देशपांडे -आमचे वडील!
देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो. त्यामुळे भारावून जाऊन वडलांनी स्वतःचे आडनाव परत कोरडे केले. मला हे भिकारडे कोरडे आडनाव अजिबात आवडले नव्हते आजही आवडत नाही पण मी तेव्हा लहान होतो. आणि माझ मत कुणी विचारलं नाही, माझ्या आईचाही नाव बदलण्याला विरोध होत पण तो म्हणजे असली काम नीट पूर्ण होत नाहित काहीतरी कुठे तरी राहते अन मग ऐन वेळेला त्यामुळे महत्वाची कामं अडतात असा technical कारणासाठी होता जो आजही खरा आहे-म्हणूनच आवडत नसूनही मी माझ आड नाव परत देशपांडे केलं नहि.पण पुढे मी बाबांना ओ ,देशपांडे! अशीच हाक मारत असे अजूनही त्यांचा उल्लेख मी देशपांडे असाच करतो. - आपला एक छोटासा सूड म्हणा हवा तर याला …पण ते एक असो!)
तर हे देशपांडे संघाचे कट्टर कार्यकर्ते. मी सुद्धा स्वयंसेवक होतो(आता नाहीये) पण मी कट्टर संघ समर्थक वगैरे नाहीये, प्रशंसक आहे आणि स्वयंसेवक होतो एवढेच . आम्ही लक्ष्मिनगरला राहता असताना देशपांड्यांनी घराच्या गेट वर विश्व हिंदू परिषदेच्या मुखपत्रावर असतो तसा मोठाला ॐ लावला होता. आता लक्ष्मिनगरच ते, तिथले लोक काय कमी टारगट होते काय! . त्यातून तो भाग दलित पंथर , R.P.I. अशा संघटनांचा प्रभाव असलेला. मग काय विचारता राव! एके दिवशी सकाळी सकाळी ( सोमवार असावा ) त्या ॐ ला हाडकांची माळ घातलेली, आणि ती पण बोकड किंवा कोंबडी नाही चांगली बैलाच्या किंवा गाईच्या मटणाची ( म्हणजे मला आपल साईज वरून वाटलं, केव्हढ मोठ एक एक हाड! आणि त्याची भोक एवढी मोठी होती कि त्यात दोरी नाही तर चांगली सुतळी ओवून पक्की माळ तयार केली होती सहज तोडता येऊ नये अशी. ) झालं , ते पाहून मातोश्रींचा फ्युज उडाला, आता रात्री कधीतरी जागून केलेल्या कष्टाच चीज होणार, तमाशा, गम्मत बघायला मिळणार या आशेने आसपासचे लोक लगेच आवंतण दिल्यासारखे गोळा होऊ लागले पण देशपांडे हुशार, त्यांनी शांतपणे माळ काढली , त्यातली हाडकं सोडवली आणि पिंटूला( आमचा कुत्रा) खायला त्याच्या ताटलीत वाढली. पिंट्याहि वस्ताद, बामणाच्या घरचं कुत्र ते,ते फुकट मिळाले मटाण सोडतय काय ? सकाळी सकाळी तिथे त्या ॐ च्याच खाली मोठ हाडूक तोंडात घेऊन जी समाधी लावली म्हणता ? देशपांडे अगदी सद्गदिद(!)होऊन तमाशा बघायला आलेल्यांना म्हणाले तुम्ही होता म्हणून पिंट्याला असं चांगलं चुंगलं खायला मिळतं नाहीतर आम्ही कुठे बडेका माल खरेदी करायला जाणार? आणि आम्हाला देतील तरी का ? एक काम कर शिवा ( हा उद्योग त्याचाच असा देशपांड्यांचा कयास होता )पुढच्या वेळे पासून अर्धा किलो पिंट्य़ा करता वेगळ घेऊन येत जा त्याचे ८ रु आधीच घेउन जा हो! ( म्हणजे १६ रु किलो बड्य़ाच मटण तेव्हा होत, हे देशपांड्यांना माहित होतं तर …अरे वा !) असो....
आज जर असा काही घडल तर दंगेच पेटायचे , पण नाही पेटणार कदाचित आमच्या देश्पाण्ड्य़ा सारखे डोकं ठिकाणावर आणि त्या डोक्यात पुरेशी विनोद बुद्धी आणि लहान सहन गोष्टीवरून दुखावली न जाणारी भावना असेल तर ….
---आदित्य
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे ही मस्त, आंदो !!!
हाहाहा
छानच लिहिताय. लिहिण्याची शैली
मस्त किस्सा. पण ते कोरडे
अहो तसे नाही , आता शिवाजी
ख्या ख्या ख्या ख्या!
अदित्य,
मस्त लेखन.
मस्त. पण थोडक्यात आटपले असं
खरोखरच बाप माणूस आहे.
मजा आली वाचताना. खरयं तुमचं!
ही तर
+1000
डोकं ठिकाणावर आणि त्या
छान लिहिता तुम्ही .........
भारीच लिहिलय की.
=))
होते.... ते 2001 मध्यच वारले
है शाब्बास ! याला म्हणतात
कुर्निसात
:)
भारीच!
भारीच!
मस्त अनुभव!
निरगुडकर वैद्य
वाईट्ट =))
अतिशय सुरेख . !!
कोरडे सर..
किस्सा मजेशीर आहे.
तुमचे पूर्वज महाराजांच्या
बय द वे "बडेका माल" म्हनजे
बीफ! बडा म्हणजे बैल.
अगा बाबौ...लैच जबर्या. मान
वावा खूप मजा आली वाचताना
भारीच!
आदित्य,
तुमच्या इरसाल वडिलां सारखे च
तुमच्या इरसाल वडिलां सारखे च
तुमच्या इरसाल वडिलां सारखे च