वस्तुतः मानवजातीला सोने जड जवाहीर्यांसारख्या चकाकत्या वस्तुंच्या आकर्षणाचे रहस्य मानववंशास्त्राला अद्यापी पुर्णतया उलगडले नसावे. बाकी जगातल्या लोकांना सोन्याचे वेड नसतेच असे नाही पण त्यात संपत्ती प्रेम अधिक आहे, भारतीयांच्या सुवर्ण प्रेमाचे स्वरुप आभूषण प्रेमाचे असावे. भारतीयांचे आणि त्यातही भारतीय स्त्री आणि त्यानंतर भारतीय अदृश्यस्रोतोद्गम सुवर्णप्रदर्शक पुरुषधनींचे ही पिवळ्या चकाकत्या धातूवर एवढे प्रेम एवढे वरचढ आहे की सोन्याच्या बाजारपेठेतील जागतीक किमतीची चढ उतार भारतातल्या लग्नांच्या मोसमावर ठरते, आणि सोन्याने तुम्हाला वेडे केले आहे टिकेनी म्हटले तरीही, भारतीयांना आपल्या पाठीवर शाबासकीची थाप पडल्यासारखे कौतुक वाटते.
ऐतिहासिक काळापासून जागतीक व्यापारात निर्यात करण्याच्या बदल्यात भारतीय व्यापारी आणि जनतेने इतर वस्तु घेण्या पेक्षा सोने घेण्यासच प्राधान्य दिले असावे. भारतीय जनतेची सोन्याची मागणी पुर्ण करु शकेल इतपत प्रमाणात सोन्याच्या खाणी भारतात बहुधा इतिहासात सुद्धा राहील्या नसाव्यात, तरीही भारतीय एवढे सोने मिळवत आणि बायकांना आणि देवांना दागिन्याने मढवत कि अफगाणी लूटारुंनी भारतावर सातत्याने हमले केले. बाबराचे आत्मचरित्र र्रेकॉर्डेड आहे आणि तो त्यात भारतात सोन खूप आहे ते मिळवण्यासाठी भारतावर स्वारी करु इच्छित असल्याचे स्पष्ट नोंदवले आहे अर्थात वर म्हटल्याप्रमाणे अफगाण लुटारुंचे सुवर्ण प्रेमाचे स्वरुप संपत्ती प्रेमाचे राहीले असावे. अगदी ब्रिटिश इस्ट इंडीया कंपनीच्या उत्तरार्धा पर्यंत त्यांना त्यांच्या मालाचा मोबदला असो का राजे लोकांचा कर असो तो सोन्याच्याच स्वरुपात चुकवावा लागत असे, आणि भारतीयांच्या सुवर्णप्रेमाने ब्रिटीशही हवालदिल होत.
जोपर्यंत भारत निर्यात अधिक होती आयातीची गरज नव्हती तोपर्यंत चालुन गेले, वसाहत-उत्तर काळात भारताची निर्यात कमी झाली इतर आयात वाढली पण त्यासोबत सोन्याची आयात सातत्याने चालत राहीली म्हणजे परदेशात विकुन निर्यातीचा पैसा मिळवून भारतीय लोक सोन्याची ऐश करत होते त्या एवजी भारतीय सोन्याची ऐय्याशी चालू ठेवण्यासाठी भारतातला पैसा आम्ही परकीयांना देऊ लागलो आणि आजही हे चालुच आहे.
भारतात शेती जशी वाढत गेली तसे धर्मग्रंथात काहीही लिहिले असो शेती नांगरण्यास बैल लागतात आणि म्हणून भारतीयांनी बदलत्या काळानुसार गोहत्या बंदीचा आग्रह भारतभर स्विकारला. पण सोन्याच्या बाबतीत रामायणात सुवर्ण मृगाची कथा येते तर बौद्ध जातकांमध्ये मेल्यावरही सुवर्ण पिसे लेऊन येणार्या पती आणि सुवर्णप्रेम न संपणारी त्याची विधवा रुपक कथेतून सुवर्ण प्रेमाची मर्यादा सांगण्याचा धार्मिक ग्रंथांनी उल्लेख केले पण भारतीय स्त्रीने त्याकडे व्यवस्थित दुर्लक्ष करुन सुवर्ण प्रेमाचा वारसा शतकोंशतके व्यवस्थीत जपला, मग तिकडे रिझर्व बँकेचा गवर्नर आणि देशाचे अर्थमंत्रालय त्यांच्या समोर येणारे पेच कसे का सोडवेनात.
पैसा शक्यतो कर भरलेला असावा, पण एकवेळ कर न भरलेला पैसा असेल तरी चालेल तो किमानपक्षी देशात रहायला हवा, सोन्याच्या आयातीसाठी देशातून जो पैसा मोजला जातो तो साराच्या सारा देशा बाहेर जातो. बरे या सोन्याच्या आधारावर काही चार उत्पादने घेतायेतील कारखानदारी वाढेल असे काही नाही, वाढतातती सोन्याची दुकाने आणि सोन्याचे स्मगलींग आणि बेकार चोरांकडून नित्याच्या सोनसाखळीच्या चोर्या. स्वदेशीचा आग्रह धरताना भारतीय माणूस सोन्याच्या बाबतीत स्वदेशीचा आग्रह धरताना दिसत नाही, सोन्याची गोष्ट आली की आमचे देशप्रेम का कोण जाणे बरेच पातळ होते. युरोमेरीकन ज्या वस्तुंची गरज आहे त्या उत्पादक देशांवर स्रोत मिळवण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हुकुमत तरी गाजवतात भारतीय तेही करत नाहीत.
आमेरीकेत जाऊन आलेल्या काही महिलांना आपापसात बोलताना ऐकलय की तिकडे असताना सोन्याचे दागिने घेण्याचा घालण्याचा तेवढा मोह होत नाही पण भारतात आले की सोन्याच्या दागिन्यांचा पुन्हा मोह होतो. म्हणजे दोष त्यांचे भार्तीय स्त्री असण्याचा नसावा आमेरीकेच्या हवेत नसलेला काही दोष भारताच्या मातीत, पाण्यात किंवा भारतीय हवेत असेल का ? कि भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम याचे अजून काही वेगळे रहस्य असेल.
वाचने
11142
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
आशयाशी सहमत
लेखाशी आणि श्रीरंगजीच्या
In reply to आशयाशी सहमत by श्रीरंग_जोशी
भारतात बँकांच्या लॉकर्समध्ये
In reply to आशयाशी सहमत by श्रीरंग_जोशी
सुवर्ण अलंकारांनी भारतीय
बहुसंख्य महिलांच्या बाबत खरे आहे
स्त्रीयांच्या नावावर
In reply to बहुसंख्य महिलांच्या बाबत खरे आहे by पैसा
पहिल्या फोटोतली कन्या मल्लू
In reply to बहुसंख्य महिलांच्या बाबत खरे आहे by पैसा
दोन्ही
In reply to पहिल्या फोटोतली कन्या मल्लू by सूड
अगदि सेम.मीहि अशीच वैतागलीये.
In reply to बहुसंख्य महिलांच्या बाबत खरे आहे by पैसा
आणखी काही उदाहरणे
सहज गंमत!
In reply to आणखी काही उदाहरणे by श्रीरंग_जोशी
अरे वा
In reply to सहज गंमत! by चांदणे संदीप
च्यायला दळभद्री तरी कसे
In reply to सहज गंमत! by चांदणे संदीप
आपण बावळट दिसतो हे कळत नाही
In reply to आणखी काही उदाहरणे by श्रीरंग_जोशी
+१ :)
In reply to आपण बावळट दिसतो हे कळत नाही by पिलीयन रायडर
लेख आवडला. त्या सोबत सोने हि
त्या सोबत सोने हि मिळाले असते
In reply to लेख आवडला. त्या सोबत सोने हि by विवेकपटाईत
शीर्षक वाचून मला वाटले
कोन बोल्तो सोना फक्त लेरीज
साईबाबा, तिरूपती बालाजी ह्या