माझी ज्यूरी ड्यूटी ५

शेंडेनक्षत्र's picture
शेंडेनक्षत्र in जनातलं, मनातलं
13 Apr 2016 - 8:25 pm

भाग ४

अमेरिकेतील कोर्टातील एक विचित्र जुनाट पद्धत म्हणजे जे काही कामकाज होते आहे ते एक लेखनिक अर्थात स्टेनोग्राफर लिहून घेत असतो. त्याला कोर्ट रिपोर्टर म्हणतात. अगदी शॉर्टहॅंड वापरले तरी तासनतास असे लिहिणे दमवणारे असणर. त्यामुळे कोर्टाचे कामकाज एक दीड तासापेक्षा जास्त सलग चालत नसे. जज छोटी का होईना पण सुट्टी देत असे. त्यामुळे ज्युरीचे काम फार दमवत नसे. अशी जुनी पद्धत आज अमेरिकेत का आहे हे एक न उलगडलेले कोडे आहे. सगळ्या कामाचे ध्वनी वा चित्रमुद्रण करणे व ते संग्रह करणे हे सहज शक्य आहे. पण तसे केले जात नाही. कदाचित अजून पन्नास वर्षांनी तसे होईलही !

तर आता विविध साक्षीदार येऊन आपापल्या साक्षी देऊ लागले. पहिल्यांदा पोलिस अधिकारी जो ह्या गुन्ह्याच्या तपासाकरता नेमला होता त्याची साक्ष झाली. सिनेमा वा मालिकांमध्ये जसे बारकाईने तपास करणारे पोलिस असतात तसे इथे नव्हते. अगदी जुजबी तपास केल्याचे दिसत होते. उदा. त्या बारमधील कुणाची विचारपूस केली नव्हती. तिथे कुठले कॅमेरे आहेत का ते तपासले नाही. आरोपीच्या ऑफिसच्या आसपास विचारपूस केली नाही. तिथे काही लहान घरे होती (मोबाईल होम्स). इतक्या रात्री इतके हिंसक काही घडले असेल तर कदाचित कोणाला तरी काही ऐकू आले असते पण तसे शोधायचा प्रयत्न झाला नाही. नंतर असे कळले की त्या शहरात सरकारकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे पोलिसांची संख्या कमी आहे आणि गुन्ह्याच्या तपासाकरता फार अनुभवी पोलिस मिळत नाहीत. त्यामुळे जवळपास एक तास साक्ष देऊनही त्यातून फार काही माहिती मिळाली नाही.

मग पीडित महिलेची साक्ष. ही अर्थातच अत्यंत महत्त्वाची होती. ही महिला मेक्सिकन, ३० वर्षाची होती. तिचे पूर्ण नाव सांगितले गेले नाही. जेमतेम ५ फुट उंच. कपडे वगैरे व्यवस्थित होते. एक म्हणजे तिने आपली साक्ष स्पॅनिश भाषेतून द्यायचे ठरवले होते. बहुधा इंग्रजी भाषेत बोलता येईल इतपत आत्मविश्वास नव्हता किंवा आपण असहाय आहोत हे ठसवायला तसे केले असेल. हे करायला परवानगी असते. मग एक दुभाष्या नेमला जातो. ज्युररना सुचना असते की फक्त इंग्रजीत अनुवादित भागाकडेच लक्ष द्यायचे आणि तेच ग्राह्य मानायचे. जरी स्पॅनिश कळत असले तरी त्या भाषेतील बोलणे ऐकायचे नाही. त्याचा आपल्या परीने अनुवाद करायचा नाही. त्यामुळे हिची साक्ष म्हणजे एक दिव्य होते. प्रत्येक वाक्याचे, प्रश्नाचे (अगदी सुरवातीला शपथ घ्यायची असते तिथपासून) भाषांतर केले जाणार. बाई स्पॅनिश उत्तर देणार. त्याचा अनुवाद होणार आणि मग आम्हाला कळणार. जर तिला कळले नाही तर कळले नाही हे स्पॅनिशमध्ये म्हणणार मग अनुवाद वगैरे. त्यामुळे कोर्टाचे कामकाज थोडे कमी वेळ चालायचे आणि छोटी सुट्टी मिळायची कारण तो दुभाष्या आणि लेखनिक दोघेही दमायचे!

सरकारी वकिलाने प्रथम प्रश्न विचारले. ती स्त्री ५-६ वर्षे अमेरिकेत रहात होती. सुरवातीला दोन तीन बारमध्ये मद्यसेविका (बारमेड) म्हणून काम केले. आता सबवे मध्ये काम करत होती. ती त्या घटनास्थळी म्हणजे बारमध्ये एका मित्राबरोबर आली होती. काही कारणाने तो मित्र निघून गेला. मग दुसरे कुणीतरी ओळखीचे लोक भेटले त्यांच्या बरोबर बियर प्यायली. बार बंद होता होता ती बाहेर पडली. तेव्हा आरोपी तिला भेटला. त्यांचे बोलणे झाले. त्याने
तिला विचारले की "तू मेक्सिकोची आहेस का?" पण मग अचानक त्याने तिला धमक्या द्यायला सुरवात केली. "माझ्या ट्रकमध्ये बस नाहीतर तुला ठार मारीन". "माझे लोक आसपास आहेत." बार बंद होत आला होता त्यामुळे आसपास कुणी नव्हते. मग ही घाबरली. ती असेही म्हणाली की आरोपी म्हणाला "इथले पोलिस माझ्याकरताच काम करतात त्यामुळे पोलिसाना बोलावून काही उपयोग होणार नाही."
पण तरी तिने हिम्मत करून असे सांगितले की मी तुझ्या ट्रकमधे येणार नाही. मग आरोपीने तिला त्याच्या ट्रकमागे यायला सांगितले . ती नाईलाजाने त्याच्या मागे गेली. तिने असाही दावा केला की एक दोन कार तिच्या कारच्या मागे पाठलाग करत होत्या. मग आरोपी बॅँकेत गेला. तिथे पैसे काढू लागला. ते झाल्यावर ती पुन्हा त्याच्या मागोमाग गेली. त्याच्या ऑफिसला पोचल्यावर त्याने ट्रक थाम्बवला. तीही थाम्बली. तिने मला जाऊ दे वगैरे सांगितले पण आरोपीने ऐकले नाही. तिला जबरदस्तीने ट्रकमधे आणले. तिचे कपडे ओरबाडून काढले. तिच्यावर अत्याचार केले. मध्ये तिने पळून जायचा प्रयत्न केला. तिच्या अंगावर कपडे नव्हते. तिच्या उंच टाचांच्या बुटामुळे तिला पळता आले नाही. आरोपीने तिचा थोडासा पाठलाग करून तिला पकडले. तिचा गळा दाबला. ती जवळपास बेशुद्धच झाली. मग तिचे केस धरून ओढत ट्रकमधे नेले आणि पुन्हा अत्याचार केले. काही वेळाने तिला सोडून दिले. मग तिने पोलिसाना कळवले. पोलिस लगेच आले. तिला हॉस्पिटल मध्ये तपासणी करता नेले. आणि मग केस दाखल झाली.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

आतिवास's picture

13 Apr 2016 - 9:15 pm | आतिवास

प्रत्येक भागावर प्रतिसाद देत नसले तरी लेखमाला आवर्जून वाचते आहे, नवा अनुभव कळतो आहे.

लालगरूड's picture

13 Apr 2016 - 10:16 pm | लालगरूड

નવીન માહિતી. ધન્યવાદ

अजया's picture

13 Apr 2016 - 10:26 pm | अजया

वाचतेय. पुभाप्र

बोका-ए-आझम's picture

13 Apr 2016 - 10:57 pm | बोका-ए-आझम

सगळ्या कामाचे ध्वनी वा चित्रमुद्रण करणे व ते संग्रह करणे हे सहज शक्य आहे. पण तसे केले जात नाही. कदाचित अजून पन्नास वर्षांनी तसे होईलही

कोर्ट टीव्हीवर कामकाज दाखवलं जातंच ना.

शेंडेनक्षत्र's picture

13 Apr 2016 - 11:08 pm | शेंडेनक्षत्र

आमच्या केसचे चित्रीकरण होत नव्हते हे नक्की. कुठल्या खटल्याचे असे चित्रीकरण केले जाते ते मला माहित नाही. काही राज्यात तसे होत असेल. कदाचित खूप गाजलेल्या खटल्यासाठी न्यायाधीशाच्या परवानगीने तसे केले जात असेल. पण अर्थात ते चित्रीकरण कोर्टाच्या कामकाजाची अधिकृत नोंद म्हणून समजले जाते का ह्याची खात्री नाही. बहुधा नाही.

बोका-ए-आझम's picture

14 Apr 2016 - 9:26 am | बोका-ए-आझम

या गाजलेल्या खटल्यापासून चित्रीकरणाची सुरूवात झाली असावी बहुतेक. अनेक प्रसिद्ध खटले, उदाहरणार्थ एखाद्या सीरियल किलरवरचा किंवा एखाद्या सेलिब्रिटीवरचा - चित्रित केले जातात. अर्थात प्रत्येक राज्यात नियम वेगळे असणारच. कोर्ट टीव्ही ही संकल्पना मला वाटतं कॅलिफोर्निया, अॅरिझोना, टेक्सास आणि वाॅशिंग्टन या राज्यांमध्ये आहे. चूभूद्याघ्या.

उगा काहितरीच's picture

13 Apr 2016 - 11:44 pm | उगा काहितरीच

वाचतो आहे.

एस's picture

13 Apr 2016 - 11:44 pm | एस

वाचतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2016 - 1:09 am | डॉ सुहास म्हात्रे

वाचतोय. प्रत्यक्ष अनुभव असल्याने खूप रोचक वाटतो आहे. पुभाप्र.

"सगळ्या कामाचे ध्वनी वा चित्रमुद्रण करणे व ते संग्रह करणे हे सहज शक्य आहे. पण तसे केले जात नाही. " - इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्क्रिप्शन वापरून (प्रायोगिक तत्वावर) पुन्हा कोर्ट रिपोर्टर कडे वळले आहेत. "Some jurisdictions have chosen to experiment with recording systems. However, they have found that using recording systems in criminal or civil cases frequently causes court delays, increased costs, and equipment failures that result in expensive retrials. Recording systems require constant maintenance and upgrades as technology improves, resulting in unanticipated expenses to the court and increased personnel." - आंतरजालावरून.

तर्राट जोकर's picture

14 Apr 2016 - 11:50 pm | तर्राट जोकर

अस्साच विचार करत होतो. लार्ज स्केलवर मेन्टेनन्सचा इशु होतो.

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2016 - 2:41 am | श्रीरंग_जोशी

प्रत्यक्ष अनुभवावर बेतलेली लेखमालिका रंगत चालली आहे.

नाखु's picture

14 Apr 2016 - 4:24 pm | नाखु

सहभाग असल्याने खाचाखोचा सहीत साद्यंत वर्णण येणार आणि तीच खासीयत आहे या मालिकेची !

पु भा प्र

दुर्दैवाने या केसमधील पीडितेचं निधन झालेलं आहे.
http://www.dnaindia.com/india/report-park-street-rape-case-all-five-accu...

विवेक ठाकूर's picture

14 Apr 2016 - 11:11 pm | विवेक ठाकूर

पण खटल्याचा निकाल लोकांवर सोडणार नाहीत हे तरी काय कमी!

भाग इतके संक्षिप्त आहेत की श्वास रोखण्याऐवजी वाचकांनी प्रतिसाद रोखलेत की काय अशी शंका येते.

बाय द वे, पैशाच्या बाबतीत फिसकटलं की राजीखुशीनं चाललेल्या कामात बलात्काराचा आरोप होतो, हा सर्वमान्य निष्कर्ष आहे.

जुइ's picture

14 Apr 2016 - 11:31 pm | जुइ

वाचते आहे!