साहित्यः
पडवळ अर्धा कि., थालिपीठाची भाजणी किंवा चण्याचे पीठ वाटीभर, दोन टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट, दोन टेबलस्पून, ओले खोबरे, एक चमचा आमचूर पावडर, एक चमचा साखर, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला एक चमचा, तेल पाव वाटी, फोडणीचे साहित्य, मीठ चवीनुसार.
कृती:
पडवळ धुवावे, बिया काढून पातळ काचय्रा कराव्या. कढईत तेल घेऊन नेहमीप्रमाणे मोहोरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. पडवळ फोडणीत घालून परतावे. झा़कण ठेवून दहा मिनिटे मंद गॅसवर वाफ काढावी. तोपर्यंत एका डीशमध्ये भाजणी, दाण्याचे कूट, ओले खोबरे, आमचूर, गोडा मसाला, लाल तिखट, पीठापुरते मीठ घालून सर्व नीट एकत्र करावे. पडवळाला वाफ आली की त्यात मीठ, साखर घालावी. नीट धवळून दोन मिनिटे मीठ साखर पडवळाला लागू द्यावी. आता तयार पीठाचे कोरडे मिश्रण घालून भाजीत मिक्स करावे. एक वाफ येऊ द्यावी. या भाजीत पाणी अजिबात घालायचे नाही. चव बघून मीठ तिखट वाढवावे.
भाजणीमुळे भाजी खमंग होते, पण भाजणी नसल्यास बेसन भाजून वापरावे.


वाचने
12121
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटोवर वॉटरमार्क देण्याचा हा पहिला प्रयत्न आहे
त्याच इसमाने माझीही पाककृती
त्याच इसमाने माझीही पाककृती
पाककृती तीपण पडवळची चोरायची
=))
In reply to पाककृती तीपण पडवळची चोरायची by कंजूस
कुळीथ पीठाचे लाडू ही चोरलीय
पडवळ कधीच आणत नाही.तुझी पाकृ
हो काहीवेळा खूप जून येतं
In reply to पडवळ कधीच आणत नाही.तुझी पाकृ by अजया
हे अशा चोर्या करणारे सद्
तेच म्हणतो
In reply to हे अशा चोर्या करणारे सद् by आनंदी गोपाळ
मस्त रेसीपी.. करुन बघेन
नक्कीच मलाही वाटत होते.
अय्यो प्रमोद तांबे?? आणि टी
नाही ते वेगळे
In reply to अय्यो प्रमोद तांबे?? आणि टी by त्रिवेणी
अनन्या मस्त पाकृ.
मस्तं आहे भाजी.
मस्त पाकृ! आवडती भाजी.
धन्यवाद!
माझ्याही खुप रेसिपीज, फोटो
पडवळ भाजी छान.
वेगळी पाकृ
छान लागेल ही भाजी.
पडवळ ऑल टाईम फेवरेट पण सासरी
या मागचं लॉजिक समजलं नाही.
In reply to पडवळ ऑल टाईम फेवरेट पण सासरी by विशाखा राऊत
पडवळ रस भाजी
मी कधीच पडवळ खात नाही. पण आता
नाही अजून!
In reply to मी कधीच पडवळ खात नाही. पण आता by पिलीयन रायडर
पडवळाची भाजी आमची सौ. हि मस्त
अनन्न्या... पडवळ अफलातुन
हे छान झाले!