पावसाच्यासरीवर सरी आल्या की वाटते
तु बरसावे असेच रीमझिम रीमझिम
करावे हिरवेगार या ओसाड मनाला
दरवळु द्यावा या देहाचा सुगंध
मंद मंद हलका हलका बेधुंद करत जाणारा
लख्खकन चमकावे तुझ्या तेजाने
मी व्हावे सौदामिनी
तु व्हावेस मुसळधार
अन करावेस तृप्त या मनाला जन्मोजन्मी
या मनाच्या कोपर्यात कुठेतरी
सुप्तेच्छा ही दडलेली
तु शांत करावेस या कासावीस मना
नवी संजीवनी देउनी
मोहाचे धागे विणताना पडावा या जगाचा विसर
नाती ही मनाची गुंफताना दु:खाची छाया ही व्हावी धुसर
तु असेच बरसावे , बरसतच राहेवेस
बळ द्यावे पुन्हा रुजावयाला
या उन्मळुन पडलेल्या जीर्ण देहाला
प्रतिक्रिया
9 Jul 2016 - 10:33 pm | अभ्या..
वाह्हह्हह,
अप्रतिम
9 Jul 2016 - 10:38 pm | स्नेहश्री
मस्तच
9 Jul 2016 - 11:09 pm | नूतन सावंत
सुरेख
9 Jul 2016 - 11:28 pm | एक एकटा एकटाच
मस्तच
9 Jul 2016 - 11:45 pm | नीलमोहर
सुंदर कविता..