व्हिक्टोरिया स्पॉंज संत्रा केक

सप्तरंगी's picture
सप्तरंगी in पाककृती
17 Mar 2016 - 3:54 am

व्हिक्टोरिया स्पॉंज संत्रा केक

साहित्य
२००gm कॅस्टर शुगर
२००gm बटर
२०० gm सेल्फ रायझिंग फ्लोर
४ अंडी (मिडीयम साईझ)
१ tsp बेकिंग पाउडर
२ tbsp संत्रा जुस / २ tb sp दुध
vanilla इसेंस

कृती :

१. अंडी दुप्पट होईपर्यंत ब्लेंडरनी फेटून घ्या. बटर-साखर वेगळे फेटा. सेल्फ रायझिंग फ्लोर आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या.
२. ओव्हन १८० डिग्री c वर गरम करा , केकपात्र तेल लावून तयार ठेवा.
३. सगळे जिन्नस क्रमाक्रमाने (अंडी, बटर-साखर, मैदा आणि मग इतर ) अगदी बिनधास्त एकत्र करा.
४. ओव्हन मध्ये केकपात्रात अंदाजे ४० मिनिटे बेक करा. प्रत्येकाच्या ओव्हन च्या क्षमतेनुसार थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो. पण केक हमखास चांगला होतो.
५. केक तर तयार होतो. एकच प्रोब्लेम आहे. केक बघण्याचे सुख घरातले लोक फार काळ टिकू देत नाहीत.
आयसिंग लिहिते आणि टाकते.

व्हिक्टोरिया स्पॉंज संत्रा केक हमखास चांगलाच बनतो

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2016 - 6:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक फोटोळी धागा? रेसिपी टाकायची राहिलीये का?

गौरी लेले's picture

17 Mar 2016 - 9:50 am | गौरी लेले

अहा , काय सुंदर दिसतोय नै , नुसते पाहूनच तोंडाला पाणी सुटले।

अय्या, गौरीआत्या तूऽऽऽ? कशीयेस गोऽऽ?

पाककृती कुठाय? नुसता फोटू पाहून जळजळ होते ना..

सप्तरंगी's picture

17 Mar 2016 - 11:49 am | सप्तरंगी

म्हणल थोडी जळजळ झाली कि लिहेन पाककृती.

सप्तरंगी असा फक्त फोटो टाकत जाऊ नका.केकची पाककृती किंवा कुठे खाल्ला अशी काहीतरी माहिती स्वतंत्र धागा काढताना अपेक्षित असते.पाकृ अजूनही द्या प्रतिसादात.धाग्यात अॅड करता येईल.

बाळ सप्रे's picture

17 Mar 2016 - 10:56 am | बाळ सप्रे

व्हिक्टोरिया स्पॉंज संत्रा केक हमखास चांगलाच बनतो

हो पण कसा करायचा ते तर सांगा..

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2016 - 11:19 am | प्रसाद गोडबोले

खरे तर व्हिक्टोरिया म्हणले की डोळ्यासमोर व्हिक्टोरियाचं येते .... ;)

पण ते असो ... केक ही काही वाईट नाही :)

सप्तरंगी's picture

17 Mar 2016 - 11:47 am | सप्तरंगी

आता व्हिक्टोरियाला expect कराल तर केक तितका चांगला कसा वाटणार? व्हिक्टोरिया चा दोष, माझ्या केकचा नाही :)

सप्तरंगी's picture

17 Mar 2016 - 11:43 am | सप्तरंगी

२००gm कॅस्टर शुगर
२००gm बटर
२०० gm सेल्फ रायझिंग फ्लोर
४ अंडी (मिडीयम साईझ)
१ tsp बेकिंग पाउडर
२ tbsp संत्रा जुस / २ tb sp दुध
vanilla इसेंस

कृती :
१. अंडी दुप्पट होईपर्यंत ब्लेंडरनी फेटून घ्या. बटर-साखर वेगळे फेटा. सेल्फ रायझिंग फ्लोर आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या.
२. ओव्हन १८० डिग्री c वर गरम करा , केकपात्र तेल लावून तयार ठेवा.
३. सगळे जिन्नस क्रमाक्रमाने (अंडी, बटर-साखर, मैदा आणि मग इतर ) अगदी बिनधास्त एकत्र करा.
४. ओव्हन मध्ये केकपात्रात अंदाजे ४० मिनिटे बेक करा. प्रत्येकाच्या ओव्हन च्या क्षमतेनुसार थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो. पण केक हमखास चांगला होतो.
५. केक तर तयार होतो. एकच प्रोब्लेम आहे. केक बघण्याचे सुख घरातले लोक फार काळ टिकू देत नाहीत.
आयसिंग लिहिते आणि टाकते.

हा केक अंडं न घालता करता येईल का?

सप्तरंगी's picture

17 Mar 2016 - 4:06 pm | सप्तरंगी

मी कधीच नाही करून पहिला बीन अंड्याचा केक , पण ऐकलय कि जवसाची पुड , दही वापरता येते, अंड्याऐवजी !

रातराणी's picture

17 Mar 2016 - 11:50 am | रातराणी

कसला भारी दिसतोय! ते संत्र इतकं छान कसं सोललय?

सप्तरंगी's picture

17 Mar 2016 - 4:11 pm | सप्तरंगी

विशेष काही नाही , संत्राचे साल काढून चकत्या केल्या आहेत.

चांदणे संदीप's picture

17 Mar 2016 - 3:37 pm | चांदणे संदीप

नुसता खाद्यपदार्थाचा फोटो टाकायचा आणि खाली लिहायचं..... "अमुक ढमुक हा पदार्थ हमखास चांगलाच बनतो!" झालं, बनवा नायतर बस्सा! ;) ही आयडिया एकदम आवडली. मीही असा पाकृचा धागा काढणार लौकरच! ;)

यानिमित्ताने, अशी वेगळी आयडिया असणारी आर माधवनची एक जुनी ॲड आठवली!

Sandy

सप्तरंगी's picture

17 Mar 2016 - 4:09 pm | सप्तरंगी

हा हा , अहो टाकली हो, पाककृती, कॉम्मेंत्स मध्ये , आता करा केक नाही तर बसा, हेहे !

श्रीरंग_जोशी's picture

17 Mar 2016 - 11:33 pm | श्रीरंग_जोशी

नेहमीपेक्षा वेगळ्या केकची पाककृती आवडली.
फोटो एकदम दिलखेचक आहे.