बाप फितूर झाला.........

किरण कुमार's picture
किरण कुमार in जे न देखे रवी...
18 Jan 2017 - 6:17 pm

जीवनात दूखा:ने डोळ्यात पूर आला
तू हासला जरासा ,थकवा दूर झाला

तू जन्मलास अन मी जगलो असा नव्याने
प्रारब्ध गवसला जो, निशब्द सूर आला

उचलता हात बाळा, दिधला जरी धपाटा
काहूर मनी माझ्या, भरुनी उर आला

इवले हात रेखिती आभाळावर नक्षी
तू रागावला कधी, चंद्रास खूर आला

तूझी पावले उन्ही,बघता या मेघांनी
भिजवण्या धरणी,पाऊस आतूर झाला

तूझी ओढ इतूकी, कामास दूर सारी
तूज भेटाया रोज बाप फितूर झाला

कविता

प्रतिक्रिया

हतोळकरांचा प्रसाद's picture

18 Jan 2017 - 6:59 pm | हतोळकरांचा प्रसाद

व्वा, छान आहे!

शब्दबम्बाळ's picture

18 Jan 2017 - 10:02 pm | शब्दबम्बाळ

मस्त! आवडेश!

शैलेन्द्र's picture

19 Jan 2017 - 11:39 am | शैलेन्द्र

मस्त, एकदम खरी कविता

पैसा's picture

19 Jan 2017 - 11:42 am | पैसा

एका बापाच्या भावना कवितेत छान उतरल्यात!

शलभ's picture

19 Jan 2017 - 12:41 pm | शलभ

मस्त..आवडली

अरिंजय's picture

19 Jan 2017 - 1:08 pm | अरिंजय

मस्त, छान कविता

शार्दुल_हातोळकर's picture

19 Jan 2017 - 1:29 pm | शार्दुल_हातोळकर

चांगले लिहिताय....

कवि मानव's picture

19 Jan 2017 - 2:19 pm | कवि मानव

मस्त - आवडली !!

फार भारी जमली आहे. एकदम बाप!

डॉ श्रीहास's picture

19 Jan 2017 - 9:03 pm | डॉ श्रीहास

आवल्डी... मस्त लिहीता..

सही रे सई's picture

20 Jan 2017 - 9:36 am | सही रे सई

व्वा मस्त जमल्ये.. विशेष करून शीर्षक अगदी लक्षवेधी झाल आहे. पण नशिबाने शीर्षकावरून वाटली तशी कविता नकारात्मक नाहीये हे खूप छान वाटल.

देशपांडेमामा's picture

20 Jan 2017 - 5:20 pm | देशपांडेमामा

आवडेश!

देश