मावशी... मीनल मावशी

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
22 Feb 2016 - 5:08 pm

आईची बालमैत्रीण...
पूर्ण नाव मीनल कवळे.
लग्ना आधीचं मीनल राउत.

मुळची आक्षीची...
आई आणि ती खुप धमाल करायचे म्हणे, कबड्डी चैंप होती म्हणे! नेशनल लेवल पर्यन्त मजल!... आई आणि मावशी आणि ग्रुप सायकल चालवायचे आक्षिच्या अरुंद रास्त्यांवरून आणि मी त्यांना बघुन घराच्या फाटकावर रडरड रडायचो... हा सीन अगदी नीट आठवतो मला, एकूणच सॉलिड मैत्री!

लकीली लग्न होऊन मावशी बोरिवलीत आली...
आम्ही ही बोरिवलीतच राहायचो, शाळेच्या ५मिनट अंतरावर मावशी आणि १५मिंटावर आमचं, त्यामुळे शाळा झाली की आई मावशी कडून मला घ्यायला यायची... आई माझ्या 'प्रगती'पुस्तकावर खुश नसायची म्हणून माझी शिकवणी मावशी कड़े... कारण ती घ्यायची शिकवणी.. भले भले टोणगे घाबरायचे तीला, तीने डोळे मोठे केले की अंगातली सगळी मस्ती उन्हातल्या बर्फासारखी वितळायची, पुढे आई क़तारला गेली... मी मावशी कड़े होतो राहायला, जवळ जवळ वर्षभर असेन... मीनल मावशीला एक लहान मुलगी होती, मनाली... तीला आणि मला कधीच कमी पडून दिलं नाही कुठल्याच बाबतीत, आईने चेक दीलेला परत केलेला आठवतोय मला! अगदी 'खरी' मैत्रीण आईची!

तीचं सासर म्हणजे जलपाड़ा,
त्यामुळे सुट्टीत जलपाडाला जायचो आम्ही...
आक्षी सारखीच तिथेही धमाल असायची!
काकांची हीरो होंडा सीडी१०० होती,
टाकिवर मी मग काका मध्ये मनाली आणि मावशी असे फीरायचो आम्ही बोरिवलीत...
गोराई खाड़ी, आमचं फेवरिट ठिकाण,
बाहेर खाण्याबद्दल खुप स्ट्रिक्ट कारण मुंबईत खराब पाण्या/खाण्या मुळे साथी वगैरे खुप... त्यामुळे कॉलोनी मध्ये भेळ वाला आला तर जवळ जवळ सर्व जण त्याच्या अजुबाजुला गर्दी करून भैया-भैया करायचे... मी हे सागळ खिड़कीतून ऊंची कमी असल्यानी पायाला स्ट्रेच मारत बघत बसायचो...एकदा मला विचारलं मावशीने की तुला हव्ये का भेळ! मी नाही म्हणालो... कारण मला माहीत होतं की मावशी का नाही घेत भेळ.

बाकी अभ्यासाबाबतीत खुप स्ट्रिक्ट...
प्रोमिस केलेल्या गोष्टी व्ह्यायलाच पाहिजेत... काका पण भलतेच् स्ट्रिक्ट... त्यात पीळदार मिशी!
पेपर वाचायला लावयचे काका, एकदातर काकानी मला विचारलं की महाराष्ट्राचे अमुक अमुक वर्षातले मुख्यमंत्री कोण...
माझ्या चेहऱ्यावरती मोठ प्रश्नचिन्ह पाहुन...
फळ्यावर १००वेळा यशवंतराव चव्हाण हे लिहायला लावले, खुप राग आलेला तेव्हा. हाहाहा... एके दिवशी खरे काकुंकडे गेल्यावर मावशी मला कशी आवडत नाही ह्याचा 'गॉसिप' केलं मी.. लहानपणी काय हो, मनात जे असायचं ते यायचं बाहेर, खरे काकुंनी ही झालेल सर्व 'खरे' 'गॉसिप' सांगितले मावशी ला माझ्या देखत! असला अम्बेरसींग क्षण होता तो माझ्या आयुष्यातला! तोड़ नाही, त्यात माझ्या शाळेतल्या तक्रारी म्हणजे विचारू नका.. आम्ब्रेकर बाइंना...डबल डेकर.. म्हणालो आणि खऱ्यांच्याच मुलानी वर्गाचा मोनिटर ह्या नात्यानी 'खरे'ते सांगितले... त्यामुळे मावशीला दुसऱ्या दिवाशी शाळेतून आमंत्रण! हां मी असा तीला सांभाळायला मिळालो हे तीचे दुर्भाग्यच!

अजुन एक किस्सा आठवाला बघा... हा किस्सा मी तिच्याकड़े राहायला गेल्याच्या अगोदारचा... टॉन्सिल्सचं ऑपरेशन झालेलं तेव्हा आइसक्रीम खाऊन खाऊन इतका वैताग आलेला... मी शेवटी वैतागुन नाही खाणार आता बास... असा निषेध जाहीर केला आणि बेल वाजली, मावशी आइसक्रीम घेऊन आलेली! गपगुमान संपवलं...

पण मनापासून सांगतो, खुप काळजी घ्यायची हो माझी मीनल मावशी! I still owe her alot!!
मध्ये पुण्यात गेलेलो असताना मला मुंबईत यायला जमणार नव्हतं म्हणून स्पेशल मला भेटायला आलेली... खुप मजा आली! २००८ला आम्ही मित्र आई आणि मावशी असे सगळे राजस्थान ला ही गेलेलो, मावशी अजुन आहे तशी आहे.. तरतरीत... तोच आवाज... जुन्या आठवणी किस्से ऐकून-सांगून धमाल केली.

आई मारो न मावशी जगो.. असं उगाच नाही म्हणत!

मीनल मावशी love you... and sorry for the troubl...

wish you the best from life... always!

#सशुश्रीके

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

22 Feb 2016 - 5:16 pm | उगा काहितरीच

चांगल लिहीता आपण ! पणा एक सांगू ? लेखांमधे थोडा गॅप ठेवत जा प्लिज!

होबासराव's picture

22 Feb 2016 - 5:20 pm | होबासराव

काका....नाखुन काका

स्पा's picture

22 Feb 2016 - 6:22 pm | स्पा

इतरांचेही लिखाण वाचा, प्रतिक्रिया द्या, चर्चा करा.

उगा दणादण जिल्ब्या

चांगला लेख. लहानपणी आपण अगदी संवेदनशील असतो, बरीच व्यक्तीमत्व लक्षात रहातात. चांगले मार्गदर्शन मिळाले तर आयुष्य बदलू शकते.

अभ्या..'s picture

22 Feb 2016 - 6:42 pm | अभ्या..

सुंदर प्रतिक्रीया.
मी ह्याचे टेम्प्लेट बनवून ठेवणारे. फारच अप्रतिम शब्द.