दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
1 Oct 2016 - 12:05 pm

ह्या आधी- दीपशिखा

.

इस्टर्न व्हेनिस नावाने प्रसिध्द असलेल्या अलापुडा ह्या केरळमधल्या निसर्गरम्य गावामध्ये, एका रोमन कॅथोलिक कुटुंबात टेसीचा एप्रिल १९६४ मध्ये जन्म झाला. लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच खेळात आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटिज मध्येही ती उत्साहाने भाग घेत असे आणि बक्षिसे, ट्रॉफीज,कप्सही जिंकून आणत असे. उत्तम बॅडमिंटन खेळणार्‍या टेसीला आपण बॅडमिंटन चँपियन व्हावे असेही वाटत असे. पण नंतर मात्र बॅडमिंटन मागे पडले आणि त्रिशुर इंजिनिअरिंग कॉलेज मधून बी. टेक केल्यानंतर टेसी गायडेड मिसाइल्स मधील पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी पुण्यात आल्या..

त्याचं असं झालं, टेसीने आय ए एस ऑफिसरसाठीची लेखी परीक्षा दिली. त्यात अर्थातच त्या उत्तम गुणांनी पास झाल्याच पण विधीलिखित काही वेगळेच होते. डिफेन्स रिसर्च अँड ऑरगनायझेशन मधल्या मुलाखतीत त्यांची निवड तर झालीच पण आठवड्याभरातच त्यांच्या हातात दोन दिवसात रुजू व्हा असे पत्र पडले. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ह्या क्षेत्रात टेसी ह्यांनी पाउल ठेवले.

पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी येथे एम टेक करत असतानाच टेसीचे सरोजकुमार पटेल ह्या आपल्या सहकारी मित्राशी भावबंध जुळले आणि दोघे लग्नगाठीने बांधले गेले. हे आंतरधर्मीय लग्न दोन्ही कडच्या आईबाबांनी चांगल्या पध्दतीने स्वीकारले. सरोजकुमार भारतीय नेव्हीत कमोडोर आहेत. मुलगा तेजसही इंजिनियर आहे. तेजसचे नाव त्यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या भारताच्या लाढाऊ विमानावरून ठेवले आहे. कोणत्याही बाईसारखीच टेसीही करियर आणि घर सांभाळण्याची तारेवरची कसरत यशस्वीपणे करत आल्या. कित्येकदा मिसाइल प्रोग्राम आणि कौटुंबिक जाबाबादार्‍या ह्यांच्या रस्सीखेचीत दोन्हीचा तोल सांभाळणे कठिण होते. हे त्या अगदीच नमूद करतात. कुटुंबाचा आणि मित्रगणांचा भक्कम सपोर्ट असल्यामुळे त्या हे सारे यशस्वीपणे निभावून नेतात. इंडियन वूमन सायंटिस्ट असोसीएशनने तर टेसी ह्यांना घर आणि करियर उत्तमरीत्या सांभाळणार्‍या रोल मॉडेल म्हटले आहे. तसेच मिसाइल्सवर काम करताना एक बाई म्हणून त्यांना कोणताही वाईट अथवा वेगळा अनुभव आला नाही तर फक्त कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही.

एम टेक झाल्यानंतर डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी टेसी यांची अग्नी मिसाइल प्रोग्रामसाठी नेमणूक केली. काही वर्षातच त्यांनी क्षेपणास्त्राचे मार्गक्रमण अधिक अचूक कसे करता येईल ह्याबद्दलची क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणाली विकसित केली. एवढ्यावरच न थांबता रिएन्ट्री व्हेइकल सिस्टिम विकसित केली. ह्यात क्षेपणास्त्र अत्त्युच्च वेगाने मेघ गर्जनेसारखा आवाज करत ३००० अंश से तपमानाला वातावरणात पुनःप्रवेश करते. जुलै २००६ मध्ये चाचणीउड्डाणात जेव्हा ७५ सेकंदांकरता क्षेपणास्त्र अचानक नियंत्रणाबाहेर गेले तेव्हा टेसी आणि त्यांच्या सहकार्‍यांची खरी सत्वपरीक्षा होती. हे आव्हान स्वीकारून १० महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर टेसी व त्यांच्या चमूने हे उड्डाण यशस्वी करून दाखवले.

अग्नी ३, ४ आणि ५ वर काम केलेल्या टेसी ह्यांना मिसाइल वुमन ऑफ इंडिया ह्या सार्थ नावाने ओळखले जाते.
अग्नि २ च्या पुढचे अग्नि ३ ह्या ३५०० ते ५००० किमी रेंजच्या क्षेपणास्त्राची संभाव्य सीइपी ४० किमी आहे. तर पूर्वी अग्नि २ प्राइम नावाने ओळखले जाणारे अग्नि ४ हे मिसाइल ३ ते ४००० किमी रेंजचे आहे आणि अग्नि २ व ३ मधल्या त्रुटी ह्यात भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. तुलनेने वजनाला हलके असून ते रोड मोबाइल लाँचरनेही उडवले जाऊ शकते.
तर अग्नि ५ हे ५५०० किमी च्याही पुढे घुसणारे आणि कुठूनही मारा करता येऊ शकणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. आपल्या आण्विक अस्त्रांमधले ते अगदी बलशाली मिसाइल आहे ह्याचा डॉ. टेसींना सार्थ अभिमान आहे. आता अग्नि ६ वर काम चालू आहे. असे असले तरी ह्या शक्तिप्रदर्शक, विध्वंसक अस्त्रांकडे पाहण्याची त्यांची दॄष्टी मात्र 'शांतीचे अस्त्र' अशी आहे. सर्वत्र शांती नांदण्यासाठीची आवश्यक अस्त्रे! विरोधाभास आहे खरा! पण सद्य परिस्थितीत त्यांचे हे विधान किती खरे आहे याचीच खात्री पटते.

टेसी ह्यांचे गुरु आणि आदर्श डॉ. कलाम ह्यांना मिसाइल मॅन ऑफ इंडिया म्हणतात त्यामुळे टेसी ह्यांना आपल्या ह्या टोपणनावाचा अभिमान वाटतो. मदर टेरेसा ह्यांच्या नावामुळे त्यांचे पाळण्यातले नाव टेसी ठेवले गेले आणि आता ही अग्निपुत्री मिसाइल वुमन ऑफ इंडिया झाली आहे.डॉ. टेसींना २०१४ साली वाय नायडूम्मा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित केले आहे..तसेच त्यांना क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात भारत स्वावलंबी बनण्यासाठीच्या मोलाच्या योगदानाबद्दल लालबहादुरशास्त्री राश्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतातील विज्ञानविषयक सर्वोच्च शांतीस्वरुप भटनागर पुस्काराने सन्मानित केले आहे. अशा अनेक पुरस्कारांनी ही अग्निपुत्री सन्मानित होवो आणि यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करो ह्याच खूप सार्‍या शुभेच्छा!

समाजजीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

वा! 'अग्निशिखे' ला सलाम! रीएंट्री व्हेईकल म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन पुन्हा जमिनीवर येऊन लक्ष्यभेद करणारे क्षेपणास्त्र. जगातल्या कुठल्याही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेकडे अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राला अटकाव करण्याचे तंत्रज्ञान नाहीये. डॉ. टेसी थॉमस यांचा फार अभिमान वाटतो.

या लेखमालेसाठी फार फार धन्यवाद. पुढील लेखांची आवर्जून वाट पाहिली जाईल.

शलभ's picture

6 Oct 2016 - 5:51 pm | शलभ

मस्त लेख..
तुमची वरील माहीती पण मस्त.

प्रचेतस's picture

1 Oct 2016 - 12:35 pm | प्रचेतस

उत्तम लेख.
पुभाप्र

अभ्या..'s picture

1 Oct 2016 - 12:37 pm | अभ्या..

बापरे. अतुलनीयच.
.
.मला तर ह्या केरळी सिरिअन ख्रिश्चनांचे कायम कौतुक वाटते. कुठून आणलीय हि अचाट बुध्दीमत्ता या मथाई, जोसेफ आणि थॉमसांनी?

आणि महत्त्वाचे म्हणजे फोटोत त्या अगदी आपल्या घरातल्या कुणीतरी आहेत असे वाटते. एकदम फॅमिलिअर साधा अ‍ॅपिअरन्स.

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Oct 2016 - 3:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

टेसी थॉमस ह्या सीरियन ख्रिस्ती आहेत अभ्या, ही लोकं ख्रिस्त वारल्याच्या लगेच नंतर म्हणजे सेंट थॉमस द अपोस्टल भारतात आला होता तेव्हा ख्रिस्ती झालेले लोकं आहेत. थोडक्यात व्हॅटिकन मध्ये पेपल सीट बनवायच्या आधी किंवा त्या दरम्यानच ख्रिस्ती झालेले हे लोक विलक्षण शांतीप्रिय असतात, धर्मांतर करण्यामुळे बदनाम झाला ख्रिस्ती धर्म तो त्याच्या इतर डिनोमीनेशन्स मुळे उदा, प्रेबिस्टरीयन अन पेंटाकोस्टल इत्यादी, सीरियन ख्रिस्ती हे conversion वगैरेला थारा देत नाहीत जास्त, आता ते मानवतावाद म्हणून का स्वतःला प्युरिटन म्हणून जास्त सोवळे मानून धर्मांतर करत नाहीत हे सांगता येणे कठीण आहे. ह्यांच्या प्रत्येक चर्चमध्ये 15 ऑगस्ट अन 26 जानेवारीला कंपल्सरी ध्वजवंदन असते अन प्रत्येकाला तिथे जावेच लागते, असा हा एकंदरीत २००० वर्षे जुना समाज आहे.

हो. मी असं ऐकलय की केरळातील नंबुद्रींचा एक बंडखोर गट ख्रिस्ती झाला. तेच हे सिरिअन ख्रिस्ती. त्यांची बँक पण मुंबई आणि गोव्यात पाह्यलीय. परराश्ट्र सेवेत, सचिवालयात आणि उच्च बुध्दीजीवी मंडळात ह्यांचे प्राधान्य असायचेच.
वर्गीस कुरीअन, मथाई जोसफ, टी थॉमस आणि अशीच बरीच काही नांवे.

नाखु's picture

1 Oct 2016 - 3:19 pm | नाखु

आणि ही पूरक माहीती दोन्ही आवडली.

घरकामाचे(गृहिणी या अर्थाने) ओढणे न मानता आणि मानाच्या नोकरीचे अवडंबर न ठेवता केल्ल्या कसरतीबद्दल आणि यशाबद्दल अभिनंदन

पिलीयन रायडर's picture

3 Oct 2016 - 4:01 am | पिलीयन रायडर

अगदी असेच म्हणते!

लेख वाचुन अत्यंत अभिमान वाटला. सोन्याबापुंनी दिलेली माहिती सुद्धा आवडली.

गिरिजा देशपांडे's picture

1 Oct 2016 - 12:54 pm | गिरिजा देशपांडे

छान माहिती करून दिलीये, पुलेशु आणि पुभाप्र

सपे-पुणे-३०'s picture

1 Oct 2016 - 12:56 pm | सपे-पुणे-३०

छान लिहिलंय! थोडक्यात पण चांगली ओळख करून दिली आहे. आपल्याला ह्या व्यक्ती जरी माहित असल्या तरी मुद्दाम त्यांच्याबद्दल माहिती करून घेणं क्वचितच घडतं.

अतिशय उत्तम विषयावर लेखमाला.प्रसंगोचितसुध्दा.
पुभाप्र

उत्तम ओळख स्वातीताई, धन्यवाद!

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Oct 2016 - 1:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

अतिशय उत्तम लेख, एक दुरुस्ती सुचवतो, तो जिल्हा अलापूज्झा नाही तर अलापुडा असा उच्चारला जातो. बाकी सर्वोत्तम लेख.

स्वाती दिनेश's picture

1 Oct 2016 - 1:28 pm | स्वाती दिनेश

दुरुतीबद्दल धन्यवाद, करते योग्य बदल,
स्वाती

प्रीत-मोहर's picture

1 Oct 2016 - 1:33 pm | प्रीत-मोहर

सुरेख लेखमाला ताई!!

नूतन सावंत's picture

1 Oct 2016 - 2:01 pm | नूतन सावंत

वेळेवर आलाय लेख,स्वाती,छान ओळख करून दिली आहेस,या वेगळ्या क्षेत्रातल्या तारकेची.पुभाप्र.

महासंग्राम's picture

1 Oct 2016 - 3:32 pm | महासंग्राम

अतिशय सुंदर लेख, पुभाप्र.

वरुण मोहिते's picture

1 Oct 2016 - 3:51 pm | वरुण मोहिते

पुभाप्र

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2016 - 4:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टेसीची ओळख आवडली. पुलेशु.

-दिलीप बिरुटे

पद्मावति's picture

1 Oct 2016 - 5:44 pm | पद्मावति

समयोचित आणि माहितीपूर्ण लेखमाला.

रेवती's picture

1 Oct 2016 - 6:46 pm | रेवती

छान ओळख करून दिलिये.

प्राची अश्विनी's picture

1 Oct 2016 - 7:05 pm | प्राची अश्विनी

ओळख आवडली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Oct 2016 - 7:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

ही बाई म्हणजे, सिपरीचं (स्टॉकहोम पीस रिसर्च इन्स्टिट्यूटचं) दुःस्वप्न असावं असली आहे राव ! शांतीअस्त्र, कमाल कमाल अन फक्त कमाल.

स्रुजा's picture

1 Oct 2016 - 8:18 pm | स्रुजा

वाह, स्वाती ताई. अभिमान वाटतो अशा स्त्रियांचा. दिसायला किती साध्या आहेत आणि !

सौन्दर्य's picture

2 Oct 2016 - 9:48 am | सौन्दर्य

उत्तम माहिती आणि साध्या शब्दातील ओघवत्या शैलीतला लेख. आवडला.

सुंदर लेख.. एकदम भारी सुरू आहे लेखमाला..!!!

पैसा's picture

2 Oct 2016 - 10:08 am | पैसा

दिसायला किती साध्यासुध्या! ही ओळख फारच आवडली. करियर करण्यासाठी घर संसार सोडून भटकायची गरज नसते हेच टेसीनी दाखवून दिलंय.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि तितकीच सुरेख ओळख. धन्यवाद स्वातीताई !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2016 - 7:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

अभिमानास्पद कामगिरी केलेल्या मिसाईल वूमन ऑफ इंडियाची ओळख खूप आवडली !

चाणक्य's picture

4 Oct 2016 - 6:41 am | चाणक्य

छान ओळख.

शिव कन्या's picture

3 Oct 2016 - 9:58 pm | शिव कन्या

प्रेरणादायक. आवडले.

रुपी's picture

4 Oct 2016 - 12:06 am | रुपी

छान ओळख!

अनुप ढेरे's picture

4 Oct 2016 - 10:38 am | अनुप ढेरे

मस्तं!

निकु's picture

4 Oct 2016 - 12:30 pm | निकु

एका नवीन व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !!!!

रातराणी's picture

4 Oct 2016 - 1:28 pm | रातराणी

सही!

सस्नेह's picture

4 Oct 2016 - 1:39 pm | सस्नेह

आणि लेखमाला. पहिले पुष्प जबरी !

अभिजीत अवलिया's picture

6 Oct 2016 - 6:54 am | अभिजीत अवलिया

वा !!!

अनन्न्या's picture

9 Oct 2016 - 9:22 am | अनन्न्या

सुंदर लेखन!

मी-सौरभ's picture

13 Oct 2016 - 6:44 pm | मी-सौरभ

आवडेश

त्रिवेणी's picture

16 Oct 2016 - 7:57 pm | त्रिवेणी

मस्त लेख आणि माहितीपुर्ण प्रतिसात.मला त्यांचे डोळे भारी आवडले.