✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

देशपांडे -आमचे वडील!

आ
आदित्य कोरडे यांनी
Tue, 10/25/2016 - 06:53  ·  लेख
लेख
देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो. त्यामुळे भारावून जाऊन वडलांनी स्वतःचे आडनाव परत कोरडे केले. मला हे भिकारडे कोरडे आडनाव अजिबात आवडले नव्हते आजही आवडत नाही पण मी तेव्हा लहान होतो. आणि माझ मत कुणी विचारलं नाही, माझ्या आईचाही नाव बदलण्याला विरोध होत पण तो म्हणजे असली काम नीट पूर्ण होत नाहित काहीतरी कुठे तरी राहते अन मग ऐन वेळेला त्यामुळे महत्वाची कामं अडतात असा technical कारणासाठी होता जो आजही खरा आहे-म्हणूनच आवडत नसूनही मी माझ आड नाव परत देशपांडे केलं नहि.पण पुढे मी बाबांना ओ ,देशपांडे! अशीच हाक मारत असे अजूनही त्यांचा उल्लेख मी देशपांडे असाच करतो. - आपला एक छोटासा सूड म्हणा हवा तर याला …पण ते एक असो!) तर हे देशपांडे संघाचे कट्टर कार्यकर्ते. मी सुद्धा स्वयंसेवक होतो(आता नाहीये) पण मी कट्टर संघ समर्थक वगैरे नाहीये, प्रशंसक आहे आणि स्वयंसेवक होतो एवढेच . आम्ही लक्ष्मिनगरला राहता असताना देशपांड्यांनी घराच्या गेट वर विश्व हिंदू परिषदेच्या मुखपत्रावर असतो तसा मोठाला ॐ लावला होता. आता लक्ष्मिनगरच ते, तिथले लोक काय कमी टारगट होते काय! . त्यातून तो भाग दलित पंथर , R.P.I. अशा संघटनांचा प्रभाव असलेला. मग काय विचारता राव! एके दिवशी सकाळी सकाळी ( सोमवार असावा ) त्या ॐ ला हाडकांची माळ घातलेली, आणि ती पण बोकड किंवा कोंबडी नाही चांगली बैलाच्या किंवा गाईच्या मटणाची ( म्हणजे मला आपल साईज वरून वाटलं, केव्हढ मोठ एक एक हाड! आणि त्याची भोक एवढी मोठी होती कि त्यात दोरी नाही तर चांगली सुतळी ओवून पक्की माळ तयार केली होती सहज तोडता येऊ नये अशी. ) झालं , ते पाहून मातोश्रींचा फ्युज उडाला, आता रात्री कधीतरी जागून केलेल्या कष्टाच चीज होणार, तमाशा, गम्मत बघायला मिळणार या आशेने आसपासचे लोक लगेच आवंतण दिल्यासारखे गोळा होऊ लागले पण देशपांडे हुशार, त्यांनी शांतपणे माळ काढली , त्यातली हाडकं सोडवली आणि पिंटूला( आमचा कुत्रा) खायला त्याच्या ताटलीत वाढली. पिंट्याहि वस्ताद, बामणाच्या घरचं कुत्र ते,ते फुकट मिळाले मटाण सोडतय काय ? सकाळी सकाळी तिथे त्या ॐ च्याच खाली मोठ हाडूक तोंडात घेऊन जी समाधी लावली म्हणता ? देशपांडे अगदी सद्गदिद(!)होऊन तमाशा बघायला आलेल्यांना म्हणाले तुम्ही होता म्हणून पिंट्याला असं चांगलं चुंगलं खायला मिळतं नाहीतर आम्ही कुठे बडेका माल खरेदी करायला जाणार? आणि आम्हाला देतील तरी का ? एक काम कर शिवा ( हा उद्योग त्याचाच असा देशपांड्यांचा कयास होता )पुढच्या वेळे पासून अर्धा किलो पिंट्य़ा करता वेगळ घेऊन येत जा त्याचे ८ रु आधीच घेउन जा हो! ( म्हणजे १६ रु किलो बड्य़ाच मटण तेव्हा होत, हे देशपांड्यांना माहित होतं तर …अरे वा !) असो.... आज जर असा काही घडल तर दंगेच पेटायचे , पण नाही पेटणार कदाचित आमच्या देश्पाण्ड्य़ा सारखे डोकं ठिकाणावर आणि त्या डोक्यात पुरेशी विनोद बुद्धी आणि लहान सहन गोष्टीवरून दुखावली न जाणारी भावना असेल तर …. ---आदित्य
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
11778 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

हे ही मस्त, आंदो !!!

जव्हेरगंज
Tue, 10/25/2016 - 11:51 नवीन
हे ही मस्त, आंदो !!!
  • Log in or register to post comments

हाहाहा

पाटीलभाऊ
Tue, 10/25/2016 - 12:37 नवीन
हाहाहा...भारी
  • Log in or register to post comments

छानच लिहिताय. लिहिण्याची शैली

अनुप ढेरे
Tue, 10/25/2016 - 12:37 नवीन
छानच लिहिताय. लिहिण्याची शैली आवडली!
  • Log in or register to post comments

मस्त किस्सा. पण ते कोरडे

राजाभाउ
Tue, 10/25/2016 - 12:47 नवीन
मस्त किस्सा. पण ते कोरडे आडनाव तुम्हाला का आवडत नाही ? असच ? चांगला आहे की.
  • Log in or register to post comments

अहो तसे नाही , आता शिवाजी

आदित्य कोरडे
Sat, 10/29/2016 - 16:36 नवीन
अहो तसे नाही , आता शिवाजी महाराजांनी देशपांडे वतन दिले तर ते नाही टिकले कूळ कायद्यात गेले पण आडनाव तर अभिमानाने मिरवायचे कि नको ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

ख्या ख्या ख्या ख्या!

एस
Tue, 10/25/2016 - 13:34 नवीन
ख्या ख्या ख्या ख्या!
  • Log in or register to post comments

अदित्य,

जयंत कुलकर्णी
Tue, 10/25/2016 - 13:40 नवीन
अदित्य, ते लिंबाचे पण लिही..... :-)
  • Log in or register to post comments

मस्त लेखन.

बोका-ए-आझम
Tue, 10/25/2016 - 13:58 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

मस्त. पण थोडक्यात आटपले असं

खेडूत
Tue, 10/25/2016 - 14:05 नवीन
मस्त. पण थोडक्यात आटपले असं वाटलं..
  • Log in or register to post comments

खरोखरच बाप माणूस आहे.

Sshashank Chan…
Tue, 10/25/2016 - 14:09 नवीन
खरोखरच बाप माणूस आहे.
  • Log in or register to post comments

मजा आली वाचताना. खरयं तुमचं!

ज्योति अळवणी
Tue, 10/25/2016 - 14:15 नवीन
मजा आली वाचताना. खरयं तुमचं! डोकं शांत ठेवण्या इतका समनजसपणा अलीकडे कमीच.
  • Log in or register to post comments

ही तर

नाखु
Tue, 10/25/2016 - 16:40 नवीन
टा़कलेल्यांच्या गळ्यात हाडुक अडकविल्यासारखे, जबरी किस्सा..
  • Log in or register to post comments

+1000

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 19:06 नवीन
+1000
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

डोकं ठिकाणावर आणि त्या

अनुप ढेरे
Tue, 10/25/2016 - 16:47 नवीन
डोकं ठिकाणावर आणि त्या डोक्यात पुरेशी विनोद बुद्धी आणि लहान सहन गोष्टीवरून दुखावली न जाणारी भावना असेल तर
लाख पते की बात!
  • Log in or register to post comments

छान लिहिता तुम्ही .........

रॉजरमूर
Tue, 10/25/2016 - 19:24 नवीन
छान लिहिता तुम्ही .........
  • Log in or register to post comments

भारीच लिहिलय की.

अभ्या..
Tue, 10/25/2016 - 22:48 नवीन
भारीच लिहिलय की.
  • Log in or register to post comments

=))

पिलीयन रायडर
Wed, 10/26/2016 - 01:09 नवीन
=)) आत्ता समजलं की देशपांडेंचा मुलगा कोरडे कसा?!! भारीच लिहीलंय! तुमचे बाबा एकदम खत्रा माणुस आहेत!
  • Log in or register to post comments

होते.... ते 2001 मध्यच वारले

आदित्य कोरडे
Wed, 10/26/2016 - 05:44 नवीन
होते.... ते 2001 मध्यच वारले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

है शाब्बास ! याला म्हणतात

स्रुजा
Wed, 10/26/2016 - 01:27 नवीन
है शाब्बास ! याला म्हणतात सवासेर !! भारी आहेत तुमचे बाबा...
  • Log in or register to post comments

कुर्निसात

वटवट
Wed, 10/26/2016 - 09:33 नवीन
कुर्निसात
  • Log in or register to post comments

:)

अजया
Wed, 10/26/2016 - 11:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments

भारीच!

इशा१२३
Wed, 10/26/2016 - 23:19 नवीन
भारीच!
  • Log in or register to post comments

भारीच!

इशा१२३
Wed, 10/26/2016 - 23:19 नवीन
भारीच!
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव!

श्रीगुरुजी
Wed, 10/26/2016 - 23:45 नवीन
मस्त अनुभव!
  • Log in or register to post comments

निरगुडकर वैद्य

रमेश आठवले
गुरुवार, 10/27/2016 - 00:01 नवीन
बाबासाहेब पुरंदरे यांनी ही माहिती झी २४ तास चे सम्पादक उदय निरगुडकर यांना त्यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितली. शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंना शिवाजीच्या वेळेला प्रसूतिवेदना सुरु झाल्यावर जुन्नर मधील ज्या निरगुडकर वैद्याना बोलवण्यात आले होते आणि ज्यांच्या देखरेखीत प्रसूति सुखरूप पार पडली त्या वैद्यांची उदय निरगुडकर हे १४ वी पिढी आहेत.
  • Log in or register to post comments

वाईट्ट =))

सतिश गावडे
गुरुवार, 10/27/2016 - 00:05 नवीन
वाईट्ट =))
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख . !!

सुज्ञ
गुरुवार, 10/27/2016 - 00:27 नवीन
असले नॉन कॉम्युनल धागे शतकी का नाही होत ? का धुरळा उडाल्याशिवाय मजा नाही येत ?
  • Log in or register to post comments

कोरडे सर..

सुज्ञ
गुरुवार, 10/27/2016 - 00:31 नवीन
कोरडे सर तुम्ही सरळ आणि अगदी स्वतःचे कौटुंबिक लिहीत आहात .. इथे कोणीही वाचू शकते .. सहज सांगितले
  • Log in or register to post comments

किस्सा मजेशीर आहे.

रेवती
गुरुवार, 10/27/2016 - 00:38 नवीन
किस्सा मजेशीर आहे.
  • Log in or register to post comments

तुमचे पूर्वज महाराजांच्या

साहना
गुरुवार, 10/27/2016 - 02:31 नवीन
तुमचे पूर्वज महाराजांच्या दरबारी वकील होते ह्यांत काहीही शंका नाही. असा गंभीर प्रकार इतक्या छान आणि विनोद बुद्धीने हाताळला. नमस्कार तुमच्या तीर्थरुपाना!
  • Log in or register to post comments

बय द वे "बडेका माल" म्हनजे

साहना
गुरुवार, 10/27/2016 - 02:32 नवीन
बय द वे "बडेका माल" म्हनजे नक्कि काय ?
  • Log in or register to post comments

बीफ! बडा म्हणजे बैल.

संदीप डांगे
गुरुवार, 10/27/2016 - 07:47 नवीन
बीफ! बडा म्हणजे बैल. विदर्भात डंगऱ्या म्हणतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

अगा बाबौ...लैच जबर्‍या. मान

बॅटमॅन
Sat, 10/29/2016 - 18:04 नवीन
अगा बाबौ...लैच जबर्‍या. मान गये. _/\_
  • Log in or register to post comments

वावा खूप मजा आली वाचताना

खटपट्या
Sun, 10/30/2016 - 12:47 नवीन
वावा खूप मजा आली वाचताना
  • Log in or register to post comments

भारीच!

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 10/30/2016 - 13:04 नवीन
मस्त हाताळला प्रसंग! छानच लिहीलंय.
  • Log in or register to post comments

आदित्य,

संजय क्षीरसागर
Sun, 10/30/2016 - 15:57 नवीन
गंभीर प्रसंगाकडे विनोदीवृत्तीनं पाहाण्याच्या या कलेचं कौतुक आहे.
  • Log in or register to post comments

तुमच्या इरसाल वडिलां सारखे च

चौथा कोनाडा
Mon, 10/31/2016 - 13:09 नवीन
तुमच्या इरसाल वडिलां सारखे च इरसाल लेखन ! हाडुक किस्सा एक नंबर ! लेखन शैली आवडली . येऊ द्या अजून लेखन ।
  • Log in or register to post comments

तुमच्या इरसाल वडिलां सारखे च

चौथा कोनाडा
Mon, 10/31/2016 - 13:09 नवीन
तुमच्या इरसाल वडिलां सारखे च इरसाल लेखन ! हाडुक किस्सा एक नंबर ! लेखन शैली आवडली . येऊ द्या अजून लेखन ।
  • Log in or register to post comments

तुमच्या इरसाल वडिलां सारखे च

चौथा कोनाडा
Mon, 10/31/2016 - 13:09 नवीन
तुमच्या इरसाल वडिलां सारखे च इरसाल लेखन ! हाडुक किस्सा एक नंबर ! लेखन शैली आवडली . येऊ द्या अजून लेखन ।
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा