बीट आणि खोबऱ्याच्या वड्या
साहित्य :
किसलेले बीट , - १/२ कप
खवलेले ओले खोबरे - १ कप (कपात खोबरे हाताने दाबून भरून घ्यावे )
साखर - १ १/४ कप
वेलची पूड- १ टीस्पून किंव्हा रोझ इसेंस - २ ते ३ थेब
सायीसकट दूध- १ कप
साजूक तूप- १ टेबलस्पून + १ टीस्पून
कृती:
बीट स्वच्छ धुऊन आणि सोलून घ्यावे. किसणीवर किसून घ्यावे.
खोबरे खवल्यावर फक्त पांढरा भागच घ्यावा.
जाड बुडाचे नॉन- स्टिक भांडे घेऊन त्यात १ टेबलस्पून तूप गरम करावे, लगेच त्यात बिटाचा कीस घालून ५-७ मिनिटे मऊ होईपर्यंत परतावा.
नंतर त्यात खवलेले खोबरे, साखर, दूध घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. सतत ढवळावे. आच मध्यम ठेवावी. प्रथम मिश्रण पातळ होईल पण नंतर घट्ट होऊ लागेल.
ताटाला तूप लावून तयार ठेवावे. मिश्रणात वेलची पूड घालावी व सतत ढवळावे. मिश्रण हळूहळू भांड्याच्या लागेल व कोरडे होऊ लागेल.
भांडे गॅस वरून उतरावे व लगेच तूप लावलेल्या ताटात मिश्रण काढून वाटीच्या मागच्या भागाने पसरावे व दाबावे.
गरम असतानाच सुरीने वड्या पाडाव्यात.
थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात. ८ दिवसापेक्षा जास्त ठेवायच्या असतील तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.

वाचने
15853
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान दिसत आहेत वड्या.
सुंदर रंगीत वड्या आवडल्या :)
सुंदर आणि पौष्टीक!
सुंदर
रंग मस्त आलाय वड्यांना.
खूप छान रेवाक्का. तुझी वडी
In reply to रंग मस्त आलाय वड्यांना. by रेवती
छान दिसतायत वड्या
सुंदर रन्ग आलाय.
वा..
सुंदर रंग आलाय वड्यांना.
मस्त दिसतायत वड्या.
वा!
किती सुरेख रंग
रंग फार च सुरेख आलाय. पौष्टिक
छान!
हो, मीही बीट शिजवूनच करते.
In reply to छान! by रुपी
हो असंही चालेल.बिट उकडून
In reply to छान! by रुपी
छान.
वड्या आवडल्या. करून
दिसायला सुंदर.
काय सुंदर रंग आलाय वड्यांना.
क्लासिक.
अप्रतिम
वड्या सुरेख दिसताहेत.
छान रंग आलाय.मस्त पाकृ.
छान रंग आलाय.मस्त पाकृ.
फोटो कोणत्याच ब्राऊजरमध्ये
आता पहा... http:/
In reply to फोटो कोणत्याच ब्राऊजरमध्ये by किसन शिंदे
पाकृ छान