प्रत्येकाला जीवनात यशाची घाई असते,
यशाचीही चव भलतीच न्यारी असते,
ज्याने ती चाखली ती धन्य होतो,
जो वंचित राहिला बिचारा तो "अन्य" होतो !!
पण यशाच्या अंगी कुठलाही भेद नाही,
धर्म, पंत, जात, लहान, थोर नाही,
मनगटात बळ आणि मनात जिद्द असेल तर,
जगाला काबीज करणेही अशक्य नाही !!
तशीच यशाची एक दुसरीही बाजू असते,
ती तुम्हाला दुस्य्रांच्या ईर्षेच्या यादीत जोडते,
तुम्ही लाख स्वता बरोबर स्पर्धा करत असला तरी,
बाकी जग नेहमीच तुम्हाला प्रतियोगी म्हणून ओळखते !!
मित्रानो यशाचा असं कुठलंच सूत्र नाही,
मेहनत, बुद्धिमत्ता, निष्ठा यांना कुठलाही विकल्प नाही,
यश नाही मिळणार म्हणून जो प्रयत्न करणे सोडतो,
तो कधीच यशाच्या वर्मालेला पात्र होत नाही !!