बाप्पाचा नैवेद्य - बीट आणि खोबऱ्याच्या वड्या

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in लेखमाला
10 Sep 2016 - 6:50 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

बीट आणि खोबऱ्याच्या वड्या
.

साहित्य :
किसलेले बीट , - १/२ कप
खवलेले ओले खोबरे - १ कप (कपात खोबरे हाताने दाबून भरून घ्यावे )
साखर - १ १/४ कप
वेलची पूड- १ टीस्पून किंव्हा रोझ इसेंस - २ ते ३ थेब
सायीसकट दूध- १ कप
साजूक तूप- १ टेबलस्पून + १ टीस्पून

कृती:
बीट स्वच्छ धुऊन आणि सोलून घ्यावे. किसणीवर किसून घ्यावे.
खोबरे खवल्यावर फक्त पांढरा भागच घ्यावा.
जाड बुडाचे नॉन- स्टिक भांडे घेऊन त्यात १ टेबलस्पून तूप गरम करावे, लगेच त्यात बिटाचा कीस घालून ५-७ मिनिटे मऊ होईपर्यंत परतावा.
नंतर त्यात खवलेले खोबरे, साखर, दूध घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. सतत ढवळावे. आच मध्यम ठेवावी. प्रथम मिश्रण पातळ होईल पण नंतर घट्ट होऊ लागेल.
ताटाला तूप लावून तयार ठेवावे. मिश्रणात वेलची पूड घालावी व सतत ढवळावे. मिश्रण हळूहळू भांड्याच्या लागेल व कोरडे होऊ लागेल.
भांडे गॅस वरून उतरावे व लगेच तूप लावलेल्या ताटात मिश्रण काढून वाटीच्या मागच्या भागाने पसरावे व दाबावे.
गरम असतानाच सुरीने वड्या पाडाव्यात.
थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात. ८ दिवसापेक्षा जास्त ठेवायच्या असतील तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.

प्रतिक्रिया

अजया's picture

10 Sep 2016 - 6:50 am | अजया

छान दिसत आहेत वड्या. आमच्याकडे गणपतीत एक तरी प्रसाद अशा वड्यांचा असतोच.

सुंदर रंगीत वड्या आवडल्या :)

पिलीयन रायडर's picture

10 Sep 2016 - 7:15 am | पिलीयन रायडर

सुंदर आणि पौष्टीक!

नेहमीप्रमाणेच छान रेसेपी!

प्रीत-मोहर's picture

10 Sep 2016 - 7:25 am | प्रीत-मोहर

सुंदर

रेवती's picture

10 Sep 2016 - 8:00 am | रेवती

रंग मस्त आलाय वड्यांना.
खोबरे घालून कधी केल्या नव्हत्या.
नुसत्या बिटाच्या करते कधीकधी.
http://misalpav.com/node/9383

पूर्वाविवेक's picture

13 Sep 2016 - 3:21 pm | पूर्वाविवेक

खूप छान रेवाक्का. तुझी वडी बीट बर्फी सारखी वाटते आहे.

अनन्न्या's picture

10 Sep 2016 - 10:12 am | अनन्न्या

रंग अगदी परफेक्ट आलाय!

नूतन सावंत's picture

10 Sep 2016 - 10:37 am | नूतन सावंत

सुंदर रन्ग आलाय.

स्वाती दिनेश's picture

10 Sep 2016 - 12:04 pm | स्वाती दिनेश

बीट+खोबर्‍याच्या वड्या सुरेख दिसत आहेत.
स्वाती

त्रिवेणी's picture

10 Sep 2016 - 3:55 pm | त्रिवेणी

सुंदर रंग आलाय वड्यांना.

यशोधरा's picture

10 Sep 2016 - 3:56 pm | यशोधरा

मस्त दिसतायत वड्या.

पैसा's picture

10 Sep 2016 - 4:21 pm | पैसा

मस्त प्रकार!

भुमी's picture

10 Sep 2016 - 6:25 pm | भुमी

किती सुरेख रंग आलाय वड्यांना ,छानच.

रंग फार च सुरेख आलाय. पौष्टिक शिवाय ! नक्की करुन बघणार.

रुपी's picture

11 Sep 2016 - 6:50 am | रुपी

छान!
मीही करते अश्या वड्या. फक्त बीट शिगवून घेते आधी थोडा.

सपे-पुणे-३०'s picture

12 Sep 2016 - 8:55 am | सपे-पुणे-३०

हो, मीही बीट शिजवूनच करते. त्यांचा रंग थोडा लालसर येतो. आता अशाही करून पाहीन.

पूर्वाविवेक's picture

13 Sep 2016 - 3:18 pm | पूर्वाविवेक

हो असंही चालेल.बिट उकडून घेतले तर लवकर शिजेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2016 - 4:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वड्या मस्त दिस्ताहेत. छान.

-दिलीप बिरुटे

विवेकपटाईत's picture

11 Sep 2016 - 4:55 pm | विवेकपटाईत

वड्या आवडल्या. करून बघण्यासारख्या. घरात ३-४ नारळ दिसतात आहे, आज घरा शेजारी शनी बाजार लागणार आहे. सौ.ला बीट्स विकत घ्यायला सांगतो. घरात दहा दिवसांचा गणपती असतो. नवीन प्रसाद दाखविता येईल. असो.

शिव कन्या's picture

11 Sep 2016 - 10:36 pm | शिव कन्या

दिसायला सुंदर.
करायला सोप्प्या.
आवडेश.

सानिकास्वप्निल's picture

13 Sep 2016 - 12:22 am | सानिकास्वप्निल

काय सुंदर रंग आलाय वड्यांना.
मला नारळाची वडी खूप आवडते त्यात गाजर, टोमॅटो रस मिसळलेली ही आवडते,
बिटाची कधी खाल्ली नाही पण रंग बघून खावीशी वाटत आहे :)

प्रभाकर पेठकर's picture

13 Sep 2016 - 2:13 am | प्रभाकर पेठकर

छान सुंदर दिसताहेत वड्या. करून पाहिल्या पाहिजेत.

सविता००१'s picture

13 Sep 2016 - 3:27 pm | सविता००१

रंग आलाय

पद्मावति's picture

13 Sep 2016 - 3:36 pm | पद्मावति

वड्या सुरेख दिसताहेत.

इशा१२३'s picture

13 Sep 2016 - 5:33 pm | इशा१२३

छान रंग आलाय.मस्त पाकृ.

इशा१२३'s picture

13 Sep 2016 - 5:33 pm | इशा१२३

छान रंग आलाय.मस्त पाकृ.

किसन शिंदे's picture

13 Sep 2016 - 5:44 pm | किसन शिंदे

फोटो कोणत्याच ब्राऊजरमध्ये दिसत नाहीत.

पूर्वाविवेक's picture

13 Sep 2016 - 7:23 pm | पूर्वाविवेक
दिपक.कुवेत's picture

16 Sep 2016 - 1:23 pm | दिपक.कुवेत

पण मला ह्या वड्या अजीबात आवडत नाहि. बीट कोशींबीरितच शोभून दिसतो....वडित त्याची कल्पनाच सहन होत नाहि. एकदाच चुकुन ह्या वड्या खाल्ल्या होत्या....बस तोच पहिला आणि शेवटचा दिवस..