प्रपोज करताय...अरे थांबा !

पारोळेकर's picture
पारोळेकर in काथ्याकूट
24 Sep 2008 - 2:19 pm
गाभा: 

काय? तुम्हाला कुणाला प्रपोज करायचंय! मग 'व्हॅलेंटाइन डे' ची वाट बघतांय? अरे हो, तो तर जागतिक प्रेम दिन! नाही का? तोपर्यंत थांबलात तर चला ठीक आहे. पण ती तोपर्यंत थाबंली पाहिजे ना! अरे घाईघाईत कुठे चाललात? 'प्रपोज' करायला? अरे थांबा थांबा, अभ्यास न करता कुठे देताय परीक्षा! तुम्ही म्हणत असाल, प्रपोज करण्यासाठी अभ्यासाची काय गरज? तुमचा हाअतिउत्साह महागात पडू शकतो. 'उचलली जीभ अन् लावली टाळ्याला' असं प्रेमात करून चालत नाही! प्रत्येक शब्द तोलून मोलून वापरावा लागतो. गोंधळून चालत नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन' हे तत्त्व लक्षात ठेवा. म्हणूनच 'प्रपोज करण्याच्या गोल्डन रूल्स'चा 'सिलॅबस' पूर्ण करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

रूल्स नं. 1.
आई-बाबाची अनुमती महत्त्वाची
जमाना बदलला असला तरी आपल्याला आपली संस्कृती व परंपरा यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांचा सन्मान करावाच लागेल. आई-बाबांशी या विषयी चर्चा करून झाल्यावर तुम्ही ज्या कुणाला प्रपोज करणार आहात तिच्या घरच्या मंडळीशी बोला. त्यानंतरच तिच्यासमोर प्रस्ताव ठेवा.

रूल्स नं. 2.
हृदयातून संवाद साधा
तिला प्रपोज करताना तुमच्या आवाजात गोडवा पाहिजे. तुमचे मधुर शब्द, वाक्ये तिच्या हृदयाला स्पर्श करणारी असावीत. तिच्याशी संवाद साधताना आत्मस्तुतीला बळी पडू नका. तुम्हाला ज्या काय भावना व्यक्त करायच्या आहेत, त्या कमी व अर्थपूर्ण शब्दात सांगा. तुमचे वक्तव्य हे थोडक्यात पण महत्त्वाचे असे असले पाहिजे. कारण तुमच्या भावना तिच्यापर्यंत सहज व 'लव'कर पोहचतील.

रूल्स नं. 3.
'क्रिएटिव्ह' व्हा
'प्रेम' जीवनाच्या बागेत अलगद उमलणारे फूल आहे. परंतु, त्या फुलाचा सुगंध 'लव'करच संबधित व्यक्तीपर्यंत पोहचला पाहिजे. 'प्रपोज' करण्याची संधी आयुष्यात (कदाचित) एकदाच येते. त्यासाठी 'रोमँटिक' व्हा, 'क्रिएटिव्ह' व्हा... तो क्षण तिच्या व तुमच्या आयुष्याला अविस्मरणीय झाला पाहिजे अशी योजना करा. त्यासाठी तुम्ही आधी कुठे भेटला होता, त्या स्थळी अथवा एखाद्या रम्य अशा कातरवेळी 'लव्ह'पॉंईंटवर तुमच्या अबोध मनाच्या कप्प्यात तिच्या विषयी लपलेल्या भावना तिच्यासमोर व्यक्त करा.

रूल्स नं. 4.
पूर्वतयारी महत्त्वाची
पूर्वतयारी करत असताना करंगळीचे माप माहीत नाही? चिंता नाही. तेच माहीत करून घेण्यासाठी नाजून 'फॅशनेबल रिंग' घेऊन जायला विसरू नका. तिला आवडेल अशा पद्धतीने सजून जा. तिला आवडणारे कॉम्बीनेशन लक्षात घ्या. परिधान केलेला ड्रेस तुमचे व्यक्तिमत्त्व व स्वभाव यांची ओळख करून देतो हे विसरू नका.

रूल्स नं. 5.
'ते' क्षण कॅमेर्‍यात टिपा
ती आणि तुम्ही एका रम्य सायंकाळी नदीच्या काठावर अथवा आवडणार्‍या स्थळी आहात. त्याचवेळी तुमच्या मनातील तिच्या विषयीच्या भावनांना शब्दरूप देऊन झाल्यानंतर तिचा होकार मिळताच एकदम बावरून जाऊ नका. तुमच्या मोबाईलमधील कॅमेर्‍यात तिची प्रत्येक अदा टिपा. व्यक्तीच्या आयुष्यात ही एकदाच घडणारी घटना असल्याने त्या घटनेला आयुष्यभरासाठी सजवून ठेवा. जीवनाच्या प्रवासात छायाचित्र निहाळून 'त्या' गुलाबी क्षणाला अधूनमधून उजाळा देता येऊ शकतो.

रूल्स नं. 6.
लॉंग ड्राईव्ह
तिने शहराबाहेर निवांत अशा वातावरणात जाण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर शहरापासून साधारण 15 ते 20 किमी अंतरावरच्या प्रेक्षणीय स्थळी, निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन तिला प्रपोज करू शकता.

पहिल्या नियमात घरातील ज्येष्ठांची अनुमतीची प्रक्रिया तुम्ही यशस्वीरित्या पार केली म्हणजे तुमचे 50 टक्के काम झाले समजा. मात्र तिच्या होकाराशिवाय तुमची डाळ कुठेच शिजत नाही. तुम्ही तिला आत्मविश्वासाने प्रपोज केले तरी तुमचा प्रस्ताव फेटाळण्यासाठी तिच्याकडे अनेक कारणं असू शकतात किंवा तिच्या काही अडचणी तुमच्यात आडव्या येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आल्या पावली मागे जावे लागते. 'ब्रेकअप'नंतर हताश होऊ नका किंवा तिला त्रास होईल, असे वक्तव्य करू नका. एकाकीपणाला सामोरे जाण्यासाठी या काही टिप्स तुमच्या सोबतच राहतील....

'देवदास' न होण्यासाठी....

* सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वत:ला कमी समजण्याची गल्लत करू नका. मनातील न्यूनगंड आधी झटका.
* हताश न होता चेहर्‍यावर नेहमी हास्य ठेवा. तुम्हाला ब्रेकअपचे दु:ख नक्की झाले असेल मात्र ते अशा पद्धतीने लपवा की, त्याचा सुगावा कुणालाही लागता कामा नये.
* दिवसभरातील काही वेळ स्वत:साठी राखून ठेवा व त्यात आपण आपल्या आयुष्यातले सुवर्णक्षण गमावले आहे. त्यावर आत्मपरिक्षण करा.
* अशा परिस्थितीत मित्र व परिवारातील सदस्यांची सोबत खूप महत्त्वाची असते.
* तुम्ही नोकरी करत असाल तर काही दिवसांची सुटी घेऊन बाहेरगावी फिरायला निघून जा.
* अशा वेळी स्वत:ला अशा छंदामध्ये गुंतवून जा की, तुम्हाला तो छंद जोपासण्याची मनापासून इच्छा आहे.

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

24 Sep 2008 - 2:22 pm | सखाराम_गटणे™

विकीने हे फंडे वापरले होते का?
आता तो काय करतो?
समुपदेशन ????????????????????

-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

टारझन's picture

24 Sep 2008 - 2:37 pm | टारझन

देवदास न होण्यासाठी ......
=)) =)) =)) =))

बाकी घरची अनुमती म्हणजे ५०% काम फत्ते ? ये कुच पट्या नही ..
कोड असा हवा
#आयात < आत्मविश्वास.ह>
# आयात < परिस्थिती.ह >
# आयात < माहिती.ह>

वॉइड मुख्य ()
{
अंक क्ष=०,य;

अक्षर घ्या[१०] = {"भगवे वस्त्र",पावशेर गांजा,"हिमालय यात्रा टिकीट",}

क्ष=प्रपोज_करा(पोरगी_अबक);

जर (क्ष==१)
{
य=परवानगी (आईबाबा);
जर (य=१) जा_सुखी_व्हा();

}
अन्यथा
{
आयुष्य= &घ्या;
}

एकदा_दाबा();
}

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

पारिजातक's picture

24 Sep 2008 - 5:58 pm | पारिजातक

झक्कास प्रोग्राम लिहिला राव तुम्ही.. :)

पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

टारझन's picture

24 Sep 2008 - 6:29 pm | टारझन

आहो मनसे ने धमकी दिल्या पासून आम्ही प्रोग्राम कोडींग देखील मराठी मधे करतो ... हा तर किरकोळ कोड आहे. :)

मनसे झिंदाबाद .. मराठी झिंदाबाद

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

धनंजय's picture

25 Sep 2008 - 2:13 am | धनंजय

झकास प्रणाली!

व्हॉइड साठी मराठी "क" भाषेत "पोकळी" शब्द आहे ना?

अवलिया's picture

24 Sep 2008 - 2:44 pm | अवलिया

रूल्स नं. 1.
आई-बाबाची अनुमती महत्त्वाची
नाही
आई बाबांची अनुमती मिळुन तुम्ही प्रपोज करेपर्यत तिला कुणी घेवुन गेला अन आई बनवुन गेला तर तुम्ही गेले बाराच्या भावात.

रुल्स नं. 2.
हृदयातून संवाद साधा

अहो हृदय गेले तिन टैम. खिसा भरलेला पाहीजे काय?
हृदयाला हल्ली परदुषणामुळे कुणी विचारीत नाही बाबा.

रूल्स नं. 3.
'क्रिएटिव्ह' व्हा
अहो ती हो म्हटली की होतोच की किर्र अंधारात एक्टिव्ह
आधिच नको

रूल्स नं. 4.
पूर्वतयारी महत्त्वाची
काही उपयोग होत नाही. अहो करंगळीचे माप चुकले तरी काही फरक पडत नाही. तिने तुमचे माप काढले नाही म्हणजे बास

रूल्स नं. 5.
'ते' क्षण कॅमेर्‍यात टिपा
कशाला ते जीवाला नस्ता ताप.
अन 'ते' क्षण टिपायचे तर 'ते' काम कोण करणार... काही सांगता राव

रूल्स नं. 6.
लॉंग ड्राईव्ह
अहो बोचा आंबतो लॉंग ड्राईव्हने. जवळच पटकन आटोपायचे हो.. छ्या

'देवदास' न होण्यासाठी....

* सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वत:ला कमी समजण्याची गल्लत करू नका. मनातील न्यूनगंड आधी झटका.
आम्ही समजत नाही हो कमी... काळजी नको

* हताश न होता चेहर्‍यावर नेहमी हास्य ठेवा. तुम्हाला ब्रेकअपचे दु:ख नक्की झाले असेल मात्र ते अशा पद्धतीने लपवा की, त्याचा सुगावा कुणालाही लागता कामा नये.
अहो ब्रेकअपचे दुःख आहे असे कळले की मैत्रीणी चला आपला नंबर लागेल असे समजुन जवळ येतात. डोळे पुसतात पदराने ..काय सांगु राव छ्या तुम्ही फारच अनाडी

तसे आम्ही देवदास होत नाही..

तुमचा लेख चांगला आहे पण काय सांगु का.. प्रत्येक अनुभव वेगळा असतो. असे नियम नाही बनवता येत

ब्रिटिश टिंग्या's picture

24 Sep 2008 - 2:46 pm | ब्रिटिश टिंग्या

>> आई बाबांची अनुमती मिळुन तुम्ही प्रपोज करेपर्यत तिला कुणी घेवुन गेला अन आई बनवुन गेला तर तुम्ही गेले बाराच्या भावात.

हा हा हा!

पारोळेकर's picture

24 Sep 2008 - 4:10 pm | पारोळेकर

चेंगट साहेब, धन्यवाद.... धन्यवाद.... त्रिवार धन्यवाद.
तुम्ही दिलेली प्रतिक्रिया अप्रतीम आहे.

ज्या कुणाला प्रपोज करणार आहात तिच्या घरच्या मंडळीशी बोला

म्हणजे १००% जोडा खावा लागेल..

सखाराम_गटणे™'s picture

24 Sep 2008 - 2:55 pm | सखाराम_गटणे™

>>अशा वेळी स्वत:ला अशा छंदामध्ये गुंतवून जा की, तुम्हाला तो छंद जोपासण्याची मनापासून इच्छा आहे.

एक लक्षात ठेवा की,
एक विष मारण्यासाठी दुसरे विषच लागते.

(आणि आमच्या स्वाक्षर्या नियमीत वाचत जा.)
-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

टारझन's picture

25 Sep 2008 - 3:06 am | टारझन

(आणि आमच्या स्वाक्षर्या नियमीत वाचत जा.)
गटणे भौ ते स्वाक्षर्या जरा स्वाक्षर्‍या असं लिहीलं तर बरं होइल, कारण आम्ही तुमच्या स्वाक्षर्या वाचल्याकी आम्हाला दिनचर्या, भार्या , इ.इ. शब्दांचा भास होतो. तो र जोडताना शिफ्ट कळ दाबा म्हंजे 'र्' चा ' र्‍ ‍' होइल

असुदलेकक
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

विनायक प्रभू's picture

24 Sep 2008 - 3:05 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
आपल्या पहिल्या परिच्छेदातच सर्व घोटाळा आहे. जिभेला टाळ्याला लावायचा उद्योग न करता तिचा योग्य वापर करावा. फक्त फर्स्ट इंप्रेशन करिता एवढा त्रास घेण्याचे कारण नाही.
वि.प्र.
केल्याने होत आहे रे
आधी केलेच पाहिजे

सखाराम_गटणे™'s picture

24 Sep 2008 - 3:21 pm | सखाराम_गटणे™

लेख चांगला आहे. तुम्ही नवीन आहात, उगाच तुम्ही नाउमेद होउ नये,
मिपावर नेहमीच नवीन लेखकांचे आणि लेखनाचे स्वागत आहे.

-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

पारोळेकर's picture

24 Sep 2008 - 4:06 pm | पारोळेकर

तुम्हाला सांगू मला खूप धीर आला.
नाडीला घाबरु नका........... मस्तच आहे.

अनिल हटेला's picture

24 Sep 2008 - 6:03 pm | अनिल हटेला

प्रपोज करत आहात ?

नाडीला घाबरू नका!!!!!!!

सही!!!!!

( बस ट्रेन लडकी , एक गयी तो दूसरी आती है !!)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

भोचक's picture

24 Sep 2008 - 6:42 pm | भोचक

बस ट्रेन लडकी , एक गयी तो दूसरी आती है !!)
हे बरिक खरे

'भ'ची बाराखडी माहित असणारा
(भोचक)

पिवळा डांबिस's picture

2 Oct 2008 - 8:55 am | पिवळा डांबिस

बस ट्रेन लडकी , एक गयी तो दूसरी आती है !!)
आणि पहिली गच्च भरलेली असली तरी......
द्सरीत आपल्यासाठी जागा असते हे महत्वाचे....
:)

भास्कर केन्डे's picture

25 Sep 2008 - 1:59 am | भास्कर केन्डे

काय राव उगी नसत्या जखमांवर मीठ चोळताय... लिहायला बरेच काही आहे पण न लिहिलेलेच बरे... तिने अथवा हिने कोणीही पाहिले तरी माप घेतले जाणार हे नक्की... जाऊ द्या. पुन्हा कधीतरी.
(आजकालच्या पोरा-पोरींना समुदेशन देण्याइतका खजिना खचितच आहे आपल्याकडे. पण मिपाच्या मसाल्यात दाभेली नको म्हणून हात आखडता घेत आहोत.)

बाकी नानांचा प्रतिसाद बेश्टच... खमक्या... आवडला. ह ह लो पो...

आपला,
(मी माझा) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विकि's picture

25 Sep 2008 - 6:56 pm | विकि

तुम्ही समुपदेशक आहात का? असाल तर मला सांगा प्रपो़ज करताना पोरगी थांबली नाही आंणि सरळ निघून गेली तर पुढे काय?
अपेक्षीत उत्तर धा.

पिवळा डांबिस's picture

2 Oct 2008 - 9:09 am | पिवळा डांबिस

त्या पोरीची ऐशीवैशी, दुसरी पोरगी शोधा....

सर्किट's picture

2 Oct 2008 - 9:11 am | सर्किट (not verified)

आणि पोरगी थांबली नाही, तर पोरगा शोधा. तो नक्की थांबेल.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

ऍडीजोशी's picture

1 Oct 2008 - 9:45 pm | ऍडीजोशी (not verified)

मधे मी यशस्वी रित्त्या प्रपोज कसे करावे ह्या बद्दल एक मेल वाचले होते.

एका रोमँटीक रात्री तिला प्रायव्हेट बोटीवर घेऊन जायचे.
जगापासून आणि किनार्‍या पासून दूर समुद्रात बोट न्यायची. जिथे आजू-बाजूला नजर पोचेल तिथवर पाणी आणि वर चंद्र साक्षीला असेल.
हळूच खिशतनं अंगठी काढायची आणि म्हणायचं "हो म्हण अथवा आपल्या वाटा इथून वेगळ्या" :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2008 - 10:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे मस्तच रे!

सर्किट's picture

1 Oct 2008 - 10:34 pm | सर्किट (not verified)

हो म्हण अथवा आपल्या वाटा इथून वेगळ्या

सांभाळून ! ती बोटीत बसून निघून जाईल, आणि तुम्ही समुद्रात गटांगळ्या खाणार !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

सखाराम_गटणे™'s picture

1 Oct 2008 - 10:36 pm | सखाराम_गटणे™

सहमत

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2008 - 10:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.

ती मुलगी वाहन म्हणजे जहाज चालवत होती का? ;-)

पिवळा डांबिस's picture

2 Oct 2008 - 9:13 am | पिवळा डांबिस

जहाज चालवायची जरूर नाही.....
त्यांचे सगळे "पाय" फर्म असतील का नाही याची त्यानाच खात्री नव्हती......

पाय फर्म तो पोरगी पचास.......

सखाराम_गटणे™'s picture

2 Oct 2008 - 9:22 am | सखाराम_गटणे™

पाय फर्म
सहमत (१००%)
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Oct 2008 - 9:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> त्यांचे सगळे "पाय" फर्म असतील का नाही याची त्यानाच खात्री नव्हती......
या सर्वनामांमुळे, त्यांचे, त्यांनाच, मला काही अर्थबोध झाला नाही.

(साळसूद) अदिती

नीधप's picture

2 Oct 2008 - 8:40 am | नीधप

प्रेम पण इतकं कॅल्क्युलेटेड करायचं? कोणीपण नकार देईल!!

'हिंदकळणारा थेंबही नसेल
तुमच्या शरीरपेल्यात
तर दारावर पावसाला बोलावू नका!'
(एका मित्राच्या कवितेतील ओळी!)

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सर्किट's picture

2 Oct 2008 - 9:07 am | सर्किट (not verified)

प्रेम पण इतकं कॅल्क्युलेटेड करायचं? कोणीपण नकार देईल!!

एका स्टिरोयोटाईपचे (साचेबद्धतेचे) हनन करण्यासाठी दुसर्‍या स्टिरियोटाईपचा उपयोग !

हे म्हणजे साचेबद्धतेला अनुमोदन !

कॅल्क्युलेटेड प्रेम कुणा संख्याशास्त्रीय मुलीला / मुलाला आवडेलही ! कुणी सांगावे ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

नीधप's picture

2 Oct 2008 - 10:16 am | नीधप

आवरा!!!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Oct 2008 - 3:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आवरा!!!
कोणाला?

सहज's picture

2 Oct 2008 - 4:05 pm | सहज

आवरा!!!
कोणाला?

"-नी"?? ला?

रंगीला रतन's picture

23 Oct 2023 - 9:55 pm | रंगीला रतन

झक्कास.