भरपेट खाऊन आणि फार थोडा व्यायाम करून तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर हा छान उपाय आहे. वय २०-३५ दरम्यान असलेल्या लोकांना हा उपाय चांगला आहे ४० च्या वर असलेल्यांनी करू नये.
१. आठवड्याला २ दिवस व्यायाम करा. शक्य असेल तर एक दिवस १ तास कार्डिओ आणि १ दिवस १ तास वजन उचलण्याचा व्यायाम करावा.
२. आपण वाट्टेल ते खाऊ शकता अट फक्त एक. तुमच्या आहारातील किमान ४०% कॅलोरी ह्या प्रोटीन मधून आल्या पाहिजेत.
१ ग्राम प्रोटीन = ४ कॅलोरी.
समजा तुम्हाला अंडे खायचे असेल तर अंड्यांत सुमारे ३० कॅलोरी असतात आणि ६ ग्राम प्रोटीन असते.
तर इथे ६x४ = २४
२४/३० = ८०%
म्हणजे अंड्यातील ८०% कॅलोरी प्रोटीन मधून येतात आणि अंडी हा अतिशय छान आहार आहे.
अर्थानं आपण दररोज फक्त अंडी खाऊन राहू शकत नाही पण तुम्हाला समजा नूडल्स खायचे असेल तर त्यातील प्रोटीन वाढवण्यासाठी आपण अंडी वापरू शकता.
हा फॉर्मुला पास होणारे इतर काही पदार्थ
१. नॉन फॅट पनीर
२. ग्रीक योगर्ट
३. बीन्स
५. प्रथिन बार्स
७. चिकन सूप
९. सलाड चिकन युक्त
१०. ३ अंडी आणि एक ग्लास ऑरेंज जूस
अत्यंत खराब खाद्यपदार्थ
१. कोला
२. शर्करा युक्त चॉकलेट
३. ice क्रिम्स
४. व्हेज बिर्याणी
५. तळलेले पदार्थ
आपण ह्या सोबत जितका व्यायाम कराल तितके वजन लवकर कमी होईल पण ह्या फॉर्मूलाने दर महिन्याला आपण साधारण ८-९ पौंड वजन सहज कमी करू शकता. हे वजन कमी होताना आपणाला थकावट जाणवणार नाही हे महत्वाचे. समजा आपण कधी ice क्रीम खाल्लाच तर नंतर घरी जाऊन त्याच प्रमाणात अंडी, बीन्स किंवा प्रोटीन शेक प्यावे.
नैसर्गिक गोष्टी खाणे केंव्हाही चांगले पण कधी कधी सप्लिमेंट्स घेण्यात वाईट काहीही नाही. महिलांनी विशेषतः हिरव्या पालेभाज्या, आयर्न सप्लिमेंट्स, बी कॉम्प्लेक्स आणि कॉडलिव्हर ऑईल आहारांत जास्त ठेवावे.
काही सोपे विना कष्टाचे व्यायाम
१. तुम्हाला शक्य असेल तर ऑफिस मध्ये स्टँडिंग डेस्क घ्यावा. हे डेस्क अडजस्टेबल असतात.
२. तुम्हाला दर काही मिनिटांनी पाणी पिण्याची सवय असेल तर पाणी डेस्कवरील फ्लास्क मधून ना पिता काही अंतर चालत जाऊन गॅलरी वगैरेतून उभे राहून प्यावे. ग्रीन टी बॅग्स पाण्यात बुडवून पिल्यास आपला मेटॅबॉलिझम सुमारे १०% नि वाढतो.
३. टॉयलेट ब्रेक साठी सर्वांत दूरच्या रेस्टरूम मध्ये चालत जावे. जिना चढवा लागला तर आणखीन चांगले.
४. आपणाला देवळांत वगैरे जायची सवय आहे तर जिथे खूप पायऱ्या चढाव्या लागतात अश्या देवळांत जावे.
५. आपली स्कुटर किक मारून स्टार्ट करावी.
६. दररोजच्या वापरासाठी किंवा हायकिंग साठी चांगले वजनदार बूट वापरावेत स्पोर्ट्स शूस किंवा ओपन शूज वापरू नयेत.
७. मंदिरात प्रदक्षिणा किमान १२ घालाव्यात. नाहीतर घोर पाप लागेल अशी समजूत करून घ्यावी. थोडक्यांत धार्मिकता आणि OCD ह्यांची सांगड घालून आळशीपणावर मात करावी.
ह्यातील कुठलाही एक उपाय विशेष महत्वाचा नसला तरी आपल्या व्यवसायाप्रमाणे आपण अश्या अनेक लो हँगिंग फ्रुट्स काढू शकता आणि दररोज १००-२०० कॅलोरी जास्त बर्न करू शकता.
प्रथिन युक्त आहार किडनीचे विकार असलेल्या लोकांनी जास्त खाऊ नये. मी डॉक्टर नाही आणि येथील कुठलाही सल्ला वैद्यकीय सल्ला नाही आहे.
वर्गीकरण
वाचन संख्या
5993
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओह. मला वाटलं काटा नसताना वजन
१, ३, ५ ७, ९ १०.. असे का आकडे
असे डायरेक्ट विचारु नये...
In reply to १, ३, ५ ७, ९ १०.. असे का आकडे by पिलीयन रायडर
नाही मी गूगल ट्रान्सलिटरेट
छान माहीती. माझ्यातर्फे अजून
ओ डॅट ग्रीन टी अँड अदर फॅड !
हा लेख काथ्याकूटात मुद्दाम
चान चान.
अशी ही बनवाबनवी
वजन कमी करण्यासाठी एकच उपाय
मिलिटरी वाल्यांचे पोट का सुटत
In reply to वजन कमी करण्यासाठी एकच उपाय by विशुमित
व्हेज बिर्याणी हा अत्यंत खराब
वेज बिर्याणी म्हणजे उंटाला
In reply to व्हेज बिर्याणी हा अत्यंत खराब by अनुप ढेरे
उंटाला मान अवघडलेला जिराफ
In reply to वेज बिर्याणी म्हणजे उंटाला by संदीप डांगे
व्हेज बिर्याणी हा अत्यंत खराब
In reply to व्हेज बिर्याणी हा अत्यंत खराब by अनुप ढेरे
भरपेट खाऊन आणि फार थोडा
+१
In reply to भरपेट खाऊन आणि फार थोडा by अमर विश्वास
अवि, सही पकडें हैं !
In reply to भरपेट खाऊन आणि फार थोडा by अमर विश्वास
यावर मिपावर डॉक्टरांचे आणि