होय , मधुमेह पूर्ण बरा होतो

विटेकर's picture
विटेकर in काथ्याकूट
19 Jul 2016 - 5:51 pm
गाभा: 

नमस्कार !
२००६ साली, वयाच्या ३८ व्या वर्षी मला मधुमेहाचे निदान झाले! घरात परंपरा होतीच शिवाय स्थौल्य आणि बैठी जीवनशैली यामुळे हे अपेक्षित होते. फक्त फार लवकर ही ब्याद मागे लागली म्हणून किंचित वाईट वाट्ले.

मूळात गोड खाण्याची आवड आणि व्यायामाचा आळस त्यामुळे साखर कमी जास्त होत राहीली ( कमी कधीच नव्हे , सतत जास्तच !) गेल्या ९ वर्षात अनेक चढ- उतार आले, तात्पुरता व्यायाम - पथ्य पाळले जाई, पुन्हा येरे माझ्या मागल्या !
यात नवीन काही नाही , बहुतेक मधुमेहींची हीच कहाणी असते.

२०१२ पासून दरवर्षी नर्मदेवर जायला सुरुवात केली, या काळात खाण्याचे काही खरे नसे म्हणून गोळ्या घेत नसे ( हा ही एक मूर्खपणाच ! पण मूळात मधुमेह असताना देखील नर्मदेवर जाणे या मुख्य मूर्खपणापुढे तो किन्चित गौण!) आणि परत आल्यावर hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) आश्चर्यकारक रित्या कमी असे ! तेव्हा माझ्या लक्षात आले की , व्यायाम, खाणे पाळले तर आपली साखर मर्यादित राहू शकते (कारण तिथे रोजचे किमान २०-२५ किमी चालणे होई) आणि औषधे फारशी परिणामकारक नाहीत , उलट डोस वाढत जातात.
२०१४- १५ मध्ये मला पायाला मुंग्या येणे, भेगा पडणे हा त्रास सुरु झाला होता. पोटाची तर कायमच बोन्ब असे ! मला हे पक्के माहीत होते की मधुमेह असाच वाढत जाणार आहे आणि डोस ही असाच वाढत जाणार आहे.. .. माझा आत्मविश्वास खचू लागला होता. अन्य मधुमेहीप्रमाणे मी ही सतत वेगेवेगळ्या प्याथी आणि औषधांच्या शोधात असे. त्यातून आयुर्वेदिक डो़क्टरांनी सांगितल्याप्रमाणे S - VYASA चा कोर्स ही केला. या सार्‍या उपायांनी साखर नियंत्रणात येई पण गोळ्या ( GLUCORYL M1 सकाळ / रात्री १-१-) सुटत नव्हत्या, गोळी अर्धी देखील होत नव्हती.
सतत आंतरजालावर शोधत असे, त्यातच http://www.freedomfromdiabetes.org सापडले, ८ ऑगस्ट २०१५ रोजी पुण्याच्या अल्पबचत भवनला त्यान्चे अर्ध्या दिवसाचे सत्र होते. त्यांनी मधुमेह पूर्ण बरा होतो - कोणत्याही औषधाशिवाय - फक्त जीवन शैलीत सुयोग्य बदल करावा लागतो असे सांगितले , बरा होऊ शकतो असे सांगणारे बरेच होते पण औषधाशिवाय फक्त आहार, व्यायाम आणि मनःशांतीद्वारा हा प्रकार नवीन होता ! आणि माझा अनुभव ही काहीसा असाच होता. तसाच भारावून घरी आलो , विटूकाकूला सांगितले , आज पासून चहा बंद ! ( ८ औगस्ट २०१५ दूध घातलेला घरी प्यालेला शेवटचा चहा ! ) त्यांनी सांगितलेले सगळे नियम पाळायला सुरुवात केली, घरच्या घरी रोज तीन वेळा साखर चेक ( ग्लुकोमीटर द्वारे) करायला सुरुवात केली ... (वास्तविक त्यांनी त्यांच्या ईन्टेन्सिव प्रोग्राम ला प्रवेश घ्यायला सांगितले होते , ते मी केले नाही पण जीवन शैली करुन बघू जमते का म्हणून सुरुवात केली होती )
या नव्या आहारामुळे हायपो ( रक्तातील साखर कमी होणे ) होऊ लागला म्हणून १३ ऑगस्ट्ला सकाळची गोळी अर्धी केली , २० ला सकाळची बंद आणि रात्रीची अर्धी केली , २३ औगस्ट्ला रात्रीची गोळी बंद झाली. ( हा उद्योग माझा मीच केला, हा मूर्खपणा आहे , वैद्यकीय सल्ल्याशिवाय असे करणे धोकादायक आहे !) २३ ऑगस्ट २०१५ ला मी शेवटची GLUCORYL M1 घेतली. माझ्या दोन्ही गोळ्या पंधरा दिवसात बंद झाल्या
या छोटेखानी विजयानंतर आता विश्वास बसल्याने आणि आत्मविश्वास वाढल्याने प्रोग्राम सुरु केला. एकून १३ चाचण्या करायला साण्गितल्या , बी १२ ,डी , लिवर फन्कशन इत्यादी इत्यादी बी १२ आणि डी खूपच कमी होते, hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ८.६८ म्हणजे साधारण २५६ !

त्यांनी सांगितलेली पथ्ये आणि व्यायाम सांभाळताना , नोकरी , देश- परदेश प्रवास, शिवशक्ती संगम ची धावपळ आणि जाग्रणे हे सारे सुरु होते. पण पथ्य - व्यायमही सुरुच होता अगदी ऐन दिवाळीत सुद्धा ! २०१५ च्या दिवाळीत लाडवाचा एक कण देखील खाल्ला नाही !
दिवाळीनंतर म्हणजे प्रोग्राम सुरु केल्यावर १४ आठवड्यात hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ५.९ आणि वजन १४ किलो कमी झाले होते !
त्यानंतर मार्च मध्ये पुन्हा तपासण्या केल्या , ब१२ / डी अतिउत्तम आणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) फक्त ६.० ( गोळ्या बंद करुन ही )
५ जुलै ला hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा )- ६.१

डिसेंबरमधील तपासण्यानंतर थोडा सैलावलो - संक्रांतीला गुळाच्या पोळ्या आणि अनेक वर्षात पहिलयांदा वड्या आणि लाडू खाल्ले , बर्यापैकी गोड खाणे सुरु झाले, रोज साखर तपासत असे ! सकाळची साखर १०० ते ११० ला स्थिरावली होती.
मार्चच्या तपासणी नंतर सुटलोच , ९ वर्षात पहिल्यंदा आंबे चेपले, किती खाल्ले ? पैशाचा हिशोब करायचा तर यावर्षी फक्त हापूसच १२,००० रुपायचे खाल्ले आम्ही चौघांनी ! अर्थात माझा वाटा सिंंहाचा होता. नौ वर्षाचा ब्याकलॉग भरुन काढायचा होता ! शिवाय घरचे रायवळ आणि रसाचे पायरी वेगेळे !
मे महिन्यातील सर्व लग्नात भरपेट जेऊन आहेर वसूल केले, सूट्टीत मुलांच्या बरोबर आईसक्रीमपण चेपले पण अगदी मर्यादेत !

जुलई मधले hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) ६.१ आल्यावर जी टी टी ( तुम्ही मधुमेही आहात की नाही हे ठरविणारी चाचणी) द्यायचे ठरवले त्यात मात्र नापास याचा अर्थ माझ्या प्यांक्रिया अजून पुरेसे इन्शुलिन पंप करत नाहीत , मी आय जी टी आहे. तो ट्प्पा आता पार पाडायचा आहे ! मधल्या काळात वजन पुन्हा ३ किलो वाढले आहे !

पण गोळ्या बंद्च आहेत अणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) नियंत्रणात आहे ! हा माझा फार मोठठा विजय आहे असे मला वाटते , गेल्या १० वर्षात माझ्या व्यक्तिगत आयुष्यात इतकी आनंदाची गोष्ट घडली नव्हती ! हा शरिरापेक्षा मनावर विजय आहे !

अधिक माहितीसाठी केव्हाही संपर्क करावा, वरती संकेतस्थळ दिले आहेच !

प्रतिक्रिया

अरे व्वा.. वाचून आनंद झाला. अभिनंदन.

प्रमोद त्रिपाठींबद्दल वाचले आहे, अनेक लोकांचे चांगले अनुभव प्रत्यक्ष पाहिले आहेत.

आणखी एकदा अभिनंदन..!!!!

यशोधरा's picture

19 Jul 2016 - 6:10 pm | यशोधरा

मस्त! अभिनंदन!

शि बि आय's picture

19 Jul 2016 - 6:14 pm | शि बि आय

व्वा अभिनंदन ! वाचून आनंद झाला. तुमच्या जीवनशैलीविषयी (आधीच्या आणि आताच्या )जरा अजुन सविस्तर सांगू शकाल का?

रुस्तम's picture

20 Jul 2016 - 10:26 am | रुस्तम

+1 हे ही वाचायला आवडेल...

रुस्तम's picture

20 Jul 2016 - 10:26 am | रुस्तम

+1 हे ही वाचायला आवडेल...

विटेकर's picture

21 Jul 2016 - 1:32 pm | विटेकर

काही विशेष नाही त्याबद्द्द्ल , अगदी सामान्यच होती ! अट्टल चाहाबाज असल्याने सुटीच्या दिवशी सहज १०-१२ कप दूध घातलेला साखर कमी असलेला चहा होई , सामान्य पणे आठवड्यतून ४ दिवस योगासने होत पण घाम काढणारा व्यायाम नसे , हालचाली मंद आणि सतत निरुत्साही वाटे !
तिन्ही त्रिकाळ पोट्भर जेवणे , सतत चरत राहणे , चमचमीत , मिसळीची अतीव आवड आणि घाबरत घाबरत गोड खाणे !
औषधाची मात्रा वर सांगितली आहेच !
व्यसन कुठलेच नाही/ नव्हते आणि जन्मापासून कधीही सामिष खाल्ले नाही/ खात नाही.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

19 Jul 2016 - 6:14 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

अभिनंदन आपले,आपल्या अनुभवाचा इतरांनाही फायदा देत आहात हे चांगले.संपुर्ण मधुमेहमुक्त आयुष्यासाठी शुभेच्छा.

मी-सौरभ's picture

19 Jul 2016 - 6:19 pm | मी-सौरभ

आमच्या घरात प्रत्येक जनरेशन मध्ये मधुमेही आहेत. तुमचा हा लेख त्यांना वाचायला संगतो.

मोहनराव's picture

19 Jul 2016 - 7:49 pm | मोहनराव

तु वाचुन रहा रे बाबा.. व्यायाम कर..

कपिलमुनी's picture

20 Jul 2016 - 4:00 pm | कपिलमुनी

पथ्य-पाणी सांगा :)

मी-सौरभ's picture

20 Jul 2016 - 5:50 pm | मी-सौरभ

फक्त तेवढं 'दुआ में याद रखना...'

सस्नेह's picture

19 Jul 2016 - 6:24 pm | सस्नेह

अभिनंदन काका !
तुमच्या आहारातील बदलाविषयी तपशीलवार सांगा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jul 2016 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो, तपशीलवार इथेच सांगा नो भो.सांगितलेली पथ्ये आणि व्यायाम, आहार कोणता करायचा ते.

-दिलीप बिरुटे

आजानुकर्ण's picture

19 Jul 2016 - 6:52 pm | आजानुकर्ण

मधुमेहाने होणारे त्रास जवळून पाहिले आहेत. त्या नरकयातनांपासून तुम्हाला मुक्ती मिळाली यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा.

विटेकर's picture

19 Jul 2016 - 6:54 pm | विटेकर

प्रयत्न करतोय, मोबाईल वरून चोपय पेस्ट होत नाहीये !

विटेकर's picture

19 Jul 2016 - 7:02 pm | विटेकर

ऊतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही
हे व्रत कसे करावे ?
१. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करावेत
२. बेकरी पदार्थ वर्ज्य
३. रोज सकाळी कडधान्यांची न्याहारी ( मोड आलेले मूग / मटकी/ हरभरे , त्याचे डोसे , आप्पे , उसळ, डाळ ढोकळा, मिसळ इत्यादी) धान्य घ्यायचे नाही म्हणजे पोहे उप्पीट इडली बंद
४. एक धान्य जेवण - दोन्ही जेवणात कोणतेही एकच धान्य घ्यावे . भाकरी/ हातासडीभात / खपली गव्हाची पोळी पैकी फक्त एक पदार्थ
५. जेवताना २५:२५:२५:२५ हे गुणोत्तर पाळावे २५%धान्य २५%डाळ २५%कच्चा भाजीपाला , दही नसलेली कोशिंबीर २५% शिजवलेली भाजी
६. रोज सकाळ संध्याकाळ चहाऐवजी स्मूदी ( स्मूदी? गुगलून पहावे , स्मूदी बनवण्याचा विडिओ पाठवला आहे)
६. पायऱ्या चढण्याचा व्यायाम anti gravity exercise न्याहारी आणि प्रत्येक जेवणानंतर
७. पुरेशी चिंतामुक्त झोप (७ ते ८ तास )
८. रोज सकाळी घाम येईपर्यंत ४५ मिनिटे व्यायाम
९ . रोज ३ वेळा ग्लुकोमीटर द्वारे साखर तपासणी.

फलश्रुती :

४ ते ६ आठवड्यात गोळ्या/ इन्शुलिन पूर्ण बंद

रक्तदाब, गुडघेदुखी, पाठदुखी गायब

वजन आटोक्यात आणि वय किमान दहा वर्षे कमी होणार

उत्साह आणि ऊमेद वाढणार

अधिक माहितीसाठी
Www.freedomfromdiabetes.org

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jul 2016 - 7:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

चंपाबाई's picture

21 Jul 2016 - 11:18 pm | चंपाबाई

वय किमान दहा वर्षे वाढणार ...... असे हवे.

मुक्त विहारि's picture

19 Jul 2016 - 7:24 pm | मुक्त विहारि

मधूमेहाच्या विळख्यातून सुटल्याबद्दल अभिनंदन.

आणि

दुसरे म्हणजे, तुमचे अनुभव इथे दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

अनिरुद्ध प's picture

20 Jul 2016 - 12:52 pm | अनिरुद्ध प
अनिरुद्ध प's picture

20 Jul 2016 - 12:53 pm | अनिरुद्ध प
अनिरुद्ध प's picture

20 Jul 2016 - 12:55 pm | अनिरुद्ध प
अनिरुद्ध प's picture

20 Jul 2016 - 12:56 pm | अनिरुद्ध प
अनिरुद्ध प's picture

20 Jul 2016 - 12:58 pm | अनिरुद्ध प
अनिरुद्ध प's picture

20 Jul 2016 - 1:04 pm | अनिरुद्ध प
अनिरुद्ध प's picture

20 Jul 2016 - 1:06 pm | अनिरुद्ध प
अनिरुद्ध प's picture

20 Jul 2016 - 1:07 pm | अनिरुद्ध प

माहिती साठी धन्यवाद, आणि मधूमेहाच्या विळख्यातून सुटल्याबद्दल अभिनंदन विटेकर काका.

एस's picture

19 Jul 2016 - 7:27 pm | एस

छान अनुभव. अभिनंदन.

चंपाबाई's picture

19 Jul 2016 - 7:29 pm | चंपाबाई

पाय मोडल्यावर दोन वर्षे घरीच होतो. माझी शुगर४३० झाली होती.

अतिशय निराश होतो. पण पुन्हा जॉबात सेटल झाल्यावर रोजचे चार ते सात किमि चालणे ठेवणे.
खाणॅ कंटृओळ केले तरी किमान गरजेचे तरी खाल्लेच पाहिजे.

रमजानचे रोजे केले. अगदी कडक.
इतर महिन्यात एकदाच जेवुन दीवस लीक्विड ज्युसवर घालवणे प्लॅन आहे. पण अजुन जमले नाही.
शुगर गेली. गोळ्या बंद आहेत.

विटेकर's picture

19 Jul 2016 - 7:42 pm | विटेकर

अरे व्वा, छानच ! अभिनंदन !

आयडी चंपाबाई स्त्रीलिंगी आणि प्रतिसादात "पाय मोडल्यावर दोन वर्षे घरीच होतो." होतो??? होतो म्हणजे पुलिंगी ना?
या नानामाईच्या डुआयडीला पुलिंगी आणि स्त्रीलिंगी मधला फरक सुध्दा कळत नाही का? समजवा रे ह्याला (का हिला) कोणीतरी.

मुवि, तुमच्या या धाग्यावर मी प्रतिसाद दिला नव्हता कारण मी याच संधीची वाट पहात होतो.

चंपाबाई's picture

19 Jul 2016 - 9:00 pm | चंपाबाई

मी नाना माई नाही.

अनुप ढेरे's picture

19 Jul 2016 - 9:51 pm | अनुप ढेरे

काहीही, उद्या सी बी आय आयडीकडे CBI चं ओळखपत्र मागाल!

आनंदी गोपाळ's picture

19 Jul 2016 - 10:57 pm | आनंदी गोपाळ

ते जामोप्या आहेत, अन त्यांनी ते लपवायचा प्रयत्न कधीही केलेला नाहिये. हे तुम्हालाही ठाऊक आहे. तेव्हा जौद्या ना?

कानडाऊ योगेशु's picture

20 Jul 2016 - 8:45 am | कानडाऊ योगेशु

रमजानचे रोजे केले. अगदी कडक.

मधुमेही व्यक्तींनी असा उपास केलेला चालतो का?
धार्मिक बाब दूर ठेवु पण अश्या केलेल्या उपासाचा त्रासच अधिक होण्याची शक्यता जास्त नाही का?

चंपाबाई's picture

20 Jul 2016 - 9:32 am | चंपाबाई

दिवसातून एकदाच खावे ते सहादा खावे अशा प्रकारचे सल्ले सर्वत्र दिसतात.... यातले नेमके कोणते चांगले कोणते वाइट माहीत नाही. ज्याने त्याने आपली सहनशक्ती , आहाराची उपलब्धता , डेलि रुटिन इ वर निर्णय घ्यावेत.

दिवसातुन एकदा किंवा दोनदाच खावे , ते आरोग्याला कदाचित जास्ती पोषक आहे, असे माझे मत आहे. हे माझ्यापुरते मर्यादित आहे.

सुबोध खरे's picture

20 Jul 2016 - 9:50 am | सुबोध खरे

http://drc.bmj.com/content/3/1/e000108.full
https://www.diabetes.org.uk/ramadan
चम्पाबाई
असे अनेक दुवे आहेत जरा वाचून घ्या आणि प्रकृतीची काळजी घ्या.

चंपाबाई's picture

20 Jul 2016 - 12:08 pm | चंपाबाई

सकाळीच फास्टिंग शुगर केली... १०३ आहे.

ग्लायकोसिलेटेड एच बी ला स्याम्पल दिले आहे. रात्री रिपोर्ट येईल.

यावर्शी रमजानच्या काळातच डिप्लोमाची परिक्षाही होती... थेअरी पेपर उपाशीपोटीच लिहिलेत.

एच बी ला स्याम्पल दिले आहे

किती आली?
मुद्दाम टोकत नाही, पण आपली साखर लपविण्याचा मधुमही लो़कांचा कल असतो. माझाही असायचा !
आणि आपली साखर काळजी करण्यासारखी नाही अशी ही समजूत घालण्याकडे कल असतो म्हनून विचारले इतकेच

चंपाबाई's picture

21 Jul 2016 - 11:01 pm | चंपाबाई

।एच बी ए वन सी ... ५.१

ब्लड शुगर .... ९३ ... ( एच बी वाले त्याच्या बरोबर करतात ती )

आमच्या ल्याबमध्ये शुगर १०३ होती.

फास्टिंग

साती's picture

22 Jul 2016 - 5:35 pm | साती

काही इतर काँप्लिकेशन्स नसतील तर योग्य ती काळजी घेऊन रमजानचे रोजे आणि इतर लोक आपापले कडकडीत उपासही ;) करता येतात मधुमेहींना.
रमजानपूर्वी माझ्या सगळ्या रोझेदार मंडळीण्ची एक व्हिजीट असते माझ्याकडे डोस अ‍ॅडजस्ट करून घ्यायला.

'डायबेटीक्स अँड रमादान- प्रॅक्टीकल गाईडलाईन्स' नावाची छोटी पुस्तिका ' इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशन 'आणि ' डायबेटीस अँड रमादान इंटरनॅशनल अलायन्स' यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डॉक्टर लोकांकरिता प्रसारित केली जाते.
त्यात या विषयाबद्दल अगदी सांगोपांग माहिती दिलेली असते.

जामोप्या स्वतः डॉक्टर आहेत त्यामुळॅ प्रश्नच नाही.
इतर कुणी रोजे ठेवणार असेल तर यातले मुख्य मुद्दे मी एक स्वतंत्र धागा काढून लिहेन.
;)

चंपाबाई's picture

22 Jul 2016 - 7:21 pm | चंपाबाई

पुढचे रोजे उन्हाळ्याकडे सरकणार आहेत.

विटेकर's picture

19 Jul 2016 - 7:43 pm | विटेकर

डॉक्टर खरे सरांच्या प्रतिसादास उत्सुक आहे

साती's picture

19 Jul 2016 - 7:45 pm | साती

सर्वप्रथम या कामगिरीबद्दल आपले अभिनंदन!

आपल्याला सांगितलेली जीवनशैली टाईप टू डायबेटीसकरिता अत्यंत योग्य अशीच आहे.
आणि तुम्ही ती मनापासून अवलंबिलीत म्हणून तुम्ही हे साध्य करू शकलात.

आमच्या ओपिडीत आपल्यासारखी क्लिनीकल प्रोफाईल असणार्‍या प्रत्येक रूग्णाला हे समजावून देऊन आणि लिहून देऊनही याप्रकारे गोळीमुक्त होणारे रूग्ण शेकडा सहा ते सातच असतात. कारण सातत्य आणि प्रयत्नांचा अभाव.
त्याबरोबरच आमचेही मोटिव्हेशन करण्यात कमी पडलेले प्रयत्न.

मात्र जे असा सल्ला मनापासून ऐकतात आणि पाळतात ते नक्की दुवा देतात.
मलाही एखादा पेशंट काही काळासाठी का होईना ओ एच ए मुक्त झाला की त्या पेशंट इतकाच आनंद होतो.

पुढिल आयुष्यासाठी शुभेच्छा!

(सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही टाईप टू डायबेटीस होण्याचा कार्यकारणभाव वैज्ञानिक दृष्ट्या समजून घेतला आहे आणि आय जी टी रेंजमध्ये तुम्ही आहात हे समजून घेतले आहे. हे आम्हाला रूग्णाला समजावून सांगताना दमछाक होते.)

nanaba's picture

20 Jul 2016 - 10:11 am | nanaba

Sati, what is IGT?

साती's picture

20 Jul 2016 - 11:56 am | साती

इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स.

म्हणजे रक्तातील साखर सामान्यवेळी मधुमेहाच्या लेव्हलला नसते पण साखरेचा अतिरीक्त भडीमार होतो तेव्हा हे लोक ती साखर नॉर्मल लेव्हलला आणू शकत नाहीत.
रक्तात मिसळलेल्या साखरेच्या प्रमाणात जितके इन्स्युलिन पँक्रियांनी स्रावित करायला हवे तितके होत नाही.

याकरिता एक ठराविक मापाचे प्युअर ग्लुकोज पाण्यातून प्यायला देऊन मग अर्ध्या अर्ध्या तासाने रक्त आणि लघवीतले साखरेचे प्रमाण मोजण्यात येते.

विटेकर's picture

21 Jul 2016 - 1:40 pm | विटेकर

ओजीटीटी
७५ मिली ग्लुकोस पाण्यातून ढवळून प्यायला देतात ( अंदाजे १५ चमचे आपली नेहमीची साखर ) दोन तासांनी रक्तशर्करा १४० च्या आत आल्यास आपण मधुमेही नाही असे म्हणता येते

nanaba's picture

21 Jul 2016 - 3:34 pm | nanaba

:)

मोहनराव's picture

19 Jul 2016 - 7:51 pm | मोहनराव

छान सल्ला...

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 8:03 pm | सुबोध खरे

साती ताईंच्या इतक्या सुंदर प्रतिसादानंतर आणखी मी काय लिहिणार

आपली दिनचर्या मधुमेहीसाठी आदर्श अशी आहे.
१. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करावेत
२. बेकरी पदार्थ वर्ज्य
३. रोज सकाळी कडधान्यांची न्याहारी ( मोड आलेले मूग / मटकी/ हरभरे , त्याचे डोसे , आप्पे , उसळ, डाळ ढोकळा, मिसळ इत्यादी) धान्य घ्यायचे नाही म्हणजे पोहे उप्पीट इडली बंद
४. एक धान्य जेवण - दोन्ही जेवणात कोणतेही एकच धान्य घ्यावे . भाकरी/ हातासडीभात / खपली गव्हाची पोळी पैकी फक्त एक पदार्थ
५. जेवताना २५:२५:२५:२५ हे गुणोत्तर पाळावे २५%धान्य २५%डाळ २५%कच्चा भाजीपाला , दही नसलेली कोशिंबीर २५% शिजवलेली भाजी
६. रोज सकाळ संध्याकाळ चहाऐवजी स्मूदी ( स्मूदी? गुगलून पहावे , स्मूदी बनवण्याचा विडिओ पाठवला आहे)
६. पायऱ्या चढण्याचा व्यायाम anti gravity exercise न्याहारी आणि प्रत्येक जेवणानंतर
७. पुरेशी चिंतामुक्त झोप (७ ते ८ तास )
८. रोज सकाळी घाम येईपर्यंत ४५ मिनिटे व्यायाम

फक्त आपण लिहिलेली दिनचर्या पाळण्यासाठी केवळ तुमचेच नव्हे तर तुमच्या सौं. चेही अभिनंदन.
कारण सहज सोपे मिळणारे पदार्थ पाव, बिस्किटे, दुधाचे पदार्थ सोडून प्रत्येक वेळेस काहीतरी आरोग्यकारक पदार्थ करून देण्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची घरच्या गृहिणींची "तयारी" असावी लागते.
शिवाय "पायऱ्या चढणे आणि ४५ मिनिटे घाम येईपर्यंत व्यायाम करणे" रोज हे करण्यासाठी किती जणांचा मनोनिग्रह असतो आणि असला तर किती दिवस टिकतो हा मूळ प्रश्न आहे.
बऱ्याचशा मधुमेही रुग्णांची मनोवृत्ती आपण "खाण्यासाठी" जन्माला आलो आहे अशी असते. बटर चिकन आणि पनीर टिक्का खाल्यावर कॅलरी जास्त झाल्यामुळे "डाएट कोक" पिणारी पिढी आहे.
आपल्या निग्रह आणि सातत्याबद्दल आपले अभिनंदन.

nanaba's picture

20 Jul 2016 - 10:11 am | nanaba

A2 milk chalel ka?

विटेकर's picture

21 Jul 2016 - 1:43 pm | विटेकर

कोणतेच दूध आणि दूग्धजन्य पदार्थ चालणार नाहीत. फक्त नारळाचे दूध , सोयाबीनचे दूध, बदामाचे दूध चालेल. ( याचे मला आश्चर्य वाटते पण मी नियम पाळतो ) दूध नाही म्हणजे ताक - दही , तूप, लोणी, पनीर , कढी, खरवस काहीही नाही !

विटेकर's picture

21 Jul 2016 - 3:52 pm | विटेकर

खरेच डॉक्टर , तिच्याशिवाय हे काही शक्य नव्हते ! ती माझ्यासाठी सावित्रीच आहे !

या प्रोग्रम साठी दोघांनी भाग घेणे जरुरी असते, नवरा रुग्ण असेल तर बायकोने आणि बायको रुग्ण असेल तर नवर्याने पण प्रोग्राम साठे प्रवेश घेणे जवळ जवळ अनिवार्य आहे !
समूह शिक्षणावर त्यांचा भर आहे , प्रत्येक रुग्णासाठी एक डॉक्टर आणि एक मेण्टर निर्धरित केलेला आसतो , त्यांच्या सतत संपर्कांमुळे आणि प्रोत्साहानामुळे मनोधैर्य टिकते आणि वाढते ! त्याशिवाय कायप्पा समूहावर खूप शेयरिन्ग होते , त्यामुळेही खूप उत्साह वाढतो. मी पण आता मेण्टर आहे ४ जणांचा !

सामान्य वाचक's picture

19 Jul 2016 - 8:04 pm | सामान्य वाचक

डॉ त्रिपाठींच्या सल्ल्याचा आमच्या घरात पण फायदा झाला
मधुमेह 10 वर्षे गोळ्या घेतल्यावर, आता बरा झाला
हापूसची गोष्ट तुमच्यासारखीच 10 वर्षांनी भरपेट आंबे खाता आले

त्यांनी सांगितलेली मुख्य सूत्रे मगणजे
दुग्धजन्य पदार्थ, pricessed food पूर्ण बंद
गहू खाल्ले तर खपली गहू। सिंहोर लोकवन इ पंजाबी वाण नाही
ज्वारी ची भाकरी च खाणे उत्तम

सकाळी हिरव्या पालेभाज्या ,सफरचंद, दुधी इ इ ची ग्रीन स्मूदी पिणे

जेवल्यावर 1,5 तासाने जिने चढण्याचा व्यायाम करावा

आनंदी गोपाळ's picture

19 Jul 2016 - 9:34 pm | आनंदी गोपाळ

सर्वप्रथम कडक जीवनशैली अवलंबून औषधे न वापरता डायबेटिस कंट्रोल मिळविल्याबद्दल अभिनंदन.
*
आता खरे साहेब व साती अक्कांच्या प्रतिसादानंतर माझा नेहेमीचा खडूस, व प्रदीर्घ प्रतिसाद. या प्रतिसादाचे कारण म्हणजे, "डॉ त्रिपाठींच्या सल्ल्याचा फायदा.. " हे वाक्य ३-४ प्रतिसादांत दिसले. आपल्याकडे प्रॉब्लेम असा असतो, की अमुक एका यशस्वी डॉ.चे औषध मी सुरू केले, की आपोआप बरा होणार. इथे मुळात त्यांचा सल्ला घेतला हे महत्वाचे नसून तो संपूर्णपणे आचरणात आणला हे जास्त महत्वाचे आहे, हे सर्व डायबेटिक रुग्णांनी लक्षात घेतले पाहिजे.

(डिस्क्लेमर क्र. १. : मी डायबेटॉलॉजिस्ट नाही. सातीअक्का डायबेटीसच्या स्पेशलिस्ट आहेत.)
(डिस्क्लेमर क्र २. : मी फक्त कडू सत्ये नोंदविणार आहे.)
(डिस्क्लेमर क्र ३. : हा/ असा प्रतिसाद पूर्वी कुठेतरी दिला असावासा देजावू येतो आहे)

डायबेटीस 'बरा' होण्यासाठी (होण्यासाठी म्हणण्यापेक्षा बरा 'राहण्यासाठी' हा योग्य शब्दप्रयोग होईल) आधी व्यायाम, मग पथ्य व शेवटी औषध असा सिक्वेन्स आहे.

सर्व प्रकारचे डायबेटीस "बरे" होत नाहीत, अर्थात संपूर्ण औषध्/इन्श्युलिन मुक्ती मिळत नाही.

जेवणात नक्की कोणते घटक किती प्रमाणात घ्यायचे, ते नीट समजून घेतले तर डायबेटीसवाल्याला अमुक वस्तू कधीच खाता येणार नाही असे होत नाही. म्हणजे २ चमचे आमरस खाल्ला, तर जेवणातून १ पोळी कट करता यायला हवी. किती कार्बोहायड्रेट खायचे ते मोजणे गरजेचे. ते कोणत्या प्रकारे खाल्लेत हे जरा कमी महत्वाचे.

शेवटी,

डायबेटीस 'कागदावर दिसतो' तोपर्यंतच त्याची ट्रीटमेंट करण्यात मजा आहे.

आपल्याला डायबेटीस झाला, की सुरुवातीला आपण घाबरतो. जोरात पथ्य पाणी, वॉक इ. सुरू होते. २-३ वर्षांत, हळूहळू डायबेटीस 'मित्र' बनतो. अर्थात, आपल्या लक्षात येते, की व्यायाम ८-१५ दिवस 'चुकला' किंवा भरपूर कुपथ्य झालं. (काय करणार चुलत भाच्याचं लग्न होतं..) तरी आपल्याला 'त्रास' होत नाही.

एकतर आधीच स्वतःला टोचून रक्तातली साखर तपासून घ्यायची जिवावर येते. वरतून लॅब टेस्ट करून घेणे हा डॉक्टरी भ्रष्टाचार, असे डोक्यात भिनलेले असते. तेव्हा, 'मला त्रास होत नाही' हा डायबेटीस "बरा" असण्याचा क्रायटेरिया तयार होतो. शुगर मॉनिटर होतच नाही. शिवाय तोपर्यंत अमुक एक 'योगासन' केल्याने, किंवा 'कारल्याचा/आणि कसला रस पिण्याने' किंवा अमुक पुड्या खाल्ल्याने वगैरे डायबेटीस बरा झाल्याच्या कथा ऐकिवा असतात, व कमी कष्टात डायबेटीस बरा करण्यासाठी त्या बिनकष्टाच्या उपायांचा वापर सुरू होतो.

मित्रहो, डायबेटीस कागदावर दिसतो, (अर्थात लॅब रिपोर्टात दिसतो, तुम्हाला 'त्रास होत नाही') तोपर्यंतच त्याला आटोक्यात ठेवा. कारण, सातीअक्कांचे, डॉ. त्रिपाठींचे, नीट न ऐकता, डायबेटीस कंट्रोल हुकतो, तेव्हा मेडिकल ट्रीटमेंट संपून पेशंट आमच्यासारख्या सर्जनकडे पाठवावा लागतो. मग पायाच्या बोटाच्या जखमेसाठी एकतर पेशंट वर्षानुवर्षे न भरणार्‍या जखमा घेऊन फिरतो. आम्ही बोट, किंवा पाय कापायला सांगतो. किडन्या फेल होतात, आम्ही डायलिसिस्/किडनी ट्रान्स्प्लाण्ट सांगतो. डोळ्याचे पडदे जातात, आम्ही लेझरने रेटिना जाळून टाकतो..

डायबेटीसने गुण दाखवले की नो पॉझिटिव्ह ट्रीटमेंट.

तेव्हा, लोकहो, विटेकर साहेबांच्या सखोल अभ्यास, अत्यंत रिव्होलुशनरी लाईफस्टाईल चेंज व चिकाटीवरून धडा घ्या, अन "पेशंट काही काळासाठी का होईना ओ एच ए मुक्त झाला की मला आनंद होतो" या डॉ. साती यांच्या वाक्याचा अर्थ समजवून घ्या, [*ओएचे=ओरल हायपोग्लायसेमिक एजंट=डायबेटीसचं औषध ;) ] डायबेटीस-मुक्त रहा, याच सर्वांना शुभेच्छा!

संदीप डांगे's picture

19 Jul 2016 - 11:39 pm | संदीप डांगे

+१०००००. This is the Best comment here!

शलभ's picture

20 Jul 2016 - 12:11 am | शलभ

मस्त प्रतिसाद..

रुस्तम's picture

20 Jul 2016 - 10:40 am | रुस्तम

या वेळेस प्रतिसाद अजिबात खडूस वाटला नाही....

आपला प्रतिसाद काहीवेळी मनाला बोचणारा असतो, पण हा प्रतिसाद खरोखरीच बरच मार्गदर्शन करणारा आहे. डोळे उघडले. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. नेहमी असेच नेटक्या शब्दात मार्गदर्शन करावे ही विनंती.

झेन's picture

19 Jul 2016 - 9:50 pm | झेन

विटेकर काका मन:पूर्वक अभिनंदन. आपला अनुभव आणि इथल्या डॉक्टरांचं अनुमोदन यामुळे मधुमेहाकडे सकारत्मकपणे बघू शकतो हे प्रथमच जाणवले. माहितीतल्या ज्यांना कुणाला मधुमेहाचा त्रास/इतिहास आहे त्याना तुमचा अनुभव कळकळीने सांगेन. अनुभव शेअर करण्याबद्दल धन्यवाद.

चंपाबाई's picture

19 Jul 2016 - 11:47 pm | चंपाबाई

पायर्‍या चढणे उतरणे व चालणे हे उत्तम वायाम आहेत.

लिफ्टचा वापर कमी करावा. रिक्षा टाळावी

रेवती's picture

20 Jul 2016 - 5:34 am | रेवती

विटूकाका व विटूकाकूंचे अभिनंदन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2016 - 6:43 am | डॉ सुहास म्हात्रे

१. सर्वप्रथम श्री व सौ विटेकर यांचे हार्दीक अभिनंदन आणि दोघांनाही उत्तम व दीर्घ आयुरोग्यासाठी शुभेच्छा !
त्यांच्याइतका अभ्यास, चिकाटी आणि मेहनत घेणे सर्वसामान्यपणे दिसत नाही.

२. त्याचबरोबर वर तीन डॉक्टरांनी दिलेले सल्ले व अनुभवही तितकेच महत्वाचे आहेत.

सुनील's picture

20 Jul 2016 - 8:33 am | सुनील

मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

स्वतः धागाकर्त्याचा फर्स्टहॅन्ड अनुभव अधिक मिपावरील सर्वच ज्ञात डॉक्टर मंडळींचे प्रतिसाद, यामुळे सदर धागा वाखु म्हणून साठवण्यायोग्य झाला आहे.

काही शंका -

१) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे व्यर्ज करण्यामागची कारणे काय? लोणी-तूप समजण्यासारखे आहे परंतु दही-ताक का व्यर्ज? शिवाय यामुळे कॅल्शियमची जी कमतरता भासेल ती कशी पूर्ण करता येईल?

२) दोन्ही जेवणात एकच धान्य हेदेखिल नीटसे समजले नाही. समजा दोन पोळ्या आणि एक मूद भात असे घेतल्याने नक्की काय फरक पडू शकेल?

३) आहारात मांसाहाराचा उल्लेख नाही. परंतु, डाळी (प्रथिने) याऐवजी कधी-मधी मांसाहार घेण्यास हरकत नसावी अशी माझी समजूत आहे. ही समजूत योग्य आहे काय?

४) रोजचा पाऊण तास व्यायाम हे ठीकच. पण तो कोणत्या विशिष्ठ पद्धतीचा (पुश-अप्स, ट्रेड-मील इ.) असे काही आहे काय?

५) पथ्यात 'तीर्थ-प्राशनाचा' उल्लेख नाही तेव्हा ते पूर्णपणे व्यर्ज समजावे काय?

अनुप ढेरे's picture

20 Jul 2016 - 9:56 am | अनुप ढेरे

नक्की कारण माहिती नाही पण ते डागदर त्रिपाठी व्हिगन आहाराचा प्रचार करतात बहुदा. व्हिगन नाव न घेता.

विटेकर's picture

21 Jul 2016 - 3:59 pm | विटेकर

१) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे व्यर्ज करण्यामागची कारणे काय?

याचे मुख्य कारण म्हणजे फ्याट वाढू नये ! डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पेशी ईन्शुलीन ला आत घेत नाहीत ! तसेच आपल्याला मिळणारे दूध अत्यन्तिक भेसळ्युक्त असते ! पण तरिही देशी गाईचे , घरीच काढलेले दूध ही वर्ज्य आहे. ( हे मला फारसे पटत नाही , आई खास देशी गाईचे तूप मला पाठवते , ते ही मला वर्ज्य आहे , कारण समजले नाही )

२) दोन्ही जेवणात एकच धान्य हेदेखिल नीटसे समजले नाही.
अगदी सोप्पे ! साखर वढू नये म्हणून ! साखरेचा ईन्टेक कमी करायचा. धान्याचा जी आय सगळ्यात जास्त म्हणून कमीत कमी धान्य घ्यायचे !

३) आहारात मांसाहाराचा उल्लेख नाही. परंतु, डाळी (प्रथिने) याऐवजी कधी-मधी मांसाहार घेण्यास हरकत नसावी अशी माझी समजूत आहे. ही समजूत योग्य आहे काय?

रिवरसल होइइपर्यन्त मांसाहार नाही, नंतर ही मर्यादा आहेच !

४) रोजचा पाऊण तास व्यायाम हे ठीकच. पण तो कोणत्या विशिष्ठ पद्धतीचा (पुश-अप्स, ट्रेड-मील इ.) असे काही आहे काय?

आपल्या आवडीचा, पण घाम येणे अपेक्षित आहे , ठोके जलद व्हावेत !

५) पथ्यात 'तीर्थ-प्राशनाचा' उल्लेख नाही तेव्हा ते पूर्णपणे व्यर्ज समजावे काय?

होय पूर्ण वर्ज्य !

असे अनुभव लिहिण्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.आनंदी गोपाळ यांनी बरोबर लिहिले आहे.
या रुग्णांना काही खाल्ले तरी पोट भरल्याची भावना होतच नाही.त्यासाठी असे अन्नपदार्थ शोधावे लागतात जे पोट भरवतील पण साखर वाढवणार नाहीत.
-
पाव भाजी खा.
पण यातली भाजी ही नेहमीची पावभाजी नसून दुधी,टिंडा,काकडी, कच्ची पपइची वापरायची.म्हणजे बटाट्याची काचय्रा भाजी करतो तशी या भाजांच्या काचय्रा करायच्या.पावात भाजी भरून खायची.करून पाहा.
इतर लोकांनी ( रोगी नसलेल्यांनी ) चमचमीत आहार ाला एक दिवस सुट्टी देऊन मद्राशी भाज्या खाव्यात.कदान्न खावे.

चौकटराजा's picture

20 Jul 2016 - 8:41 am | चौकटराजा

माझ्या अंदाजाने माझ्या शरीरात डायबेटिक ट्रीगर होऊन आता चौदा वर्षे झाली. त्यात गेली १२ वर्षे मी गोळया घेत आहे. पण गोळ्या बंद कशासाठी करायच्या ते मला काही उमगलेले नाही.माझे वय आता ६३ आहे. जर माझा मधुमेह २८ व्या वर्षी चालू झाला असता तर गोळ्या बंद करण्याचे स्वपन मी पाहिले असते. विटेकर यानी दिलेल्या माहितीत बेकरी फूड न खाण्याचा सल्ला दिला आहे. तो माहित होण्यासाठी त्रिपाठीच का ? हे सारे माहिती जालावरही आहे. मैद्याचा ग्ल्यसेमिक इंडेक्स अति आहे. नुकत्याच केलेल्या तपासणीत माझे ग्लूकोसायलेटेड हिमोग्लोबिन ६.७ आहे. चौदा वर्षाच्या मधुमेहाच्या सहवासाच्या मानाचे ६.७ हा उत्तम कंट्रोल आहे असे डॉक्टरांचे मत आहे. वे त्याचे श्रेय कालच त्यानी मलाच दिले. ते म्हणाले तुमच्या या प्रवासात औषध हा एक लहानसा उपाय आहे. खरे व्यवस्थापन तुम्ही केले तरच.

प्रतिसादात आगो यानी एक सूचक वाक्य टाकले आहे. डायबेटीस 'बरा' होण्यासाठी (होण्यासाठी म्हणण्यापेक्षा बरा 'राहण्यासाठी' हा योग्य शब्दप्रयोग होईल) आधी व्यायाम, मग पथ्य व शेवटी औषध असा सिक्वेन्स आहे. यातच खरी बात आहे. चालायचे नाही, पालेभाज्या कोशिंबीरी आवडत नाहीत, केळी आंबे , सिताफळे चिकू मजबूत खायचे, फक्त फलभाज्या हव्यात उसळी नकोत, सारखे सारखे बाहेर जाउन पावभाजी खायची व मुख्यतः कार्ली जांभूळ रस अलोव्हेरा मेथी यांचे प्रयोग करीत रहायचे यापासून मी लांब राहिलो आहे.

सतत शरीर हालते ठेवून वा थोडे थोडे खाऊन स्वादुपिंडावरील भार कमी ठेवणे हा यातील खरा फंडा आहे. पण हा फंडा नोकरी करणार्‍या॑ माणसाला अंमलात आणणे कठीण आहे. साखर जास्त प्रमाणात रक्तात येणे याचा ताणाशी जवळचा संबंध आहे सबब नात्यात व ध्येयातही फार गुंतून रहाण्याचे टाळावे. ते मी करतो. संगीत, विनोद,गप्पा, निसर्गाची आवड याने ताण कमी होतो असा अनुभव आहे.

विटेकर's picture

21 Jul 2016 - 4:08 pm | विटेकर

चौरा सर,
६३ म्हणजे फार वय नव्हे ! अगदी यौ-वनात नसले तरीही वनात जावे असेही नाही ! आणि हल्ली आरोग्य सुविधामुळे आयुर्मान वाढले आहे !
६.७ हा उत्तम कंट्रोल आहे , पण हा गोळ्या घेऊन आहे ! डायबेटीस च्या गोळ्यांचे साईड इफेक्टस आहेत म्हणून गोळ्या नकोत ! ( गोळ्यांपेक्षा इन्शुलीन बरे अशी माझी धारणा आहे , त्याचे दुष्परिणाम नाहीत )
एकदा त्यातील गंमत समजली की नोकरी करणार्‍या माणसालाही काही कठीण नाही ! उलट माझ्या रजा कमी झाल्या आहेत.
ताणाचा मुद्दा अगदी बरोबर आहे , पण त्याचा नोकरीशी संबंध नाही ! ताण असतो तो आत , बाह्य परिस्थितीवर नाही असे मला वाटते .

अर्धवटराव's picture

20 Jul 2016 - 9:16 am | अर्धवटराव

डिसिप्लिईन नीट पाळता आली तर आश्चर्यकारक परिणाम दिसतात हे खरं आहे.

अवांतरः
सुरुवातीला/अधुन मधुन मनोनिग्रह कमि पडतो तेंव्हा जिभेचे चोचले पुरवत पथ्य पाळण्याचे हमखास टेक्नीक म्हणजे "जिभेला द्या, पोटाला देऊ नका". गुलाबजाम खावासा वाटतोय? रस पिळुन टाका आणि गुलाबजाम तोंडात टाका. डोळे मिटुन जिभेवर चव रुळु द्या. ५ मिनिटाने मन भरेल. देन स्पिट इट औट. (हा अन्नाचा अपमान आहे हे मान्य. पण पोटात जास्तिच्या कॅलरी ढकलुन त्या व्यायमाने कमि करणे म्हणजे देखील त्या कॅलरीज थुंकणे होय. अ‍ॅज गुड अ‍ॅज स्पिटींग)

विटेकर's picture

21 Jul 2016 - 4:09 pm | विटेकर

डोळे मिटुन जिभेवर चव रुळु द्या. ५ मिनिटाने मन भरेल.

हा उपाय एस- व्यासा वाले सुचवितात , अर्थात प्रत्यक्ष खाणे नव्हे तर फक्त कल्पना करायला सांगतात !

गोडगोड सल्ले सतत मिळाल्यानेही रोगी कंटाळत असतील.

ब़जरबट्टू's picture

20 Jul 2016 - 10:00 am | ब़जरबट्टू

मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

मागच्या वर्षीच डायबेटीस आहे हे समजले. अजून तरी धावणे, जिम सोडून वेगळे काही केले नाहीये.
आता रजिस्ट्रेशन करतो पाहिले बेसिक कोर्स साठी.
धन्यवाद !

विटेकर's picture

21 Jul 2016 - 4:10 pm | विटेकर

धावणे, जिम सोडून

जिन्यावर पायर्‍या चढण्याचा व्यायाम करावा असे सुचवेन !

ब़जरबट्टू's picture

8 Aug 2016 - 4:23 pm | ब़जरबट्टू

मनापासून धन्यवाद काका., तुमच्या या धाग्यामुळे फार फायदा झाला.. सध्या तरी पूर्व-मधुमेही आहे. त्यामुळे आतापासून काळजी घेतोय. दूध व तत्सम पदार्थ बंद करून 2 आठवडे झालेत, व पृथ्वीवरचे 3 किलोग्रॅम वजन कमी झालेय. त्यामुळे उत्साह आहे. मागच्या आठवड्यातच बेसिक प्रोग्रामला हजेरी लावली, व आता स्मूदी सुरु करतोय.
आता मांसाहार व तीर्थ बंद करणे म्हणजे जिकरीचे काम आहे, पण अनायसे श्रावण आलाय मदतीला, तर थोडे पुण्य पण कमावून घेतो.. :)

खरंच विटेकर काका...मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! व हा लेख लिहील्याबद्दल धन्यवाद.
वाचनखूण तर साठवली आहेच पण लेखाची लिंक आमच्या पिताश्रींना देखील पाठवली आहे.

ह्यानिमित्तानं मिपावरील सन्माननिय डॉक्टर्सना काही प्रश्नः

१. माझं संपूर्ण घराणं डायबेटीक आहे. माझ्या माहितीतल्या बराचश्या जवळच्या व लांबच्या आजोबांना व काकांना डायबेटीस होता/आहे. माझ्या वडीलांना सुद्धा आहे. पण घरातील मुलींना म्हणजे आत्या व बहीणींना डायबेटीस झाला आहे असं कधी कानावर आलं नाही, असं का?

२. माझे वडील ज्वारी-बाजरी-नाचणी-मेथी (मुठभर) असं मिक्स पिठाच्या भाकर्‍या खातात व कधीकधी चपाती. पण लहानपणाच्या सवयीमूळे त्यांना जेवणात मच्छी (ओली/सुक्की) लागते; रोज नाही पण आठवड्यातून ३-४ दिवस. तर कुठली मच्छी त्यांच्या डायबेटीसच्या आजारात खालेली चालेल?

३. आत्ता त्यांच वय ६३ आहे व २ महीन्याने वैगरे एखाद पेग स्कॉच घेतात. तसंपण ते कधीच हेवी ड्रींकर नव्हते. तर असा एखादा पेग चालेल का की दारू पुर्ण वर्ज्य करावी?

आगाऊ धन्यवाद!

सुबोध खरे's picture

20 Jul 2016 - 8:09 pm | सुबोध खरे

मधुमेह अनुवांशिक असला तरी पुढच्या पिढीतील सर्वानाच होतो असे नाही. शिवाय बऱ्याच वेळेस नीट तपासणी केलेलेही नसते त्यामुळे एखादी जखम बरी होत नसेल तेंव्हा तपासणी केली तर एकदम भरपूर साखर( मधुमेह) आहे असे कळून येते.
वजन आटोक्यात राहील अशा तर्हेने राहिले तर कोणतेही "मासे" खाल्ले तर चालतात. त्यामानाने शिंपले खेकडे इ कठीण कवचाचे प्राणी कमी खावेत.
दोन महिन्यात एखादा ( किंवा दोन पेग) घेण्याने काहीही फरक पडणार नाही.

शिद's picture

21 Jul 2016 - 1:52 am | शिद

खुप आभार ही माहीती दिल्याबद्दल...धन्यवाद!

वेदांत's picture

20 Jul 2016 - 3:39 pm | वेदांत

अभिनन्दन

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jul 2016 - 3:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

विटूकाकांचे कचकावुन अभिनंदन.
परत एकदा सकाळी उठुन व्यायाम सुरु केला पाहिजे.
पैजारबुवा,

पैसा's picture

20 Jul 2016 - 4:20 pm | पैसा

अभिनंदन! असेच मधुमेह मुक्त रहा!

अप्पा जोगळेकर's picture

20 Jul 2016 - 4:53 pm | अप्पा जोगळेकर

अभिनंदन.

विटेकर's picture

20 Jul 2016 - 6:25 pm | विटेकर

सर्वांचे मन:पूर्वक आभार, बाकी निवांत सविस्तर लिहितो. सध्या हापिसच्या गडबडीत आहे

सुबोध खरे's picture

20 Jul 2016 - 6:54 pm | सुबोध खरे

सर्व प्रकारचे डायबेटीस "बरे" होत नाहीत, अर्थात संपूर्ण औषध्/इन्श्युलिन मुक्ती मिळत नाही.
गोपाळरावांच्या या वाक्याचे मी फक्त विश्लेषण देत आहे.
डायबेटीस का होतो-- आपल्या रक्तातील साखर सरक्तातून शरीरातील प्रत्येक पेशीत शिरण्यासाठी आणि तिचा तेथे वापर होण्यासाठी स्वादुपिंडातून(PANCREAS) इन्स्युलिन हे द्रव्य शरीरात उतरत असते. जितकी साखर जास्त खाल तितके इन्स्युलिन जास्त लागते.
अनुभवांशिकता किंवा इतर कारणांमुळे जेंव्हा इन्स्युलिन स्रवण्याची ही प्रक्रिया कमी होते तेंव्हा सुरुवातीला उपाशीपोटी रक्तात साखर व्यवस्थित असते पण जेंव्हा तुम्ही जेवता तेंव्हा अतिरिक्त साखर वापरण्यासाठी लागणारे इन्स्युलिन तुमचे शरीर तयार करू शकत नाही यामुळे खाल्ल्यानंतरची रक्तातील साखर ही जास्त दाखवली जाते. याला इम्पेयर्ड ग्लुकोज टॉलरन्स( IGT) म्हणतात म्हणजे आपले शरीर अतिरिक्त ग्लुकोजला सहन करू शकत नाही. हा आजार अजून वाढला तर आपल्या रक्तातील इन्स्युलिनची पातळी इतकी खाली येते की उपाशीपोटी सुद्धा आपल्या रक्तातील साखर वाढलेली असते.
दुर्दैवाने रक्तात भरपूर साखर असूनही शरीराच्या पेशींना साखर मिळत नाही. यामुळे आपल्याला भूक आणि तहान जास्त लागणे आणि हीच साखर मूत्रातून टाकून दिल्याने लघवीला वारंवार होणे अशी लक्षणे दिसतात.
मुळात तुमच्या शरीरात इन्स्युलिन स्रवण्याचे प्रमाण कमी झाल्याने जी औषधे दिली जातात(OHA) ती स्वादुपिंडाला चालना देऊन अधिक इन्स्युलिन तयार करायला भाग पडतात. आपले वजन जितके जास्त तितकी आपल्याला इन्स्युलिनची गरज जास्त. एक विशिष्ट पातळी नंतर आपले स्वादुपिंड अधिक इन्स्युलिन तयार करू शकत नाही मग आपल्याला इन्स्युलिनची इंजेक्शने घ्यावी लागतात.
स्वादुपिंदात पेशी हळूहळू मृत्यू पावल्यामुळे कमी होत जातात यामुळे उरलेल्या पेशींवर ताण येतो. मूळ आपले स्वादुपिंड नीट काम करत नसेल तर ते पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत आणण्यासाठी (मृत पेशींचे पुनरुज्जीवन होण्यासाठी) कोणतेही औषध आजतरी उपलब्ध नाही.
यासाठी ज्यांच्या कुटुंबात हा रोग आनुवंशिकतेने आला/ येणार असेल त्यांनी वयाच्या "२५" पासूनच आपली दिनचर्या जास्त आरोग्यपूर्ण करावी. (२५ वयाला विमा काढला तर तो स्वस्त पडतो). जितक्या उशिरा हे काम कराल तितक्या जास्त स्वादुपिंडातील पेशींचा नाश झालेला असेल.
एवढ्या उहापोहानंतर आपल्याला हे लक्षात आले असेल की अजून तरी मधुमेह "कायमचा बरा" होणे शक्य नाही. तो केवळ नियंत्रणात राहू शकतो.

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 8:21 pm | मुक्त विहारि

ह्या माहितीबद्दल धन्यवाद.

आनंदी गोपाळ's picture

20 Jul 2016 - 9:50 pm | आनंदी गोपाळ

आपण म्हणताहात ते बरोबरच आहे.

आपल्या रक्तातील साखर सरक्तातून शरीरातील प्रत्येक पेशीत शिरण्यासाठी आणि तिचा तेथे वापर होण्यासाठी स्वादुपिंडातून(PANCREAS) इन्स्युलिन हे द्रव्य शरीरात उतरत असते. जितकी साखर जास्त खाल तितके इन्स्युलिन जास्त लागते.

वर डॉक्टरसाहेबांनी इन्शुलिन नक्की काय करते याबद्दल ही माहिती दिलेली आहेच. पण डायबेटीस सी.एम.ई. (कंटीन्यूड मेडीकल इडुकेशन उर्फ परिसंवाद) सुरूच आहे, तर वर हायलाईट केलंय त्याबद्दल थोडं डिटेल बोलून घेतो. चूकभूल द्यावी घ्यावी.

आपल्या पेशी एकाद्या कारखान्यासारख्या असतात. अन तो कारखाना चालण्यासाठी लागणारे इंधन = ग्लूकोज. हे ग्लुकोज लिटरली 'जाळून' (ऑक्सिडेशन) उर्जा बनवली जाते.

तर, हे इंधन आपण जेवणातून पोटात घेतो. पचनातून काँप्लेक्स शुगर्सचे ब्रेकडाऊन करून ग्लुकोज बनते, ते पोटातून रक्तात येते. (जेवणातून मिळाले नाही तर शरीरातले राखीव फॅट, वा प्रसंगी स्नायूही मोडून ऊर्जानिर्मिती केली जाते, पण तो वेगळा विषय.) हे रक्तातून वाहून आणलेले ग्लूकोज पेशीच्या दारी आले, की फॅक्ट्रीचे दरवाजे उघडण्याचा जो गेटपास, किंवा किल्ली असतो, तो म्हणजे इन्शुलिन. ही इन्शुलिनची किल्ली पेशीभित्तीच्या कुलुपात लागली, की सेल मेंब्रेन ग्लूकोजसाठी 'पर्मिएबल' होते, अर्थात दराजा उघडतो, होते, व ग्लुकोज आत प्रवेश करते.

डायबेटीसमधे, एकतर किल्ल्या कमी बनतात. किंवा कुलुपे खराब होतात. अर्थात, इन्शुलिन नॉर्मल प्रमाणात येऊनही पेशींत ग्लुकोज शिरणे दुरापस्त होते.. किल्ल्या कमी बनण्यात काहींदा किल्ल्या बनवणारे कारागीर (आयलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स) आळशी होतात, त्यावेळी (पॅन्क्रिआ ग्रंथीतील या पेशींना उत्तेजित करणारी औषधे देवून) किल्ली, अर्थात, इन्शुलिन प्रॉडक्शन वाढवता येते. काहींदा कारागीरच नष्ट झालेले असतात तेव्हा बाहेरून किल्ल्या (इन्शुलिन इंजेक्शने) आणून द्याव्या लागतात. इ. अर्थातच यावरून डायबेटीसचे प्रकार असतात, अन त्यानुसार उपचारही बदलतात.

*

इन्सुलिन हे प्रोटीन असल्याने गोळीसारखे तोंडाने खाल्ले तर नॉर्मल अंडी खाल्ल्यावर प्रोटीन पचते, तसे पचून जाते व रक्तात शिरेपर्यंत त्याचा औषधी इफेक्ट गायब होतो. तस्मात आजतरी इंजेक्शनेच घ्यावी लागतात.

*

डायबेटीसमधे रक्तातील साखर वाढते, हे केवळ लक्षण आहे, जसे मलेरियात 'थंडी वाजून ताप येतो'. मलेरियातले खरे नुकसान वेगळे असते. लाल रक्तपेशींत मलेरियाच्या जंतूची वाढ होऊन त्या फुटतात, ही ती 'अंडरलाईंग पॅथॉलॉजी' अर्थात होणारे खरे नुकसान. मलेरियाचे जंतू शरीरात शिरणे हे कारण आहे. रक्तपेशी फुटतात तेव्हा थंडीवाजून ताप येणे हे लक्षण आहे. लिव्हर व रक्तपेशींना होणारे नुकसान आहे.

डायबेटीसमधे नुसती साखर वापरता येत नाही, हे कारण आहे, रक्त, लघवीतली वाढलेली साखर हे लक्षण आहे, व मायक्रोव्हॅस्कुलर अँजिओपथी हे नुकसान आहे. (आणखीही काही आहे, पण सध्या हा मुख्य मुद्दा)

तर, शरीरातल्या सूक्ष्म रक्तवाहिन्या बंद पडणे हा खरा डायबेटीसचा आजार आहे. यामुळे मज्जतंतूंना पुरवठा करणार्‍याच छोट्या रक्तवाहिन्या बंद पडतात, ज्यामुळे संवेदना खुंटतात. पायाला ठेच लागलेली समजत नाही. तिथे अल्सर्स, जखमा तयार होतात. या जखमा भरण्यासाठी लागणारा रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या पुनः बंद असतात, हवी ती प्रतिकारशक्ती तिथे पोहोचत नाही. रक्तातली अतिरिक्त साखर जंतूंना खाद्य देण्याचे काम करते, इन्फेक्शन्स होत राहतात.

वेदनाच समजत नाहीत. डायबेटिक पेशंटचे हार्ट अ‍ॅटॅकही सायलेंट असतात. दुखतच नाहीत!

रक्तवाहिन्या बंद पडल्याने गल्लीतला पाणीपुरवठा कमी झाल्यासारखी परिस्थिती येते. मग तिथे 'निओव्हॅस्कुलरायझेशन' होते. अर्थात लोक इल्लीगल कनेक्शन्स घेऊ लागतात. नव्या रक्तवाहिन्या फुटतात. या गळक्या असतात. नको तिथे रक्तस्त्राव होतात. उदा. रेटिना. किडनीज..

मल्टी सिस्टीम फेल्युअर, मल्टिसिस्टीम डिसीज.

हे सगळे डायबेटिसच्या अ‍ॅडव्हान्स्ड स्टेजेसमधे होते, जेव्हा मी वर सांगितल्याप्रमाणे पेशंट फिजिशियनकडून सर्जनकडे पोहोचतो/ पोहोचवावा लागतो. व हे होण्याचे मूळ कारण बहुतेकदा, पुअर डायबेटीस कंट्रोल इतकेच असते. उत्तम डायबेटीस कंट्रोल ठेवल्यास सहसा, या स्टेजेस कमी वयात येत नाहीत. वय झाल्यावर... असो. येतानाच रिटर्न तिकिट आणलंय ना आपण? ;)

तर, डायबेटीस अर्थात रक्तशर्करेवर ताबा ठेवला तर या सगळ्या गोष्टी होण्याचे प्रमाण खूपच कमी असते, व म्हणून आम्ही डॉक्टर लोक साखर ठिकाणावर ठेवा, हा सल्ला सांगत राहतो. अर्थात, त्यासाठी व्यायाम, पथ्य, औषध, ही त्रिसूत्री आवश्यक आहे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कॅन गिव्ह मिरॅकल्स. पाच पन्नास हजाराची गाडी आपण काळजीपूर्वक वापरतो. लाख मोलाचे शरीर समजून उमजून वापरणे = लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. इतके हे सगळे सोपे आहे.. त्याला औषधांची जोड आहेच. औषधे, सुर्‍या कात्र्या शक्य तितक्या कमी वापरणे हाच प्रयत्न आम्हा डॉक्टरांचा असतो, तो सफल होण्यासाठी तुमच्या प्रयत्नांची जोड अत्यावश्यक असते. औषध घ्यायला लाजू नये, व विनाकारण, विना एक्स्पर्ट अ‍ॅडव्हाईस ते घेऊही नये.

*

डिस्क्लेमर्सः

१. वरील प्रतिसादात अनेक मेडिकल कन्सेप्ट्स/संज्ञांचे जनसामान्यासाठी अतिसुलभीकरण (putting in layman's terms) केलेले आहे. डायबेटीस हा हत्तीसारखा आहे. आम्ही आंधळे आमच्या वैयक्तीक व्ह्यूपॉईंटातून समजवून सांगायचा प्रयत्न करीत असतो, ;) पण तो मुळात हत्ती आहे, यावर आमचे सर्व डॉक्टरांचे एकमत आहे. तसेच लेमॅन टर्म्स कोणत्या याबद्दल युनिफॉर्म गाईड नाही, म्हणून काही लोक शेपूट, काही टेल, काही पूँछ म्हणतात, अर्थ तोच असतो.

२. "सर्व प्रकारचे डायबेटीस "बरे" होत नाहीत, अर्थात संपूर्ण औषध्/इन्श्युलिन मुक्ती मिळत नाही."
अर्थात, काही प्रकारचे डायबेटीस, काही काळाकरता विना औषध (ओएचए) आटोक्यात राहतात, हे मला म्हणायचे आहे. सर्व नाहीत, सर्वकाळ नाहीत. 'बरे' नाहीत, आटोक्यात.
येनकेनप्रकारेण, शुगरकंट्रोलम् पुरुषो प्राप्येत ;) आयुर्वेदातही मधुमेह 'असाध्य'च वर्णिलेला आहे. :)

आनंदी गोपाळ's picture

20 Jul 2016 - 9:51 pm | आनंदी गोपाळ

अती लांबट प्रतिसादाबद्दल क्षमस्व.

विटेकर's picture

21 Jul 2016 - 4:13 pm | विटेकर

डॉ. त्रिपाठीनी हेच समाजावून सांगितले आहे ! फारच छान सांगितलेत !
दुर्दैवाने डॉक्टर लोक इतके समजाऊन साण्गत नाहीत , डोस वाढवत राहतात !

चौकटराजा's picture

22 Jul 2016 - 9:10 am | चौकटराजा

मी असे वाचले आहे की चल व्यायाम करताना ( गप्पा मारीत मित्रानी सकाळी फिरायला जाणे नव्हे.) करताना " गेट पास" शिवाय मेम्ब्रेन ची दारे उघडतात. त्यामुळे चालायची संवय असलेल्या मधुमेही माणसाला दमायच्या ऐवजी साखरेला पेशीत प्रवेश मिळून उलटे उत्साही वाटते. मला याचा अनुभव आहे. पण याचा अर्थाअर्थी संबंध मी उल्लेखिलेल्या कार्यकारण भावाशी आहे का हो मला कोडे आहे.

सामान्य वाचक's picture

20 Jul 2016 - 10:16 pm | सामान्य वाचक

अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले

एकंदरीत lifestyle कायमस्वरूपी बदलणे हा उपाय आहे
10 दिवसाचा गोळ्यांचा कोर्स केला आणि दुखणे गायब असे नाही
या सगळ्या गोष्टी आयुष्य भर पाळल्या पाहिजेत

मार्मिक गोडसे's picture

21 Jul 2016 - 10:29 am | मार्मिक गोडसे

डॉक्टर आनंदी गोपाळ, छान समजावून सांगितले.

डायबेटीसमधे, एकतर किल्ल्या कमी बनतात. किंवा कुलुपे खराब होतात. अर्थात, इन्शुलिन नॉर्मल प्रमाणात येऊनही पेशींत ग्लुकोज शिरणे दुरापस्त होते.

कुलुपे खराब झाली तर त्यावर कसा इलाज केला जातो? आणि कुलुपे खराब होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी.

विटेकर's picture

21 Jul 2016 - 4:15 pm | विटेकर

कुलुपे खराब

माझ्या माहितीप्रमाणे त्यावर फ्याट जमा होते म्हणून कुलपे खराब होतात, बाकी डो़क्टर समजाऊन सांगतीलच !

बाळ सप्रे's picture

21 Jul 2016 - 11:17 am | बाळ सप्रे

डॉ खरे यांच्या व तुमच्या या प्रतिसादामुळे मधुमेहाची बर्‍यापैकी कल्पना आली.

अप्पा जोगळेकर's picture

21 Jul 2016 - 11:42 am | अप्पा जोगळेकर

थँक्स अ लॉट सर. या प्रतिसादाबद्दल.

वेदांत's picture

21 Jul 2016 - 11:54 am | वेदांत

खुप छान माहीती दिलीत..

साती's picture

21 Jul 2016 - 12:11 pm | साती

आनंदी गोपाळ, एकदम सुंदर शब्दांत समजावलंत मधुमेहाविषयी.
धन्यवाद!

यात अजून एक म्हणजे इन्स्युलीन काही फक्त साखरेच्या चयाप हयातच महत्त्वाचा रोल बजावते असे नाही
चयापचयाच्या इतर अनेक अभिक्रीयांत शरीराला इन्स्युलीनची गरज असते.
त्यामुळे आपल्या रक्तातील साखर कमी आहे म्हणजे मधुमेहाच्या दृष्टीने सगळे आलबेल आहे असे अजिबात नाही हे ही महत्त्वाचे!

साती's picture

21 Jul 2016 - 12:11 pm | साती

आनंदी गोपाळ, एकदम सुंदर शब्दांत समजावलंत मधुमेहाविषयी.
धन्यवाद!

यात अजून एक म्हणजे इन्स्युलीन काही फक्त साखरेच्या चयापचयातच महत्त्वाचा रोल बजावते असे नाही
चयापचयाच्या इतर अनेक अभिक्रीयांत शरीराला इन्स्युलीनची गरज असते.
त्यामुळे आपल्या रक्तातील साखर कमी आहे म्हणजे मधुमेहाच्या दृष्टीने सगळे आलबेल आहे असे अजिबात नाही हे ही महत्त्वाचे!

nanaba's picture

21 Jul 2016 - 3:58 pm | nanaba

Hi,
I have HBA1C 6.1, 6.2 from last 2 years or so (post partum, it went up to 6.7, then with diet change alone, it came down to 6.1 and is in that range most of the times).
lately, fasting sugar was bit higher - 108 or so.
I am not on any medication.
How much damage is already done?
Now, if this changes with lifestyle changes, can we call it "managed" or "cured"?

nanaba's picture

21 Jul 2016 - 10:35 pm | nanaba

हा प्रश्न कुतुहल म्हणून विचरतेयं माहिती साठीं . मेडिकल उपचारांसाठी पर्याय म्हणून नव्हे.

nanaba's picture

21 Jul 2016 - 10:36 pm | nanaba

हा प्रश्न माहितीसाठी विचारला आहे _ उपचारांसाठी पर्याय म्हणून नव्हे.

पिलीयन रायडर's picture

21 Jul 2016 - 9:01 pm | पिलीयन रायडर

बघा बरं.. फक्त खडुसपणा न करता परखडपणे सांगितलत तरी समजतंच आम्हाला.. ;)

सुंदरच समजावुन सांगितलं आहे. ह्या धाग्यातुन पुष्कळ चांगली माहिती मिळाली.

फक्त ते दही, ताक, पनीर आणि लोणी सुद्धा चालणार नाही ह्याबद्दल कुणी डॉक्टर टिपण्णी करेल काय?

शिवाय हे खायचं नाही, धान्य कमी खायची तर बाकी घटक कमी होणार नाहीत का शरीरात?

शाकाहारी लोकांचे फारच वांदे आहेत.

ब़जरबट्टू's picture

8 Aug 2016 - 3:31 pm | ब़जरबट्टू

फक्त शाकाहारीचा नाही, मांसाहारींचे पण वांधे आहेत. या उपचारपदध्तीमध्ये मांसाहार पूर्णपणे बंद करायचा असतो.. त्यामुळे मलापण प्रोटीन बद्दल शंका आहे. पण डॉक्टर म्हणतात, एक महिना स्वतःचे डोके वापरू नका.. :)

चौकटराजा's picture

20 Jul 2016 - 9:03 pm | चौकटराजा

आज येथील एक अट पुरी करता येते का ते प्रयोग करून पाहिले,.वीस मिनिटाच्या काळात 24 मजले 2 हप् त्यात चढून गेलो पहिल्या 12 मजल्या ना 4 मिनिटे 1 से व आणखी 12 मजल्या ना 4 मि व 15 से लागले दोन्ही इमारतीत 4 मजल्या नंतर 20 से आराम केला 12 व्या मजल्यावर नाडी 138 होती .सदर प्रयोग जेवल्यावर 2 तासाने केला .
काहीही दमणूक झाली नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2016 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

चौराजी आप तो नवजवान हो । अभिनंदन ! थम्ज अप !! :)

विटेकर's picture

21 Jul 2016 - 4:21 pm | विटेकर

गोळी घेत असाल आणि जिन्यांचा व्यायाम सुरु केला असेल तर हायपो होण्याची शक्यता आहे , ग्लुकोमीटर वर चेक करत रहा. १५ मिनिटांच्या पायर्‍यांच्या व्यायामाने ३०-४० युनिट साखर कमी होते असा माझा अनुभव आहे !
सदाशिव पेठेत ग्लुकोमीटरच्या १०० स्ट्रीप ११०० रुपायला मिळतात. नेहमीचा दुकानदार लै कापतो

पैसा's picture

20 Jul 2016 - 10:25 pm | पैसा

या धाग्यावरचे सर्व डॉक्टर मंडळींचे प्रतिसाद खूप माहिती देणारे आहेत. धन्यवाद!

अभिजीत अवलिया's picture

21 Jul 2016 - 1:38 am | अभिजीत अवलिया

डॉक्टर आनंदी गोपाळ,
तुमचे ह्या लेखातले प्रतिसाद खूप माहितीकारक होते.
मे गेले 5 महिने कोणतेही कारण नसताना बंद केलेला माझा व्यायाम उद्यापासून परत चालू करत आहे.

चौकटराजा's picture

21 Jul 2016 - 6:25 am | चौकटराजा

आपले कौतुक याबद्द्ल. खरे तर असा व्यायाम व्हॅल्यू अ‍ॅडेड असावयास हवा. महिला पेशंट (अनाहिता मंडळ माफी असावी) तो करत नाहीत. उगीच दोन चार फेर्या मारतात.

मला संगीताची आवड आहे. निरनिराळ्या संगीतकारांच्या प्लेलिस्ट करून त्या ऐकत चालतो. मस्त वाटते. यात शक्यतो मध्य द्रूत
लयातील गाणी घेतलेली आहेत. सबब पायाना अपोआपच लयीची प्राप्ती होते. पाउण तास कसा गेला हे कळत नाही.

मधुमेहात साखरेची पातळी १४० चे खाली सतत असणे कठीण असते. काही लबाडी करून चाचणीचे वेळी तसे करून स्वतः ची फसवणूक करून घेता येते. सबब 'एच बी ए वन सी' ची टेस्ट ही आवश्यक करण औषधाचा डोस त्यामुळे अधिक अचूक ठरवता येतो. साखरेची पातळी १८० चे खाली सतत ठेवणे हे किमान ध्येय असावे. बाकी मधुमेह किडनी डोळा पाय, मेंदू ,हृदय यात नक्की कोणाला नुकसान पोहोचवतो हे नशीबच ठरवते. मधुमेह हा एन्डोक्राईन ओरिएन्टेड व व्हस्कुलर टारजेटिंग आजार आहे
असे म्हणतात.

ले चाैकट फुल्ल फाॅर्म मध्ये

मधुमेह आटोक्यात राहातो असं म्हणायचं असेल.

कंजूस's picture

21 Jul 2016 - 8:07 am | कंजूस

गाला यांचे मधुमेहावरचे पुस्तकही फार उपयुक्त आहे.

चौकटराजा's picture

21 Jul 2016 - 8:54 am | चौकटराजा

हेच म्हणतो.मधुमेही माणसाला त्यात फार उपयुक्त मार्गदर्शन आहे. डॉ जावडेकर यानी लिहिलेले प्रश्नोत्तर वजा पुस्तक ही उत्तम आहे.

विटेकर's picture

21 Jul 2016 - 11:23 am | विटेकर

डॉक्टर लोक्स,
नमस्कार, तुम्ही फार आपुलकीने लिहित आहात म्हणुन थोडे आगंतुक पणे विचारतो, क्षमा असावी,

मी GTT केली तेव्हा एकूण 21 जण होते, पैकी 7 जण पुर्व मधुमेही मुक्त झाले, त्यांचे PP दोन तासांनी 140 च्या खाली होते, ते आतामधुमेही नाहीत असे म्हणायचे का?

बाकी पुष्कळ प्रश्न आहेत, वेळ मिळाला की विचारतो,

सुबोध खरे's picture

21 Jul 2016 - 11:40 am | सुबोध खरे

त्यांचा मधुमेह "आता" नियंत्रणात आहे असा अर्थ आहे. पथ्य पाणी सोडलं आणि वजन वाढलं कि परत साखरेचे प्रमाण वर जाईल.
मधुमेह हा "उच्च रक्तदाबा"सारखा आपला मित्र असतो आणि आपली मृत्यूपर्यंत साथ देतो. तेंव्हा आहारविहार पथ्यपाणी करून तो नियंत्रणाबाहेर जाणार नाही ही काळजी घेणे आवश्यक आहे.

वामन देशमुख's picture

21 Jul 2016 - 5:11 pm | वामन देशमुख

डॉ सुबोध खरे, डॉ आनंदी गोपाळ आणि इतर डॉक्टर्स,

उच्च / निम्न रक्तदाबावर परिपूर्ण माहिती (कारणे, लक्षणे, प्रतिबंधक उपाय, इलाज इ.) देणारा एक लेख लिहावा ही नम्र विनंती.

मराठी_माणूस's picture

21 Jul 2016 - 11:32 am | मराठी_माणूस

हे विधान

पैकी 7 जण पुर्व मधुमेही मुक्त झाले

आणि

सर्व प्रकारचे डायबेटीस "बरे" होत नाहीत, अर्थात संपूर्ण औषध्/इन्श्युलिन मुक्ती मिळत नाही.

थोडा गोंधळ होत आहे. म्हणजे मधुमेहा पासुन कधीच सुटका होउ शकत नाही का होउ शकते ?

विटूकाका आनि विटूकाकी दोघांचे अभिनंदन.
सातीअक्का आणि गोपाळरावांना धन्यवाद.
.
आम्ही बी अनुवांशिक मधुमेहप्रेमीच.
सध्या वायाम चालुय, खाणेपिणे जरा मापात ठेवाया पायजे.

गामा पैलवान's picture

21 Jul 2016 - 11:43 am | गामा पैलवान

समस्त डॉक्टरलोक,

तुम्हाला एक प्रश्न आहे. मला सकाळी झोपेतून उठल्यावर साखर खावीशी वाटते. साधारणत: चमचा दोन चमचा फ्रूट जाम खाऊन बरं वाटतं. रोज अतिरिक्त साखर फक्त चहाकॉफीत असते. दिवसभरात सहा चमचे (टीस्पून) किंवा कमी. इथली इंग्लंडमधली साखर गोडीला बरीच कमी आहे. मधुमेह अजिबात नाही. थोडंफार गोड खाल्लं जातं कधीमधी, पण मनापासून आवडंत नाही. व्यायाम रोजच्या रोज नसला तरी नियमित आहे.

तर प्रश्न असा आहे की साखर खाल्ल्यानंतर तरतरी येणे हे कुठल्याश्या विकाराचे लक्षण आहे का? सकाळी साखर खाल्ल्यावर बरे वाटणे हे व्यसन आहे का?

आ.न.,
-गा.पै.

अप्पा जोगळेकर's picture

21 Jul 2016 - 11:45 am | अप्पा जोगळेकर

शुगर इज इंजुरिअस टु हेल्थ असे वाण्याच्या दुकानात बोर्डावर लिहिणे मँडेटरी करावे काय ?

विटेकर's picture

21 Jul 2016 - 4:24 pm | विटेकर

साखर धोकादायक नाही , साखर उलट आवश्यक आहे , धोकादायक आहे दूध ! त्यावर कायद्याने बंदी आणावी. मनुष्य सोडलयास अन्य कोणताही प्राणी वाढ पूर्ण झाल्यावर दूध सहसा पीत नाही ( अपवाद असतील )
आणि त्यापेक्षा धोकादायक आहे अविवेकाने खाणे ! ती पाटी प्रत्येक ठीकाणी लावावी

बाळ सप्रे's picture

21 Jul 2016 - 12:29 pm | बाळ सप्रे

डॉ खरे व आनंदी गोपाळ यांना प्रश्न..

विटेकर यांनी बी१२, डी जीवनसत्व चाचणी केल्याच म्हटलय.
याचा मधुमेहाशी कसा संबंध आहे??

कारण माझ्या या चाचण्या ( खांद्याच्या दुखापतीसंदर्भात) झाल्या असून ब१२ व ड३ कमी आढळले आहेत. homocysteine ची पातळी २२ होती..

कंजूस's picture

21 Jul 2016 - 2:38 pm | कंजूस

थोडक्यात मधुमेह
१)रोग असा नाही पण त्रास भयंकर
२)रक्तातील अन्नाची झालेली साखर इतर अवयवापाशी पोहोचते पण ती त्यांना घेता येत नाही अथवा फार थोडीच घेता येते ही क्रिया बिघडणे म्हणजेच मधुमेह.
३)ही न घेतलेली साखर मुत्रावाटे बाहेर पडते अथवा पडतच नाही हा एक त्रास वाढतो.
४) या क्रिया का बंद पडतात याचा शोध लागलेला नाही.

श्रीगुरुजी's picture

21 Jul 2016 - 2:54 pm | श्रीगुरुजी

विटेकर,

सर्वात प्रथम तुम्ही प्रयत्नपूर्वक मधुमेहापासून मुक्ती मिळविलीत या बद्दल अभिनंदन!

माझे काही विचार मांडतो.

१) तुम्हाला २००६ पासून मधुमेह होता (म्हणजे २००६ मध्ये मधुमेह आहे हे तपासणीत दिसले. कदाचित त्याआधीपासूनही असेल.). २०१४-१५ पर्यंत तुम्ही फक्त ग्लुकोरिल च्या रोज २ च गोळ्या घेत होता व इतक्या कमी औषधावर तुमची साखर पूर्ण नसली तरी बर्‍यापैकी नियंत्रणात होती. म्हणजे बहुतेक तुमचा टाईप-२ चा मधुमेह तितक्या तीव्र स्वरूपात नसावा. साधारणपणे टाईप-२ चा मधुमेह असलेल्यांना यापेक्षा जास्त प्रमाणात औषधे घ्यावी लागतात. बर्‍याच जणांना गोळ्या व / किंवा थोडे इन्सुलिन असे दोन्ही घ्यावे लागते. परंतु तुमचे फक्त दोन गोळ्यांवर भागत होते. याच कारणामुळे डॉ. त्रिपाठींची उपाययोजना तुम्हाला लागू पडली असावी. ज्यांना जास्त प्रमाणात औषधे घ्यावी लागतात किंवा जे रोज किमान २०-२५ युनिट्स इन्सुलिन घेतात, त्यांना या उपचार पद्धतीने मधुमेहापासून मुक्ती मिळणे शक्य होईल असे वाटत नाही.

२) आता तुम्हाला मधुमेहापासून मुक्ती मिळाली आहे. परंतु यापूर्वी मधुमेह होऊन गेल्याने भविष्यात पुन्हा तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो. यासाठी आमरस किंवा तत्सम गोड पदार्थ थोड्या प्रमाणातच खाणे आवश्यक आहे.

३) मधुमेह मुक्तीसाठी डॉ. त्रिपाठींनी सुचविलेले डाएट तितकेसे परीपूर्ण नाही असे मला वाटते. तुमच्या सध्याच्या वयात शरीरात कॅल्शिअम व ड जीवनसत्व पुरेसे नसण्याची शक्यता असते. दूध व दुग्धजन्य पदार्थ पूर्ण बंद केले तर शरीराला आवश्यक असलेले कॅल्शिअम, ड जीवनसत्व व अ जीवनसत्व पुरेसे मिळू शकणार नाही. विशेषतः ड जीवनसत्वासाठी गायीचे दूध वगळता फारसे शाकाहारी पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे मधुमेहावर मुक्ती मिळविताना हाडे व स्नायू दुर्बल होण्याची शक्यता वाटते.

४) ज्यांचा मधुमेह बॉर्डरवर आहे त्यांनाच तो फक्त व्यायाम व आहाराने नियंत्रणात ठेवता येतो. इतरांना व्यायाम व आहाराच्या बरोबरीने योग्य ती औषधे घ्यावी लागतात.

५) रोज सकाळी कडधान्याची न्याहारी प्रथिने व तंतुमय पदार्थ मिळण्याच्या दृष्टीने चांगली असली तरी कडधान्ये पचायला काहीशी जड असल्याने ज्यांना आतड्याचे विकार आहेत त्यांना ही रोजची न्याहारी जरा त्रासदायकच होईल.

६) मधुमेह सुरवातीला एकटा आला तरी नंतर त्याच्यापाठोपाठ रक्तदाब, हृदयविकार, काचबिंदूसारखे डोळ्यांचे आजार इ. कालांतराने येण्याची शक्यता असते. अशा रूग्णांना फारच संतुलित आहार सांभाळावा लागतो. डॉक्टर त्रिपाठींची उपाययोजना ज्यांना फक्त मधुमेह आहे व इतर विकार नाहीत आणि ज्यांचा मधुमेह तितकासा तीव्र नाही अशांनाच लागू पडेल असे वाटते.

७) एकदा झाल्यानंतर मधुमेह कधीही बरा होत नाही, परंतु तो नियंत्रणात ठेवता येऊ शकतो असे सर्व डॉक्टर सांगतात. त्यामुळे एखाद्याचा मधुमेह पूर्ण बरा झाला असे वाचून थोडासा संभ्रम निर्माण होतो.

अर्थात तुमचा मधुमेह पूर्ण बरा झाला आहे हे चाचण्या करून सिद्ध झाले आहे. चिकाटीने उपचारपद्धती समजून घेऊन मधुमेह पूर्ण बरा केल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन!

विटेकर's picture

21 Jul 2016 - 5:18 pm | विटेकर

१. पूर्ण शाकाहारी आणि काहीसा व्यायाम यामुळे माझे दोन गोळ्यांवर चालून गेले हे खरेच पण माझ्याबरोबर अनेकांचे इन्शुलीन पण सुटले, माझ्याबरोबर जी टी टी केली आणि पास झाली अश्या एक प्राध्यापिका २५ वर्षांपासून मधुमेही होत्या आणि त्यपैकी १० वर्षे इनशुलीन घेत होत्या. पूर्ण मुक्त झाल्या !

२. होय , पुन्हा साखर वाढू शकते याची मला जाणीव आहे ! धन्यवाद. आणि म्हणूनच मी जी टी टी पास न झाल्याचा मला सूक्ष्म आनंदच झाला ! नाहीतरी मी पुन्हा सैराट झालो असतो !

३. बी १२ आणि डी ही शाकाहारी लोकांची नेहमीची समस्या आहे ! त्यासाठी सप्लीमेंट घेत राहणे हाच उपाय आहे. अर्थात काही मिश्रहारी लोकांनाही ही समस्या आहेच,त्याचा मधुमेहाशी संबंध आहे ही आणि नाही ही! डाळींमधून पुरेशी प्रथिने मिळतातच आणि माझ्या मार्च मधील चाचण्यांमध्ये दोन्ही ही नोर्मल आले आहे !

४. नाही , इन्शुलिन घेणारेही मुक्त झाले आहेत हे वरती सांगितले आहेच !

५.सुरुवातीला त्रास झाला पण स्मूदिमुळे पित्ताचा / पोटाचा अजिबात त्रास होत नाही. आणि बहुतेक गुजराती लोक डाळींची न्याहरी करतात ! असा आहार मी गेली ११ महिने करतो आहे.

६. डॉ. त्रिपाठींच्या म्हणण्यानुसार मधुमेह बरा होतो. जी टी टी पास असेल तर द्ब्ल्यु एच ओ देखील मधुमेह नाही असे मान्य करते. त्यांनी एच बी वन सुद्धा चालते. पण मिपाच काय इतरत्र ही दॉक्टर लोक हे मान्य करत नाहीत

६.मधुमेह च नव्हे तर अन्य आजार देखील या आहाराने आटोक्यात येतात असा अनुभव आहे, आणि आजाराप्रमाणे थोडे फार आहारात बदल करता येतात.

मन१'s picture

21 Jul 2016 - 6:20 pm | मन१

त्रिपाठींकडे जाउन, जबरदस्त नियंत्रण प्राप्त केलेली दोन लोकं मला ठाउक आहेत. त्यातले एक ज्येष्ठ माजी मिपासदस्य आहेत. ते मागील दहा वर्षे इन्शुलिन घेत होते. डायबेटिस त्यांना त्याही पूर्वीपासून होता. त्यांनी दिनचर्या बदलल्यवर दोनेक महिन्यांतच इन्शुलिन घेणे पूर्णतः बंद करणे शक्य झाले! दहा वर्शापासून सुरु असलेले . गोळ्यांचीही गरज पडलेली नाही .
मागील किमान दीडेक वर्षं पूर्णतः इन्शुलिन - गोळ्या बगोळ्यात. त्यांची एच बी ए वन सी सुद्धा ६.० पेक्षा कमीच असावी.
.
.
त्यांच्याच रेफरन्सने आमच्याकडच्या पेशण्टला घेउन गेलो. (सुरुवातीस्स हा डॉ त्रिपाठी गोलमाल असण्याची शक्यता वाटली. म्हणून रेफरन्स तपासून घेतला.) माझ्या जावळच्या व्यक्तीच्या गोळ्या पूर्णतः बंद झालयत . एच बी ए वन सी ६.० पेक्षा कमी आलेली आहे. फास्टिंग व पोस्ट मील दोन्ही आकडे शंभरच्या आसपास असतात. जी टी टी लवकरच केली जाणार आहे.
.
.
इथल्या डॉ लोकांच्या प्रतिसादांवरुन व माझ्या खास जवळचय डॉक्टर मित्रांशी बोललल्यावर जाणवलेली बाब म्हणजे "फ्रीडम फ्रॉम डायबेटिस " हे मिसनॉमर, किंचित चुकीचं नाव असू शकतं.
"फ्रीडम फ्रॉम मेडिसिन्स्/इन्शुलिन/ मेडिकल ट्रीटमेण्ट" हे नाव कदाचित त्यातल्या त्यात जवळ जातं. आणि त्याबद्दल दुमत नसावं. आणि डायबेटिस पासून मुक्ती मिळत नसेल तरी औषधांपासून मुक्ती मिळणेही हीसुद्धा फार मोठी गोष्ट आहे ना ?.
.
.
आता प्रश्न राहिला की "असं किती दिवस चालाय्चं" तर उत्तर हेच की जितके दिवस चाल्वता येइल तितपत. समजा तुम्ही अजून काही दशके अशी घालवू शकलात )आणि प्रारब्ध असल्याप्रमाणे नंतर डायबेटिस उपटलाच) तरी आयुष्यातली महत्वाची वर्षं तुम्ही आरोग्यदायी, विना औषध घालवलेली असतात. ही सुद्धा म्हत्वाची गोष्ट वाटते.
.
.
त्रिपाठी सांगतात त्यातल्या कित्येक गोष्टी डॉक्टर मंडाळींना कॉमन सेन्सवाल्या वाटतत; हे खरय. माझ्या डॉक्टार मित्रांना त्या तशाच वाटल्या. पण दुर्दैवाने आमचा पेशण्ट जेव्हा डॉक्टार लोकांना दाकह्वायला गेला तेव्हा त्यांनी हे ऑप्शन दिलं नव्हतं की "तुम्ही अमुक लाइफ स्टाइल बदल केलात तर औषध पूर्ण बंद करता येइल. आणि आहे तसच रहायचं असेल तर औषध घ्यावं लागेल." त्यांनी थेट औषधं सुरु करण्याचा सल्ला दिला.
अर्थात ह्याबद्दल काडीचीही तक्रार नाही. कदाचित आम्हीच आमच्याबाजूने तसं विचारणयत कमी पडलो असू. किंवा त्या वेळी डॉक्टरना काही इतर कामं/ वर्कलोड असू शकत होता. आमच्या बाजूने काही चूक आसेल हे मान्य आहे. पण त्रिपाठींकडे गेल्यावर त्यांनी पहिल्यांदा हाच ऑप्शन दिला की पुरेशी पथ्य पाळून औषधं बंद करता येत असतील तर करणा र का ?
.
.

क्रमशः

मन१'s picture

21 Jul 2016 - 8:40 pm | मन१

वरती नीट घटनाक्रम लिहायचा राहिला. तो लिहितो.
१. काही वर्षापूर्वी पेशण्टला शुगर डिटेक्ट झाली.
२. डायबेटिसमधल्या तज्ञ, अनुभवी , जाणत्या मुळे नावाच्या डॉक्टरांकडे गेलो. (अर्थातच मॉडर्न मेडिसिनवाले डॉ आहेत ते ) ह्यांचे नाव आहे बरेच. हसतमुख, सज्जन व्यक्तिमत्व. आणि तसाच अनुभवही आला. ह्यांच्याकडे नियमित जाउन शुगर नियंत्रणात रहात होती. साधारण १६० च्या घरात असे. पण नियमित गोळ्या घ्याव्या लागत. (त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आकडा बराच मोठा होता.)
३. कुठूनतरी त्रिपाठींबद्दल ऐकले. (मिपावर एक सिनिअर,पूर्वी बरेच सक्रिय असणारे, अभ्यस्त, कलंदर सदस्य व माजी संपादक ह्यांनीही दहा वर्षाची इन्शुलिन बंद करुन दाखवल्याचे कन्फर्म केले. ) मग "प्रोग्राम जाउन बघायला हरकत काय आहे " असा विचार करुन आम्चा पेशण्ट त्रिपाठींचा प्रोग्राम ( हा धागा ज्याबद्दल आहे तो प्रोग्राम) अटेण्ड करुन आला.
४. डॉक्टर मुळे ह्यांना विचारले की अमुक एक प्रयोग करुन पाहणार आहे आहार- विहार नियंत्रण, व्यायाम वगैरे बद्दल ; चालेल का ? त्यांनी होकार दिला. व नियमित तपासणी करत राहण्यास सांगितले.
५. तपासण्या केल्या गेल्या. व नियमित मुळेंकडे चेक अपला जात होतो. त्यांनीच काही महिन्यांनी सांगितले की आता गोळ्या थांबवल्या तरी चालतील. (पण तपासणी नियमित करत राहणे पिरियॉडिकली, हे मात्र गरजेचे. )
पेशण्टने गोळ्या पूर्णत: बंद केल्या .
ह्या धाग्यात वरती डॉक्टर लोकांनी जी माहिती दिली ऑल्मोस्ट तीच माहिती त्यांनीही दिली. त्यांचे म्हण्णे आहे की "तुम्ही कंट्रोल करत आहात ते चांगलेच आहे. जितके दिवस कराल तितके चांगलेच."
आता हे किती दिवस करता येइल , कल्पना नाही. किमान काही दशके तरी कंट्रोल करता यावे अशी इच्छा /उद्दीष्ट आहे. जमल्यास उत्तमच. अर्थात अजूनही महिन्याभरातून एकदा किंवा सुचवले/ साम्गितले जाइल तसे डॉक्टर मुळेंकडे जाणे होतेच. ते सांगतील ते श्रद्धेने ऐकण्याकडे कल आहे.
त्यांनी "तुम्ही कंट्रोल करत आहात ते चांगलेच आहे. जितके दिवस कराल तितके चांगलेच." हे म्हणताना काही तपशील अतिसंक्षिप्त रुपात सांगितले होते. त्यातले काही समजले, लक्षात राहिले. काही विसरले गेले. वरचे प्रतिसाद बघून डॉक्टर मुळे काय म्हणाले होते, ते अधिक नेमक्याने उलगडले. त्यामुळे ह्या धाग्यातल्या प्रतिसादांबद्दल डॉ लोकांचे आभार.
.
.
गोळ्या - औषधं काही वाईट आहेत ; भयंकर आहेत असं म्हण्णं अर्थातच नाही . त्या संदर्भात काहीही म्हण्ण्याइत्का अभ्यास / पात्रता माझी नाही. गोळ्या- औषधांना " आहार - विहार -जीवनशैली नियंत्रण " हा एक पर्याय ( निदान काही काळापुरता) असणं शक्य आहे (निदान काही केसेस मध्ये) इतकच साम्गायचं आहे (ज्यांना माहित नसेल त्यांना .... म्हंजे आम आदमीला, आम पेशण्टला सांगायचं आहे. वैद्यकिय क्षेत्रातल्या लोकांसाठी हे सामान्य ज्ञान असेल , त्यांना ह्यात विशेष काही नवीन नसेल ह्याची आयडिया आहे. )
शिवाय स्थल-काल-परिस्थिती-ऐपत लक्षात घेता काही केसेसमध्ये औषधोपचार (गोळ्या , इन्शुलिन ) हे अपरिहार्य/व्यवहार्य आहेत ह्याचीही कल्पना आहे. पण निदान काही लोकं तरी त्यापासून दूर राहू शकतात, ह्यची त्या लोकांना जाणीव व्हावी, इतकीच इच्छा. माझ्या डोळ्यासमोर दोन उदाहरणं आहेत, म्हणून सांगतो आहे.

चौकटराजा's picture

21 Jul 2016 - 6:31 pm | चौकटराजा

एकदा म्हणता WHO म्हणते जी टी टी पास झालेला माणू स मुक्त झाला दुसऱ्या जागी म्हणता पून्हा साखर वाढेल याची जाणीव आहे यात तुमचा पुरता गोंधळ झालेला दिसून येतोय . एक घोडा बोलो नाहीतर.......चतुर बोलो. आहार नियंत्रणाने मूळ बीटा सेल सर्वच्या सर्व काम करायला लागतील ? मला शंका आहे बुवा ! व गोळ्यांचे काही भयानक परिणाम मला तरी 12 वर्षात जाणवलेले नाहीत दरम्यान आजही मी 9 मिनिटात 24 मजले चढून गेलो.जे पटले तेव्हडे लगेच चालू केले आहे.

चंपाबाई's picture

21 Jul 2016 - 11:11 pm | चंपाबाई

आज जी टी टी नॉर्मल आहे. याचा अर्थ इन्शुलिन डिमांड व सप्लायठीकठीक आहे.

पण उद्या अचानक मेडिकल सर्जिकल प्रॉब्लेम. स्ट्रेस वगैरे झाल्यासपुन्हा शुगर वाढू शकते.

गटार तुंबली होती... ७० % साफ केली. आता पाणी तुंबत नाही... पण अचानक पाउस जोराचा झाला किंवा काही कारणाने पुन्हा घाण अडकली व ३० चे ब्लॉकेज पुन्हा ५० ला आले तर पुन्हा पाणी तुंबेल.

आजानुकर्ण's picture

21 Jul 2016 - 9:25 pm | आजानुकर्ण

उत्तम चर्चा. सर्व डॉ. मंडळींना मनापासून धन्यवाद

पद्मावति's picture

21 Jul 2016 - 11:04 pm | पद्मावति

खूप माहितीपूर्ण लेख.धन्यवाद. प्रतिसाद ही आवडले.
तुम्ही सांगितलेलं diet मधुमेहासाठी तर आहेच. पण असेच diet निरोगी वेट लॉस साठी सुद्धा उपयुक्त आहे. अगदी महिनाभर जरी केलं तरी उत्तम परिणाम दिसतात. कडधान्ये आहारात समाविष्ट असल्यामुळे मसल मास अजिबात कमी न होता वजन कमी होते.

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 4:35 am | संदीप डांगे

धन्यवाद! प्रयत्न करतो.

स्वाती दिनेश's picture

21 Jul 2016 - 11:43 pm | स्वाती दिनेश

लेख व प्रतिसाद माहितीपूर्ण.
स्वाती

लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

शिवाय, चिकाटीसाठी तुमचे आणि तुमच्या पत्नीचेही कौतुक! नाहीतर बर्‍याचदा कुठलीही गोष्ट करण्यामध्ये कंटाळाच आड येतो.

स्वीट टॉकर's picture

22 Jul 2016 - 10:35 am | स्वीट टॉकर

तुमचं तर कौतुक आहेच, त्याहूनही जास्त तुमच्या सौभाग्यवतींचं.

डॉक्टरमिपाकरांकडून अतिशय सोप्या भाषेत उत्तम माहिती आम्हाला मिळाली तुमच्यामुळे. सगळ्यांना धन्यवाद!

अवांतर - मी कुठेतरी वाचलं आणि पटलं. पूर्ण उंचीचा आरसा घरी ड्रेसिंग टेबलला नसेल तरी हरकत नाही. न्हाणीघरात मात्र असायलाच हवा. आपण खरेखुरे कसे आहोत ते स्वतःला रोज दिसायला हवं.

डायबेटीसमधे, एकतर किल्ल्या कमी बनतात. किंवा कुलुपे खराब होतात. अर्थात, इन्शुलिन नॉर्मल प्रमाणात येऊनही पेशींत ग्लुकोज शिरणे दुरापस्त होते.

डॉक्टर खरे आणि डॉक्टर आगो,

ह्या कुलुप खराब होण्याबद्दल पण सांगा प्लीज.

अजुन एक प्रश्न.

माझ्या वडीलांना डायबेटीस होता आणि पुढे इन्सुलिन पण घ्यावे लागत होते. तेंव्हा डॉक्टरांची एक कॉमेंट होती ती अशी की "मधुमेही माणसाची सुगर कंट्रोल मधे आहे म्हणजे सर्व ऑलवेल आहे असे समजू नये. इन्सुलिन ची कमतरता बॅकग्राउंड ला नुकसान करतच असते" हे बरोबर आहे का? असले तर काय करावे?

डॉ सुबोध खरे, डॉ आनंदी गोपाळ, डॉ. साती, डॉ. म्हात्रे
आपल्या सर्वांचे मनापासून आभार. सध्याच्या लाइफ स्टाईल मुळे असेल पण बहुतेक कुठलेहि डॉक्टर इतके सर्व समजावून सांगण्याइतका वेळ देवू शकत नाहीत. तुम्ही सर्वांनी स्वतःहून इतक्या सोप्या सरळ भाषेत कळकळीनी लिहिलं आहे कि तुम्ही मिपा परिवाराचे खरे फॅमिली डॉक्टर शोभता.

शिद's picture

22 Jul 2016 - 9:40 pm | शिद

+१००...अगदी सहमत.

रुस्तम's picture

23 Jul 2016 - 11:21 am | रुस्तम

बाडीस

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 8:34 pm | गंगाधर मुटे

फारच उपयुक्त आणि मौलिक धागा.

_________________________________
साती, नानबा, जामोप्या रामराम :)
(माझे तिकडचे मित्र इकडेही आहेत हे आजच कळले म्हणून :)

nanaba's picture

24 Jul 2016 - 11:14 am | nanaba

नमस्कार!
मी इथे नव्याने यायला लागलिये.. :)

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 9:18 pm | गंगाधर मुटे

२००७ पूर्वी वेगवेगळ्या कारणाने मधुमेहाच्या चाचण्या घेतल्यातरी मधुमेह नाही असे डॉक्टर सांगत होते. मला मधुमेह हे १२-०१-२०१२ ला कळले. तेव्हा जेवनानंतर २ तासाने २५२ होती. नंतर प्राणायाम, थोडा व्यायाम व साखर पूर्णपणे केल्यानंतर सहा महिन्यात नॉर्मल पातळीवर आला. १२-०१-२०१२ पासून आजतागायत Glyomet 500 SR २ वेळा सुरू आहे. मात्र एक वर्षापासून प्राणायाम, व्यायाम बंद आहेत.

गेल्या सहामहिन्यात फ़ास्ट १२० ते १३० आणि जेवनानंतर १७० ते २२० असं चाललंय. दोन महिन्यापासून चेक केलेली नाही. उद्या सकाळी चेक करून सांगतो.

नियमित होणारे त्रास : तासाभराच्या अंतराने तरी पाणी प्यावेच लागते.
पातळी वाढल्यानंतर होणारे स्पेशल त्रास : अंगदुखणे. सांधे दुखने. कधी अंगाला खाज सुटणे. (Cetrazine घेतली की १५ मिनिटात थांबते), कधीकधी रात्रभर व दिवसभर झोपच न येणे.

याव्यतिरिक्त वेगळे काही त्रास जाणवले नाही.

माझ्या मर्यादा : नियमितपणे समान दिनचर्या ठेवणे अशक्य आहे. सदासर्वदा पुरेशी झोप घेणे शक्य नाही. सदासर्वदा सकाळी झोपून उठणे शक्य नसल्याने प्राणायाम, व्यायाम करणे शक्य होत नाही. सायंकाळी अर्धा तास चालायचे असा विचार सध्या करतो आहे.

कवितानागेश's picture

24 Jul 2016 - 12:19 am | कवितानागेश

या विषयावरचा भाग २ लवकरच लिहिण्याची इच्छा आहे! :)

राजेश घासकडवी's picture

24 Jul 2016 - 3:40 pm | राजेश घासकडवी

सर्वच डॉक्टर लोकांनी अत्यंत स्पष्ट आणि समजायला सोप्या शब्दांत मुद्दे मांडून स्पष्ट चित्र मांडल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. विशेषतः आनंदी गोपाळ यांनी कारखाना, कुलपं, चाव्या यासारख्या उपमा वापरल्याने कुठचा डायेबिटिस गोळ्यांशिवाय ताब्यात राहू शकतो, कधी गोळ्या घेणं अनिवार्य होतं याबद्दल छान विवेचन केलेलं आहे. सगळ्यांचेच आभार.

मला आता दुसऱ्या बाजूने प्रश्न विचारावासा वाटतो. इन्शुलिन घेण्यात नक्की काय त्रास आहे? इन्शुलिन टाळण्यासाठी जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल करावा लागतो.
- साखर खायची नाही. यामुळे आपण जीवनातल्या एका प्रचंड आनंदाला मुकतो.
- अतिरेकी व्यायाम करायचा. सगळ्यांना यासाठी दररोज पंचेचाळीस मिनिटं मिळू शकतीलच असं नाही.
- दूग्धजन्य पदार्थ सोडायचे. (याने किती फायदा होतो हे विवाद्य आहे पण लेखात उल्लेख आलेला आहे) किती चवदार पदार्थांना आपण यामुळे मुकतो याची कल्पनाही करता येत नाही.

जीवनपद्धतीत डायबेटिसच्या निमित्ताने काही मर्यादित बदल करावे हे ठीकच आहे. म्हणजे व्यायाम वाढवावा, साखर थोडी कमी खावी, दारू कमी प्यावी वगैरे वगैरे सर्वसाधारणच चांगल्या तब्येतीसाठी आवश्यक गोष्टी आहेत. पण याचा अतिरेक करून आपण नक्की काय साधतो? तर दिवसातून दोनचार वेळा इन्शुलिन टोचून घ्यावं लागत नाही. यातून 'आपण काहीतरी विजय मिळवला' या भावनेपलिकडे नक्की काय मिळतं?

म्हणजे
१. वर दिलेली अतिरेकी पथ्यं + शून्य बाह्य इन्शुलिन = साखरेची पातळी मर्यादेत
२. किंचित जीवनपद्धतीत बदल + काही बाह्य इन्शुलिन = साखरेची पातळी मर्यादेत

या दोन पर्यायांमध्ये पहिला चांगला, आणि दुसरा वाईट असं का? माझ्या डोळ्याला जर काही मर्यादा असतील तर मी मुकाट्याने चष्मा लावतो. तशाच इन्शुलिनच्या मर्यादा मान्य का करू नये? गोळ्यांशिवायच किंवा इन्शुलिनशिवायच हे सगळं साधण्यासाठी इतका जिवाचा आटापिटा का करावा?

संदीप डांगे's picture

24 Jul 2016 - 8:33 pm | संदीप डांगे

मलाही काहीसे असेच वाटले होते. पण नेमक्या शब्दात मांडणे जमत नव्हते.

१. गोळ्या कायम राहिल्याने नेमकं काय होतं?
२. इन्सुलिन तयार होणे बंद झालेलेच असतांना बाहेरुन इन्सुलिन घेण्यात अडचण काय आहे?
३. जर मधुमेह कधीच बरा होणार नसेल, तर वर उल्लेखित अतिरेकी जीवनपद्धती कायमस्वरुपी कशी काय अवलंबता येईल?
४. हे एका अर्थाने तुरुंगासम जीवन नव्हे काय?

राजेशजींनी मांडलेला मुद्दा व त्याबद्दलचे विचार यावर डॉक्टरांकडून मंथन अपेक्षित आहेच...

सामान्य वाचक's picture

24 Jul 2016 - 8:57 pm | सामान्य वाचक

म्हणून माझे निरीक्षण असे,
1 काही गोळ्यांनी वजन वाढते , हळू हळू गोळी ची मात्र वाढवत न्यावी लागते

डॉ नि सांगितलेले साईड इफेक्ट्स
किडनी, लिवर वर परिणाम होते, स्किन allergy इ इ

2 इन्सुलिन ची मात्रा वाढवत न्यावी लागते
3 हि खरे तर अतिरेकी जीवन पद्धती नाही। एकदा शुगर कंट्रोल मध्ये आली कि deviation म्हणजे चैन करता येते

4 नाही हो। आपले आजी आजोबा हेच खात मजेत जगले

माझ्या एका मामाला डायबेटिस ने झिझवले हे मी पहिले आहे

35 वर्षे गोळ्या हळू हळू वाढत आणि नंतर इन्सुलिन वाढत गेले
डोळे आणि मज्जा संस्था यावर खूप परिणाम झाला

हे सगळे औषधे घेऊन आणि पथ्य पाळून,

याउलट दुसऱ्या नातेवाईक ना त्रिपाठी डायट ने डायबेटिस मुक्त झालेले पाहिले आहे
आता कमी प्रमाणात हॉटेलिंग, चहा, मिठाया इ सगळे सुरु करून हि शुगर कंट्रोल मध्ये आहे

संदीप डांगे's picture

24 Jul 2016 - 9:55 pm | संदीप डांगे

Ok. Fine. Thanks for the answer. Did not know that medication keeps on increasing

सुबोध खरे's picture

24 Jul 2016 - 11:13 pm | सुबोध खरे

घासुगुरुजीआपल्याला पडणारा प्रश्न हा जवळजवळ १०० % मधुमेहाच्या रुग्णांना पडतो
मधुमेह हा जितका चांगला नियंत्रणात असेल तितक्या त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंती कमी होतात याचा अर्थ असा नाही की आपण "जगणे" सोडून द्यावे

गुलाबजाम एक घासात खाण्या ऐवजी चार लहान लहान घास घेतले आणि नीट चावून खाल्ला तर तुम्हाला चार गुलाबजाम इतकाच स्वाद अनुभवता येतो.

जास्त खाणाऱ्याला खवय्या म्हटले तर जास्त गणरायाला गवय्या म्हणायला पाहिजे हे पु लं म्हणून गेले आहेत याचा हाच अर्थ आहे.

जर तुम्हाला थोडी औषधे आणि प्रमाणात गोड खाऊन तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवता आला तर "उपाशी" औषधावाचून राहण्यापेक्षा हे बरे असे माझे वैयक्तिक मत आहे. शेवटी जीवन हे जगण्यासारखेच असावे हे माझे मत आहे.

माझ्या आईला मधुमेह वयाच्या ६२-६३ ला प्रथम दृष्टीस पडला. यानंतर तिचे पथ्य आणि गोळ्या घेऊन साखर १००-१२० आणि १६०-१८० (जेवण अगोदर आणि नंतर) या टप्प्यात ठेवण्याचं प्रयत्न करतो. कारण अतिपथ्य करायला सांगितले तर आमची आई ते करणार नाही आणि तिचे असे मत आहे की उपाशी मारण्याच्या पेक्षा मी खाऊन मरेन. मी तिला भीती घालत असतो की एकदाच फगेलीस तर ठीक आहे पण हृदयविकार किंवा पक्षाघात होऊन अंथरुणावर पडलीस तर तुला आणि वडिलांना जास्त त्रास होईल. तिचे सध्या वय ७५ आहे आणि रक्तातील साखर गणपती उत्सव आणि दिवाळी च्या नंतर २०० च्या वर जाते आणि Hb a १ C हे सात च्या आसपास असते. त्यानंतर परत ते ६ ते ६. ५ पर्यंत येते.

सुग्रास अन्न हा एक आयुष्यातील अतीव आनंदाचा भाग आहे म्हणूनच आपण बरीच वेळेस कोणताही सण समारंभ साजरा करतो त्यात सुग्रास अन्न हा एक महत्त्वाचं भाग आहे.

ज्याला पटेल आणि रुचेल त्याने कडक पथ्य करावे आणि औषधे गोळ्या न घेताही आनंदात राहावे.

ज्याला ते झेपणार नाही त्याने मात्र प्रमाणात खाणेव्यायाम, गोळ्या आणि गरज असल्यास इन्स्युलिन घेऊन आपला मधुमेह नियंत्रणात ठेवावा.

काही होत नाही म्हणून हलगर्जी पण फार महागात पडू शकते.

राजेश घासकडवी's picture

25 Jul 2016 - 4:33 am | राजेश घासकडवी

जर तुम्हाला थोडी औषधे आणि प्रमाणात गोड खाऊन तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवता आला तर "उपाशी" औषधावाचून राहण्यापेक्षा हे बरे असे माझे वैयक्तिक मत आहे.

धन्यवाद. आत्तापर्यंत ज्या ज्या डॉक्टरांशी बोललेलो आहे त्यांचा असाच दृष्टिकोन दिसलेला आहे. मात्र डायाबेटिसच नाही, तर एकंदरीत 'हेल्थ-सेल्फ-हेल्प' इंडस्ट्रीचे प्रवक्ते हे अशा मध्यममार्गांऐवजी हे खाऊच नका, इतकाच व्यायाम करा वगैरे काहीसा हट्टी आग्रह धरताना दिसतात. वजन कमी करण्यासाठीची जी काही डायेटं येतात त्यात असे अनेक टोकांचे सल्ले दिसतात. वर दिलेल्या रजिममध्येही असाच एक टोकेरीपणा मला जाणवला.

मला स्वतःला अशा सल्ल्यांमध्ये माणसाच्या आनंदाची जी कॉस्ट असते ती खर्चाच्या कॉलममध्ये मांडलेली कधीच दिसत नाही. काही लोक खरोखर असे असतात की त्यांच्यासाठी या विजयाच्या आनंदाच्या मानाने दूध-साखर-पाव न खाण्याचं दुःख नगण्य असतं. ते त्यांना लखलाभ. पण सामान्य माणसांसाठी हे आनंद महत्त्वाचे असतात. आनंद कितीही कमी झाला तरी चालेल पण आयुर्मान वाढलंच पाहिजे हा अट्टाहास कधीकधी अशा सल्ल्यांतून दिसतो. असो.

सुबोध खरे's picture

25 Jul 2016 - 10:01 am | सुबोध खरे

बहुसंख्य डॉक्टर हे रोज पाहत असतात की अतिकडक पथ्य असेल तर माणसे त्यातून पळवाट काढतात किंवा त्यांना ते शक्य नसते. शिवाय डॉक्टर रोज अकाली मृत्यू पाहत असतात त्यामुळे "आज" आयुष्य आनंदात जगायला पाहिजे या गोष्टीची त्यांना सतत जाणीव असते.
बरेचसे असे वजन कमी करणे किंवा मधुमेहावर खात्रीशीर इलाज सारखे कार्यक्रम असतात ते १-३ -६ महिने इतकाच कालावधी साठी असतात आणि याचे प्रवर्तक तुमची तेवढ्याच काळाची "खात्री" देतात. तुमचा फॅमिली डॉक्टर मात्र तुमचा दूरवरचा आणि तुमच्या मानसिक स्थितीचा विचार करून औषध देत असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच आकड्यात ( रुपये ६०,०००/- आणि अधिक) पैसे दिल्यावर एक नैतिक जबादारी येते आणि शिवाय कुटुंबाचे सदस्य एवढे पैसे दिले आहेत तर पथ्य व्यवस्थित पाळायला पाहिजे हा सल्ला/"भाषण" देण्यास मागे पुढे पाहत नाहीत. जिम मध्ये सुद्धा केवळ दाबून पैसे भरले आहेत म्हणून जाणारी पानसे कमी नाहीत.
या उलट आपले फॅमिली डॉक्टर १००-२०० रुपयात बराच मोलाचा सल्ला देत असतात. तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला मी तुम्हाला ३०,०००/- रुपये(अर्धेच पैसे) देतो एक वर्षभर(दुप्पट काळ) माझ्या संपूर्ण आहार, पथ्य आणि व्यायामाची काळजी तुम्ही घ्यायची हे म्हणून पहा ते आनंदाने तसे करतील.

प्रतिसाद.
विटूकाका आणि काकू यांचे अभिनंदन! तुमचा मनोनिग्रह आणि सातत्याचे कौतुक वाटते. तुमचे आरोग्यपूर्ण आयुष्य असेच सुरु राहो.

माझ्या मावशीच्या यजमानांना डायबेटीस होता. त्यांचं पथ्य सांभाळून नियमित व्यायाम, संतुलित आणि योग्य आहार, विश्रांती इत्यादींच्या सहाय्याने तिने त्यांना इंसुलीनपासून लांब ठेवले. ते ऐंशीव्या वर्षापर्यंत अतिशय अ‍ॅक्टिव आयुष्य जगले.

डॉ. खरे, डॉ. आनंदी गोपाळ, डॉ. साती या सर्वांचे मनापासून आभार. नात्यात अनेक डायबिटीसधारी असल्याने बर्‍याच गोष्टी कानावर पडलेल्या होत्या परंतु त्यामागील नेमका कार्ककारण भाव कोणता. डायबेटिस मधे नेमकं शरीरात काय होतं यावर नक्कीच जास्त उजेड पडला. माझ्या वडिलांच्या आईला आणि आईच्या वडिलांना डायबेटीस होता आणि अतिशय तीव्र होता. त्यामुळे मी नियमित वार्षिक तपासणीत सगळ्या गोष्टी तपासून घेतो. सुदैवाने व्यायाम आवडतो त्यामुळे चालणे, पळणे, सायकलिंग यातले काहीना काही सुरु असतेच. ते तसंच सुरु ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे माझ्यासाठी अधोरेखित झालं! धन्यवाद!!

मुळात डायबेटीस हा "बरा" झाला तरी एखादी "जखम बरी होणं" असा बरा होत नसून तो फक्त नियंत्रणात असतो, दबून असतो. व्यायाम बंद करुन, खाण्यावरचे नियंत्रण सोडून तुम्ही त्याच्यासाठी फेवरेबल कंडिशन्स निर्माण केल्यात की तो मजेने पुन्हा एकदा तुमच्याशी सलगी सुरु करतो हे समजले! :)

नुसते इंन्सुलीन वाढवून साखर नियंत्रणात राहू शकली तरी त्याचे मज्जासंस्था, किडनीज, हाडे, हृदय इत्यादींवरती हळूहळू होणारे दुष्परिणाम हे केवळ आणि केवळ योग्य जीवनशैलीनेच आटोक्यात राहू शकतात हे महत्त्वाचे समजले. त्यामुळे शरीराचा कारखाना सगळ्या किल्ल्या आणि कुलुपांसहित व्यवस्थित चालायला हवा असला तर व्यायाम आणि योग्य खाण्याला पर्याय नाही! :)

(सध्यातरीकिल्ल्याकुलुपेव्यवस्थितअसलेला)रंगा किल्लेदार