Skip to main content

पडवळाची सुकी भाजी (भाजणी पेरून)

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 29/06/2016 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पडवळ अर्धा कि., थालिपीठाची भाजणी किंवा चण्याचे पीठ वाटीभर, दोन टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट, दोन टेबलस्पून, ओले खोबरे, एक चमचा आमचूर पावडर, एक चमचा साखर, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला एक चमचा, तेल पाव वाटी, फोडणीचे साहित्य, मीठ चवीनुसार. कृती: पडवळ धुवावे, बिया काढून पातळ काचय्रा कराव्या. कढईत तेल घेऊन नेहमीप्रमाणे मोहोरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. पडवळ फोडणीत घालून परतावे. झा़कण ठेवून दहा मिनिटे मंद गॅसवर वाफ काढावी. तोपर्यंत एका डीशमध्ये भाजणी, दाण्याचे कूट, ओले खोबरे, आमचूर, गोडा मसाला, लाल तिखट, पीठापुरते मीठ घालून सर्व नीट एकत्र करावे. पडवळाला वाफ आली की त्यात मीठ, साखर घालावी. नीट धवळून दोन मिनिटे मीठ साखर पडवळाला लागू द्यावी. आता तयार पीठाचे कोरडे मिश्रण घालून भाजीत मिक्स करावे. एक वाफ येऊ द्यावी. या भाजीत पाणी अजिबात घालायचे नाही. चव बघून मीठ तिखट वाढवावे. भाजणीमुळे भाजी खमंग होते, पण भाजणी नसल्यास बेसन भाजून वापरावे. bhaji

वाचने 12121
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

आपल्याच मिपाचा सदस्य असलेल्या एकाने माझी पाकृ आपलीच म्हणून चेपुवर पोस्ट केलीय, म्हणून हा प्रयत्न. काही बदल हवे असल्यास सुचवा.

त्याच इसमाने माझीही पाककृती फोटोसकट टाकलिये अर्थातच आपलीच म्हणून.खवय्येगिरिचि हौस अशी भागवत आहेत. बाकी भाजि छान दिसतेय.

त्याच इसमाने माझीही पाककृती फोटोसकट टाकलिये अर्थातच आपलीच म्हणून.खवय्येगिरिचि हौस अशी भागवत आहेत. बाकी भाजि छान दिसतेय.

म्हणून मी या पाकृवर वॉटरमार्क टाकण्य्चा प्रयत्न केलाय.आता तुम्हाला नाव पण सांगते आम्ही सारे खवय्ये मध्।ऐ घेतलीय पोस्ट!

In reply to by अजया

त्याला दोर येतात, चिरले जात नाही. कोवळे पडवळ कडक नसते. काहीलोक घेताना त्यात नख खुपसून बघतात्,पण असे करायला भाजीवाले तयार होत नाहीत.

In reply to by आनंदी गोपाळ

तेच म्हणतो ते चोर्‍या करायला लाजत नाहीत मग तुम्ही तरी त्यांचे नाव कशाला लपवता. अशा लोकांना उघडे पाडलेच पाहिजे.

बय्राच भाज्या करताना तीच तीच पध्दत वापरून एकाच चवीचा कंटाळा येतो,म्हणून थोडा बदल!

In reply to by विशाखा राऊत

या मागचं लॉजिक समजलं नाही. एक पडवळ आणखी एक इतरांच्या आवडीची अशा दोन भाज्या करायला काय हरकत असते?

मी पण पडवळाची भाजी करते पण बेसन घालून. तसेच बिरड्या ( मोड आलेले वाल) घालूनही रस भाजी छान होते.तिखट,मीठ गोडा मसाला व फोडणी नेहमीप्रमाणे करणे. वरून वाढताना ओले खोबरे कोथिंबिर घातली की कलरफूल मस्त भाजी होते.

मी कधीच पडवळ खात नाही. पण आता हा फोटो पाहुन कदाचित खाईन असं वाटतय. ते चोरीला गेलेले लेख काढले का त्या ग्रुपवरुन?

पडवळाची भाजी आमची सौ. हि मस्त करते. तिच्याच मुळे हि भाजी खायला शिकलो. खरे तर स्वत: कृती केल्या शिवाय कधीच टाकली नाही पाहिजे. टाकण्या पूर्वी ताजी करून बघितली पाहिजे. बाकी चोरी करणार्यांचे नाव जाहीर केलेच पाहिजे. त्यांना जाब हि विचारला पाहिजे.

अनन्न्या, पडवळाची भाजी भाजणी पिठ पेरुन करुन बघितली.. ए वन. खूपच खुमासदार झाली होती. पडवळ म्हटंल कि कडवे वाल घालुन भाजी हे समिकरण बाजुला ठेवुन पिठ पेरुन भाजी छान झाली होती. रेसिपी साठी धन्यवाद. --मयुरा

कोणी करून पाहिली लगेच की उत्साह येतो नविन नविन करण्याचा!