना आनंद साजरा करू द्या.

आदूबाळ's picture

28 Jan 2017 - 3:11 pm | आदूबाळ

(मिथुनदा आवाज सुरू)

जल रहा हूँ, जलता आया हूँ अंदर से. सोचता रहता हूँ मैं ही क्यू? ऐसा क्या है मुझ में की ऐसे जलने की किस्मत पायी है? इसीलीये दुनिया मुझे कहती है आंतर्ज्वलन आवेशित विचारवंत...

(मिथुनदा आवाज समाप्त)

पैसा's picture

28 Jan 2017 - 3:37 pm | पैसा

=)) =))
मिथुनदाचा एक गोलमाली ड्वायलॉक आठवला. "जिनके घर शीशे के होते है, वो बेसमेंट में कपडे बदलते है!"

अजया's picture

28 Jan 2017 - 2:19 pm | अजया

प्रश्न ४.चे उत्तर- नहीं कभी नहीं!

इरसाल कार्टं's picture

28 Jan 2017 - 5:08 pm | इरसाल कार्टं

आंतर्ज्वलन आवेशित विचारवंत

लोळालोळ

गामा पैलवान's picture

28 Jan 2017 - 5:50 pm | गामा पैलवान

टफि,

तुम्ही अगदी प्रथमग्रासे मक्षिकापात केलात. हे विधान साफ नामंजूर :

टक्कल पडायला लागणे हे कोणत्याही पुरुषाला इन्फेरीओरीटी कॉम्प्लेक्स द्यायला पुरेसे असते.

मी टकल्या असूनही मी माझं टक्कल ते मोठ्या अभिमानाने मिरवतो. तुम्ही कशाला केशगळीचा न्यूनगंड येऊन बसला आहात फुकटचा? स्वत:ला चित्रपटातला नट समजणं सोडून द्या. सगळं ठीक होईल.

आ.न.,
-गा.पै.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 Jan 2017 - 10:27 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
गामा,मी स्वतःला कुणी हिरो वगैरे समजत नाही.फक्त सध्या काय ट्रेन्डींग आहे ते जाणून घ्यायला धागा काढला आहे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 Jan 2017 - 10:27 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
गामा,मी स्वतःला कुणी हिरो वगैरे समजत नाही.फक्त सध्या काय ट्रेन्डींग आहे ते जाणून घ्यायला धागा काढला आहे.

सामान्यनागरिक's picture

29 Jan 2017 - 7:21 am | सामान्यनागरिक

आंधळ्याचं दळण खरंच !