Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चला बर्लीनमध्ये फिरुया ! (उत्तरार्ध)

ल
लिखाळ यांनी
Tue, 09/23/2008 - 03:32  ·  लेख
लेख

Book traversal links for चला बर्लीनमध्ये फिरुया ! (उत्तरार्ध)

  • ‹ चला बर्लीनमध्ये फिरुया ! (पूर्वार्ध)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7880 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

म
मृदुला Tue, 09/23/2008 - 04:19 नवीन

लेख आवडला

चित्रप्रवासाची कल्पना आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 09/23/2008 - 04:44 नवीन

चित्रे सुंदर

चित्रदर्शी फेरफटका मस्तच. संग्रहालयातील चित्रे लाजवाब. नेफेर्तीती (किंवा टेन कमांडमेंट्समधील आणि ममी या टुकारपटातील नेफेर्तीरी) जर्मनीत जाऊन नेफ्रॅटिटस झाली का काय? ;) ही तुतनखामुनची सावत्र आई आहे.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 09/23/2008 - 15:16 नवीन

नेफेर्तीती

नेफेर्तीती हेच बरोबर. मी चुकीचा उच्चार लिहिला..वरच्या लेखात चूक सुधारतो. हा चेहरा आणि त्यावरचे रंग अगदी चांगले राहिलेले आहेत. या पुतळ्याला मजेने 'बर्लीन मधली सुंदर स्त्री' असे म्हणतात. :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Tue, 09/23/2008 - 15:53 नवीन

सुंदर गणली जाते खरी पण....

नेफेर्तीतीचा पुतळा लाजवाब आहे यात शंकाच नाही पण खरी नेफेर्तीती इतकी सुंदर असावी का माहित नाही. मुगुटाने झाकलेले नेफेर्तीतीचे डोके थोडे विचित्र आणि लांबट आकाराचे आहे. परंतु नाकी-डोळी बाई सुंदरच. ;) तिच्या सावत्र मुलाची ही शवपेटी लक्सॉर या लास वेगासच्या हॉटेलातील. खरी नाही - मेड इन चाईना असावी. ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Tue, 09/23/2008 - 16:04 नवीन

खरेतर

खरेतर ती नाकी-डोळी बरी आहे असे समजले तरी त्याच पुतळ्याच्या शेजारी तिचा पूर्णाकृती पुतळा आहे. विकिपेडिआ मध्ये चित्र आहे. (http://en.wikipedia.org/wiki/Nefertiti) Image removed. मला पुतळा आवडला नाही म्हणून मी फोटो काढला नाही :) तीची मान लांब आणि डोके पुढे झुकलेले, तसेच पाठिला थोडे पोक काढुन ती उभी आहे. बहुधा अशक्त झाली असावी :) मला तरी ती सुंदर वाटली नाही. तीच्या चेहर्‍याचा मुखवटा चांगला जतन झाला आहे इतकेच वाटले. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
च
चित्रा Wed, 09/24/2008 - 08:05 नवीन

बर्लिनचे सचित्र दर्शन

आवडले. वरच्या पुतळ्याबद्दल एक शंका (!) हा पुतळा बाकी नग्न असताना पायात काय चपलेप्रमाणे घातले आहे? आधी वाटले की पैंजणांप्रमाणे काही आहे, पण नंतर चप्पल असल्याप्रमाणे वाटले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Wed, 09/24/2008 - 15:32 नवीन

.

आपल्या प्रश्नाचे खरे उत्तर माहिती नाही. पण शैली म्हणूनच अनेकदा विवस्त्र शिल्पे बनवत असतात. आपले निरिक्षण चांगले आहे. पायात चपलाच आहेत. त्या तर्‍हेच्या चपलांचे जोड संग्रहालयात ठेवले देखील होते. आपल्या कोल्हापुरी चपले प्रमाणे कातड्याचे मोठ्या आकाराचे ते जोड होते. एक अंदाज. उकडत असल्याने अंगावर कपडे नसतील पण चालतान खडे बोचुनयेत म्हणून चपला :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
प
प्रियाली Wed, 09/24/2008 - 17:07 नवीन

चपला आणि कपडे

राजे महाराजांचे विवस्त्र पुतळे बनवण्याची इजिप्शियन शैली नसावी असे वाटते. नग्नता ही इजिप्शियन संस्कृतीत वर्ज्य नसली तरीही माणसाच्या हुद्द्या आणि मानाप्रमाणे त्याचे कपडे दाखवले जात. उदा. वेश्या, खेळाडू, नर्तकी, मल्ल इ. नग्न दाखवले जात. परंतु श्रेष्ठ कुटुंबातील कोणी नग्न दाखवल्याचे आठवत नाही. (होरसची चित्रे नग्न पाहिली आहेत पण ती त्याच्या बालरूपातील असून त्यात आयसीस आणि होरस या आईमुलाचे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न अधिक वाटतो.) त्यामुळे हा पुतळा नेफेर्तीतीचाच असावा का असे म्हणायला जागा उरते. बहुधा लांब मान आणि लांबुडके डोके त्या पुतळ्याला नेफेर्तीती म्हणून सिद्ध करत असावे परंतु हा पुतळा कधी बनवला गेला त्याचा तपशील सापडला नाही. टोलेमिक काळात जर हा पुतळा बनवला गेला असेल तर नेफेर्तीतीला विवस्त्र दाखवण्याचा घाट घातला असावा कारण ग्रीक संस्कृतीत नग्नतेला (विशेषतः देव, देवता, राजे-राण्या) विशेष महत्त्व असल्याने हा पुतळा त्या काळातील असण्याची शक्यता आहे. मलाही त्या कोल्हापुरी चपलांप्रमाणेच असल्याचे सुचले होते परंतु बहुधा वेताच्या बनल्या असाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Wed, 09/24/2008 - 21:22 नवीन

.

>>राजे महाराजांचे विवस्त्र पुतळे बनवण्याची इजिप्शियन शैली नसावी असे वाटते.....टोलेमिक काळात जर हा पुतळा बनवला गेला असेल....... << ह्म्म्..बरं..असेल .. हे माहित नव्हते. >>मलाही त्या कोल्हापुरी चपलांप्रमाणेच असल्याचे सुचले होते परंतु बहुधा वेताच्या बनल्या असाव्यात.<< उम्म.. ती कल्पना नाही. आणि वेत हे भरपूर पावसाच्या प्रदेशात होत असावेत असा अंदाज.. त्यामुळे कातडे असणे जास्त शक्य वाटते. पण मी संग्रहालयातल्या चप्पला या दृष्टीने पाहिल्या नाहीत. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्राजु Tue, 09/23/2008 - 05:29 नवीन

सहल छान झाली.

चित्रांमुळे जास्ती मजा आली. संग्रहालय खास आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 09/23/2008 - 05:31 नवीन

उत्तम

पूर्वार्ध-उत्तरार्ध एकत्रच वाचून काढले. सचित्र बर्लिनदर्शन आवडले. (प्रवासी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/23/2008 - 08:51 नवीन

मस्त

मस्त चित्रं! बोटीचं आणि राजवाड्यचं चित्रं तर क्लासच... तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 09/23/2008 - 09:04 नवीन

बर्लिनचा चित्रदर्शी प्रवास आवडला!

लिखाळ, आत्ताच दोन्ही भाग एकदम वाचले आणि सर्व प्रकाशचित्रांसह प्रामाणिक वर्णनशैलीतल्या लेखाचा आनंद घेतला. असेच अजून लेख येऊदेत. जगाच्या वेगवेगळ्या भागांची सफर घरबसल्या होते आहे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/23/2008 - 12:25 नवीन

आम्ही फुकटे

लिखाळरावांच्या सोबत आमची बी टुर झाली बसल्या बसल्या या निमित्ताने. नाही त पैशे देउन आम्ही कव्हा जानार? लिखाळ राव अशीच फुकट टुर घडवुन आनत जा आमची. (अप्रवासी) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2008 - 12:36 नवीन

मस्त जर्मनी....

सर्व छायाचित्रे आणि त्यातून दर्शन देणारी सर्व शिल्पे जीवंत वाटतात. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 14:45 नवीन

मस्त

दोन्ही भागांतले फोटो आणि वर्णन एकदम मस्त! पुन्हा एकदा माझ्या बर्लिनमधल्या आठवणी ताज्या झाल्या. (अवांतरः याच पोट्सडॅमच्या ऍस्ट्रॉनॉमिकल इंन्स्टिट्यूटच्या दूर्बिणीमधून नेपच्यून या ग्रहाचा शोध Johann Gottfried Galle याने लावला.) अदिती
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 09/23/2008 - 15:37 नवीन

वा !

माहितीमध्ये भर घातल्याबद्दल आभार. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रियाली Tue, 09/23/2008 - 21:17 नवीन

ऍस्क्लेपायस

हातात साप धरणारा विवस्त्र पुतळा कोणाचा हा प्रश्न सकाळपासून भेडसावत होता. हातात अजगर धरतो तो अपोलो पण अपोलोच्या हातात एक वाद्य असते आणि त्याला तो अजगर वेढे घालून असतो. इथे तर अजगराने काठीला वेढा घातला आहे. ;) शोधाशोध केल्यावर सापडले की हा अपोलोचा पुत्र ऍस्क्लेपायस याचा पुतळा असून तो अपोलोप्रमाणेच धन्वंतरी होता.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 09/24/2008 - 01:27 नवीन

वा

अरे वा ! बरोबर आहे अपोलोच्या हातात वाद्य असते.. याच्या हातात नाही. ते वैद्यकशास्त्राचे चिन्ह याच्याच नावावरुन आहे असे दिसते. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Wed, 09/24/2008 - 01:49 नवीन

हो!

वैद्यकशास्त्राचे चिन्ह याच्यावरूनच आहे. साप म्हणजे जीवंतपणाचे किंवा पुनर्जन्माचे लक्षण. सापाची कात झडते म्हणजे नवे जीवन, पुनर्जन्म. जे केवळ धन्वंतरी देऊ शकतो आणि काठी मला वाटतं की त्याचा या क्षेत्रातील अधिकार दर्शवतो असे काहीसे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Wed, 09/24/2008 - 01:56 नवीन

वा

त्या संकेतांचा अर्थ समजला. साप चिरंजीव असतो असे बहुधा आपल्याकडे सुद्धा मानले जाते असे वाटते. >>काठी मला वाटतं की त्याचा या क्षेत्रातील अधिकार दर्शवतो असे काहीसे आहे.<< अच्छा ! किंवा पेशंट औषध घेऊन पैसे बुडवायला लागला तर काठी हाताशी असावी म्हणून असेल :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Wed, 09/24/2008 - 02:01 नवीन

हाहा!

अच्छा ! किंवा पेशंट औषध घेऊन पैसे बुडवायला लागला तर काठी हाताशी असावी म्हणून असेल
असेल असेल. ;) ही आयडीया मस्तच आहे. सर्व डॉक्टरांनी अवलंबायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ध
धनंजय Wed, 09/24/2008 - 00:27 नवीन

चित्रमय लेख

आवडला. बर्लिन देखो, जर्मनी देखो!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/24/2008 - 00:29 नवीन

मस्त सफर

मस्त सफर घडवलीत, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा