Skip to main content

बाप फितूर झाला.........

लेखक किरण कुमार यांनी बुधवार, 18/01/2017 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनात दूखा:ने डोळ्यात पूर आला तू हासला जरासा ,थकवा दूर झाला तू जन्मलास अन मी जगलो असा नव्याने प्रारब्ध गवसला जो, निशब्द सूर आला उचलता हात बाळा, दिधला जरी धपाटा काहूर मनी माझ्या, भरुनी उर आला इवले हात रेखिती आभाळावर नक्षी तू रागावला कधी, चंद्रास खूर आला तूझी पावले उन्ही,बघता या मेघांनी भिजवण्या धरणी,पाऊस आतूर झाला तूझी ओढ इतूकी, कामास दूर सारी तूज भेटाया रोज बाप फितूर झाला
लेखनविषय:

वाचने 2291
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

व्वा मस्त जमल्ये.. विशेष करून शीर्षक अगदी लक्षवेधी झाल आहे. पण नशिबाने शीर्षकावरून वाटली तशी कविता नकारात्मक नाहीये हे खूप छान वाटल.