देशपांडे -आमचे वडील!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
25 Oct 2016 - 6:53 am

देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो. त्यामुळे भारावून जाऊन वडलांनी स्वतःचे आडनाव परत कोरडे केले. मला हे भिकारडे कोरडे आडनाव अजिबात आवडले नव्हते आजही आवडत नाही पण मी तेव्हा लहान होतो. आणि माझ मत कुणी विचारलं नाही, माझ्या आईचाही नाव बदलण्याला विरोध होत पण तो म्हणजे असली काम नीट पूर्ण होत नाहित काहीतरी कुठे तरी राहते अन मग ऐन वेळेला त्यामुळे महत्वाची कामं अडतात असा technical कारणासाठी होता जो आजही खरा आहे-म्हणूनच आवडत नसूनही मी माझ आड नाव परत देशपांडे केलं नहि.पण पुढे मी बाबांना ओ ,देशपांडे! अशीच हाक मारत असे अजूनही त्यांचा उल्लेख मी देशपांडे असाच करतो. - आपला एक छोटासा सूड म्हणा हवा तर याला …पण ते एक असो!)
तर हे देशपांडे संघाचे कट्टर कार्यकर्ते. मी सुद्धा स्वयंसेवक होतो(आता नाहीये) पण मी कट्टर संघ समर्थक वगैरे नाहीये, प्रशंसक आहे आणि स्वयंसेवक होतो एवढेच . आम्ही लक्ष्मिनगरला राहता असताना देशपांड्यांनी घराच्या गेट वर विश्व हिंदू परिषदेच्या मुखपत्रावर असतो तसा मोठाला ॐ लावला होता. आता लक्ष्मिनगरच ते, तिथले लोक काय कमी टारगट होते काय! . त्यातून तो भाग दलित पंथर , R.P.I. अशा संघटनांचा प्रभाव असलेला. मग काय विचारता राव! एके दिवशी सकाळी सकाळी ( सोमवार असावा ) त्या ॐ ला हाडकांची माळ घातलेली, आणि ती पण बोकड किंवा कोंबडी नाही चांगली बैलाच्या किंवा गाईच्या मटणाची ( म्हणजे मला आपल साईज वरून वाटलं, केव्हढ मोठ एक एक हाड! आणि त्याची भोक एवढी मोठी होती कि त्यात दोरी नाही तर चांगली सुतळी ओवून पक्की माळ तयार केली होती सहज तोडता येऊ नये अशी. ) झालं , ते पाहून मातोश्रींचा फ्युज उडाला, आता रात्री कधीतरी जागून केलेल्या कष्टाच चीज होणार, तमाशा, गम्मत बघायला मिळणार या आशेने आसपासचे लोक लगेच आवंतण दिल्यासारखे गोळा होऊ लागले पण देशपांडे हुशार, त्यांनी शांतपणे माळ काढली , त्यातली हाडकं सोडवली आणि पिंटूला( आमचा कुत्रा) खायला त्याच्या ताटलीत वाढली. पिंट्याहि वस्ताद, बामणाच्या घरचं कुत्र ते,ते फुकट मिळाले मटाण सोडतय काय ? सकाळी सकाळी तिथे त्या ॐ च्याच खाली मोठ हाडूक तोंडात घेऊन जी समाधी लावली म्हणता ? देशपांडे अगदी सद्गदिद(!)होऊन तमाशा बघायला आलेल्यांना म्हणाले तुम्ही होता म्हणून पिंट्याला असं चांगलं चुंगलं खायला मिळतं नाहीतर आम्ही कुठे बडेका माल खरेदी करायला जाणार? आणि आम्हाला देतील तरी का ? एक काम कर शिवा ( हा उद्योग त्याचाच असा देशपांड्यांचा कयास होता )पुढच्या वेळे पासून अर्धा किलो पिंट्य़ा करता वेगळ घेऊन येत जा त्याचे ८ रु आधीच घेउन जा हो! ( म्हणजे १६ रु किलो बड्य़ाच मटण तेव्हा होत, हे देशपांड्यांना माहित होतं तर …अरे वा !) असो....
आज जर असा काही घडल तर दंगेच पेटायचे , पण नाही पेटणार कदाचित आमच्या देश्पाण्ड्य़ा सारखे डोकं ठिकाणावर आणि त्या डोक्यात पुरेशी विनोद बुद्धी आणि लहान सहन गोष्टीवरून दुखावली न जाणारी भावना असेल तर ….
---आदित्य

रेखाटनप्रकटन

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

25 Oct 2016 - 11:51 am | जव्हेरगंज

हे ही मस्त, आंदो !!!

पाटीलभाऊ's picture

25 Oct 2016 - 12:37 pm | पाटीलभाऊ

हाहाहा...भारी

अनुप ढेरे's picture

25 Oct 2016 - 12:37 pm | अनुप ढेरे

छानच लिहिताय. लिहिण्याची शैली आवडली!

राजाभाउ's picture

25 Oct 2016 - 12:47 pm | राजाभाउ

मस्त किस्सा. पण ते कोरडे आडनाव तुम्हाला का आवडत नाही ? असच ? चांगला आहे की.

आदित्य कोरडे's picture

29 Oct 2016 - 4:36 pm | आदित्य कोरडे

अहो तसे नाही , आता शिवाजी महाराजांनी देशपांडे वतन दिले तर ते नाही टिकले कूळ कायद्यात गेले पण आडनाव तर अभिमानाने मिरवायचे कि नको ...

ख्या ख्या ख्या ख्या!

जयंत कुलकर्णी's picture

25 Oct 2016 - 1:40 pm | जयंत कुलकर्णी

अदित्य,
ते लिंबाचे पण लिही..... :-)

बोका-ए-आझम's picture

25 Oct 2016 - 1:58 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र.

मस्त. पण थोडक्यात आटपले असं वाटलं..

Sshashank Chandrakant Gharat's picture

25 Oct 2016 - 2:09 pm | Sshashank Chand...

खरोखरच बाप माणूस आहे.

ज्योति अळवणी's picture

25 Oct 2016 - 2:15 pm | ज्योति अळवणी

मजा आली वाचताना. खरयं तुमचं! डोकं शांत ठेवण्या इतका समनजसपणा अलीकडे कमीच.

नाखु's picture

25 Oct 2016 - 4:40 pm | नाखु

टा़कलेल्यांच्या गळ्यात हाडुक अडकविल्यासारखे, जबरी किस्सा..

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 7:06 pm | संदीप डांगे

+1000

अनुप ढेरे's picture

25 Oct 2016 - 4:47 pm | अनुप ढेरे

डोकं ठिकाणावर आणि त्या डोक्यात पुरेशी विनोद बुद्धी आणि लहान सहन गोष्टीवरून दुखावली न जाणारी भावना असेल तर

लाख पते की बात!

रॉजरमूर's picture

25 Oct 2016 - 7:24 pm | रॉजरमूर

छान लिहिता तुम्ही .........

अभ्या..'s picture

25 Oct 2016 - 10:48 pm | अभ्या..

भारीच लिहिलय की.

पिलीयन रायडर's picture

26 Oct 2016 - 1:09 am | पिलीयन रायडर

=))

आत्ता समजलं की देशपांडेंचा मुलगा कोरडे कसा?!! भारीच लिहीलंय! तुमचे बाबा एकदम खत्रा माणुस आहेत!

आदित्य कोरडे's picture

26 Oct 2016 - 5:44 am | आदित्य कोरडे

होते.... ते 2001 मध्यच वारले

स्रुजा's picture

26 Oct 2016 - 1:27 am | स्रुजा

है शाब्बास ! याला म्हणतात सवासेर !! भारी आहेत तुमचे बाबा...

वटवट's picture

26 Oct 2016 - 9:33 am | वटवट

कुर्निसात

अजया's picture

26 Oct 2016 - 11:10 am | अजया

:)

इशा१२३'s picture

26 Oct 2016 - 11:19 pm | इशा१२३

भारीच!

इशा१२३'s picture

26 Oct 2016 - 11:19 pm | इशा१२३

भारीच!

श्रीगुरुजी's picture

26 Oct 2016 - 11:45 pm | श्रीगुरुजी

मस्त अनुभव!

रमेश आठवले's picture

27 Oct 2016 - 12:01 am | रमेश आठवले

बाबासाहेब पुरंदरे यांनी ही माहिती झी २४ तास चे सम्पादक उदय निरगुडकर यांना त्यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितली.
शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंना शिवाजीच्या वेळेला प्रसूतिवेदना सुरु झाल्यावर जुन्नर मधील ज्या निरगुडकर वैद्याना बोलवण्यात आले होते आणि ज्यांच्या देखरेखीत प्रसूति सुखरूप पार पडली त्या वैद्यांची उदय निरगुडकर हे १४ वी पिढी आहेत.

सतिश गावडे's picture

27 Oct 2016 - 12:05 am | सतिश गावडे

वाईट्ट =))

सुज्ञ's picture

27 Oct 2016 - 12:27 am | सुज्ञ

असले नॉन कॉम्युनल धागे शतकी का नाही होत ? का धुरळा उडाल्याशिवाय मजा नाही येत ?

सुज्ञ's picture

27 Oct 2016 - 12:31 am | सुज्ञ

कोरडे सर तुम्ही सरळ आणि अगदी स्वतःचे कौटुंबिक लिहीत आहात .. इथे कोणीही वाचू शकते .. सहज सांगितले

रेवती's picture

27 Oct 2016 - 12:38 am | रेवती

किस्सा मजेशीर आहे.

तुमचे पूर्वज महाराजांच्या दरबारी वकील होते ह्यांत काहीही शंका नाही. असा गंभीर प्रकार इतक्या छान आणि विनोद बुद्धीने हाताळला. नमस्कार तुमच्या तीर्थरुपाना!

बय द वे "बडेका माल" म्हनजे नक्कि काय ?

संदीप डांगे's picture

27 Oct 2016 - 7:47 am | संदीप डांगे

बीफ! बडा म्हणजे बैल.

विदर्भात डंगऱ्या म्हणतात..

बॅटमॅन's picture

29 Oct 2016 - 6:04 pm | बॅटमॅन

अगा बाबौ...लैच जबर्‍या. मान गये. _/\_

खटपट्या's picture

30 Oct 2016 - 12:47 pm | खटपट्या

वावा खूप मजा आली वाचताना

अनिरुद्ध.वैद्य's picture

30 Oct 2016 - 1:04 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त हाताळला प्रसंग! छानच लिहीलंय.

संजय क्षीरसागर's picture

30 Oct 2016 - 3:57 pm | संजय क्षीरसागर

गंभीर प्रसंगाकडे विनोदीवृत्तीनं पाहाण्याच्या या कलेचं कौतुक आहे.

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2016 - 1:09 pm | चौथा कोनाडा

तुमच्या इरसाल वडिलां सारखे च इरसाल लेखन !

हाडुक किस्सा एक नंबर !

लेखन शैली आवडली . येऊ द्या अजून लेखन ।

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2016 - 1:09 pm | चौथा कोनाडा

तुमच्या इरसाल वडिलां सारखे च इरसाल लेखन !

हाडुक किस्सा एक नंबर !

लेखन शैली आवडली . येऊ द्या अजून लेखन ।

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2016 - 1:09 pm | चौथा कोनाडा

तुमच्या इरसाल वडिलां सारखे च इरसाल लेखन !

हाडुक किस्सा एक नंबर !

लेखन शैली आवडली . येऊ द्या अजून लेखन ।