भरपेट खाऊन आणि फार थोडा व्यायाम करून तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर हा छान उपाय आहे. वय २०-३५ दरम्यान असलेल्या लोकांना हा उपाय चांगला आहे ४० च्या वर असलेल्यांनी करू नये.
१. आठवड्याला २ दिवस व्यायाम करा. शक्य असेल तर एक दिवस १ तास कार्डिओ आणि १ दिवस १ तास वजन उचलण्याचा व्यायाम करावा.
२. आपण वाट्टेल ते खाऊ शकता अट फक्त एक. तुमच्या आहारातील किमान ४०% कॅलोरी ह्या प्रोटीन मधून आल्या पाहिजेत.
१ ग्राम प्रोटीन = ४ कॅलोरी.
समजा तुम्हाला अंडे खायचे असेल तर अंड्यांत सुमारे ३० कॅलोरी असतात आणि ६ ग्राम प्रोटीन असते.
तर इथे ६x४ = २४
२४/३० = ८०%
म्हणजे अंड्यातील ८०% कॅलोरी प्रोटीन मधून येतात आणि अंडी हा अतिशय छान आहार आहे.
अर्थानं आपण दररोज फक्त अंडी खाऊन राहू शकत नाही पण तुम्हाला समजा नूडल्स खायचे असेल तर त्यातील प्रोटीन वाढवण्यासाठी आपण अंडी वापरू शकता.
हा फॉर्मुला पास होणारे इतर काही पदार्थ
१. नॉन फॅट पनीर
२. ग्रीक योगर्ट
३. बीन्स
५. प्रथिन बार्स
७. चिकन सूप
९. सलाड चिकन युक्त
१०. ३ अंडी आणि एक ग्लास ऑरेंज जूस
अत्यंत खराब खाद्यपदार्थ
१. कोला
२. शर्करा युक्त चॉकलेट
३. ice क्रिम्स
४. व्हेज बिर्याणी
५. तळलेले पदार्थ
आपण ह्या सोबत जितका व्यायाम कराल तितके वजन लवकर कमी होईल पण ह्या फॉर्मूलाने दर महिन्याला आपण साधारण ८-९ पौंड वजन सहज कमी करू शकता. हे वजन कमी होताना आपणाला थकावट जाणवणार नाही हे महत्वाचे. समजा आपण कधी ice क्रीम खाल्लाच तर नंतर घरी जाऊन त्याच प्रमाणात अंडी, बीन्स किंवा प्रोटीन शेक प्यावे.
नैसर्गिक गोष्टी खाणे केंव्हाही चांगले पण कधी कधी सप्लिमेंट्स घेण्यात वाईट काहीही नाही. महिलांनी विशेषतः हिरव्या पालेभाज्या, आयर्न सप्लिमेंट्स, बी कॉम्प्लेक्स आणि कॉडलिव्हर ऑईल आहारांत जास्त ठेवावे.
काही सोपे विना कष्टाचे व्यायाम
१. तुम्हाला शक्य असेल तर ऑफिस मध्ये स्टँडिंग डेस्क घ्यावा. हे डेस्क अडजस्टेबल असतात.
२. तुम्हाला दर काही मिनिटांनी पाणी पिण्याची सवय असेल तर पाणी डेस्कवरील फ्लास्क मधून ना पिता काही अंतर चालत जाऊन गॅलरी वगैरेतून उभे राहून प्यावे. ग्रीन टी बॅग्स पाण्यात बुडवून पिल्यास आपला मेटॅबॉलिझम सुमारे १०% नि वाढतो.
३. टॉयलेट ब्रेक साठी सर्वांत दूरच्या रेस्टरूम मध्ये चालत जावे. जिना चढवा लागला तर आणखीन चांगले.
४. आपणाला देवळांत वगैरे जायची सवय आहे तर जिथे खूप पायऱ्या चढाव्या लागतात अश्या देवळांत जावे.
५. आपली स्कुटर किक मारून स्टार्ट करावी.
६. दररोजच्या वापरासाठी किंवा हायकिंग साठी चांगले वजनदार बूट वापरावेत स्पोर्ट्स शूस किंवा ओपन शूज वापरू नयेत.
७. मंदिरात प्रदक्षिणा किमान १२ घालाव्यात. नाहीतर घोर पाप लागेल अशी समजूत करून घ्यावी. थोडक्यांत धार्मिकता आणि OCD ह्यांची सांगड घालून आळशीपणावर मात करावी.
ह्यातील कुठलाही एक उपाय विशेष महत्वाचा नसला तरी आपल्या व्यवसायाप्रमाणे आपण अश्या अनेक लो हँगिंग फ्रुट्स काढू शकता आणि दररोज १००-२०० कॅलोरी जास्त बर्न करू शकता.
प्रथिन युक्त आहार किडनीचे विकार असलेल्या लोकांनी जास्त खाऊ नये. मी डॉक्टर नाही आणि येथील कुठलाही सल्ला वैद्यकीय सल्ला नाही आहे.
प्रतिक्रिया
6 Jan 2017 - 12:55 am | आदूबाळ
ओह. मला वाटलं काटा नसताना वजन कसं एस्टिमेट करावं यावर धागा आहे.
6 Jan 2017 - 1:43 am | पिलीयन रायडर
१, ३, ५ ७, ९ १०.. असे का आकडे वापरलेत?
असो.. पुन्हा मुख्य प्रश्न.. लेख तुमचाच आहे का? की कॉपी पेस्ट?
6 Jan 2017 - 7:41 am | खटपट्या
असे डायरेक्ट विचारु नये...
6 Jan 2017 - 5:26 am | साहना
नाही मी गूगल ट्रान्सलिटरेट टूल वापरते त्यांत अशी टाईप केलेली अक्षरे कधी कधी गायब होतात! :/
6 Jan 2017 - 7:43 am | खटपट्या
छान माहीती. माझ्यातर्फे अजून थोडी भर.
रात्रीचे जेवण कमी असावे. पहीले काही दीवस झोप लागणार नाही पण नंतर सवय होइल. रात्रीचे जेवण जर जास्त असेल तर लवकर जेवावे. ७ वाजता वगैरे.
6 Jan 2017 - 8:12 am | फेदरवेट साहेब
ओ डॅट ग्रीन टी अँड अदर फॅड ! काय करायचं नाय फकस्त ब्लॅक टी विथ ऑरेंज पील इनफ्युजन पेयाचा, मंग तेच्या सोबत काय बी खा, आपुन इंग्लिश माणस हाय आपुनला किती बी डायट सांगाल तरी आपुन मॉर्निंग टाइम ला फुल इंग्लिश स्प्रेड खाल्ले बगर राहू शकते नाय.
6 Jan 2017 - 9:06 am | विंजिनेर
हा लेख काथ्याकूटात मुद्दाम टाकलाय का चुकून पडलाय?
असो. एकून अती सरसकटीकरण+ अती सुलभीकरण असा लेख वाटतोय.
"देअर आर नो शॉर्टकटस टू वेट लॉस अँड हेल्थ गेन" हे एकच सत्य आहे बाकी सगळे मिथ्या.
6 Jan 2017 - 9:54 am | खेडूत
चान चान.
हे वाक्य अन OCD काय काहीच कळलं नाही!
वय २०-३५ या खिडकीबाहेर असूनही लाईट वेट असल्याने फक्त माहिती म्हणून वाचला आहे.
(जाता जाता : घोर पाप वगैरे काही लागत नसते हो! कुठच्याही कारणाने असा खोटाखोटा समज करून घेणेही घातक आहे.)
6 Jan 2017 - 10:05 am | अनन्त्_यात्री
अम्रुत, परीस, फेअरनेस क्रीम, टकलावर केस उगविणारी तेले, स्थूलता निवारण औषधे , ग्रहान्चे खडे....................सगळ्याचा अर्थ एकच............प्राचीन काळापासून आजपर्यन्त ग्राहकाच्या भोळसटपणाचा फायदा घेऊन केलेली बनवाबनवी
6 Jan 2017 - 10:19 am | विशुमित
वजन कमी करण्यासाठी एकच उपाय रोज कमीत कमी ५ किमी धावणे (धावणे म्हणजे धावणे नो चालींग ) आणि धावून आल्यानंतर १०-१५ मीनीट स्ट्रेचिंग सारखे व्यायाम.
(मिलिटरी वाल्यांचे पोट का सुटत नाही हे त्यांच्या नियमित पि टी पिरियड ची करामत आहे. खरे साहेब उत्तम सांगू शकतील)
7 Jan 2017 - 7:52 pm | सुबोध खरे
मिलिटरी वाल्यांचे पोट का सुटत नाही हे त्यांच्या नियमित पि टी पिरियड ची करामत आहे
एवढेच नाही तर वजन जास्त झाले तर पुढची बढती थांबवली जाते.
वायुसेनेत तर वार्षिक गोपनीय अहवालात फोटो लावला जात असे तो आता केवळ समोरून नव्हे तर बाजूनेही काढलेला असतो त्यामुळे आपले पोट किती पुरोगामी आहे हे समजून येते.
fighting fit -- युद्धासाठी संपूर्ण तयार
असेच तुम्ही असले पाहिजे
6 Jan 2017 - 10:34 am | अनुप ढेरे
व्हेज बिर्याणी हा अत्यंत खराब पदार्थ आहे याच्याशी सहमत आहे.
6 Jan 2017 - 11:10 am | संदीप डांगे
वेज बिर्याणी म्हणजे उंटाला मान अवघडलेला जिराफ म्हणण्यासारखे आहे.
6 Jan 2017 - 11:38 am | अत्रन्गि पाउस
लोळ
हि उपमा आम्ही चोरली आहे ...ह्याचा इतरत्र वापर करणेत येईल ...
7 Jan 2017 - 7:56 pm | सुबोध खरे
व्हेज बिर्याणी हा अत्यंत खराब पदार्थ आहे
याचा अर्थ कदाचित असाही असू शकेल कि तुम्ही चांगली "व्हेज बिर्याणी" खाल्ली नसावी.
यात चव आणि तेलकट पणा या दोन्हीचा अंतर्भाव आहे.
लग्नाच्या जेवणात कोणताही पदार्थ उत्तम बनला आहे असे क्वचितच होते.
6 Jan 2017 - 12:33 pm | अमर विश्वास
भरपेट खाऊन आणि फार थोडा व्यायाम करून तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल
या पहिल्याच वाक्याला अडखळलो.
भरपेट खाऊन आणि फार थोडा व्यायाम करून वजन कमी होत नाही..
मिपावर डॉक्टर साहेबांनी वजन या विषयावर छान लेखमाला लिहिली आहे. ती जरूर वाचा
भरपूर व्यायाम व खाण्यावर कंट्रोल याला पर्याय नाही.
6 Jan 2017 - 1:43 pm | रुस्तम
सहमत
8 Jan 2017 - 10:12 pm | लीना कनाटा
अवि,
सही पकडें हैं !
6 Jan 2017 - 7:34 pm | सूड
यावर मिपावर डॉक्टरांचे आणि इतरही तज्ञ मंडळींचे लेख येऊन गेलेत. ते एकदा वाचून काढावे अशी सुचवणी करतो. वजन कमी करण्याची पद्धत जितकी सोपी आणि वेग जितका जास्त तितके पहिले पाढे पंचावन्न व्हायची शक्यता जास्त!! उदाहरण डोळ्यासमोर बघून सांगतोय. रोज तज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करणे आणि खाणे उत्तम.